Sunday, October 31, 2021

Quiz on Rashtriya Ekta Diwas 2021

Quiz on Rashtriya Ekta Diwas 2021

 

Start Date : 31 Oct 2021, 10:00 am
End Date : 30 Nov 2021, 11:45 pm



About Quiz

On the occasion of celebrating the “National Unity day” on 31st October MyGov has decided to conduct online quiz competition.

The Indian subcontinent was known for its knowledge, traditions and practices in various fields. They have survived till date reflecting the phenomenon of continuity and change. Our rich cultural heritage has been depicted in variety of our art forms, architecture, literature, music, dance and drama.  These rich repositories in tangible and intangible form have been handed down to us both in oral as well as in the form of material remains. They promote a sense of identity, pride as they highlight the knowledge people had in understanding natural as well as the social phenomenon. The ancient system of knowledge mainly consisted of understanding the mysteries of the universe, human interactions with environment, philosophy of life and the significance of conserving the habitat for peace, harmony and sustenance. The glimpses of our in-depth knowledge have been highlighted in the domain of polity, medicine, yoga, astronomy, astrology, life-sciences, arts and crafts, architecture, metallurgy, mining, gemology, shipbuilding, trade and commerce and so on.

The Quiz competition is designed to promote Indian knowledge, traditions and practices for strengthening awareness about our rich heritage and also develop in children a pride for the contributions made in diverse fields.

Rewards:

1. Participation Certificates will be issued to all the participants.

2. Top 3 winners will be rewarded with a Prize Money:
1st Prize money – Rs. 5,000/-
2nd Prize money – Rs.3,000/-
3rd Prize money – Rs 2,000/-

Terms and Conditions

  1. The quiz will be in bilingual format i.e. English and Hindi.
  2.  
  3. Duration of the quiz will be 5 minutes (300 seconds), during which a maximum of 10 questions can be answered.
  4.  
  5. There will be no negative marking for the incorrect answer. Participants can view their score after the last date of the quiz.
  6.  
  7. Only Indian Citizens can participate in the quiz.
  8.  
  9. An individual can participate only once in the quiz.
  10.  
  11. Any individual who desires to participate in the quiz will be required to provide his/her name, date of birth, correspondence address, email address and mobile number.
  12.  
  13. The same mobile number and same Email ID cannot be used more than once for participation in the quiz.
  14.  
  15. Discovery/detection/noticing of use of any unfair/spurious means/ malpractices, including but not limited to impersonation, double participation, etc. during the participation in the quiz, will result in the participation being declared null and void and hence, rejected. The organizers of the quiz competition or any agency acting on their behalf reserves the right in this regard.
  16.  
  17. Employees, directly or indirectly, connected with organizing the quiz are not eligible to participate in the quiz. This ineligibility also applies to their immediate family members.     
  18. CLICK HERE TO ATTEND QUIZ

Saturday, October 30, 2021

🔯 दीपावलि 🔯

भाग -१.

      🔯 दीपावलि 🔯
लेखक - डाॅ.प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)

      दिवाळी हा शब्द मराठी आहे. दिव्यांची आळी म्हणजे दिवाळी. आळी म्हणजे रांग. घरांची रांग असते तिला 'आळी' असे मराठीमध्ये म्हणतात. पण आता हा शब्द आपण मूर्ख माणसांनी हरवून टाकलेला आहे. मराठी माणसेच आता आळीस 'लेन' हा इंग्रजी शब्द वापरतात. मानसिक पारतंत्र्य अजूनहि गेलेले नाही; उलट वाढतच चाललेले दिसत आहे. यास कारण आपलेच लेखक, दूरदर्शन नि वृत्तपत्रे आहेत. त्यांनी जर स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वाभिमान जोपासला असता तर ही वेळ आली नसती. हे आपले जाता जाता निदर्शनास आणतो.

      दीपावलि हा संस्कृत शब्द दीप+आवलि मिळून बनलेला आहे. दीप म्हणजे दिवे. आवलि म्हणजे रांग. *दिपांची रांग लावली जाते असा सण म्हणजे दीपावलि.* दीपावलि हीच मराठीत दिवाळी बनली. दिवाळीत खूप व्यय होतो, त्यापायी जी अवस्था होते तीवरून 'दिवाळे निघणे' हा वाक्प्रचार आलेला असावा. दिवाळे निघण्याची पाळी येऊ नये म्हणूनच लक्ष्मीपूजन साजरे करण्याची प्रथा आली असावी. हे आपले माझे अनुमान आहे हो! त्यास पुरावा नाही.

      दिवाळी या सणास तरी पुरावा कुठे मिळतो? किती शतके दिवाळी चालू आहे हेहि सांगता येत नाही. कारण तशा नोंदी कुठे सांपडत नाहीत. त्यामुळे येथे आपण इतिहासातील पुरावे गोळा करीत अनुमान बांधू.

      दिवाळी ही सणांची आवलि म्हणजेच आळी आहे. लागोपाठ पांच-सहा दिवस हा सण चालतो. वसुबारस हा पहिला दिवस. धनत्रयोदशी हा दुसरा दिवस. दिवस म्हटले खरे, पण दिवसास महत्त्व नसून सायंकाळ महत्त्वाची असते. सायंकाळी दिवे रांगेमध्ये लावावयाचे असतात. नरकचतुर्दशी तिसरा दिवस, लक्ष्मीपूजन चौथा, पाडवा पांचवा तर भाऊबीज हा सहावा दिवस होय. सहा दिवस सण साजरा करणे ही जगातील एकमेव गोष्ट आहे. इतर कुठल्याहि धर्मामध्ये येवढा मोठा सण नाही. याचे कारण येवढा मोठा इतिहासहि इतर कुणा धर्माला नाही. *हिंदु धर्माचा इतिहास पंचवीस सहस्र वर्षे इतका प्रचंड आहे.* म्हणूनच प्रचंड मोठा सण आहे.

      हे सहा दिवस योजण्याचे कारण तैत्तिरीय संहितेमध्ये सांपडते. तैत्तिरीय संहिता म्हणजे *कृष्ण यजुर्वेदाची* तित्तिरी ऋषींनी सांभाळलेली संहिता होय. तैत्तिरीय संहिता निदान दशसहस्र वर्षे इतकी मागे रचलेली आहे. हे मी म्हणतो कारण ती सांगते की कृत्तिका नक्षत्रावर उदगयनारंभ असतो. उदग् म्हणजे उत्तर दिशा. अयन म्हणजे उगवत्या सूर्याची चाल. उगविणारा सूर्य जेव्हा दक्षिणेकडून उत्तरेस वळतो तेव्हा उत्तरायणारंभ असतो. आज हा दिवस २२ डिसेंबरचा असतो. उत्तरायणारंभी तैत्तिरीयकाळी कृत्तिका नक्षत्रात सूर्य असे; पण आज सूर्य मूळ नक्षत्रात असतो. साहजिकच दहा नक्षत्रे सूर्य मागे हटलेला आहे. त्या हटण्याचे कारण परांचन किंवा संपात गति आहे. परांचन गतिमुळे सूर्य नउशे साठ वर्षामध्ये एक नक्षत्र मागे सरकत असतो. तेव्हा दहा नक्षत्रे मागे हटण्यास त्यास दशसहस्र वर्षे लागलेली असली पाहीजेत. साहजिकच तैत्तिरीय संहिता काळ दशसहस्र वर्षापूर्वीचा ठरतो.

      त्या प्राचीन काळी तैत्तिरीय संहिता सांगते की आश्विन मासात सहा दिवस असतात कारण वर्षाचे ऋतु सहा असतात. वेदकाळी चांद्रमास नि चांद्रवर्षे वापरीत तद्वत सौरमास नि सौरवर्षेहि वापरीत तसेच सावन वर्षहि वापरीत असत. सावन नि सौर या दोन प्रकारच्या वर्षांमध्ये सवा पांच दिवसांचा फरक असतो. तो फरक भरून काढण्यासाठी ही योजना असे. सावन वर्ष ३६० दिवसांचे तर सौर वर्ष ३६५.२५ दिवसांचे असते. वेदकालीन सावन वर्ष आजहि परंपरेने आपण वापरीत असतो. म्हणूनच वर्षाचे दिवस ३६० गृहीत धरतो. हे सवा पांच दिवस जमविण्यासाठी आश्विन मासामध्ये सहा दिवस अधिक धरत. त्याचा निर्देश तैत्तिरीय संहितेत आहे. हे सहा दिवस वर्षाचे अखेर धरत; कारण आश्विन मास हा वर्षाचा शेवटचा मास असे. कार्तिक मासीं नववर्ष आरंभत असे. ती परंपरा आपण आजही पाळतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा हा वर्षाचा आरंभ मानण्याची प्रथा इतकी प्राचीन आहे. विक्रम राजाने हीच परंपरा विक्रम संवतामध्ये वापरलेली आहे.
  

Sunday, October 24, 2021

उचल्या

'मार्तंडा, लक्षुमनाला चोऱ्या कराया शिकव, शाळा शिकून आपण काय करणार हाव?' शेजारचे लोक लक्ष्मणच्या बापाला सांगायचे. 

लक्ष्मणलाही शाळा नको वाटायची. शाळेतली पोरं त्याला 'लछमनताता, खेकड्याची आमटी खाता!' म्हणून चिडवत. शाळा सोडली तर 'कुठंही जत्रंला फिरता येईल, चोऱ्या करता येईल, चांगलं राहता येईल, चांगलं खाता येईल' असं लक्ष्मणला वाटे. 

पण तो चोरी करायला भ्यायचा कारण पकडलं गेल्यावर पोलिसांच्या माराची भीती राहायची. 

संतराम आणि तुकाराम माणिकला, म्हणजे लक्ष्मणच्या मोठ्या भावाला, घेऊन नदीवर गेले. भर दुपारची वेळ. वाळू प्रचंड तापलेली. अनवाणी माणिकला वाळूवरून चालता येईना. 

संतरामने अचानक माणिकला उचलून वाळूवर टाकलं. तुकारामने त्याचे कपडे उतरवले. उघड्या-नागड्या माणिकला तापलेल्या वाळूत त्यांनी रेंगसू रेंगसू घेतलं. माणिकच्या अंगावर लाथा-बुक्क्यांचा मार पडत होता. ते कमी होतं म्हणून दोघांनी माणिकच्या तोंडात व गांडीत मिरचीची पूड टाकली. मार खाऊन बेजार झालेला माणिक चड्डीत हागल्या-मुतल्यावरच त्याची सुटका झाली. 

तसे संतराम आणि तुकाराम माणिकचे नातेवाईक. त्यांनीच माणिकला चोरी करायला शिकवलेलं. आताची मारहाण सरावासाठी होती. अशा माराची सवय लागल्यावर कोणताही उचल्या पोलिसांपुढे तोंड उघडत नसे. 

घरचे लोक इतके मारायचे की त्या मारहाणीपुढे पोलिसांचा मार काहीच वाटत नसे. 

आणि हे उचले चोरी तरी कशाची करत? किरकोळ वस्तूंची. पोटाची खळगी भरण्यासाठी. आणि तेवढीच चोरी त्यांना पचायची. मोठी चोरी केली तर गावच्या पोलीस पाटलापासून शहराच्या पोलिसांपर्यंत सर्वांना वाटा द्यावा लागे आणि उचल्यांच्या हातात काही येत नसे. 

उचल्यांनी कधी चोरी लपवायचा प्रयत्न केला तर पोलीस खोपटात येऊन 'लाज लपवण्यासाठी घातलेल्या हातभर कपड्यातल्या आईमाईपासून अंगावर एकही कपडा नसलेल्या उघड्या-नागड्या लेकरापर्यंत' सर्वांना बेदम मारत. 

लक्ष्मणचा बाबा चामलेच्या मळ्यात काम करायचा. शिकल्या-सवरल्या लोकात राहून त्याला शाळेचं महत्त्व समजलं होतं. इतर पोरांसारखं लक्ष्मण 'तिरगायला जाऊ नये' म्हणून बाबाने त्याला शाळेत घातलं. 

'पुस्तक न् वही नीट संबाळ न्हायतर मारीन,' पुस्तक, वही व पेन पोराच्या हातात टेकवताना बापाने धमकावलं. 

लक्ष्मणच्या घरी खायची आबाळ. बाबाला चामलेच्या घरून भाकर येई. ती भाकर खाण्यासाठी कधी कधी लक्ष्मण चामलेच्या मळ्यात जाई 

'पुस्तक चांगलं ठिवलास का? दाखव.' म्हणून बाबाने वही बघितली. लक्ष्मणने वहीत लिहिलेलं बघून बाबाने त्याला जोड्याने मारलं. 'वही लिहिण्यासाठी असते' एवढंही त्या बिचाऱ्याला माहीत नव्हतं. 

पाथरूटाचं पोरगं शाळेत जाऊ लागल्यावर इतर पोरं त्याला त्रास देणारच. लांडग्यांच्या कळपात शेळी शिरल्यागत लक्ष्मण शाळेत राहू लागला. उचल्याचं पोर म्हणून इतर पोरं त्याला खडे फेकून मारत. 

पुढे परिस्थितीमुळे लक्ष्मणला शाळा सोडावी लागली आणि अठरा वय होण्याआधीच तो गिरणीत जाऊ लागला. तिथे १२५ दिवस फुकट काम केल्यावर 'दोरे चिकटवायला शिकलेल्या' लक्ष्मणला साठ रुपये पगार चालू झाला. पण नोकरी सुखाची नव्हती. क्षुल्लक चुकांसाठी सुपरवायझर लक्ष्मणची कातडी फोकाने सोलून काढी. 

कामदार झाल्यावर घरच्यांनी लक्ष्मणच्या लग्नाचं मनावर घेतलं. इथे लक्ष्मणने जावळीच्या आत्याची मुलगी न करता कवठ्याची मुलगी केल्यावर त्याच्या घरच्यांनीच लक्ष्मण व छबूबाईच्या संसारात बिब्बा घातला. नवरा-बायकोची भांडणं लावली. लक्ष्मणच्या मनात छबूच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण केला. 

लक्ष्मणचे मोठे भाऊ चोर्‍यामाऱ्या करून कसंबसं पोट भरत. लग्न झाल्यावर ते लहान भावंडाकडे बघेनात. धाकट्या हारचंदाला अधूनमधून फेफरं येत असल्याने तो चोरी करायला भ्यायचा. 

ज्याला कमवता येत नाही त्याची किंमत शून्य. म्हणूनच हारचंदाचे भाऊ व भाभ्या त्याची हिडीसफिडीस करू लागले. हारचंदाला कुणी सांभाळीना. 

हारचंदाची दया येऊन लक्ष्मणने त्याला स्वतःच्या घरी आणलं पण भावाला एक वेळचं जेवन देणंही त्याला शक्य होईना. लक्ष्मणने हारचंदाला किरकोळ कामं करायला सांगितली पण तो काम करायचं सोडून भीक मागू लागला. 

'आपला भाऊ भीक मागतो' याची लाज वाटू लागल्याने लक्ष्मण त्याला घरातून हाकलून द्यायची भाषा करू लागला. 

लक्ष्मण हाकलून देईल या भीतीने एका पावसाच्या रात्री हारचंदा दाराला आतून कडी लावून बसला. त्यावेळी लक्ष्मणची बायकोही बाहेर होती. कितीतरी आवाज दिले तरी हारचंदा दार उघडीना. 

'जा कुठं बी, मर. भीक मागून खा. उद्या लातुरात दिसू नकोस. नाही तर पोलिसला धरुन देईन,' हारचंदाने दार उघडताच पिसाळलेल्या लक्ष्मणने त्याला घरातून अक्षरशः हाकलून दिला. 

गरीबीमुळे सख्ख्या भावाला घरातून हाकलून दिल्याची बोच लागल्यावर लक्ष्मणने हारचंदाचा खूप शोध घेतला. हारचंदाला ठिकठिकाणी, वर्षानुवर्षे शोधला पण तो सापडला नाही. हारचंदा बेवारश्यासारखा मेला असावा. 

लक्ष्मण लहानपण नेहमी आठवे. 

'तू लई शाळा शिक. मोठा कामदार बन' लक्ष्मणचा बाबा म्हणायचा. पण गरीबाच्या पोराला कसली शाळा न् कसलं काम. लक्ष्मणची ना शाळा पूर्ण झाली ना शिक्षण; ना नोकरी नीट झाली ना धंदा. 

आपलं आयुष्य वाया गेलं असलं तरी आपल्याला त्याची जाण आहे पण 'अज्ञानातच सुख' समजणाऱ्या आपल्या समाजबांधवांना जागं करण्यासाठी लक्ष्मण लढा उभारायचं ठरवतो आणि स्वतःचं आयुष्य त्यासाठी वाहून घेतो. 

- विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे 

#लक्ष्मणगायकवाड #उचल्या #श्रीविद्याप्रकाशन

Saturday, October 23, 2021

दैनंदिन भगवद्गीता

दैनंदिन भगवद्गीता

प्रतिदिन वाचन चिंतन आणि मनन करण्यासाठी

   जिज्ञासू वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला ग्रंथ 

निवेदन /निरूपण : राजेंद्र खेर /सीमंतिनी खेर

गीता हे एक निश्चित शास्त्र आहे. वेद उपनिषदांचे दोहन करून गीता निर्माण झाली. भगवंतानी स्वमुखाने गीता सांगितली हे वैशिष्ट्य आहे. समृद्ध जीवन कसे जगावे हे गीता समजवते. ते समजवण्यासाठी निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार झाले ; आणि त्याने अखिल मानवमात्रासाठी गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले! सामान्य जन, श्रेष्ठ भक्त, संसारी, संन्यासी या सर्वांना गीतेने मार्गदर्शन केले आहे. गीतेमधला प्रत्येक श्लोक भगवंताच्या आश्वासनाने ओतप्रोत भरला आहे. त्यात व्यक्तीचा आणि समष्टीचा विचार केलेला आहे. प्रत्येक शब्द तोलून मापून वापरलेला आहे. तो बदलता येत नाही.

    गीते मधले सिद्धांत त्रिकालबाधित आहेत. मानवाचा राहणीमानात फरक पडला तरी समस्या त्याच त्याच असल्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात गीता मार्गदर्शक ठरते. गीता भोगलाही प्रोत्साहन देत नाही आणि त्यागाचेही समर्थन करीत नाही. गीता संयम शिकवते. राजविद्या, ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या त्याचबरोबर ज्ञान, कर्म, भक्ती याचे दिग्दर्शन गीता करते. तसेच कामपावित्र्यही गीता समजावते. गीता माणसाला मूर्ख बनवत तर नाही  मुर्खांनाही ती सुजाण बनवते!

धर्माची पुनप्रस्थापना करायची होती हे श्रीकृष्णाच्या अवताराचे प्रयोजन होते. तेच युध्दाच्या पुढच्या तीस पस्तीस वर्षाच्या काळात त्याने साध्य करून दाखविली. 

  भगवान श्रीकृष्णाच्या एका अवतार समाप्ती मुळे भगवंताचे कार्य संपत नसते.सृष्टीचे रहाटगाडगे जोपर्यंत चालू असते तोपर्यंत भगवंतांना युगायुगात पुन्हा पुन्हा अवतार धारण करावाच लागतो. सर्वत्र अधर्म बोकाळला की त्याला जन्म घ्यावाच लागतो. पण श्रीकृष्ण- वतारने केवळ तत्कालीन धर्मसंस्थापनेचे कार्य केले नाही तर पुढे येणाऱ्या अनंत पिढ्यांसाठी गीतरुपी तत्त्वप्रणाली मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी दिली. 

   वेद आणि उपनिषदे यांचे सारभूत संतुलित तत्त्वज्ञान असलेल्या या भगवद्गीतेला आज पाच हजार वर्षे पूर्ण झाली. मोठमोठ्या टीकाकारांनी, ज्ञानी पंडितांनी आजपर्यंत गीतेचे विविधांगांनी विवेचन केलेले आहे.      

    दैनंदिन भगवद्गीतेचे नियमित वाचन, मनन, चिंतन करावे असा या ग्रंथामागचा उद्देश आहे. या ग्रंथाचे श्रद्धेने नियमाने वाचन, मनन, चिंतन केल्यास ऐहिक संसारातील अनेक प्रश्न सुटतील मन:शांती लाभेल आणि आत्मविश्‍वास बळावेल असा विश्वास वाटतो.

३६५ दिवस ३६५ श्लोक आणि एका पानावर एक श्लोक अशी या ग्रंथाची रचना आहे.

मूल्य: ४८०₹ टपाल ४०₹ एकूण ५२०₹ 

संपर्क: हर्षल भानुशाली पालघर ९६१९८०००३०
G pay/ phone pay/ Paytm/ Bhim 


पुस्तक: खिल्ली

पुस्तक: खिल्ली
लेखक: पु ल देशपांडे. 
प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन, पुणे

या पुस्तकातील #एका_गांधी_टोपीचा_प्रवास या लेखात पु ल देशपांडे म्हणतात...

कधी एखादा हिंदुत्ववादीही यायचा- हे लोक हिंसावादी असल्याचा आव आणीत. तोंडाने भगतसिंग, सावरकर प्रभूतींची तारीफ करीत. परंतु त्यांचे हाथ पिस्तुलाशी न जुळता, अकाऊंट जनरलचे ऑफिस, पोस्ट, रेल्वे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असल्या सरकारी चाकरीत लेखणी घासण्यात गुंतलेले असायचे. 

गांधीजींच्या चळवळीत फार मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आला होता. हजारोंच्या संख्येने बायका सत्याग्रहात शिरून तुरुंगात चालल्या होत्या. हिंदुत्ववाद्यांना समाजाच्या सर्व थरातले हे चैतन्य महत्वाचे वाटत नव्हते. या मंडळीत एक विलक्षण नतद्रष्टेपणा असायचा. राजकीय चळवळ म्हणजे एक व्यासपीठ, दोन खुर्च्या, मग अध्यक्षाचे फर्डे भाषण, आभार हीच या लोकांची कल्पना होती. वाचावीरच स्वराज्य मिळवून देईल. फार तर कुणीतरी ५-१५ बॉम्ब वगैरे फेकावे.(स्वतःचा मुलगा मात्र नसावा. त्याला कुठेतरी चिटकवून द्यायची तयारी चाललेली असायची.)

वेळोवेळी इतिहासाच्या पूर्वदिव्यात घुसायचं... असली काहीतरी चमत्कारिक वृत्ती असलेली हि माणसे! त्यात काही मंडळी "काय म्हणतोय तुमचा गांधी?" असं विचारून "एकूण सारा पोरखेळ चाललाय" असा शेरा मारून जायचे. बाबू गेनू नावाच्या एका मजुराने परदेशी कापडाची लॉरी पुढे जावू देणार नाही या निर्धाराने स्वतःला त्या खाली चिरडून घेतले होते. ही असली उदाहरणे डोळ्यापुढे घडत असतानाही, ही चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत पोचलेली आहे याची जाणीव या गांधीद्वेषाने अंध झालेल्या मंडळीना येत नव्हती. ही चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, याची जाणीव या गांधीविरोधाने अंध झालेल्या मंडळींना येत नव्हती. हिंदुत्ववाल्यांपैकी बहुतेकांचा 'आपण टिळक सांप्रदायातले आहोत' असाही गैरसमज होता.

स्वातंत्र्याचे एवढे यज्ञकुंड पेटलेले असताना ही मंडळी कुठल्यातरी ऐतिहासिक जमान्यातल्या लुटुपुटूच्या युद्ध कल्पनांत दंग होती. ब्रिटिशांविरुद्ध 'ब्र' नव्हता. सारी शक्ती आणि बौद्धिके फक्त गांधीद्वेषाने भरलेली. हिंदु मुसलमानांच्या दंग्यात मुंबईत आमचे कोकणी रामा आणि गिरणमजूर गुंडांची टाळकी सडकायला बाहेर पडत. सोडावॉटरच्या बाटल्यांची 'फ्री फाईट' होई. तिथे सरळ ' तू माझे डोके फोडतोस की मी तुझे ते बघू या' हा कायदा होता. पण हे हिंदुधर्मरक्षक मात्र हवेत लाठी फिरवून गनिमांची टाळकी फोडण्याची दिवास्वप्ने पाहात होते.

गांधीजीचा मुसलमानधार्जीणेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांच्या निषेधापेक्षा मुसलमान गुंडांनी केलेल्या अत्याचारांच्या वेळी त्यांच्या लेखणीला आणि वाणीला विशेष धार चढे. बरे, हिंदू-मुस्लीम दंगलीत कधी ही मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणाव तर तेही नव्हतं. हे येरू वगळले तर त्या काळी आम्हा अनेकांच्या आयुष्याचे कर्णधार महात्मा गांधीच होते.

पुस्तकाचे नांव--सभेत कसे बोलावे

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-६२
 पुस्तकाचे नांव--सभेत कसे बोलावे
 लेखकाचे नांव--श्याम भुर्के
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०१०/ पुनर्मुद्रण
एकूण पृष्ठ संख्या-७४
वाङमय प्रकार -ललित
मूल्य--६०₹
 📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
एका कार्यक्रमात तुम्हाला प्रमुख व्याख्याते म्हणून बोलावले आहे. कार्यक्रम सुरू होण्याचीसूत्रसंचालक सूचना करत आहेत.आपण व्यासपीठावर विराजमान झालेला आहाततदनंतर संयोजन समितीतील मान्यवर आपला परिचय करून श्रोत्यांना करून देतायत. स्वागत म्हणून आपणास अध्यक्षांच्या हस्ते फुलांचा गुच्छ अर्पण केला आहे.तो घेताना आपल्या सुहास्यवदनाची प्रतिमा क्षणार्धात छायाचित्रकाराने टिपली.त्याचवेळी क्षणभर पडलेल्या प्रकाशझोताने तुम्ही सेलिब्रिटी झाला आहात.रसिकजण टाळ्यांनी स्वागत करतायत.

तद्नंतर ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते श्रीमान आदरणीय …….

   आपणास मार्गदर्शन करतील असे सूत्रसंचालकाने  निवेदन केल्यावर तुम्ही आत्मविश्वासपूर्वक माईक समोर उभे राहिलेले आहात. खणखणीत आवाजात सुरुवात करून श्रोत्यांना काबीज केले आहे. आणि आपल्या विचारांनी श्रोते प्रभावित होतायत.समर्पक उदाहरणांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे तुम्हालाही प्रोत्साहन मिळत आहे. मग आपलं व्याख्यान संपताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होतोय.असे हे वर्णन किती सुखद आहे!किती कल्पना किती आनंददायी! परंतु ही कल्पना म्हणजे कल्पनातले मनोरे नव्हेत. स्वप्न नव्हे.भाषणाची भीती वाटणे अगदी साहजिक आहे. पण ही भीती कमी करायला लावणारे "सभेत कसे बोलावे" हे शिकवणारे पुस्तकआहे. केवळ शब्दप्रपंच नसून वाणीवर प्रभुत्व असणारे प्रसिद्ध लेखक श्याम भुर्के यांनी स्वानुभवातून दाखवलेला हा भाषणाचा सुलभमार्ग आहे.

व्याख्याते श्याम भुर्के यांनी साताऱ्यात नामवंत प्रतिभासंपन्न ऋषितुल्य साहित्यिक आचार्य अत्रे, प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि क्रांतिसिंह नाना पाटील आदी वक्त्यांची भाषणं श्रवण केल्याने त्यांच्या मनात'आपणही वक्ता व्हावं' अशी सुप्त इच्छा निर्माण झाली. सरावात सातत्य ठेवत ते नामवंत व्याख्याते म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांनी बॅंकेतील नोकरी सांभाळत हजारो व्याख्याने विविध विषयांवर दिलेली आहेत.सभेत कसे बोलावे याच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत.

प्रत्येकाच्यात वक्ता होण्याची क्षमता असते.आपण हे पुस्तक मनापासून वाचले तर आपणही वक्ता होऊ शकाल याची लेखक खात्री देतात. 'सभेत कसे बोलावे' या विषया इतकेच 'सभेत कसे बोलू नये'हे फार महत्त्वाचे आहे.त्यातील बारकावे सुक्ष्मपणे मांडले आहेत.पारावर, चावडीवर आणि मित्रांच्या बैठकीत आपण गप्पा झोडत असतो.पण स्टेजवर सर्वांपुढे बोलायचं झालं तर आपणाला भिती वाटते,शब्दांना कंप येतो.पाय लटपटायला लागतात. त्यातच पहिल्यांदाच सुरुवात केली तर टेबलावर ठेवलेल्या वस्तुंशी चाळा करत कसेतरी आपण बोलायचा प्रयत्न करत असतो.काही शब्द पुन्हा पुन्हा बोलतो.आपले भाषण कधी संपतेय असं वाटतं राहते.
'जो थोडक्यात पण महत्त्वाचे सांगतो तोच खरा वक्ता होय.'या अनुकरणीय पुस्तकात १४लेख आपणाला सभेत बोलण्याचे सोपान आहेत.तुम्ही वक्ते होणार,भाषणापुर्वी,आताव्याख्यानाला निघायचं हं,व्यासपीठाचा भूगोल, आकर्षक सुरुवात,साऱ्यांचे डोळे तुमच्याकडे,आवाज,विचार, अडचण, रेंगाळणं,समारोप ,वाचलेले भाषण शुभस्य शीघ्रम आदी लेखांतून काय करावे याचे विवेचन सहज सुंदर सोप्या शब्दात केलेआहे.

 विशेषत: प्रसिद्ध नामवंत व्याख्यात्यांचे भाषणाच्या अनुषंगाने मत, विचार आणि आवाज यांचे सोदाहरण पटवून दिलेले आहे. नामवंत व्याख्यात्यांच्या सभेतील भाषणातील मास्टर पीस,श्रोत्यांना आपलसं करण्यासाठी केलेल्या शब्दपेरणीची माहिती समजते.

तुम्ही वक्ते होणार या लेखात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते.विद्यार्थांनी मजा म्हणून व्याख्यान उधळावयाचे ठरविलेले असते.प्राचार्य म्हणजे शब्दांचे जादूगार सरस्वतीच्या प्रांगणातील शारदेचे पुजारी.सुरुवातील पहिलेच वाक्य उच्चारले,''साहित्य सोनीयाच्या खाणीतला मी एक मजूर. तुम्हा तांत्रिक आणि यांत्रिक विद्यार्थ्यांपुढे हा शब्दांचा मांत्रिक काय बोलणार?'' सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सारे विद्यार्थी एकदम रसिक श्रोते झाले.

आपली प्रबळ इच्छा हीच असते व्याख्यानाची पहिली पायरी. कोणत्याही वयात व्याख्यानाची सुरुवात करता येते.'Better late than never' भाषण ही कला आणि शास्त्र आहे.माहिती घेऊन सराव केला की तुम्ही समाधीटपणे सभेत बोलाल.पहिल्यांदा सुरुवातीला अडखळत घाबरतच शब्द नफुटता भाषण करताना अनेकांचे हसं झालेले असतानाही ते पुढे प्रसिध्द व्याख्याते म्हणून नावारूपाला आले आहेत.

प्रसिद्ध सिनेनट चार्ली चाप्लीन याचे रेडिओ वर व्याख्यान होते ते द्यायला जाताना चार्ली चाप्लीन इतका घाबरला होता की तो म्हणाला,'प्रचंड वादळ सुटलं असताना अटलांटिक सागरातून जाताना जसा भीतीचा पोटात गोळा उठतो, त्यापेक्षाही जास्त भयाने व्याख्यानास जाताना मी पछाडलो होतो.' पण हेच चार्ली चाप्लीन पुढे लोकांना निर्भयतेने सामोरे जाऊ शकले. 

भाषणापूर्वी या लेखात मनात विषयाची तयारी करणे. संबंधित विषयाचे साहित्य वाचन करणे. टिपणं काढणं, मनन करणे,आखणी करणे, विचारांची जुळवाजुळव करून योजनाबध्द आराखडा तयार करायचा.विषय प्रतिपादनात सद्यस्थिती तद्नंतर नेमकं काय करायचं?अशा स्थुल स्वरुपात आराखडा तयार करावा.

भाषणाची तळमळ हवी,विषय ज्ञान असावे.काय आणि किती बोलावे हे महत्त्वाचे आहे.श्रोते पाहून आपण  बोलण्याची भाषा सहज सोपी करावी.आता व्याख्यानाला निघायचं हं या लेखात तुमचे अस्तित्व हेच व्यक्तिमत्त्व असल्याने साजेसा पेहराव असावा.नियोजित वेळेपूर्वी पोहचावे.मुद्दयांचे टिपण आणि परिचयाचा कागद सोबत घ्यावा.

सकारात्मकतेने संयोजकांशी हितगुज करावे.आणखी महत्त्वाच्या टीप्स तपशीलवार दिलेल्या आहेत. सुरुवातीला श्रोत्यांना काबीज करण्यासाठी सुरूवात लहानशा कथेने,म्हणीने,प्रश्नार्थक वाटल्याने अथवा काव्याने करावी म्हणजे 'पुढे काय'याची उत्सुकता जागृत राहील. कथा अथवा विनोद हजारोंच्या पुढे सांगितल्यावर खुलतो.तेव्हा सुरुवातीलाच श्रोत्यांना खळखळून हसायला मिळाले की मग सारं ऐकण्याच्या मनस्थितीत श्रोते राहतात.

रसिक श्रोत्यांचे लक्ष तुमच्याकडे असल्याने तुमच्या बारीकसारीक हालचाली प्रेक्षकांच्या नजरेत भरतात. बोलताना उभे कसं राहावे.व्यासपीठावरील टेबलावर ठेवलेल्या वस्तुंशी खेळत बसू नये. माईक टेबल बुके इत्यांदींना बोलताना स्पर्श करु नये.दृश्य आणि श्राव्य दोन्ही एकत्र वक्तृत्वामध्ये असते.आवाज,शब्दफेक,शब्दोच्चार, निरर्थक शब्दांची पुनरावृत्ती टाळणे.(उदा.या ठिकाणी, तर, तेव्हा,हे पहा असे शब्द)कारण हे शब्द ग्रामोफोन वरील चांगल्या रेकॉर्डमध्ये खरखर आल्या- सारखे वाटतात.जसे सुग्रास भोजनात एखादा खडा लागला की लज्जत कमी होते.तसेच भाषणाचंही होत असतं.प्रेक्षकांचे अवधान टिकवायला अधूनमधून समर्पक विनोदी चुटके ही पेश करावेत.त्यामुळं वातावरण हलकं फुलकं होतं.

WATCH म्हणजे Wordsशब्द Action विचारThoughts कृतीCharacter आचार आणि Habitsसवयी.चांगल्या सवयी साठी हे महत्त्वाचे आहे.समारोपापुर्वी विषयाचा सारांश संक्षेपाने प्रस्तुत करावा.समारोप एखाद्या उत्साहवर्धक संदेशात्मक काव्य पंक्तीने अथवा नामावंतांच्या कथेने करावा.
कलेची आराधना केली की ती आत्मसात होते.अशा अनेक टिप्स आणि किस्से पानोपानी आपल्याला वाचायला मिळतात.या पुस्तकाचे रसग्रहण केल्यावर आपणही सभेत वक्ते म्हणून आत्मविश्वासाने उभे आहात.विषयाचे विवेचन करत आहात.सुरुवात दमदारपणे केलीय. प्रेक्षक टाळया वाजवून दाद देतायत.

मस्तच खुसखुशीत विनोदावर हास्याची कारंजी उडताहेत. तुमच्यावर कॅमेऱ्याचा फ्लॅश पडतोय प्रभावी लयबद्ध कवितेने आपण समारोप करुन टाळ्यांचा कडकडाट होतोय.काहीजण भाषण चांगले झाल्याचे आवर्जून भेट घेऊन सांगतायत.दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात तुमचा फोटो व व्याख्यानाचे कव्हरेज छापून आलेय ते तुम्ही आनंदाने वाचीत आहात.हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपणाला 'सभेत कसे बोलावे' याचा कानमंत्र मिळेल..

श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

पुस्तकाचे नांव--सर्कसबरोबर चाळीस वर्षे

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-६४
 पुस्तकाचे नांव--सर्कसबरोबर चाळीस वर्षे
 लेखकाचे नांव--बंडोपंत देवल
शब्दांकन-शशी पटवर्धन
प्रकाशक-मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी १९८२/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१९१
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई.)--चरित्र गाथा
मूल्य--३०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚६४|| सर्कसबरोबर चाळीस वर्षे
             लेखक-बंडोपंत देवल 
           शब्दांकन-शशी पटवर्धन
----------------------------------------------
'सर्कस' या खेळाचे बालपणी फार कुतूहल होते.अद्भुत दुनियेतील साहस,धाडस अन् थरारक कसरती डोळे दिपवतात.वेगळे कल्पनेच्या पलीकडील विश्र्वातील मनाला भुरळ घालणारे कसरतीचे आकर्षक खेळ दाखवून मनोरंजन करतात. पाळीव आणि जंगली श्वापदांचे खेळ बघताना आनंद द्विगुणित होतो. प्राण्यांंच्या गोल रिंगणात  रिंगमास्तरच्या चाबकाच्या इशाऱ्यावरील मनमोहीत करणारे खेळ.एकाचवेळी हजारो माणसांना खिळवून ठेवणारा मनोरंजक,साहसी नजरबंदी करणारा करमणूक करणारा रिंगणातील खेळ ''सर्कस'' यातील बालपणी विदुषकाचे खेळ फार धमालकरायचे.मनापासून रसिक प्रेक्षक टाळ्यांच्यागजरात दाद द्यायचे.

  माणसं आणि जंगली प्राणी यांच्या एकत्रित कसरतींतून अफलातून मनोरंजन केलं जायचं, प्रत्येक सर्कस ही मनोरंजनाचं पूर्ण वर्तुळ पूर्ण व्हायचं.त्यात विनोद असायचा आणि थरारही असायचा.विदुषकाची कला तर सर्कसचा जीव की प्राणच.जंगली प्राण्यांशी  मैत्री आणि रिंगमास्तरांची तालीम बघून कौतुक वाटायचे.एकसारखेच,चमचमणारे कपडे.झुल्यावरील  झोके घेणारे कसरतपटू आणि त्यांच्या त्या आवाक् करणाऱ्या योजनाबद्ध,न चुकणाऱ्या कसरती,साहजिकच प्रत्येक कसरत उत्सुकता निर्माण करायची आणि मग खेळ संपल्यावर कल्पनेपलीकडचा निर्भेळ आनंद मिळायचा. 
सर्कशीत बघितलेल्या अनेक दृश्यांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहायच्या.खेळ बघताना मन रममाण होवून जायचे.अद्भुत सर्कस कलाकारीच्या दुनियेचा जीवनप्रवासाचा परिचय आज करतोय. 

शशी पटवर्धन शब्दांकित 'सर्कसबरोबर चाळीस वर्षे'हे पुस्तक वाचताना आत्तापर्यत गावी,वाई, सातारा,कराड आणि पुणे येथील बघितलेले सकाळचे आणि रात्रीच्या विद्युत रोषषणाईतील खेळ नजरे समोर तराळले.हजारो प्रेक्षकांना एकाच वेळी खिळवून ठेवून मनोरंजन करणारे कलाकार.या कलाकारांच्या साहसी प्रात्यक्षिक कसरती मागील त्यांच्या जीवन मानावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

काशिनाथ सखाराम उर्फ बंडोपंत देवल हे जगविख्यात सर्कसचेमालक 'दि वेस्ट क्लाऊन इन् इंडियन सर्कस' असा उल्लेख अभिमानाने केला जातो.त्यांच्या सर्कसमय विश्र्वातील कसरतींचा सुखदुःखाचा खेळ या पुस्तकात शशी पटवर्धन यांनी मांडला आहे.बंडोपंत देवल यांनी विदूषक,जगलर,अॅनिमल ट्रेनर आणि रिंगमास्टर अशा चौफेर भूमिकांचे दर्शन यातून सगळे घडते.सर्कशीतील कलाकारांचा रिंगणाबाहेरील आयुष्याचा मनोवेधक आलेख.जीवनपटाचा आलेख या पुस्तकात उलगडला आहे. प्रोफेसर विष्णुपंत छत्रे यांनी भारतात पहिली सर्कस सुरू केली.या घटनेला शंभरपेक्षा जास्त वर्षे होऊन गेली.तदनंतर अनेक सर्कशी उभारल्या काहींनी तर परदेशातही नावलौकिक मिळविला आहे.

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील तासगांव-म्हैसाळ भाग म्हणजे सर्कस कलाकारांची जन्मभूमी. याच भागात सर्कस जन्मली अन् फोफावली.या भागात त्या काळी नामांकित पंधरा एक सर्कशी होत्या त्यातीलच 'देवल सर्कस'

  मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे देवल कुटूंबियांची'देवल सर्कस' जगप्रसिद्ध आहे.यातील बहुतांश कलाकार याच मातीतले.त्यांचा उलगडा लेखमालिकेतून सर्कसबरोबर चाळीस वर्षे कशी अनुभवली याचे वर्णन सहज सुंदर सोप्या भाषेत व्यक्त केले आहे.प्रारंभीच 'प्रो.देवल्स सर्कस'या ब्रॅण्डचे संस्थापक सर्कस सम्राट कै.व्यंकटराव उर्फ बाबासाहेब देवल आणि मालकबंधू दादासाहेब देवल व बंडोपंत देवलयांची छायाचित्रे आहेत.तसेच सर्कशीतील खेळांची कसरती करतानाची कृष्णधवल छायाचित्रे वास्तवता दर्शवून आठवणी उजळवतात.तर समूह फोटो रिंगणाच्या मागील कलाकारांचे चेहरे अधोरेखित करतात.

दररोजचा खेळ संपल्यावर सायबू माहूत मोडक्या तोडक्या हिंदीत अभिमानाने गाणं गुणगुणत असायचा…

मजा करते है,हम यार ,देवल सर्कसवाले
म्हैसाळ हमारी बसती
दूध,दही ज्वाआर बहुत सस्ती
वहॉसे कृष्णानदी बस्ती
उसके पानी पिनेवाले
मजा करते है‌,हम यार देवल सर्कसवाले 
 विजयादशमी सीमोल्लंघन आमच्या सर्कशीचा वर्धापनदिन साजरा करायचो. त्यानिमित्ताने आमचा सर्कशीचा पहिलाखेळ सुरू करुन हंगामाला शुभारंभ व्हायचा. बंडोपंत देवल सर्कसच्या यशाचे गमक उत्तम तंबू,उत्तम व्यवस्था,उत्तम खेळ आणि उत्तम बॅंड यांना देतात. हे असेलतर आपण यशस्वी होतो. कारण बॅंड म्हणजे सर्कशीची बोलकी जाहिरात असते.
ज्या गावात मुक्काम आहे,त्या गावात जाहिरात करण्यासाठी हत्तींची मिरवणूक निघाली की अग्रभागी ज्यूनिअर लोकांचे बॅंडपथक असतं.उद्घाटनाच्या खेळाला पाहुण्यांचे स्वागत व सलामी बॅंडचीच झडायची.प्रेक्षकांची गर्दी जमवायला सर्कसच्या प्रवेशद्वारावर बॅंड पथकच तालासुरात वाजत-गाजत असायचं.
सर्कसच्या जगतातील अनुभव समृद्ध चाळीस वर्षांत खूप शिकायला मिळालं.

विदूषक म्हणजे सर्कशीचा प्राणच असतो.बंडोपंत देवल तनमन अर्पूण विदूषक उभा करायचे.विदूषक केवळ हसवण्यासाठी नसतो.
खेळाचा प्रयोग वेगवान करणं महत्त्वाचं असतं. समयसूचकता, चापल्य, हजरजबाबी आणि खिलाडूवृत्तीने कलाकुशलता दाखवत रसिक प्रेक्षकांना हसवत ठेवावं लागतं.त्यामुळे लेखक मोठ्या जिद्दीने विदूषकी कसरती सादर करायचे.परदेशात युरोपियन सर्कशीत तर जाहिरात पत्रावर विदुषकाचे फोटोंसह नांव छापलेले असते.पोशाख चढवला तोंड रंगवलं की आपण रडणं सुध्दा प्रेम त्यांना हसायला लावतं.इतकी ताकद विदुषी कलाकारात असते.त्यामुळे माझी.ओळख इतर कामांपेक्षा 
विदूषक म्हणूनच सर्वपरिचित होती.हे ते आवर्जून सांगतात.

सर्कशीतीलशिकारखाना,हत्ती,घोडे,वाघ, सिंह,कुत्री, विविध रंगांचे पक्षी यांच्या कडून अनेक नवेनवे खेळ व कसरती बसवतात.अनेक सुखदुःखाच्या,आनंदाच्या भरात. उन्हाळ्यपावसाळ्याचे वर्णंन खुमासदार शैलीत वास्तवतेला भावस्पर्शी करुन केलेले आहे.
पडद्यामागच्या कलाकारांची ओळख या पुस्तकाने अधोरेखित होते. साहसी खेळांची वर्णने व त्यावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचताना सर्कसचे ममत्व लक्षात येते.अतिशय सूक्ष्मपणे सर्व बाबींचे वैशिष्ट्यासह लेखन उठावदार दिसते.

या आत्मचरित्र गाथेची सुरवात मुक्काम देवल सर्कस पपासून होऊन समारोप कृतार्थ कृतज्ञ मी!ने झालाय.बालपणात बघितलेला खेळ सवंगड्यात खेळत खेळत सर्कशीत जाण्याचं मनाने ठरविलेले प्रत्यक्षात उतरत असताना घडलेल्या प्रसंगाचे वर्णन वाचताना लेखक नामवंत कसे झाले याची प्रचिती येते.

अकराव्या वर्षी सर्कशीत,घरची आठवण आली तरी रडायचं नाही,ब्रम्हदेश-सिंगापूर-सिलोन परदेशात जाणं,समुद्रातून कार्गो बोटीतला थरारक प्रवास आणि गमतीजमतींचे यथार्थ वर्णन केले आहे.
पुणे येथे मुक्काम असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या हस्ते बाबासाहेब देवांना सन्मानित करुन सत्कार केला होता.त्यांनी कलाकारांचे खेळ पाहून प्रशंसा केली होती."सर्कस ही अस्सल स्वदेशी कला आहे. हिंदुस्थानी लोक परदेशातही कला सादर करीत आहे.याचा अभिमान बाळगणे महत्त्वाचे आहे".असे गौरवोद्गार काढून बाबासाहेब देवल यांना सर्कससिंह किताब देवून गौरविण्यात आले होते.संकटांचा महापूर कोसळत होता.सर्कसची वाताहत झाली.ताराबाई सर्कशीत नोकरी पत्करली.चौदा महिने अज्ञातवासात काढले.मग आम्ही मालक झालो. म्हैसूरच्या दरबारात दसऱ्याला खेळ सादर केला.

 आगीच्या तावडीतून सुटका, संकटांचा काळ ,गांधार देशात देवल सर्कसचे खेळ,अपशकून,मिरजेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवास, काठेवाडीत दादासाहेबांचं आजारपण, दुसरे महायुद्ध आणि सर्कस,सर्वस्वाची होळी, कडाक्याच्या महागाईत खेळांचं उत्पन्न घटत गेलं.सिनेमामुळं प्रेक्षकांची रुची बदलली.मगनिवृत्ती घेतली.देवल सर्कसची अखेर. सर्कसच्या जगात आणि मराठी सर्कसची पीछेहाट अशा लेखांमधून "सर्कसबरोबर चाळीस वर्षे" प्रवासाचा उलगडा होतो.सर्कस जगतातील वास्तव सुखदुःखाचे घटनाप्रसंग वर्णन करण्याचे कसब बंडोपंत देवल आणि शशी पटवर्धन यांनी कसरतींचे शिवधनुष्य लीलया लेखणीबध्द केले आहे.

मराठी सर्कसचा इतिहास दस्ताऐवज  पुस्तक रुपाने वाचक रसिक प्रेक्षकांना रसास्वाद घेण्यासाठी शशी पटवर्धन यांनी शब्दांंकित केली आहे.बंडोपंत देवल व कुटूंबियांच्या गप्पा आणि चर्चेतून अनेक पैलूंचा उलगडा होत गेला.तेच लिहिते करण्याचा स्तुत्य प्रयत्न झालेला आहे.या पुस्तकाचे रसग्रहण करताना वाचक अद्भुतरम्य सर्कशीच्या दुनियेत रमून जातील.

परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
-----------------------------------------------

पुस्तकाचे नांव--नटरंग

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-६३
 पुस्तकाचे नांव--नटरंग
 लेखकाचे नांव--आनंद यादव
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण सप्टेंबर २०१९
एकूण पृष्ठ संख्या-२००
वाङमय प्रकार --कादंबरी
मूल्य--२३०₹
📖📚🎞️📚🎞️📚🎞️📚🎞️📚🎞️📚🎞️📚

कागल गावचा गुणा,ऐका त्याची कहाणी

रांगडा त्याचा बाज , आगळं हुतं पाणी

कौतिक सांगू किती,पठ्ठ्या बहुगुणी,

अंगी हुन्नर,डोसक्या मधी झिंग,

पैलवानी तोरा त्याचा, रुबाब राजावाणी..

या गाण्याने गुणा कागलकराची कथा 'नटरंग'मराठी सिनेमात कथानक पुढं सरकते. 'झोंबी' आत्मचरित्राचे चतुरस्त्र साहित्यिक आनंद यादव लिखित 'नटरंग' या कादंबरीचा चित्रपट निर्माण झालेला आहे.यातील गाणी आणि स्टोरीही सुपरहीट होऊन मराठी सिनेजगतातील हा सिनेमा सुवर्णाची मोहर उठावदार करणारा ठरलाय.

नटरंग कादंबरीचे लेखक प्रतिभासंपन्न लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावचे. साहित्यातील चौफेर क्षेत्रात त्यांनी आपल्या लेखणीने रसिक वाचकांना भुरळ घातली आहे.ग्रामीण कलावंताच्या आयुष्यातील व्यथा, वेदना आणि सुख-दु:खं त्यांनी कथा- कादंबरीतून जगासमोर मांडली आहेत. त्यांच्या साहित्यकृतीस साहित्य अकादमी व राज्य सरकारचे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अनेक लिखित माध्यमांनी कल्पक, 
कलात्मक समिक्षणात्मक अभिप्राय दिलेत.साहित्य विश्र्वातील अव्वल दर्जाची कादंबरी.तमाशा कलावंतांच्या आयुष्यातील व्यथा वेदनांच्या शोकांतिकेचे दर्शन या पुस्तकातून घडते.पुस्तकातून पडद्यावर... लेखक तमाशा….नाटक….. शेवटी चित्रपट आधी वैताग….आता समाधान. एखादी लोकप्रिय कादंबरी चित्रपटात रुपांतरीत होऊन पडद्यावर अवतरते… 'माध्यम बदला'चा हा किचकट प्रवास नेमका कसा घडतो…

त्या पटकथेची 'नटरंग'कादंबरी कलात्म व शोकात्म अव्वल दर्जाची आहे.प्रसंगांना चित्रासारखे आकार देऊन तमाशातील पात्रांना रसपुर्ण बनविले आहे.कथानकातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची त्यांची क्षमता अत्युच्च  कोटीतील आहे. याचा रसास्वाद घेताना मन व्यथित करत काळजाला हात घालतो. अस्सल आणि हुबेहूब वर्णन केलेले आहे.

नटरंग कादंबरी ते सिनेमा या लेखात किर्ती मुळीक यांनी समर्पक शब्दात या लोकप्रिय अक्षरशिल्पाचे आणि सिनेमा निर्मितीचे गुपित सारांंशाने उलगडून दाखविले आहे.'नटरंग' या कादंबरीचे कथानक पूर्ण काल्पनिक असून ते लेखकाच्या मनातील आहे. कलाकृती हे कलावंतांच्या मनात जीवन जगताना उमटलेल्या अनेक ठशांचे रुप असतं.कागलच्यागैबीच्या उरुसाचा उमटलेला ठसा,'नटरंग' या कथेतून आकाराला आलाय.हे लेखक सांगतात.पोटाची भूक भागविण्यासाठी रोजचं जगणं सुरु ठेवावे लागते.नवी स्वप्न उराशी बाळगून ध्येयासाठी कष्ट करताना अनेक. अडीअडचणींना तोंड देत आव्हाने स्विकारताना केलेला संघर्ष या कथेत अस्सल जिवंतपणा दृष्टीस पडतो.

'नटरंग' या कादंबरीचा नायक गुणा हा उपेक्षित मातंग समाजातील तरुण कलावंत.कुस्तीचं मैदान गाजविणारा, थोडाफार शिकलेला पण परिस्थितीनं दुसऱ्याच्या (शिर्पतीच्या) शेतात कामकरी म्हणून मोलमजुरी करीत असतो. कुटूंबासाठी राबणारा तो एकटाच असतो.पण तो तमाशा बघायचा नादीक असतो.तुटपुंज्या मिळणाऱ्या आठवड्याच्या पगारात घरखर्च आणि तमाशाचा नाद भागत नाही. त्यामुळे तो वैतागुन जायचा.गुणाचे आई-वडिल,बायको दारकी आणि मुलं राजा दया माया रंजा त्याचा भाऊ यशवंता सैन्यात बेपत्ता झालेला होता.त्यामुळं गुणांचे वडील बाळू नेहमी गुणांची हिडीस फिडीस करायचा.शिव्यांची लाखोली वाहून हजामत करायचा.कारण गुणाचं तमाशाला जाणं त्याला आवडायचं नाही.सतत तो लिंबाच्याबुडी बसून चिंतामग्न असायचा.घराचा कर्ताधर्ता गुणा.
त्याने शेतात मजूरी करावी. बायकामुलांना बघावं,आईबापाचं म्हातारपण जपावं.आणि घरातल्यांची इज्जत राखावी असं गुणाच्या बापाला सतत वाटायचं. शेतात राबून काय मिळकत होत नाही याची रात्रीच्या गप्पा झोडताना सगळ्यांना विवंचना व्हायची. कामधाम,चोऱ्यामाऱ्या,सिनेमाआणि तमाशा यांवर चर्चा चालायची. त्यातच चार पैसे मिळवण्यासाठी तमाशाचा फड उभारायचा मनसुबा सगळ्यांच्या पुढं मांडतो.शेतात काम करताना, चालताना आणि निवांतपणे बसताना त्याच्या पुढं गैबीच्या जत्रेतला तमाशातील पात्रं मनपटलावर उमटायची आणि तो त्यात रंगून जायचा.

मग जन्माचं पांग फिटेल.तमाशातून बऱ्यापैकी पैसा मिळेल या आशेने एके दिवशी नानांच्या गोठ्यात तमाशाचा फड उभारण्यासाठी कुलदैवत खंडोबाची आणाभाका घेऊन भंडारा उचलतात.आणि रात्रीचं गैबीच्या दर्ग्यात जावून शपथ घेतात.नानाच्या गोठ्यातच तमाश्याची तालीम सुरू होते. वादन साहित्य मिळवायला पैश्याची जुळवाजुळव सुरू होते.गुणा शेतात काम करत करत वग आणि लावणी रचत राहतो.ऊसाच्या फडाकडं बघत मनात पाखरं भिरभिरु लागतात.तेंव्हा शब्द पाडसासारखे उड्या मारु लागतात.मग गुणा ओळी जुळवत,घोळवत रचत राहतो.
चाली बांधत घोकू लागतो.शेतीतल्या त्याच्या रोजच्या कामाचे वर्णंन अस्सल कोल्हापुरी अलंकारिक साजात सुक्ष्मपणे केले आहे. वाचताना याची प्रचिती पानोपानी येते.अप्रतिम ग्रामीण बोलीचे सौंदर्य आणि चपखल शब्दांची पखरण केलीय.अप्रतिम कादंबरी

     गुणा तमाशाच्या नादाला लागलाय म्हणून त्यांचा बाप आणि बायको नेहमी वादंग माजवितात. भांडण करतात. शिव्या घालतात पण गुणा फड उभारण्यासाठी पुढचं पाऊल टाकत असतो.त्याला तमाशाची थोडीफार माहिती असलेल्या पांडबाची साथ मिळते. नाचायला यमुनाबाईच्या मुली नयना आणि शोभना तमाशात नाचायला तयार होतात.पण तमाशात एक नाच्या (गणपत पाटील) यांच्या सारखा पाहिजेच तरच तमाशाला चांगले दिवस येतील.असं ती म्हणते.अनेकांना विचारल्यावर कोणीही त्याचे साथीदार तयार होत नाहीत.त्याची घालमेल होते. तमाशाचा फड मोडला जावू नये म्हणून पांडबाने सुचवल्यावर तो नाच्या व्हायला तयार होतो.नयना त्याला बाईसारखंं चालणं, नाचणं, मुरकणं अशी अदाकरी त्याला शिकविते.आणि मग गावच्या  गैबीच्या उरुसाच्या जत्रेत पहिला शुभारंभाचा प्रयोग होतो.

पहिलाच प्रयोग रसिकांना फार आवडतो.गुणाच्या नाच्याच्या अदाकारीला रसिक प्रेक्षक टाळल्या वाजवून दाद देतात.पण गावात त्याच्या वाईट गुणाचीच चर्चा सुरू होते.बायको सासरा आणि बाप तमाशात काम करु नये म्हणून समजूत घालतात.पण तो ठाम नकार देतो.वतनदार घराण्याची अब्रु घालवली म्हणून बाप झाडाला फास लावून घेतो.

नयना शोभना कोल्हापूर व गुणा कागलकर यांचा तमाशा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला असतो.तो गावोगावच्या यात्रेजत्रेत गाजायला लागतो.तिकिटावरही तमाशाला गर्दी होत असते.तमाशा परिषदेत गुणाचा सत्कार होतो.

 घराचं रुपडंही गुणाने मिळालेल्या पैशातून बदलले असते.मातीच्या भांड्यांची जागा आता तांब्या- पितळेच्या भाड्यांनी घेतलेली असते. साधं झोपडं आता दगड मातीचं झालं होतं. घरावर कौलं आली होती.आता मुलं शाळेत जात होती.सगळ्यांना कपडालत्ता चांगला मिळत होता.खाणपिणं चांगलं होतं.पण त्याची बायको दारकी मात्र त्याच्यावर नाराज असायची.पैसा मिळतोय पण हा धंदा चांगला न्हाय.आपला नवरा आपल्या जवळ असावा असं तिला वाटायचं. वस्तीतल्या शेजारणी गरजू बायका उसनवार मागायला यायच्या.आणि नाही दिलं की,तिला काहीबाही बोलून सतत हिणवायच्या.

कला म्हणून गुणा नाच्याचं काम करुन कायमच तमाशाच्या खेळात कायम करत राहिला.इकडं नयनाही त्याच्या मनात घर करत होती.पण तिनं त्याच्या प्रेमाचा अव्हेर केला.ती पक्की व्यवहारी होती.'म्हातारपणी नाच्याच हालं,कुत्रही खाणार नाही.' असं ती म्हणाली.तेव्हापासून तो कुडत राहिला.मितभाषी झाला. कोपरवाडीच्या जत्रेत नाच्यासोबतच पुरुषधारी 'अर्जुन बृहन्नडेचा' हे नवे वगनाट्य सादर करत असताना अचानक नाच्याच्या नावाची आवई उठवून प्रेक्षकांनी गोंधळ घातला. स्टेजवर कल्लोळ माजला. मोरे आणि माने साहेबांच्या भांडणातून फड उधळला गेला. कनात,फड आणि तमाशाची गाडी पेटवून देतात.त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी सगळं जळून जातं.गुणा नयना आणि शोभनाशी अक्रित घडतं.

त्यामुळे सगळ्यांची अवस्था काळीज करपल्या सारखी होते,पोटात खोल खड्डा पडतो.हातापायातील अवसान गळून पडते.या घटनेची सगळ्या पेपरात बातमी आल्याने त्यांची नाचक्की होते.मग उध्दवस्त झालेला गुणा गावी येतो तर घराला कुलूप लावून बायकोपोरांसह माहेरी निघून गेलेली असते.मग तो सासरवाडीला जातो.पण घरी माघारी यायला दारकी नकार देवून भांडते.सासराही सगळ्यासमक्ष त्याचा पाणउतारा करून भांडतो.मग गुणा कागलकर गावाकडच्या घरी येतो.घरातल्या अंधारात दार बंद करून स्वत:ला कोंडून घेतो.पांडबा येऊन त्यांची समजूत घालतो.'तुझी ही दशा व्हायला हीच कारण आहे.गुणा मला माफ कर.'असं म्हणून गुणाचं सांत्वन करतो.पण गुणा म्हणतो,मी आता एकटा आहे.

मी नाच्या हाय नाना,
माझी कला माझा जीव, 
नि मी तिचा शिव.
चैतन्याने रसरसावं तसा नसलेल्या घुंगराच्या ठेक्यात तो नुकत्याच उठून चाललेल्या प्रेतासारखंं तो पावलं टाकत निघाला.

उत्तरार्धात अतिशय भावस्पर्शी शब्दात गुणांच्या मनातील स्वप्नपुर्तीचा तमाशापट आणि त्यातील चाळातलं घुंगरु.त्याची लयबध्द बोली अप्रतिम शब्द लालित्याने गुंफली आहे.त्याचं आठवणं म्हणजे त्याच्या जीवनपटातल्या देवकिन्नराची कला कुणाला कळली नाही.मी मूळ स्त्री सादर केली.पण प्रत्यक्ष बाई असणाऱ्या दारकी,नयना यमुनाबाई यांना कळली नाही. नाना,पांडबा, इश्ण्या,शंकर,धामुड्यापाव्हणां,सद्या,मारुती,

किसना,जन्या आणि पब्या यांच्या साथीने फड उभा केला.हीच साधी माणसं रंगपटात भरजरी फटका, काटेवाडी धोतर परिधान करून राजा प्रधान होतात.बहारदार गण -गवळण- वग सादर करतात. दिलखेचक तालबद्ध नृत्य सादर करतात.पण कनातीत गेली की ही माणसं सामान्य होतात.अशा आगळवेगळ्या तमाशा कलेच्या पायी गुणाच्या आयुष्याची धुळधाण कशी उडाली यांची एक अस्सल कादंबरी  'नटरंग'होय.अप्रतिम लेखन शैली वाचक रसिकांवर गारुडी करणारी अन् कुतूहल वाढविणारी लेखणी.याच लेखणीने रंगवलेली कादंबरी,'नटरंग' अप्रतिम...

रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' सिनेमाही खूप गाजला.लोकप्रिय झाला. अतुल कुलकर्णीचा 'गुणा' आणि सोनाली कुलकर्णीची 'नयना'आणि किशोर कदमचा 'पांडबा' रसिकांच्या मनात चिरकाल स्मरणात राहीला.असा लोकप्रिय मराठी चित्रपट याच पटकथेवरील आहे.नटरंग कादंबरीचे लेखक प्रतिभावंत चतुरस्त्र साहित्यिक आनंद यादव यांच्या लेखणीला वंदन आणि मनःपूर्वक सलाम!

✒️श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

21 ग्रेट लीडर्स

21 ग्रेट लीडर्स  ....
(विश्वावर ठसा उमटवणार्‍या नेतृत्वांची कार्यशैली)

‘‘21 ग्रेट लीडर्स हे पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर अत्यंत विचारपूर्वक केलेले भाष्य आहे. लेखकाचे इतिहास आणि लीडरशीपचं सखोल ज्ञान आणि एक लीडर व एक कोच म्हणून त्यांच्याकडे असणारा असामान्य वैयक्तिक अनुभव यामुळे हे पुस्तक अतुलनीय ठरते. ‘21 ग्रेट लीडर्स’ हे मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे, जे तुम्हाला एक उत्तम नेता बनण्यासाठी
नक्कीच उपयुक्त ठरेल.’’
पुस्तकाची वैशिष्ट्ये-

* नेतृत्वाचे सात पैलू
* महान लीडर्सची स्वभाववैशिष्ट्ये
* जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन
* 21 लीडर्स आणि त्यांचे गुणविशेष
* त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग
* प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे आणि संदेश

(वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्ज, बिल गेटस्, मदर टेरेसा, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, विन्स्टन चर्चिल, मार्टिन ल्युथर किंग, फ्रँकलीन रुझवेल्ट, जॉर्ज वॉशिंग्टन...असे २१ ग्रेट लीडर्स)
 
लेखक -  पॅट विल्यम्स
अनुवाद - नीलिमा करमकर
पाने  -  २४०
किंमत- २७५/-
संपर्क: ९८८११८६६६३ (व्हाट्सअप)
मायमिरर पब्लिशिंग हाऊस.

The Secret (रहस्य)

The Secret (रहस्य)
लेखक :Rhonda borne
अनुवाद : रमा मराठे
प्रकाशन: मंजुळ पब्लिकेशन

 सकारात्मक दृष्टिकोन ,दृढ विश्वास, अढळ अविचल श्रद्धा , परिपूर्ण कृतज्ञभाव ,कायम वर्तमानात व प्रत्येक क्षण आनंदात जगायची वृत्ती  व मनातील शंकेला दूर झटकून योग्य मानसचित्र डोळयासमोर आणून आपल्या प्रबळ ठाम आणि स्पष्ट विचारांना वस्तूत परिवर्तन करण्यासाठीचे सूत्र म्हणजे #secret 

1.आदर्श वजन आणि बांधेसूद शरीर असलेल्या व्यक्तीची स्तुती
2.स्वतःच्या विशिष्ट वजन आणि शरीरबांध्याची व्हिज्युअलायझेशन
3.अन्नाची स्तुती आणि व्यवस्थित चर्वण करत आनंददायी जेवण
4.स्वतःच्या शरीरावर प्रेम आणि इंचाइंचाची स्तुती
5.दिवसाची योजना आधीच बनवणे ,
6.आजच्या घटना विचाराद्वारे आधीच मानसचित्राने पाहणे.
7.दिवसातील घटना विचाराद्वारे आधीच निश्चित करणे
8.रोज रात्री दिवसभराच्या मनाविरूद्ध घडलेल्या गोष्टीं,कशा हव्यात तशा त्या व्हिज्युअलायझेशन
9.मँजिक चेकवर मनोवांछित रक्कम,तारीख टाकून तो व्हिजन बोर्डावर लावा आणि मिळालेले पैसे आवडत्या गोष्टीवर खर्च करत असल्याचे व्हिज्युअलायझेशन
10.मनात कमतरतेऐवजी नेहमी समृद्धीचे विचार
11.मला जमणार नाही /खर्च झेपणार नाही हया नकारात्मक विचारांना मी हे लवकरच विकत घेईल अशा सकारात्मक विचारात बदल.
12.मिळत असलेल्या पैशावर प्रेम करा, बिलांना चेक समजा 
13.दान हे संतुष्ट मनाने आणि सुखद भावनांसह करा त्यात त्यागाचा अविर्भाव नसावा.
14.आंतरिक शांती ,अंतर्दृष्टी,आंतरिक आनंद हे कुठल्याही बाहय गोष्टी पेक्षा जास्त सुखकारक असतात
15.प्रत्येकाला प्रेम,सन्मान,आदराने वागवा, त्यांना योग्य वेळ द्या
आपले अंतकरण प्रेमाने भरून टाका.
स्वतः सुखी रहा आणि इतरांनाही सुखी बनवा
16.आपणं लोकांसाठी जगण्याचे एक आदर्श रोल माँडेल व्हावे.
17.कुणाबद्दल ही वाईट बोलू नका,शक्य तितके कौतुक ,प्रशंसा,कृतज्ञता व्यक्त करा.
18.आपला आनंद हा नेहमी आपल्या हाती  असतो.कुणी कितीही आपला आनंद बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी नाही झाला पाहिजे.
19.बरेचसे आजार हे आपल्या नकारात्मक विचारांमुळे उद्भवतात आणि ते दूर करण्यासाठी प्रेम,आनंद आणि कृतज्ञता
ही जगातील बेस्ट औषधे आहेत
20.माणूस वयापेक्षा विचारांनी जास्त थकतो त्यामुळे म्हातारपणाच्या चुकीच्या धारणा मनातून काढून टाका.
21.नकारात्मक गोष्टीविषयी चर्चा नको,त्यावर लक्ष द्यायची गरज सुद्धा नाही.
22.कुणाशीही स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्न आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी झटा.
23.स्वतःला परमात्म्याच्या अपरिमित शक्तीचा दैवी अंश समजा 
24.आपण फक्त आपल्याच नशीबाचे शिल्पकार नाही तर हया विश्वाच्या नशीबाचेही शिल्पकार आहोत हे ध्यानात ठेवून जबाबदारीने वागा.
25.स्वतःच्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव ठेवून आपल्या जीवनामागचा परमेश्वराचा  उदात्त हेतू समजून घेत जीवन जगणे.

#secret
Nilesh Shinde 

The Hero (नायक)

The Hero (नायक)
लेखक : रोंडा बर्न
प्रकाशक: मंजुळ पब्लिकेशन

माणूस आपल्या सामान्यत्वाच्या मर्यादा ओलांडतो तेव्हा तो नायक बनतो.
सामान्य माणसाला नायक बनायचे असेल तर त्याला ज्या गोष्टी हव्यात त्यांचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे.

1.स्वप्ने: 
▪️आपल्याला आनंदी समाधानी बनवणार्या स्वतःच्या स्वप्नांचा शोध आणि त्यासाठी आपला आतला आवाज ऐकत ,समजून घेण्याची तयारी
▪️स्वप्नं उद्दिष्ट यांचा पाठलाग करण्याची तयारी
▪️स्वतःच्या क्षमतांची/कमतरतेची जाणीव
▪️नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्यासाठी प्रयत्न
▪️अपयशाची भीती दूर सारत Comfort Zone सोडण्याची तयारी

2.विश्वास
▪️स्वतः वर ठाम विश्वास
▪️सकारात्मक स्वसंवाद
▪️अंतर्मनात आत्मविश्वासाचा नवा प्रोग्राम
▪️प्रेरणादायी लोकांचा सहवास आणि त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास

3.दूरदृष्टी
▪️सकारात्मक आत्मप्रतिमा
▪️आशावादी वृत्ती
▪️षड्रिपूंना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न
▪️स्वप्नांबाबत स्पष्टता आणि प्रयत्नशील ता

4. अंतकरण
▪️भीतीवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील
▪️कृतज्ञतेचा वापर करून स्वतःला ओळखायची तयारी
▪️स्व-जबाबदारीची जाणीव आणि कुणालाही बोल न लावता यशाच्या मार्गावरून स्वतःला भरकटून न देण्याची जिद्द आणि आव्हानांवर मात करण्याची तयारी.

5.अंतःप्रेरणा
▪️वैश्विक मनाशी संपर्क करण्यासाठी अंतर्मनाचा योग्य वापर 
▪️मनाला प्रश्न विचारून उत्तर शोधण्यासाठी त्याला प्रवृत्त करण्याची प्रगल्भता

6.अँक्शन
▪️आपले शब्द आणि विचार यातून कृती घडते याची जाणीव
▪️इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न
▪️जीवनाचा सकारात्मक उद्देश
▪️विनम्रता आणि इतरांचा मान राखत आत्मसन्मान वाढवणे
▪️चांगले दिसण्यापेक्षा चांगले असण्याला प्राधान्य

7.निष्ठा
▪️आपले काम ,कुटुंब, जोडीदार यांच्याशी एकनिष्ठता
▪️ज्वलंत इच्छाशक्ती, प्रयत्नात सातत्य, कुटुंबाची साथ,
▪️नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष देणे आणि नियंत्रणाबाहेरील गोष्टीवर उर्जा वाया न घालवणे. 
▪️वाईटातून चांगल्याकडे प्रवास
▪️नशीब, वेळ ,माणसे याबाबत कृतज्ञता
▪️अडथळयांवर मात करण्याची जिद्द
▪️चांगल्या वाईटाची पारख
▪️स्वतःला अपटूडेट ठेवण्याची सुधारणावादी वृत्ती

8.बक्षीस
▪️जेवढे मोठे स्वप्ने तेवढे मोठे बक्षीस
▪️स्वप्नपूर्तीसाठी आयुष्य जगणे आणि स्वप्नपूर्तीचा आनंद अनुभवणं हे बक्षीसच आहे
▪️इतरांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करणे आणि तशी संसाधने आपल्याकडे असणे हेही आपल्यासाठी बक्षीस आहे
▪️आपल्या प्रगतीसाठी सहाय्य करणाऱ्या लोकांना त्यांचा योग्य मोबदला देणे हे बक्षीसच आहे
▪️ आपल्या सामाजिक जबाबदारींचे भान असणे हेदेखील समाजासाठी बक्षीसच आहे.

NILESH SHINDE 

The Power (शक्ती)

The Power (शक्ती)
लेखक: रोंडा बर्न
प्रकाशन: मंजुळ पब्लिकेशन

एखाद्या विद्युतचुंबकीय शक्तीप्रमाणे 
प्रेम माणसाच्या जीवनात सकारात्मक 
गोष्टी घडवून आणते,त्यांना कार्यरत बनवते
प्रेमाच्या भावनेमुळे आपल्याला Feel Good वाटत असते.त्यामुळे प्रेमाचा आवेग कोणत्याही कारणास्तव रोखायचा नसतो.
टीका,टाँन्टिंग,ब्लेमगेम हया प्रेमाच्या शक्तीला क्षीण बनलतात हयाउलट निरपेक्ष मदत, सकारात्मक भावना हया प्रेमाला सहाय्यक ठरतात.
आपल्या भावना सुधारण्यासाठी दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचारांनी करावी,नेहमी वर्तमानात जगावे आणि परिस्थिती कितीही आव्हानात्मक असेल तरीही इच्छित परिणाम सकारात्मक असतील हयाचीच आशा ठेवा.
इच्छांची कल्पना करताना जाणीव पंचेद्रीयांनी घ्यायला हवी, आपल्या इच्छांवर आपले प्रेम पाहिजे. 
सातत्याने जाणीवपूर्वक इच्छा कल्पनांद्वारे व्यक्त करत राहिलात तर ब्रम्हांड ती पूर्ण करतेच कारण आपल्या ईच्छा फक्त आपल्यासाठीच मोठ्या असतात. ब्रम्हांडासाठी त्या किरकोळ नगण्यच मानाव्या लागतील.
राग दुःख अशा वाईट भावनांपासून माणूस मुक्त होऊ शकत नाही पण त्यांना आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका.
भूतकाळातील वाईट गोष्टी विस्मरणात टाकणेच उत्तम होईल. 
कोणत्याही परिस्थितीत आवडत्या व्यक्तीशी चांगलेच बोला.वागा 
आपल्या आयुष्यावर प्रेम करा, आवडीच्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या त्यासाठी मनाला चालना द्या.
आजवर मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा आणि ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात त्या आपल्याकडे आहेत अशाच अविर्भावात वागा.

पैश्यावरही प्रेम केले तरच आपण धनवान होऊ त्यासाठी पैशासाठी चांगल्या भावना, पैशाला कल्याणकारी वस्तू समजून यथोचित दान, कुटुंबासाठी वापर आणि मुख्य म्हणजे पैशाला जीवनाचे ध्येय न मानता उत्तम आयुष्य मिळवण्यासाठीचा मार्ग समजायला हवा.

नात्यांवर प्रेम करत असाल तर ती सुधारण्यासाठी आपण स्वतः हून पुढाकार घ्यायला हवा. इतरांच्या इच्छेचा मान राखत त्यांना योग्य गोष्टीसाठी मोकळीक ही द्यायला हवी. माणसाच्या चांगुलपणावर आपला विश्वास हवा.
जरी एखाद्याला काही देता नाही आले तरी प्रेम तर आपण देऊच शकतो ना....?
नात्यातील आपले पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलायला हवेत त्यासाठी मनमोकळा संवाद घडणे गरजेचे आहे.
समोरच्याला माणूस म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा.
No Gossip Behind हे तत्त्व पाळत
मूडचेंजरचा वापर करून बिघडलेली मनस्थिती सुधारायला हवी पण वाईट मनस्थितीत मोठा निर्णय घेणं ,आपला संयम सुटू न देता त्यावर मात करायला हवी.

उत्तम आरोग्य हवयं तर आपल्या शरीरावर प्रेम करायला शिका .तेव्हाच उर्जैने परिपूर्ण तन, निर्मळ मन,शांत झोप लाभेल
प्रत्येक अवयवाच्या निरोगी प्रतिमेची कल्पना डोळयासमोर ठेवत ह्दयात प्रेम,कौतुक आणि कृतज्ञता बाळगत नकारात्मक गोष्टी पासून स्वतःला दूर ठेवत
आनंदी जीवन जगायला प्राधान्य द्यायला हवे. जीवन किती मिळालयं याची चिंता करण्यापेक्षा प्रत्येक दिवस भरभरून जगायला भर दिला तर तेच जीवनावरचे आपले प्रेम अधोरेखित करेल.

आपला मनुष्य जन्म काळजी,चिंता भयासह जगण्यासाठी झाला नाही तर इच्छा पूर्ती आणि आनंद प्राप्तीसाठी झालायं हे समजून उमजून जगलो तरच आपण सुखी होऊ.
Nilesh Shinde 

Sunday, October 17, 2021

जॉर्ज_डब्लू_कार्व्हर

#जॉर्ज_डब्लू_कार्व्हर

त्याला दिलेलं नाव हे त्याचं स्वतःच नाही, दोन महिन्याचा असताना त्याच्या गुलाम आईला दरोडेखोर पळवून घेऊन गेले ते कायमचीच, वयाच्या दहा बारा वर्षापर्यंत त्याला बोलता येत नव्हतं, मातीत राबून कष्ट करतच दिवस काढायचे, त्वचेचा रंग काळा असल्यामुळे समाजात मिळणारी दुय्यम वागणूक. एकदा आपल्याच जातबंधुला (Black) काही लोक फरफटत नेत आहेत आणि त्याला रस्त्यावर जिवंत जाळलं जात आहे हे बघून तो पुरता सैरवैर झाला, ही घटना आहे उत्तर अमेरिकेतल्या १८६० च्या दशकातली जेव्हा काळ्याना माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य दिलं जावं  आणि गुलामगिरी संपुष्टात यावी यासाठी संघर्ष सुरू होता. हे सर्व असताना बागकामाची, झाडांची फुलांची प्रचंड आवड असलेला हा मुलगा म्हणजे जॉर्ज डब्लू कार्व्हर, कार्व्हर हे आडनाव ज्याने त्याच्या आईला विकत घेतलेल त्या मालक कडूनच मिळालं, खूप कठीण आणि हालाकीच्या परिस्थितीत त्याने कष्ट करून त्याच शिक्षण पूर्ण केलं, या जगात त्याला स्वतःच असं कोणीच नव्हतं त्याने लग्न ही केलं नाही, पण त्याला वेळोवेळी चांगली माणसं भेटत गेली, अमेरिकेत कृषी क्षेत्रात त्यांनी अदभुत अशी क्रांती केली, शेती व्यवसायाला पूरक अशी  कितीतरी नवीन उत्पादन शोधून काढली, फक्त भुईमूगा पासून शंभर हुन अधिक उत्पादन त्याने शोधून काढली, रताळ्यापासून ही अनेक उत्पादन त्याने बनवले, कापसाच्या शेतीत अभूतपूर्व बदल घडवले, ज्याचा अमेरिकेच्या अर्थ व्यवस्थेला भरपूर लाभ झाला, अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याला व्याख्यानासाठी बोलावण्यात येत असे, त्वचेचा रंग काळा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याला अपमान सहन करावा लागत असे, बऱ्याच हॉटेलात निग्रोना (black) राहण्यासाठी परवानगी नव्हती, लिफ्ट वापरण्याची परवानगी नव्हती, एवढं सगळं असूनही त्याने कधीही हार मानली नाही, शोध लावलेल्या कुठल्याही पदार्थच कधी पेटन्ट घेतलं नाही, आता त्याच्या मित्र यादीत अमेरिकेच्या राष्ट्रअध्यक्ष पासून हेन्री फोर्ड सारखे मोठमोठाले उद्योगपती होते, भारतातून गांधींजी सोबत देखील त्याचा पत्र व्यवहार होत असे, परंतु कार्व्हर ने कधीही कुणाकडूनही कुठली वस्तू वयक्तिक लाभासाठी स्वीकारली नाही, आयुष्यभर त्याने एकच कोट ठिगळ लावून आणि रफू करून वापरला. 

आयुष्यभर कार्व्हर एकाच पगारात काम करत राहिला त्याने कधीही पगारवाढ घेतली नाही, त्याला पैशाच्या प्रलोभनच्या कितीतरी नौकऱ्या येत पण कार्व्हर सर्वांना नम्रपणे नकार देत असे, शेवटपर्यंत बुकर टी वशिंग्टन यांच्या संस्थेतच तो काम करत होता, माझ्या बांधवांसाठी (black) मला काहीतरी करायचं आहे जेणे करून त्यांचं हे कनिष्ठतेच जीवन संपुष्टात येईल आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल हाच त्यांनी ध्यास घेतला होता. कार्व्हर कोणाकडूनही काहीही भेट स्वीकारत नसे पण त्यांचा एक उद्योगपती मित्र काहीतरी घ्यावं म्हणून खूप मागे लागला होता शेवट कार्व्हर ने त्याला एक हिरा मागितला हे ऐकून त्यांचा मित्र खुश झाला आणि एका अंगठीत लावून एक हिरा कार्व्हर ला दिला, खूप दिवसांनी जेव्हा त्यांचा मित्र त्यांना भेटला तेव्हा ती हिऱ्याची अंगठी कर्व्हरच्या हातात नव्हती मित्राने विचारल्यावर प्रयोगशाळेच्या कपाटात ठेवलेली अंगठी कार्व्हर ने त्याला दाखवली, विद्यार्थ्यांना दाखवताना हिरा हे खनिज कार्व्हर कडे नव्हतं आणि त्यासाठी त्याने तो हिरा मित्राकडून घेतला होता. असा कार्व्हर हा एक उत्तम चित्रकार देखील होता, संगीतदेखील तो चांगलं वाजवत असे. असा कार्व्हर आयुष्यभर इतरांच्या मदतीसाठी झिजत राहिला. यापुस्तकाची भाषा खूप सरळ सोपी आहे माझ्या सहा वर्ष्याच्या मुलीला देखील समजायला सोपी अशी. A must read book.

:- मयुर नरवाडे

४} पुस्तकाचे नाव :- वंचिताच्या वेदना

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.
२} परिचय कर्ता नाव :- राजू गरमडे
३} पुस्तक क्रमांक      :-  ३६
४} पुस्तकाचे नाव       :- वंचिताच्या वेदना
५} कवीचे नाव           :-  राजेंद्र एन.घोटकर
६} प्रकाशक               :- शब्दजा प्रकाशन,अमरावती
७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :-  २०१९,पहीली.
८} एकूण पृष्ठ संख्या :-  १२०
९} वाड् मय प्रकार    :-  कवितासंग्रह
१० } मूल्य               :- ₹ १८० / - फक्त

—  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  — 

पुस्तक परिचय क्रमांक :- ३६
कवितासंग्रह                :-  वंचितांच्या वेदना
कवी                           :-  राजेंद्र घोटकर

—  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —

एक प्रतिभावंत युवा कवी,लेखक श्री.राजेंद्र घोटकर यांचा * वंचितांच्या वेदना * हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला.सर्वप्रथम त्यांचे मी मनापासुन अभिनंदन करतो.कवी हे शिक्षक आहेत.विद्यार्थ्यामध्ये मानवी मुल्याची पायाभरणी आणि संस्कार रुजविण्यासोबतच ते साहित्यामध्येही आपल्या प्रतिभेने आणि सर्जनशील विचारांने आपली एक प्रतिभावंत कवी म्हणुन ओळख निर्माण केलेली आहे.आपल्या कवितेद्धारे त्यांनी विविध विषयांना स्पर्श केलेला आहे.
मानवी जीवन म्हटले की,दुःख,संकटे,गरीबी,वेदना ही ओघाने आलीच.आपल्या समाजामध्ये जी गरीब,श्रीमंतीची जी दरी पडलेली आहे ती कायम अशीच राहणार हा एक न ऊलगडणारा प्रश्न आहे.शिवाय आपल्या समाजामध्ये एक घटक कायम वंचित म्हणून जगत आहे.समाजाकडुन त्यांची होणारी ऊपेक्षा आणि अवहेलना हाच काव्यसंग्रहाचा महत्वाचा केंद्रबिंदु आहे.
कवी शिक्षक असल्याकारणाने समाजामधल हे ऊपेक्षित लोकांच जीवन पाहुन दुःखी कष्टी झालेला आहे.वंदनीय तुकडोजी महाराजाच्या विचारांचा वारसा पाठिशी घेऊन आणि समाजाप्रती आपल एक कर्तव्य म्हणुन आपल्या विचारांनी आणि चितंनातुन वंचिताच्या वेदना त्यांनी शब्दबद्ध केल्या.कवीची दृष्टी मानवतावादी आहे.मानवांच्या वेदना त्यांना सहन होत नाही.म्हणुनच त्यांनी वंचिताच्या वेदना तर मांडल्याच सोबतच शेतकर्‍यांच्या प्रश्नानांही वाचा फोडलेली आहे.शिक्षणावर ही आपली अनमोल मते मांडलेली आहे.आध्यात्मिक विषयांनाही त्यांनी स्पर्श केलेला आहे.
कवी श्री.राजेंद्र घोटकर सरांच्या सर्वच कविता एकापेक्षा सरस आहेत.
ह्या काव्यसंग्रहामध्ये एकुण ८५ कविता आहेत.जगाचा पोशिंदा बळी राजा वर त्यांनी बर्‍याच कविता केलेल्या आहेत.त्यांच्या काही प्रातिनिधीक कवितांचा ऊल्लेख करावासा झाल्यास वंचिताच्या वेदना,भाकरीचे स्वप्न,हे लोकशाहीचे ठेकेदार,ठिगळ,माझी माय,स्वैर माकडं,जीवनाचा कोरा सातबारा,ञस्त किडा,हरवलेल बालपण,आर्त अशा अनेक कविता या काव्यसंग्रहामध्ये आहे.
त्यांची पहिलीच कविता * हे लोकशाहीचे ठेकेदार * या कवितेत ते लिहीतात,
लोकशाही इथे निवडणुकापुरती  ।
नंतर भरतो फक्त दलालांचा बाजार ।।
या ओळीमधुन कवी लोकशाही ही आपल्या देशामध्ये फक्त नावापुरती ऊरलेली आहे.निवडणुक आली की,फक्त ती कागदोपञी आपल्याला अनुभवयाला मिळते पण प्रत्यक्ष्यात माञ विपरीत चिञ आपल्याला बघाव लागते.
त्यांची * ठिगळ * ही कविता दिवस राञ शेतात राबणार्‍या बळीराजावर आहे.या कवितेत ते लिहीतात,
वस्ञ अस फाटलेल,
कोठे लावावी ठिगळ ?
कोणासाठी धनी तुम्ही,
सोसता हे सगळ ?
या ओळीमधुन बळी राजाची पत्नी आपल्या घरधन्याला म्हणत आहे की,तुम्ही कशाला हे सगळ काही सोसता.ज्यांच्या पोट भराव म्हणुन तुम्ही दिवसराञ काबाड कष्ट करता त्यांना तुमची काही फिकिर नाही.आपल वस्ञच इतक फाटलेल आहे की,कुठे कुठे ठिगळ लावाव.
कवी * माझी माय * या कवितेत लिहीतात,
त्या रखरखत्या 
जळत्या ऊन्हात 
डोईचा फाटका पदर सावरते
माझी माय.......
कवीने हा वेदनेचा हुंकार अनुभवलेला आहे.कवीची आई ही रखरखत्या ऊन्हात डोईवरला फाटका पदर सावरत जात असल्यामुळे ती वेदनेची झळ प्रत्यक्ष्य भोगलेली आहे.त्यामुळेच त्यांनी लिहीलेल्या कविता वेदनेची आणि ऊपेक्षेंची झुल पांघरुण येत आहे.
कवी * स्वैर माकडं * या कवितेत लिहीतात,
गांधीजी,तुमची ती तीन माकडं
केव्हाच विसरलीत.
कवीने या ओळीमधुन महात्मा गांधीच्या विचारांना आणि मानवी मुल्यांना आजची पीढी विसरलेली आहे.आपल्याला फक्त गांधीजी जंयतीपुरतेच आठवतात.आपल्यासाठी ही एक शोकांतिका आहे.
कवी * ऊजेड वाटा झोपड्यातही * या कवितेत लिहीतात,
तुमच्या त्या कडक रोषनाईला माझी मनाई नाही
पण त्या जवळच्या कुटीत एक पणती नेऊन ठेवा.
कवी वंचिताच्या वेदना मांडता मांडता अशा ही दुर्लक्षित घटकाकडे दृष्टी वळवित आहे की,जिथे अजुनही अंधाराचे साम्राज्य आहे.तिकडेही आपली कृपा दृष्टी ठेवावी असेही कवी सांगतो आहे.
कवी * वंचिताच्या वेदना * या कवितेत लिहीतात,
आजच्या घडीला सारेच आहेत वंचित
लाभापासुन.लाभाच्या पदरापासुन.
आज माणुस हा माणसापासुन दुर गेलेला आहे.प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेतच.आपल जगण कस सुखी,आंनदी होईल याकडेच तो लक्ष ठेवुन जीवन जगत आहेत.दुःख,संकटे,अडचनी यांनीही तो ञस्त झालेला आहे.
कवी * क्रांतीज्योत तू...* या कवितेत लिहीतात,
झालीस ज्योत तू
त्या महान ज्योतीबाची 
ज्योतीने चेतवुन ज्योत 
केली होळी अज्ञानाची....
ज्योतीबाच्या खांद्याला खांदा लावुन साविञीबाई फुले नी केलेले कार्य सगळ्यांना परिचीत आहे.ज्ञानाची पणती लावुन अज्ञानाला दुर सारले आणि शिक्षणरुपी कार्याची वेल विस्तारत ठेवली.अनेकांना ज्ञानाच तेज बहाल केल.शिक्षणांचा सुर्य दोघांनी मिळुन तळपत ठेवला.
त्यांची * आर्त * ही कविता आजच्या वास्तव घटनेच प्रतिबिंब आहे.
त्यांची * कास्तकार बाप,वादळातील दीपस्तंभ,भटक्याच जीणं,ज्योतीबाचे स्वप्न,मुखवटे,मन पाखरु * यासारख्या अनेक कवितेतुन त्यांनी सुंदर अस भाष्य केलेल आहे.
या काव्यसंग्रहाला लाभलेली आचार्य ना.गो.थुटे सरांची प्रस्तावना,तसेच या काव्यसंग्रहाला श्री.सुदर्शन बारापाञे,चंद्रपुर यांनी काढलेल सुंदर आणि बोलक मुखपुष्ट त्यामुळेच हा काव्यसंग्रह सुंदर झालेला आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.डहाके सरांच मार्गदर्शन कवीला लाभलेल आहे.
या काव्यसंग्रहाचे वाचकवर्गामध्ये स्वागत होत आहे.वाचकांना हा काव्यसंग्रह अतिशय आवडलेला आहे.असा हा सर्वांगसुंदर काव्यसंग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा.कवी श्री.राजेंद्र घोटकर सरांचे मनपुर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरुन शुभेछा व्यक्त करतो.
कवितासंग्रह = वंचिताच्या वेदना
कवी            = राजेंद्र घोटकर
प्रकाशक      = शब्दजा प्रकाशन,अमरावती
पुष्ठे              = १२०
किमंत           = १८० रुपये

पुस्तकाचे नाव : शेतकऱ्याचा असूड

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक क्रमांक : 32.

पुस्तकाचे नाव : शेतकऱ्याचा असूड.

लेखक : महात्मा फुले.

पृष्ठसंख्या : 126.

स्वागतमूल्य : 150 रुपये.

प्रकाशन संस्था : साकेत प्रकाशन.

पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

     थोर समाजसुधारक ,क्रांतिसूर्य ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथात वर्णन  केली   आहे .अठराशे  त्र्याहत्तर साली महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला .शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाची  अनेक संपादने आजपर्यंत झालेली   आहेत ;पण आजही या ग्रंथातील आशयाची यथार्थता टिकून आहे .शेतकऱ्यांची तत्कालिन विपन्नावस्था आजही कमी झालेली नाही याची प्रचीती   शेतकर्यांच्या एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येतं.शेतकऱ्याचा आसूड या साकेत प्रकाशनाने संपादित केलेल्या ग्रंथामध्ये प्रस्तावना भास्कर लक्ष्मण भोळे यांनी लिहिलेली आहे.
    भास्कर लक्ष्मण भोळे लिहितात की कोरडवाहू शेतकऱ्यांची वाईट अवस्था ही दयनीय अशी आहे .शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीचे दर्शन समाजाला घडावे हा मूळ उद्देश हा  ग्रंथ लिहिण्यामागील महात्मा फुलेंचा आहे . 
    एकूण पाच मुख्य प्रकरणांमध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे . विशिष्ट समाजाचे लोक सरकारी खात्यांमध्ये प्राबल्याने असल्यामुळे त्यांनी आपल्याच समाजाचे लोक अधिकाधिक प्रमाणात तेथे भरती केले असल्यामुळे अज्ञानी शेतकर्यांना येथे अडचणीत आणले जाते. त्यांचे  मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि मानसिक शोषण करण्यात येते . त्यांच्या मुलाबाळांना शाळेत टाकण्यासाठी त्यांच्याकडे पैसा सुद्धा शिल्लक राहत नाही .त्याचप्रमाणे या शेतकर्यांकडे त्यांच्या मुलांना झाकण्यासाठी कपड्यांसाठी पैसे सुद्धा शिल्लक राहत नाही ;म्हणून शेतकऱ्यांची मुले ही उघडी    दिसतात .अशा रीतीने   हृदयाला पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती शेतकर्यांची महात्मा फुले यांनी या प्रकरणामध्ये वर्णिलेली आहे .पोटाला पोटभर अन्न खाऊन जगण्याची भ्रांत या शेतकर्यांना पडलेली   असते त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणाचा विचारदेखील करत नाहीत.आजच्या परिस्थितीत थोडा बदल झालेला असला तरी शेतकरी हा पूर्णतः सुखी नाही हे भारतीय शेतीप्रधान देशाचे   वास्तविक चित्र आहे.
     दुसऱ्या प्रकरणामध्ये महात्मा फुले  म्हणतात की सरकारी गोऱ्हे अधिकारी हे बहुतकरून मज्जा   करण्यामध्ये गुंतलेले  असल्यामुळे शेतकऱ्यांची विदारक अवस्था, विपन्नावस्था त्यांच्या नजरेस येत नाही किंवा त्यांना माहीत असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल ते दुर्लक्ष करतात, कानाडोळा करतात .शेतकऱ्यांच्या गरिबी अवस्थेला त्यांनी दाखवलेला म्हणजेच गोऱ्या   अधिकाऱ्यांनी दाखविलेला गाफीलपणा हे मुख्य कारण देखील महात्मा फुलेंनी येथे व्यक्त केलेला आहे.आयुष्यभर हलाखीच्या विदारक गरिबी अवस्थेमध्ये पिचलेल्या शेतकऱ्याच्या जेव्हा   मृत्यू होतो त्यांच्या मृत्यूनंतरदेखील त्यांचे   सर्व  अंतिम संस्कार विधी पूर्ण करावे   लागतात त्या विधींसाठी तो सावकारांकडून कर्ज घेतो आणि कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी अवस्थेमध्ये तो जगताना अनेकदा मरतो ही वस्तुस्थिती आहे असे महात्मा फुले   संवेदनशीलपणे येथे मांडतात .
    इंग्रज अधिकारी कर्मचार्यांना, कामगारांना मनाला मानेल तसे पगार देतात ,पेन्शन देतात आणि या सर्व खर्चाचा बोजा कराच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर लादतात .हा बोजा शेतकरी सहन करु शकत नाही किंवा बोजा सहन करता करताच त्याचा बळी जातो, त्याचा मृत्यू होतो किंवा तो आत्महत्या करतो.
शेतकर्यांची   मनाला   हेलावून टाकणारी परिस्थिती वर्णन करताना महात्मा फुले म्हणतात की ज्याप्रमाणे गरीब हरणे   ही जंगली श्वापदांना घाबरून पळून जातात,  ज्याप्रमाणे झाडांवर मधुर गायन करणारे  पक्षी, आरामात स्वच्छंद विहार करणारे पक्षी हे बहिरी ससाणा याला घाबरून   स्वतःचा जीव वाचवतात त्याप्रमाणे शेतकरी  खूप  सहन करतो. येथील दु :ख अन्याय, अत्याचार  शेतकऱ्यांच्या माता ,भगिनी या वाईट वळणाला लावल्या जातात .
    चौथ्या प्रकरणामध्ये  महात्मा फुले शेतकर्यांच्या वस्तुस्थितीबद्दल लिहितात  की सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अपेक्षेएवढी लाच न दिल्या गेल्यामुळे ज्या शेतकर्यांच्या जमिनीवरचा शेतसारा दुप्पट करण्यात आला आहे. असे  हताश, निराश शेतकर्यांच्या घराच्या हलाखीचे  ज्योतिराव येथे वर्णन   करतात .या प्रकरणात महात्मा ज्योतिबा फुले आवर्जून सांगतात की शेतकर्यांच्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, त्यांना शिक्षण जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला किमान प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे .
     पाचव्या प्रकरणामध्ये महात्मा जोतिबा फुले  तत्कालीन समाजातील उच्चभ्रूंना, त्याचप्रमाणे  इंग्रजांना काही उपाय सुचवतात.  ते म्हणतात की ज्याप्रमाणे उच्चभ्रूंची मुले शिक्षण घेतात त्याप्रमाणेच शेतकर्यांच्या मुलांना हे शिक्षण मिळायला पाहिज।  ढोरे  वळण्यापेक्षा त्यांना शेतीचे  आधुनिक ज्ञान प्राप्त झाले पाहिजे .  शेतकऱ्यांच्या माता भगिनी वाईट वळणाला लावल्या जातात .त्यांना वाईट वळणाला   लावणाऱ्यांना   कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी कायदे केले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बोर्डिंग तयार केले पाहिजे. त्याचप्रमाणे  विविध कार्य करून समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली  पाहिजे . शेतकर्यांवर लादल्या जाणारे   अतोनात कर हे कमी केले पाहिजेत  .तत्कालीन समाजाला त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून एकप्रकारे आसूड मारला आहे। शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले या ग्रंथामध्ये परखडपणे मत व्यक्त करताना लक्षात येता.  हा एकप्रकारे शेतकऱ्यांच्या मनातील आसूड महात्मा जोतिबा फुले यांनी तत्कालीन व्यवस्थेला अतिशय चपखलपणे लगावला आहे हे आपल्या लक्षात येतं  .  या सगळ्यामुळे नक्कीच त्यावेळी असलेल्या व्यवस्थेला घाम फुटला असेल ,हे मात्र निश्चित !
     महात्मा फुले यांचे स्पष्टवक्तेपणा, परखडपणा   आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची वृत्ती या ग्रंथांमधील त्यांच्या लेखनातून वारंवार निदर्शनास येते  .
     आपल्या पुस्तकांच्या संग्रही   असावा असा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे शेतकर्याचा आसूड होय .
   महात्मा ज्योतिबा फुले या महामानवास विनम्र अभिवादन  !

Saturday, October 16, 2021

पुस्तकाचे नांव--बाजिंद

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-५८
 पुस्तकाचे नांव--बाजिंद
 लेखकाचे नांव--पै.गणेश मानुगडे
प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१८ पुनर्मुद्रण
एकूण पृष्ठ संख्या-१५८
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--
ऐतिहासिक कादंबरी
मूल्य--१८०₹

-----------------------------------------------

महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज, यांच्या स्वराज्यातील शिलेदार गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या थरारक,साहसी, अतुलनीय पराक्रम आणि बुध्दीचातुर्य व हजरजबाबीपणाचा इतिहास.
त्यांनी मर्दुमुकी गाजवलेले अनेक उत्कंठावर्धक घटना प्रसंगाचे वर्णन अप्रतिम शब्दसाजात केलेले आहे.

सुवर्णाक्षरांनी कोरलेला जाज्ज्वल्य इतिहास मल्लविद्या जोपासणारे लेखक पैलवान गणेश मानुगडे यांनी 'बाजिंद' या कादंबरीत गुंफून अनेक ऐतिहासिक घटनांची रहस्यमय कथा वाचताना लेखकांच्या लेखणीची ताकद लक्षात येते.

अप्रतिम स्थळ काळ, व्यक्तिंचे चेहरे त्यांचे संभाषण आणि घटनाप्रसंग वर्णंनाचा रसास्वाद घेताना प्रत्यक्ष जीवंत नाटकाचा प्रयोग चालू आहे असं दिसतं. दमदार आणि रोमांचकारी वर्णंन अफलातून लेखनशैलीत केले आहे.

पुस्तक वाचताना तहानभूक विसरून आपण वाचण्याच्या आहारी जातो.
प्रत्येक वेळी पुढं काय घडतंय ?  याची कुतूहल व उत्सुकता वाढत जाते.इतकं रसभरीत वर्णने केलेली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे जनतेचे सुराज्य कसे झाले याचे दर्शन ही कादंबरी वाचताना होते.प्रखर राष्ट्रप्रेम,
युध्दाचा थरार आणि भावभावनांची गुंतागुंत यांची अलौकिक मांडणी म्हणजे बाजिंद साहित्य कृती होय.

स्वराज्याशी फंदफितुरी करणाऱ्यांचा चौरंग करून ,हात कलम करून रायगडाच्या टकमक टोकाच्या सुळक्यापासून खाली फेकले जायचे.त्याचा अक्षरशःचिखल व्हायचा.कोल्ह्या- कुत्र्यांची  मेजवानी व्हायची पण त्यामुळे जंगली श्वापदांचा सुळसुळाट झाला.एखादे वेळी टकमकावरुन मढं आलं नाही तर भुकेने कासावीस झालेली जनावरे टकमक टोकाच्या खाली असणाऱ्या धनगरवाडीतील जित्रांबावर हल्ले करुन लागले. त्यामुळे वाडी भयभीत झाली.गावचा कारभारी सखाराम व सोबतीला  मल्हारी,सर्जा,नारायण हे गाऱ्हाणे घेऊन रायगडावर दफ्तरी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना फिर्याद सांगायला निघाले होते.

तेथून पुढं जंगलातील वाट तुडवत जाताना घडलेल्याअनेक रहस्यमय प्रसंगांचे,घडामोडींचे वर्णन कादंबरीकार पैलवान गणेश मानुगडे यांनी अप्रतिम शैलीत केले आहे. 

धनगरवाडीच्या कारभारी सखाराम व त्याच्या साथीदारांची गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेला मल्ल व समशेर बहाद्दर खंडोजी सरदेसाईयाच्याशी नाट्यमयरीत्या झालेली भेट,रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं खंडोजीचं आश्वासन,सावित्री(साऊ)-खंडोजीची प्रेमकथा,महाडचे राजे येसाजीराव राजेशिर्के यांचा यशवंतमाचीतील  काळभैरव यात्रेतील कुस्तीचा आखाडा, राजेशिर्के-कदंब यांचे हाडवैर,बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला,चंद्रगडचे राजे चंद्रभान देसाई व जंगलाचे अद्भूत रहस्य बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची रहस्यमय कथा, बाजीला अवगत असलेली पशुपक्ष्यांची सांकेतिक भाषा, आपल्या वंशजाला 'बाजिंद'ला त्या भाषेचा दिलेला वारसा अशा थरारक,नाट्यमय आणि अद्भुत घटनांनी वळण घेत 'बाजिंद'कादंबरी पुढे सरकत रहाते.

या कादंबरीत बहिर्जी नाईक यांची रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असणारी स्वामिनिष्ठा वाचताना अंगावर शहारे उभे राहतात.

स्वाभिमानाचा ''जरीपटका भगवा ध्वज मनात अभिमानाने डौलत राहत होता.''अहो नशीब काय काका, या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या परिसाचा स्पर्श झाला.आणि आयुष्याची सोने झाले.नाहीतर गावोगावच्या यात्रेजत्रेत सोंगं करत भिका मागत हिंडलो असतो.जे काय माझे सर्वस्व आहे.ते श्रेय केवळ शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याला आहे.वस्ताद काका तुम्हाला इथंवर आणणं,खंडोजीकडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे.त्यांच्याकडून छोटीछोटी शंभर राज्ये स्वराज्यात घेणे.याचे खरे सुत्रधार आहेत त्याचे नांव आहे.छत्रपती शिवाजी महाराज.त्यांच्या आदेशा शिवाय हा बहिर्जीच काय  स्वराज्यातला अणुरेणु सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही. बाजींद हे सारं ऐकताना त्याच्याही अश्रुंचा बांध फुटला होता.

आजवर या बाजिंदने जगाला घाबरवून फुशारकी मारली. त्यालाही उमजले की खरे बाजिंद तर  छत्रपती शिवाजी महाराज आहेत.स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्यावर  प्रेम करणाऱ्या  समस्त मावळ्यांनी ही कादंबरी आवर्जून वाचावी.

# परिचयकर्ते श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

पुस्तकाचे नाव : त्रिवेणी

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक क्रमांक : 31.

पुस्तकाचे नाव : त्रिवेणी.

कवी : मंगेश पाडगावकर.

पृष्ठसंख्या : 102.

स्वागतमूल्य : 100रुपये.

प्रकाशन : मौज प्रकाशन गृह.

     मराठी काव्य जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणजेच कवी मंगेश पाडगावकर होय .मंगेश पाडगावकरांच्या विविध गझलांनी युक्त असे त्रिवेणी हे पुस्तक आहे . संध्याकाळचे गझल ,न गझल, बोल गझल अशा विविध गझला त्रिवेणी या गझल संग्रहामध्ये मंगेश पाडगावकरांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने रचलेले आहेत.  
    हा गझलसंग्रह कवींनी कुसुमाग्रज यांना प्रेम आदरपूर्वक समर्पित केला आहे.  तुमच्या कवितेचा हात धरून माझ्या कविता चालायला शिकल्या असे समर्पक विचार त्यांनी मांडले आहेत.  
     मूड या गझलेमधे कवी म्हणतात , 
    
     किर्र वेळी पाखरू कोठून आले? 
का असे हे कापते कोणास भ्याले?

    ऊब का घरट्यातली झाली नकोशी? थंड, काळा, कापरा काळोख प्याले ;

    स्वागताला वाकली फांदी फुलांनी, टाकून  सारे परंतु का निघाले?  
 
   काय होते आता हे सांगे न काही :
ओठ गाणारे कशाने बंद झाले ? 

     एका पक्षाची मनोवृत्ती येथे या गझलमधून पाडगावकरांनी चितारली आहे . 

    रस्ते चुकल्यावर नेमकी कशी मन: स्थिती होते, हे चुकल्यावर रस्ते या गझलेतून कवी मंगेश पाडगांवकर अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात.  

    चूकल्यावरीच रस्ते या भेटतात वाटा 
नसतो जिथे किनारा भिडती तिथेच लाटा  

    शिवलेत ओठ माझे, काही नको विचारू, बुडला कुणी तरी ही सुखदु खं काय काठा  !

    थंडीत गोठलेली मी बाग पाहताना ओलीस तू फुलांचा मागावयास वाटा;  

    फुलांवरील गझलेत पाडगावकर उत्तम पद्धतीने विचार मांडतात , 

     नको ना रे फुला असा आणू भरुन तू गळा
 नको ना रे नाकारूस तूला लावि लेला  लळा  

    पाहतो मी काजळले सोनारान किरणांचे, 
नाही पण विझलेला माझ्या प्राणात सोहळा ; 
 
    काठावर  काळोखात गेल्या बुडून सावल्या,
 तुझ्यासाठी गाणे झाल्या वेदनेच्या सोळा  कळा
  

    दोन ओळींनी अतिशय सुंदर आशय व्यक्त करणाऱ्या या गझली खूप आकर्षक वाटतात आणि वाचनीय वाटतात,  

     ज्याने दु :ख जाणले तो सुखाला भाळत नाही असे मत दु: ख जाणी ले  या गझलेत कवी मांडतात  

    दु :ख ज्याने जाणले तो का सुखाला भाळतो 
तू मला सांभाळ आता, मी तुला सांभाळतो  

     लागले हातास काटे, रक्त आले पाहा ;
जो कोणी काट्यास भ्याला तो फुलांना टाळतो  

     गेय वाटणार्या गझली मनाला नवीन शिकवण देऊन जातात.  

    शहरातील वस्तुस्थिती व्यक्त करताना रंगवताना मंगेश पाडगांवकर गझल रचतात , 

     दिसते  दिवे भोवती तुला शहरात या,
 काळ्या गुहा गिळती मला शहरात या 
बघतोस तू भोवती तुझ्या ही माणसे 
ही श्वापदे छळती मला शहरात या  

     दिसते तुला प्रसाद हे, ऐश्वर्य हे,
 या झोपडय़ा भिडती  मला शहरात या  

  बघतोस तू बगीच्यात ही हसरी फुले,
 पण साप हे डसती मला शहरात या  

    दिसती तुला बाजार हे  सजले इथे
ही माणसे विकली मला शहरात या  

     शहराची खरी विदारक परिस्थिती कवी मंगेश पाडगावकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आहे.  

      हास्यात हुंदक्यांना  या गझलेमधे पाडगावकर शब्द लालित्याची सुंदर पध्दतीने उधळण करतात , 

     हास्यात हुंदक्याना मी आवरून गेलो,
 शोधीत मी फुलांना काठावरून गेलो  ;

    होते इमानवाले गुडघ्यात वाकलेले ,
 मी बंद या घरांच्या दारावरून गेलो  ;

   वाटा अरुंद तेथे ढळला नं तोल माझा; 
येताच राजरस्ते मी सावरून गेलो  

    एके ठिकाणी कवी पाडगावकर म्हणतात,  

    गजर नाहीच हा या गझलेमधे ते मांडतात  ,

     म्हणाले ते," गझल नाहीच हा, हे गीत आहे ,नसे येथे कुठेही इश्क; पातळ प्रीत आहे ." 

    जुन्या चाळीत या कैसी तुला मी हाक घालू ?
नळाचा फाटला आवाज या खोलीत आहे  ;

   कुठे जाणार हाती हात हे गुंफून राणी?
 बुडाच्या खालती जळते गडे, कोलीत आहे ;

  खडे वास्तवाचे या गझलेत कवी अतिशय   अप्रतिम पध्दतीने शब्दरचना करतात  ,

   डोळे कुठे बघाया जे भोवती घडे ?
रस्त्यावरी  उभे हे  आयुष्य नागडे!  

   फिल्मी हिशोब अंती ठरलाच की  खरा ;
कुल्ले, स्तने नि  जांघा हे सत्य रोकडे !
 

   गेला लुटून कोणी रस्त्यावरही कुणा, 
दुमडून कायद्याचे शेपूट वाकडे!  

     भाषेचे अनेक कंगोरे, अनेक शलाका असतात, हे गझलीतून कवी मांडतात,  

भाषेला वणवा होऊन पेटताना पाहिली,
 लाजून कधी एकांतात भेटताना पाहिली;

  वांझोट्या विद्वत्तेच्या फांदीवरती बसून 
भाषेला कावळ्यासारखी शीटटताना पाहिली ; 

बाजारात नाणं होऊन  खणखणणारी भाषा 
स्वत: च्या आवाजाला विटताना पाहिली;  

   आयुष्याची वास्तविकता चितारताना पाडगावकर व्यक्त होतात  ,

      आयुष्याचा अजब अजब ढंग दिसतो ;
राखेतूनही ओठांचा रंग दिसतो; भीतीचं सावट पडतं घरांवर, फिकटलेला दिवस अगदी तंग दिसतो;  

   एकाकी या गझलमध्ये पाडगावकर माणसाचे मनोविज्ञान वर्णन करतात,

   माणसं ओळख देणार नाहीत, नावसुद्धा घेणार नाहीत;
 मैफिल खिन्न, रीती असेल,
 सूर जागे होणार नाहीत 
थंड ,थंड पानगळ सुरू ,
आता पाखरं गाणार नाहीत; प्रत्येक दिशा तिऱ्हाइत,
वाटा कुठेच नेणार नाहीत;  

    मानवी मनाच्या विविध बाजू, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या नैसर्गिक परिस्थितीच्या स्थिती गझलमधून कवी मंगेश पाडगावकरांनी अतिशय मनोवेधक रीतीने  रचल्या आहेत  .

     अशा या महान गझलकारास विनम्र अभिवादन  !

Friday, October 15, 2021

पुस्तकाचे नाव : ठिकरी

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक क्रमांक : 30.

पुस्तकाचे नाव : ठिकरी.

लेखक : व.पु. काळे.

प्रकाशन संस्था : मेहता पब्लिशिंग हाऊस.

पुस्तक पृष्ठसंख्या : 76.

स्वागतमूल्य : 80 रुपये .

पुस्तक परिचयकर्ता : श्री . मनोज
                            अग्रवाल.

     थोर साहित्यिक ,कादंबरीकार, फोटोग्राफर, व पु काळे  यांची गाजलेली ठिकरी ही कादंबरी  वाचली.  ज्याप्रमाणे एखाद्या रहस्यमय  कथांचा समावेश असलेला चित्रपट बघताना आता पुढे काय होईल असे जिज्ञासेने भरलेले प्रश्न मनात उभे राहतात   त्याप्रमाणेच अतिशय रहस्यमय पद्धतीने ही कादंबरी व पु यांनी लिहिली आहे  
  या कादंबरीमधील सोना नावाची मुलगी कशाप्रकारे ठिकरी होऊन जाते आणि वेगवेगळ्या चौकटींमध्ये ती फेकली जाते हे वपुंनी अतिशय  अतिशय भावोत्कटतेने रेखाटले आहे . 
     चैत्राली नावाची एक सुंदर मुलगी मुंबईला येते. तिचा मित्र रमण तिला घ्यायला येणार असतो ; पण रमन विमानतळावर येतच नाही .एकटी असणारी चैत्रालीची ओळख सोनालीशी हाेते . अपरिचित असणाऱ्या लोकांमध्ये ,अपरिचित असलेल्या शहरामध्ये चैत्रालीला, सोनाली राहायला जागा देते  चैत्रालीला खूप दु :ख होतं, कारण रमण तिला घ्यायला येत नाही .  चैत्रालीला सोनाली एक गोष्ट सांगते .  सोनाली चैत्रालीला एक सत्य दीर्घकथा सांगते.
    ती अशी की सोना नावाची एक मुलगी होती .ती तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे छत्र हरवले.  तिच्या वडिलांचं नाव राजा असतं. हे राजा यांचा मित्र काका आणि सोना हिची आई विजयाबाई यांच्यामध्ये विवाह होतो . काका सोनाला तिच्या वडिलांची उणीव मुळीच भासू देत नाही . सोना देखील वडिलांचं दु: ख विसरून जाते.  विजयाबाई आणि काका हे गुण्यागोविंदाने नांदतात आणि सोना देखील अतिशय आनंदित असते . मात्र एकेदिवशी काकांना विजयाबाई म्हणतात की माझ्या मनात अजूनही  राजा आहे. त्यामुळे ते दुखावले जातात.  नंतर काका हे विजयाबाईंना कधीच स्पर्श करत नाहीत. काही वर्षांनंतर विजयाबाई आजारी पडतात आणि अंथरूणाला खिळून राहतात  .अनेक वर्षे काका स्वत: ला विजयाबाईपासून  आईपासून वेगळे ठेवतात, मात्र त्यांची शुश्रूषा करायला ते विसरत नाही . विजयाबाई आणि त्यांच्यासोबत यशोदाबाई देखील तिथे असतात.  सोना आता मोठी झालेली असते आणि सोनाचं वय उंच भरारी घेण्याचं असतं .मात्र एकेदिवशी असा प्रसंग घडतो, त्या प्रसंगाने सोना पूर्णतः उद्ध्वस्त होऊन जाते .काकांकडून एक अनपेक्षित कार्य घडतं . काका हे सोनाचा बलात्कार करतात .  ज्या व्यक्तीने आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि एका रोपाचं एका उमद्या वृक्षात रूपांतर केलं अशा व्यक्तीकडून आपल्यावर बलात्कार झाला  हे सर्व सोनाला असह्य होतं.  सोना काका, विजयाबाई आणि यशोदाबाई यांना सोडून मुंबईला येते.  मुंबईला महेश हा सिंधी माणूस तिला आश्रय देतो.  सोना ही बलात्कार झाल्यामुळे गरोदर राहिलेली असते.  तिला लहानपणापासून मोठे होईपर्यत जीव लावणाऱ्या प्रेम करणार्या काकांकडून अनपेक्षित असं कार्य घडतं . मात्र बलात्कार पीडित झाल्यामुळे ती त्या मुलाला जन्म देऊ इच्छित नाही.  महेश सोनाला पुरेपूर सहकार्य करतो.  सोनाला गाडी घेऊन घेतो .तिचं ऑफिस थाठतो. पासपोर्टचा बिझनेस ती अतिशय यशस्वीपणे करते.  पुढे महेश आणि सोना यांचं लग्न होतं . हनिमून दरम्यान ते भारतभर फिरतात.  नंतर हनीमूनला खर्च झालेला पैसा कसा परत मिळवायचा याबद्दल महेश सोनाला बोलतो.  लग्नानंतर एक महिना गुण्यागोविंदानं नांदणार हे दाम्पत्य यांच्यामध्ये धुसफूस सुरु होते.  महेश हा पैसापिपासू आहे असं सोनाच्या लक्षात येतं.महेशला फक्त पैसा हवा आहे हे तिला समजतं..  मनी इज एव्हरिथिंग हे ब्रीदवाक्य घेऊन महेश  जगत असतो . सोनाला हे लक्षात येतं की आपण वापरल्या जात आहे . सोना जेव्हा मुंबईला येते तेव्हा तिचा मित्र बबन देखील तिच्यासोबत येतो.  मात्र बबनला जेव्हा कळतं की सोनाच्या काकांनी तिचा बलात्कार केलेला आहे तेव्हा तो पळून जातो . महेशला सोडून सोना निघून जाण्याच्या बेतात असते . माधुरी नावाच्या एका तरुण मुलीला फ्लॅटमध्ये महेशने आणलेलं असतं.  माधुरीच्या  आईला पाच हजार रुपये देऊन महेश तिला मुंबईला घेऊन येतो.  हे जेव्हा सोनाला समजतं, तेव्हा त्याला खूप दु :ख होतं.  माधुरी प्रमाणेच खुर्शीद ,लक्ष्मी इतर चार, पाच मुली देखील तेथे असतात. त्या वाईट वळणाला लागलेल्या असतात . पुढे सोना महेशला सोडून निघून जाते .माधुरीला ती सोबत घेते . माधुरीला घेऊन ती बंगलोरला जाते. मात्र आईवडील माधुरीचा स्वीकार करत नाही . नंतर ती माधुरीला मुंबईला परत घेऊन येते आणि पैसे जमा करून तिचा संसार थाटून देते.  सोना जी असते ते दुसरे कोणी नसते तर चैत्राली च्या समोर बसलेली सोनालीच असते . चैत्रालीला हे जेव्हा  कळतं त्यावेळेस ती हमसून रडते . सोनालीला हे लक्षात येतं की आपण आता ठिकरी झालो आहे . ठिकरी प्रमाणे आपण इतस्ततः विखुरले गेलो आहोत ,फेकल्या गेलो आहोत . माधुरीबरोबरील पाच मैत्रिणी असतात त्यांना सोनाली स्वत: च्या मुलींप्रमाणे वागवते व तिचा सांभाळ करते.  स्वत: च्या फ्लॅटमध्ये सोनाली त्या सहाजणी ना सांभाळते . विपरीत परिस्थिती स्त्रीला किती मजबूत बनवू शकते हे या कादंबरीवरून दिसून येतं.  सोनाली हे व्यक्तिमत्त्व किती अफाट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेले आहे हे लक्षात येतं. 
ठिकरी या कादंबरीवरून एक समजले की व पु काळे हे अतिशय महान लेखक होते . त्यांच्या लेखनाचा दर्जा एवढा अत्युच्च आहे की वाचकाला त्यांची कादंबरी पूर्ण होईपर्यंत सोडावीच वाटत नाही.  अशा या महान साहित्यिकास विनम्रपूर्वक अभिवादन!

पुस्तकाचे नांव--बनगरवाडी

पुस्तक परिचय बनगरवाडी

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-५६
 पुस्तकाचे नांव--बनगरवाडी
 लेखकाचे नांव-- व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक-मौज प्रकाशन गृह, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१९ सत्ताविसावी
एकूण पृष्ठ संख्या-१३२
वाङमय प्रकार ---कादंबरी
मूल्य--१५०₹
------------------------------------------------
तालमीचे बंद दार औंध संस्थानचे राजे यांनी आपल्या हाताने उघडले.
पुन्हा शिंगे वाजली.वाजंत्रीवाल्यांनी गजर केला.ती मोठी तालीम, हौदा, लाल माती बघून राजाला आनंद झाला.त्यांनी मास्तरांचे नांव विचारुन प्रशंसा केली.ते मास्तरला म्हणाले,
उत्तम आहे!'ज्ञानाबरोबर बलोपासना पाहिजेच!'मग राजेसाहेबांचे छोटेसे भाषण झाले.ते म्हणाले,"माझ्या या मेंढपाळ मुलांनी या एवढ्याशा वस्तीत अशी सुंदर तालीम बांधली, हे बघून माझा ऊर आनंदाने , अभिमानाने भरून आला आहे. 

बलोपासना आणि ज्ञानसंवर्धन हे माझ्या संस्थेचे ध्येय आहे. संस्थानातील विद्यार्थी म्हटला की, त्याची छाती रुंद असावी, बाहू पिळदार असावेत, बुद्धी तल्लख असावी, असा माझा आग्रह आहे.तो आग्रह मी सतत बोलून दाखवीत असतो. माझे बोलणे इथल्या धनगरांपर्यत पोहोचले असेल याची मला कल्पना नव्हती. आता ते पोहोचले आहे आणि प्रत्यक्षात ते उतरते आहे. हे बघून मी चकित झालो आहे. तुमच्या या राजाची छाती दोन इंच जास्त फुगली आहे. जगदंबा तुम्हाला सद्बुद्धी देवो. देव तुमचे कल्याण करो."

 ही कर्तृत्ववान कार्याची पोचपावती आहे.प्राथमिक शाळेचे गुरुजी (मास्तर) नायक प्रधान असलेली ग्रामीण व्यक्तिंचे चित्रण करणारी कादंबरी. ऋषीतुल्य प्रतिभावान कथा, कादंबरीकार तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'बनगरवाडी' या अजरामर साहित्य कृतींतील गुरुजी आणि बनगरवाडीतील गावकऱ्यांच्या कार्याचा गौरव करणारे भाषण आहे.हे भाषण खरचं मनाला फार भावते.

मराठी साहित्यात कथा-कादंबरीच्या प्रांगणात अनेक नामवंत लेखक आणि वक्त्यांनी लेखणी आणि वाणीने नवा आयाम दिला आहे.
त्यापैकी जेष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी माणदेशी परिसराचे चित्रण बनगरवाडीत केले आहे.ही कादंबरी १९५५ साली प्रकाशित झाली आहे.या कादंबरीस महाराष्ट्र राज्य सरकारने सन्मानित केले आहे.सन्माननिय तात्यासाहेब म्हणतात की,''मराठी कथा साहित्यात आता चांगल्या माहितीची 'बनगरवाडी' माझ्या माडगुळे जन्मगावाजवळ आहे.वाडीचं नांव लेंगरवाडी अन्य मी दिलेलं नांव 'बनगरवाडी'.माझ्या मनातल्या खडकावर वसलेलं.

  त्यातील सगळी पात्रं मनाच्या वाडीत जन्मलेली.लेंगरवाडीचा परिसर,प्रसंग आणि पात्रे धागे धागे होते.ते मनाच्या मागावर विणून शब्दांचे अक्षरलेणं बनगरवाडीत उठावदार दिसत आहे."सर्जनात्मक काम दृश्य स्वरुपात दाखवणं कठीण असतं.वेलाला कलिंगड दाखवावं तसं एकच पुस्तक मी दाखवीन : बनगरवाडी !चौदाव्या आवृत्तीत माडगूळकर आवडत्या कादंबरी विषयी व्यक्त होतात.

  औंधच्या पंत प्रतिनिधी सरकारनी बनगरवाडी च्या सरकारी शाळेत राजाराम मास्तरची नेमणूक तीन वर्षांसाठी केलेली असते.तिथं हजर होण्यासाठी विभूतवाडीतून भल्या पहाटे माहित नसलेल्या माळरानातील गाडीवाटेने अनवाणी पायाने धुळीत पावलांच्या नक्षीकामाचे ठसे उठवत निघाले होते.पहाटं ते डोक्यावर उन्ह यायच्या वेळेपर्यतच्या माळरानावरील सौंदर्याचे वर्णन अस्खलित केले आहे.प्रत्येक वाक्यात परिसरातील नजरेत भरणाऱ्या नवलाईचे वर्णंन खुमासदार शैलीत ग्राम्य बोलीभाषेत चितारलयं.अगदी माशी ते पक्षी अन् वाटेतील धुळ ते कुडाच्या घरात पेटलेल्या चुलीचा धूर असं इथपासून ते तिथपर्यंत अप्रतिम शब्दात वेचक वेधक वर्णनाची मोहर उठविली आहे.

सपाट मोकळा माळ,बाजरीची तांबडी राने आणि गबाळे पडावे अशी तीस-पस्तीस घरे,अशी बनगरवाडी आहे.कथेचा आस्वाद घेताना वाचक रममाण होऊन जातो.ते प्रसंग घटना आपल्या समोरच पिंगा घालतायत असं वाटतं.नजरेसमोरुन प्रसंग हटत नाहीत.इतके आपण रसग्रहणात गुंगून जातो. 

 ही कादंबरी मला भावली ती यातील माणदेशी व्यक्तीचित्रणामुळे ,पात्रांचे हुबेहूब अस्सल वर्णन वाचताना पात्रातील जिवंतपणा नजरेस भरतो.राजाराम गुरुजी बनगरवाडीत आल्यावर पहिल्यांदा ते लिंबाच्या झाडाखाली पारावर गार सावलीत बसले.तदनंतर पहिल्यांदा भेटलेला भालाईत दादु बालट्या मास्तरचा पेहराव बघून अंडीवाला ठरवतो.ते ओशाळवाणे हसून मी मास्तर आहे म्हणतात.
हाच दादु बालट्या नंतर मास्तरच्या घरी येऊन 'पोरं शाळेत आली तर त्यांना शिकवं, गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस! अशी
धमकीवजा सक्त ताकीद देतो.
त्याच्या चेहऱ्याचे, बोलण्याचे,चिलीम ओढण्याचे आणि धमकीचे वर्णन अफलातून केले आहे.टिवल्या बावल्या करत जगणारा वजनदार माणूस.

   तर सोशिक आणि सहकार्याला सदोदित पुढं असणारा,शाळेत मुलं आणण्यासाठी प्रयत्न करणारा ,घर बघून देणारा,तालीम बांधायला एक पाऊल पुढे असणारा म्हातारबाबा कारभारी.नातीच्या चोळी प्रकरणात खरं खोटं न करता अबोला धरतो.
त्याची चूक त्याला उमगल्यावर मास्तरशी बोलायला लागतो.
शेवटात त्याला वाईट स्वप्न पडतं.ते खरं मानून सगळ्यांची गाठभेट घेतो.अन् अचानक दुसऱ्या दिवशी ढाळवांत्या होऊन मृत्यू पावतो.
सगळ्या वाडीला दु:ख होते.आणि वाडीवर दुष्काळाचे संकट कोसळते.

शाळेतील मुलांना शिकविण्याची काम हळूहळू सुरू होते.मुलंही येतात.आपण भलं आणि आपलं काम भलं या भावनेने मास्तर मुलांना शिकवित असतात.त्यावेळची शाळा सकाळी व दुपारी भरायची.मुलांना अक्षरांची घटवणूक करतच कारभाऱ्या सोबत गावातील लोकांना ही फावल्या वेळात मदतीचा हात देतात.
आठवड्‍याला गावाकडे जाताना लोकांची कामे तो करायला लागतो. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची तो कामे करतो.जगण्याच्या प्रकरणात तंटा सोडवायला गावाला मदत करणे.अंजीला तिच्या पैशातून कारभाऱ्याला न समजता चोळीशिवून आणून देणे. गावात रहायचे तर गावकर्‍यांना होईल तेवढी मदत करायला हवी.अस त्याला नेहमी वाटायचं.

  शाळेतल्या पोरांबरोबर सदा शाळेत असणारी त्रिमुर्ती म्हणजे आयबु मुलाणी,आनंदा रामोशी आणि रामा बनगर .हे तिघे रोज काहीही न बोलता मास्तरचे व मुलांची तोंड बघत शाळेत बसायचे.रिकामटेकडे पणाचे ज्वलंत नमुने.वेळ घालवणे हाच यांचा जीवनाचा एककलमी कार्यक्रम होता.त्यातला आनंदा रामोशी पोटापाण्यासाठी भाकरीसाठी चोरी करणारा. दिवसा शिवारात टेहळणी करुन रात्रीचा कुणाच्या मळ्यातील कणसं खुडणार, वांगी लांबवणार, मिरच्या तोडून आणणार. दहा-पंधरा दिवसांनी त्यांच्या शेतात जाऊन कुणी नसेल असलं हो असं मळेकऱ्याला विचारणार? 

मागून कोणी देत नाही म्हणून मुकाट्याने नेहणार.आणि मीच नेली होती असं कबूल करणार.मास्तरकडे भाकरी मागायला घरी आल्यावर ते झोपलेत म्हणून भाकरीच्या गटुळ्यासोबत पैशाची थैली लंपास करणारा आनंदा.ते बघून वासना झाली.पण तुमची चोरी करायला तुम्ही काय सावकार का जहागीरदार आहेत का! तुमच्यासोबत असून तुम्हाला दगा देणं खरं न्हाई.म्हणून रुपयेआणून दिले.आणि फिर्यादही करायला सांगितलं.असा आनंदा प्रामाणिकपणे तीन रुपये दहा आणे पोटासाठी खर्च केले सांगून उरलेले आणून देणारा.

 बाहेरच्या काळोखातून दांडगादुडगा वीस- बावीस वर्षाचा माणूस पोटासाठी गावोगावी हिंडतो.'मला कोणीही नाही.आज हितं आलो.
शाळेपुढं लोकांनी सांगितले,मास्तर हाय एकलाच,ज्या त्याच्या सोबतीला,म्हणून आलोय.
'एखतपूरचा मळक्या अंगाचा अन्य मळक्या कपड्याचा आयबू मुलाणी हे पात्रं मास्तर सोबतीला नेहमी वाडीत असतं.घराची शाळेची साफसफाई करणारा.मास्तरच्या मागं सावली सारखा शेवटपर्यंत राहिला. 

त्याकाळातील सामाजिक आर्थिक दारिद्र्याच्या  विदारक परिस्थितीचे आयबू आणि आनंदा हे प्रतिनिधित्व करतात याचे मर्मबेधक विवेचन या कथेत गुंफले आहे.तिसरा सतत चेहरा म्हणजे राम बनगर शांतपणे निर्विकार चेहऱ्याने शाळेत येणार.
सतत अबोल कामधंदा काहीही नाही.

बाप मेंढरं राखणार आणि हा शांतपणे वेळ घालवत बिनदिक्कत राहणार.पण याच्याकडे जुन्या काळातील बुचड्याचे रुपये (चांदीचा रुपया)इतरांच्या मानाने बक्कळ होते.तो मास्तरला त्यांची मोड करूनआणायला गळ घालतो.
मास्तरही त्याला या कामात मदत करत होता.
  व्यंकटेश माडगुळकरांनी कादंबरीत वाडी आणि शाळा याशिवाय इतर व्यक्तिंची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि विक्षिप्तपणाच्या गोष्टी अफलातून चितारलेल्या आहेत.सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, शेकू-अंजीचे प्रेमप्रकरण, आनंदा रामोशी आणि आयबु यांचे मास्तरांच्या प्रेमासाठी बालट्याला गुपचूप जायबंदी करणं, रामा बनगराच्या बुचड्याच्या रुपयांच्या चिल्लरच्या थैलीची चोरी,बाळा धनगराचा हेकेखोर व आडमुठेपणा, काकुबाचं मेंढरांची संतती शोधण्याचा तोडगा, तालीम बांधणं अशा अनेक प्रसंगांनी धनगरांच्या विविध स्वभावाचे चित्रण केलेले आहे. 

याच बरोबरीने धनगरांचे आणि शेतकऱ्यांचे खडतर जीवनातील चढउतार आणि तिन्ही ऋतू चक्रातील निसर्ग, पीकपाण्याचे वर्णंन,मावल्याईची यात्रा, चावडीवरची सभा,सण उत्सव, मेंढपाळांचे जीवनचक्र ,सुगीच्या काळातले त्यांचे जगणे आणि अवर्षणग्रस्त झाल्यावर पाण्याचं दुर्भिक्ष झाल्याने गाव सोडणाऱ्या गावकऱ्यांची वाताहत कादंबरीत अनुभवायला मिळते.शेवटी तर गावात फक्त काकुबा त्यांची सून, आयबू,मास्तर आणि काकुबाची दोन मेंढरचं उरतात.मुलं नसल्याने शाळा बंद करून तालुक्यातील शाळेत हजर होण्याचा आदेश येतो.उजाड बनगरवाडीला मागे ठेवून मास्तर आयबूच्या सोबतीने गाव सोडतात.

गावाबरोबर गुरुजी म्हणून जपलेले ऋणानुबंध कादंबरीचे रसग्रहण करताना पानोपानी लक्षात येतात.याच कादंबरीवरुन अमोल पालेकर यांनी मराठी सिनेमा काढलेला आहे.यात राजाराम मास्तर श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी ताकदीने उभा केला आहे. 
या कादंबरीचे अनेक भाषेत अनुवाद केला आहे.
अशी ही ग्रामीण भागातील सामाजिक,आर्थिक  परिस्थितीचे दर्शन घडविणारीवाचनीय साहित्य कृती आहे.

परिचयक-- श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १५ मे २०२१