Monday, July 26, 2021

Kargil Vijay Diwas 26th July 2021

 VIDYA PRATISHTHAN’S

POLYTECHNIC COLLEGE INDAPUR 

Approved by AICTE New Delhi,Recognized by DTE,Mumbai Affiliated to MSBTE, Maharashtra.

Vidyanagari,Indapur,Pune-413106

LIBRARY


Kargil Vijay Diwas 26th July

Organizes QUIZ on the occasion of  Quiz on Kargil Vijay Diwas 26th July

E-Certificate will be send after attending the Quiz to your registered E-mail ID 

Click on given link to participate in Quiz

https://forms.gle/2SJBBjDmJRwEsAkKA




                                    With Thanks and Regards                                                         
                                        Atul Chandanvandan

पुस्तक:📖इंडियाज मोस्ट फिअरलेस

#कारगिल_विजय_दिनानिमित्त_फ्रीहोम_शिपिंग!
विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे पुस्तक वाचून तुम्हा ला आपल्या सैन्याचा अजुन जास्त अभिमान वाटेल!

पुस्तक:📖इंडियाज मोस्ट फिअरलेस

"आधुनिक लष्करातील शूरवीरांचा सत्य कहाण्या"

लेखक🖊ले.शिव अरुर आणि राहुल सिंग

पृष्ठ:३१५ 

मनोविकास प्रकाशन

📍मूल्य:२८०/(३१ जुलै पर्यंत)

 (टपाल केवळ :३०/जुलै २१ नंतर)

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता,पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

फोन पे गुगल पे, Paytm: व्हॉट्सॲप:9421605019

BHIM:9075465517

 

काय काय आहे या पुस्तकात?

🏅सप्टेंबर २०१६ एलओसी पलीकडे पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइक!

🏅जून २०१५ म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राइक

🏅अकरा दिवसात 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक

🏅रक्तबंबाळ स्थितीतही जळतं जेट विमान चालवणारा हवाईदलाचा पायलट!

🏅लान्स नाईक मोहन नाद गोस्वामी त्यांनी डोळे उघडले आणि मृत्यू त्यांच्याकडे बघून हसला!

🏅हवालदार हांगपण दादा मोठे मोठे शूर्विर ही लपण्यासाठी आडोसा शोधतात पण तो लपला नाही.

🏅कॅप्टन जयदेव डांगी फक्त दोन गोळ्या कुठल्याही कमांडोला मारू शकत नाहीत!

कर्नल संतोष यशवंत महाडिकमग मला फक्त एवढंच सांगा ते यातून वाचतील ना?

🏅मेजर मुकुंद वरदराजन मला गोळ्या लागल्या आहेत? माझा विश्वासच बसत नाहीये!

🏅लान्स नाईक हनुमंत अप्पा कोप्पड ह्याचे उत्तर वैद्यकशास्त्र जवळ सुद्धा नाही.

🏅लेफ्टनंट कमांडर नितीन आनंदराव यादव प्रत्येक गोष्ट आमच्या विरोधात जाणारी होती! प्रत्येक गोष्ट!

🏅विंग कमांडर गौरव विक्रम सिंग चौव्हाण चेहऱ्यावरून व घडणार्‍या रक्ताची चव मला कळत होती.

🏅कॅप्टन वरून सिंग त्यांनी मृत्यूला जवळून पाहिलेलं आहे. आम्ही त्यांचं अनुकरण करत राहू.

🏅स्क्वाड्रन लीडर विकास पुरी हेलिकॅप्टर चालवणाऱ्या प्रत्येकाचं दु:स्वप्न.

या पुस्तकाचे कौतुक लष्कप्रमुखांनी केले जनरल बिपिन रावत," सुंदर शैलीत वाचकांपुढे ठेवलेल्या आणि मनाची पकड घेणाऱ्या सत्यकथा"

इंडिया मोस्ट फियरलेस हे पुस्तक असामान्य शौर्य आणि कमालीची निर्भयता यांचे दर्शन वाचकांना घडवत.
लेखक:

१)शिव अरूर्:१० वर्षांपासून भारतीय लष्कर आणि संघर्षाचा अभ्यास करत आहेत. ..इंडिया टुडे टीव्ही वाहिनी चे संपादक आणि सूत्रसंचालक! युद्ध काळातील बातम्यांच्या कव्हरेज साठी दोन पुरस्कार!

२) राहुल सिंग:१८ वर्षे पत्रकारिता! 10 वर्षापेक्षा अधिक काळ लष्कराचे वृत्तान्त हिदुस्तान टाइम्स मधून लिखाण!

Tuesday, July 20, 2021

QUIZ on Eid Al-Adha 2021: Bakrid

VIDYA PRATISHTHAN’S

POLYTECHNIC COLLEGE INDAPUR 

Approved by AICTE New Delhi,Recognized by DTE,Mumbai Affiliated to MSBTE, Maharashtra.

Vidyanagari,Indapur,Pune-413106

LIBRARY

Eid Al-Adha 2021: Bakrid

Organizes QUIZ on the occasion of  Eid Al-Adha 2021: Bakrid

E-Certificate will be send after attending the Quiz to your registered E-mail ID 

Click on given link to participate in Quiz




                                    With Thanks and Regards                                                         
                                        Atul Chandanvandan

MY eLIBRARY


 Vidya Pratishthan's

Polytechnic College,Indapur

Library 

MY eLIBRARY 

ओपन करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा 


 https://sites.google.com/view/vplib/home

EMPLOYMENT NEWS 12-18 JUNE 2021

Vidya Pratishthan's 

Polytechnic College,Indapur

Library


http://employmentnews.gov.in/newemp/ENEng2.html 

Friday, July 16, 2021

पुस्तकाचे नाव:—बकुळा

वाचन साखळीतील नवीन पुष्प
पुस्तकाचे नाव:—बकुळा
मुळ लेखिका:— सुधा मुर्ती
अनुवाद:— लीना सोहोनी
प्रकाशक:—मेहता पल्बिशिंग हाऊस
पुस्तक परिचय:- राजु सातपुते
 माणसाला आवड लागली की सवड मिळते तस झालेय, दोन दिवसा पुर्वीच सुधा मुर्तीचे एक पुस्तक वाचुन पुर्ण केलै, व वाचनालयातील नवीन चार पाच पुस्तक मागवले,आता सुधा मुर्ती लेखिका म्हणटलय की पुस्तक हातचे सुटत नाही, "बकुळा" हे सुधा मुर्तीचे सुंदर कादंबरी हातात पडली आणि वाचण्यास सुरुवात केली, फक्त दोन दिवसात पुर्ण वाचुन झाली देखील,
श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची एकमेकांत गुंफत कहाणी खुपच आतुर आणि वास्तविक वाटतेय. शालेय जीवनापासुन सुरुवात होत जाणारी जीवनातील अनेक प्रसंग डोळया समोर चिञीत होतात, या गोष्टीचा उपयोग नक्की आपल्या सामाजिक जीवनात होईल, अनेक चुका कुठे होतात कुठे सावधपणे वागायला हवे याची जाणिव होते.
त्यांच्या प्रेमाची साक्षीदार ठरलेले बकुळीचे झाड त्यात श्रीमती ही श्रीकांत च्या पेक्षा हुशार व बुध्दीमान होती. आपल्या जीवनातील ध्येया पेक्षा आपल्या प्रेमावर तिने जास्त महत्व दिले गेले. श्रीकांतने नेहमी तिला ग्रहीत धरले गेले त्याचा महत्वकांशी स्वभावामुळे तिच्या आशा अपेक्षाला उतेजन मिळाले नाही, 
Lonely at the top माणुस जेव्हा इतक्या उंचीवर पोहचतो, तेव्हा तो फार एकाकी असतो.
शेवट मनाला हुरहुर लावुन गेला,आपण नेहमीच स्तव:च्या आयुष्यात श्रीमतीला तिच्या आयुष्यात फक्त वापर केला गेला, तिच्या भावना मनाचा विचार केला असता तर जीवनाचा रंगच वेगळा असता, 
एक गोष्ट नक्की लक्षात ठेवण्यासारखी वाटली की आयुष्यात प्रत्येकाने यश प्राप्त करावे त्या सोबतच आपल्या जीवनसाथी सोबत कुटुंबाची नाळ तुटता कामा नये. छोटया छोटया बाबीतच आनंद भरलेला आहे याची जाण असावी.
यश तर मिळेल पण त्याची किंमत पण मोजावी लागते. हे पुन्हा एकदा समोर आले.
सर्वांनी वाचावै असे पुस्तक आहे हे माञ नक्की.
धन्यवाद

Thursday, July 15, 2021

अँटाँमिक_हँबिटस भाग 2

#अँटाँमिक_हँबिटस

                लेखक : जेम्स क्लियर
                प्रकाशक : जयको पब्लिकेशन

अँटोमिक हँबिट म्हणजे सवयींचे अणुरूप 
किंवा सवयींना लहान लहान तुकड्यात विभागून त्या अमलात आणायच्या.

आपल्या प्रत्येकाला काही सवयी असतात त्यापैकी काही चांगल्या असतात तर काही वाईट असतात. 
सवयी कधीच संपवता येत नाहीत पण वाईट सवयी बदलून चांगल्या सवयी मात्र लावता येऊ शकतात.

खरेतर चांगल्या सवयी लावणे आणि त्या टिकवणे हे शेती करण्यासारखे आहे आणि वाईट सवयी बदलणे हे मोठा वटवृक्ष  हलवण्यासारखे अवघड आहे पण ठरवले तर अशक्य असे काहीच नाही. 

सवयी बदलणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे जी सातत्याने करावी लागते. त्यात खंड पडू द्यायचा नसतो.

हया सवयी बदलण्याच्या प्रक्रियेत माणसाला अडसर ठरू शकतात
तणाव : जबाबदाऱ्यांचा ताण, संयमाचा अभाव, आरोग्य समस्या
नकारात्मक विचार : स्वतःला कमी लेखणे

हया सवयी बदलण्याच्या प्रक्रियेत माणसाला मदत करू शकतात
ज्ञानपिपासूपणा : आजीवन ज्ञान मिळवण्याची तयारी
उत्पादकता : कौशल्ये, कामे हाताळण्याची पद्धत
संबंध : विस्तृत आणि सशक्त माणसांचे नेटवर्क

सवयी बदलणे ही तीन टप्प्याची प्रोसेस आहे
पहिला टप्पा : लक्ष्य निश्चित करणे
दुसरा टप्पा : धारणांमध्ये बदल
तिसरा टप्पा : अमंलबजावणी
उदाहरण द्यायचे झाले तर सिगारेटची सवय सोडायची हे लक्ष्य निश्चित केले की  , त्या सवयीमागच्या आपल्या चुकीच्या धारणा शोधायच्या ( सिगारेटमुळे चिंतामुक्ती  ) आणि त्या बदलण्यासाठी ज्ञानमार्ग वापरायचा (चिंतामुक्तीचे खरे पर्याय शोधायचे )आणि बदलासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहायचे. नवे पर्याय आपल्याला योग्य वाटतील ते अंमलात आणायचे.

 वाईट सवयीपासून रोज 1% फारकत घ्या आणि फरक अनुभवा....

अपूर्ण..

#ज्ञानयज्ञ
#सवयी
#atomichabits 
#स्वसुधारणा
#selfhelp

आर्य_भारत

#आर्य_भारत 
(खंड पहिला- भारताच्या दहा हजार वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आराखडा)
          - हर्षद सरपोतदार

युरोपीय इतिहासकारांनी बायबल खोटं ठरू नये म्हणून वेद प्राचीन नसल्याचं भासवलं, ख्रिश्चनिकरणाच्या हेतूने भारतीय पुराण- इतिहास क्षुद्र ठरविले, खऱ्या इतिहासावर ताशेरे ओढून तो पुसण्याचा कट या सर्व गोष्टी ब्रिटिश विद्वानांनी हेतुपुरस्सर केल्या. या सगळ्याचा पर्दापाश् प्रस्तुत पुस्तकात लेखकाने केला आहे.

भारतीय प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आणि इथल्या लोकांना आपण कसे बरोबर आहोत हे दाखवून गुलाम बनवण्यासाठी ब्रिटिशांनी दोन कलमांवर भर दिला.
कलम एक: लष्करी दबावाने भारताचा जास्तीत जास्त प्रदेश ताब्यात घेणे.
कलम दोन: भारतीयांना अभिमानास्पद वाटणाऱ्या त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करून त्याचं ख्रिश्चनीकरण करणे. 
याचा कळस म्हणजे ब्रिटिशांनी वेदांचा विकृत अनव्यार्थ लावण्यासाठी मॅक्समुल्लर या जर्मन शिक्षकाची जास्तीचा पगार देऊन निवड केली. अश्या बहाद्दरांनी खोटा कालक्रम रचून महाभारतोत्तर इतिहासातील किमान १२०० वर्ष खाल्ली.

इंग्रज गेल्यावर तत्कालीन भारत सरकार पण कमी नव्हते, वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननात अनेक आर्य- पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडायला लागल्यावर सरकारने हस्तक्षेप करून उत्खननच बंद करून टाकले.

प्रस्तुत पुस्तकात या सर्वाचा उल्लेख केलेला असून आर्य भारतात आल्यापासून ते इ.स.९०० म्हणजे यादव काळापर्यंत सर्वच इतिहासाचा तपशील वंशावळी आणि पुरावे देऊन मांडलेला आहे. त्यात प्रामुख्याने विशेष कालखंड तपशीलवार दिलेले आहेत ते पाहू.
रामचंद्र- यांच्या समकालीन राजाच्या जवळपास २८ पिढ्या नंतर धृतराष्ट्र राजा झाले.
युधिष्ठिराचे राज्यारोहन(कलियुग सुरवात)- इ.स.पूर्व ३१०१
बुद्धांचा जन्म- इ.स.पूर्व १६७६
हर्षवर्धन राजाने शालिवाहन शक सुरू केला- इ.स.७८
महम्मद पैगंबरांचा जन्म- इ.स.५७०

येशूच्या काळापासून इसवी सनाला सुरवात झाली अस म्हणतात, त्याआधीच्या घटनांना इ.स.पूर्व म्हणले जाते, अश्या युधिष्ठिर सिंहासनावर बसल्यापासून इ.स. सुरू होईपर्यंतच्या ३१०१ वर्षांमध्ये होऊन गेलेल्या राजांच्या वंशावळीदेखील पुस्तकात मांडल्या आहेत.

याचबरोबर मनू कोण?वेदांमध्ये कोणती माहिती आहे? ४वर्ण कसे तयार झाले?, ४ युग कोणत्या राजांच्या कालखंडाला म्हणतात? वैगरे गोष्टी तपशीलवार लेखक हर्षद सरपोतदार यांनी मांडल्या आहेत. 

अभ्यासकांसाठी आणि अज्ञान लोकांसाठी अत्यंत महत्वाचे असे पुस्तक, अवश्य वाचा🙏
     
           -आदित्य अरुण गरुड

#वाचनप्रेमी 
#आर्य_भारत
#हर्षद_सरपोतदार

Wednesday, July 14, 2021

अँटाँमिक_हँबिटस

#अँटाँमिक_हँबिटस

                लेखक : जेम्स क्लियर
                प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला -भाग पहिला

लेखकाविषयी:
जेम्स क्लियर हे लहानपणी बेसबाँल खेळत असताना त्यांच्या तोंडावर बँट आदळून जबरदस्त दुखापत झाली होती.
काही दिवसांनी कोमातून बाहेर आल्यावर काही महिने त्यांना जवळजवळ वर्षभराची सक्तीची विश्रांती घेण्यासाठी सांगितली गेली तसेच पुन्हा आवडता खेळ खेळू शकू का हयाबाबत कमालीची अनिश्चितता होती
पण हयाही परिस्थितीत त्यांनी कमालीचे मनोधैर्य दाखवून शारिरीक जखमांना मनावर हावी होऊ दयायचे नाही हा त्यांचा ठाम निर्धार केला.
दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या वाईट सवयी बदलण्यावर काम करण्यास सुरुवात केली.
सर्वात आधी रात्री उशिरा गेमिंग मध्ये वेळ घालवण्याऐवजी लवकर झोपण्यास प्राधान्य दिले,मग स्वच्छता, अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावण्यात लेखकाला यश आले त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला मग शरीरसुधारणेवर लेखकाने भर दिला आणि कमालीची सुधारणा झालेला लेखक पुन्हा बेसबाँल ग्राउंडवर उतरला
आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू चा पुरस्कार त्याने मिळवला.
आपल्याला झालेले सवयींचे झालेले फायदे लोकापर्यंत पोहचावे हया उद्देशाने लेखकाने स्वतःची वेबसाईट सुरू केली आणि त्यावर दर आठवड्याला सवयींवर लेख लिहायला सुरू केले.
पाहतापाहता लाखो सबस्क्रायबर त्यांच्या शी जोडले गेले.
ठिकठिकाणच्या कार्यक्रमांची निमंत्रणे त्यांना मिळू लागली आणि त्यातूनच पुढे लेखक आणि उद्योजक असा त्यांचा प्रवास सुरू झाला.
 हया प्रवासाचे फलित म्हणजे लेखकाचे हे पुस्तक ज्याला न्यूयॉर्क टाइम्स चे बेस्टसेलिंग बुक म्हणून नावाजले गेले.

पुस्तकाविषयी
लेखकांनी हया पुस्तकात सवयींना लहान लहान बदलात रुपांतरित करून स्वतः मध्ये मोठा बदल घडवून व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तसेच सवयींची स्पष्टता, सहजता, आकर्षकता आणि समाधानकारकता हयाद्वारे कायमस्वरूपी बदल घडवण्यासाठी लेखक प्रोत्साहन देतोच आणि आपल्याला केवळ चांगला नाही तर उत्तम माणूस म्हणून घडवण्यात आपल्याला मदत करतो.

अपूर्ण....

#ज्ञानयज्ञ
#स्वसुधारणा
#सवयी
#atomichabits
Nilesh Shinde 

Sunday, July 11, 2021

Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication  Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test





VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY


http://103.159.250.162:81/fdScript/RootOfEBooks/E%20Book%20Collection%202021/ECE/Digital%20Communications.pdf

Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

 Electronic & Telecommunication  Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:



VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY


https://pinoybix.org/2019/12/mcq-in-digital-communications-blake.html


Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication  Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:


 VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY



https://edurev.in/course/quiz/attempt/-1_Digital-Communications-MCQ-Test-1/356ae38d-6d79-442e-8c37-84cb5e8ec2e1


Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication  Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:


 VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY


https://edurev.in/course/quiz/attempt/-1_Digital-Communications-MCQ-Test-2/35690532-4a45-4cd0-9133-9c09bf2f7136


Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

 Electronic & Telecommunication  Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:




VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY


https://www.javatpoint.com/digital-communication-mcq


Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

 Electronic & Telecommunication  Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:


VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY

https://engineeringinterviewquestions.com/electronics-communication-engineering-ece-multiple-choice-interview-questions-and-answers-pdf/


Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication  l Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:


VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY

https://engineeringinterviewquestions.com/mcqs-on-digital-communication/

Electronic & Telecommunication Engineering Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication Engineering  Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

 VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY


https://www.objectivequiz.com/objective-questions/electronics/digital-communication

Electronic & Telecommunication Engineering all Subjects Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication  Engineering all Subjects Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:


                                                        VIDYA PRATISHTHAN'S

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY

https://civildatas.com/download/electrical-engineering-objective-type-questions-answers-by-rajput


ATUL CHANDANVANDAN 

LIBRARIAN

Electronic & Telecommunication Engineering all Subjects Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:

Electronic & Telecommunication  Engineering all Subjects Multiple Choice Questions with Answers Practice Test Series:



VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY

https://www.objectivebooks.com/p/electrical-engineering-mcq.html


ATUL CHANDANVANDAN

LIBRATIAN 


Friday, July 9, 2021

पुस्तकाचे नाव -कर हर मैदान फ़तेह

पुस्तक क्रमांक-📗97..🖋️ 
पुस्तकाचे नाव -कर हर मैदान फ़तेह
लेखक - विश्वास नांगरे पाटील

जिद्द+ चिकाटी+आत्मविश्वास= यश (विश्वास नांगरे पाटील)

"मन मे है विश्वास" हे पुस्तक विश्वास नांगरे पाटील यांचे आय.पी.एस अधिकारी होण्यासाठी अत्यंत खडतर केलेला अभ्यास,प्रवास नवयुवकांना मार्गदर्शक असा असलेला आपण सर्वांनी पाहिला, अनुभवला. तसेच आय.पी.एस अधिकारी झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या
 23 वर्षाच्या सेवेमध्ये आणि प्रशिक्षणामध्ये त्यांना आलेले सर्व अनुभव "कर हर मैदान फ़तेह"या पुस्तकात अत्यंत समर्पक शब्दात, दिशादर्शक पद्धतीने मांडलेला आहे. तो निश्चितच स्पर्धा परीक्षांकडे वळलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे ठरेल तसेच काहींना आपला मार्ग स्पर्धा परीक्षेकडे वळवण्यासाठीही
प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

"कर हर मैदान फ़तेह " हे पुस्तक मला वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य, संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे यांच्याकडून वाचनसाखळीतील पुस्तक परीक्षण वरील सर्वाधिक कमेन्ट देऊन समूहावर लेखन करणार्‍यांना प्रोत्साहित केल्याबद्दल मिळालेली ही सस्नेह भेट.
          "इन मुठीयों मे चांद तारे भर के" 
                 आसमा की हद से गुजर के'
          हो जा तू भीड से जुदा,भीड से जुदा
                               रे बंदेया, 
                  कर हर मैदान फ़तेह

"चला हवा येऊ द्या" या निलेश साबळे यांच्या कार्यक्रमात काही दिवसापूर्वी प्रमुख अतिथी म्हणून विश्वास नांगरे पाटील हे उपस्थित असताना त्यांनी "कर हर मैदान फ़तेह" या नवीन पुस्तकाची माहिती दिली व एक-दोन पाने ही त्या कार्यक्रमात वाचून दाखवली. तेव्हापासून त्या पुस्तक वाचनाची ओढ मनामध्ये लागली असतानाच हे पुस्तक हातामध्ये बक्षीस स्वरूपात पडले, आणि वाचन करत असताना स्वतःला हरवून गेलो.

"कर हर मैदान फ़तेह" या पुस्तकामध्ये जे विद्यार्थी उत्कृष्ट दर्जाची शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक प्रगती साधणारे प्रशिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी या पुस्तकातून बहुमोल असे मार्गदर्शन होणार आहे.

यशाच्या मार्गामध्ये कधीच आपली परिस्थिती आड येत नाही. हे सांगत असताना स्मशानातील एका काम करणाऱ्या कुटुंबातील मुलीला स्मशानातील जळणाऱ्या प्रेताच्या उजेडावर अभ्यास करून 98.5 टक्के गुण मिळाले तेव्हा तिच्या आईला हा आकडा किती असतो हेही माहीत नव्हते. आणि इकडे काही मुले सर्व गोष्टी असतानाही विनाकारण परिस्थितीला दोष देऊन आत्महत्यासारखे निर्णय घेतात. स्वातंत्र्याच्या काळानंतरही अशा काही गोष्टी घडतात याची मनापासून चिंता वाटत असल्याचे या ठिकाणी त्यांना जाणवते.

सांगली जिल्ह्यातील "कोकरूड" गावात त्यांचा जन्म झाला आय.पी.एस मध्ये निवड झाल्यानंतर 23 वर्ष अतुलनीय कार्य करत असताना त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यावर केलेली उपाय योजना, जीवनाचा मार्ग,ट्रेनिंग काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेत असताना आलेले अनुभव, मिळालेली शिस्त, शत्रूंचा पाठलाग करत असतानाचे अंगावर शहारे आणणारे वर्णन,  फिल्डवर काम करत असताना आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारची संकटे,आव्हाने वेगवेगळ्या प्रकारची माणसे आंदोलन करत असताना आपणाला दिसून येत असतात. त्यावेळेस कशा प्रकारे आपण त्यांना सामोरे जायचे आणि परिस्थिती कशी हाताळायची याचे अत्यंत सुंदर असे उदाहरण त्यांनी या पुस्तकात दिले आहे. यामध्ये ताज हॉटेलमधील उदाहरण असेल, नाशिकमधील आंदोलने असतील असे कितीतरी प्रसंग निश्चितच नवीन पिढीला, अधिकारी वर्गाला दिशादर्शक ठरणारे आहेत.

प्रशिक्षण काळामध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्या बरोबर कित्येक आय.पी.एस अधिकारी प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांच्यामध्येही एक एक प्रशिक्षण मध्ये टॉप करण्याची धडपड चाललेली होती. त्यावेळी त्यांनी रूपकुंड ट्रेक एक चित्तथरारक अनुभव याठिकाणी मांडला तो अनुभव वाचताना अंगावर शहारे आलेले  दिसून येतात.

कोणतेही कार्य करत असताना आपल्याकडे प्रखर ध्येयशक्ती हवी.If we rest,we rust. आपण थांबलो आराम करायला लागलो तर गंज चढतो. त्यामुळे कोणतेही कार्य करत असताना आपल्या मार्गात अनेक मोहाचे प्रसंग येत असतात, परंतु त्याला बाजूला सारून आपण यशाचे शिखर गाठायचे असते. कधी आपण छोटे व्हायचे आणि कधी मोठेही. समयसूचकता  आपल्या अंगी असली पाहिजे. कधी मृदु व्हायचे व कधी कठोर याची जाण आपल्याला असली पाहिजे. प्रत्येक प्रसंगाला आपण प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नये. आपण जेव्हा मी पणा सोडतो तेव्हा ध्येयप्राप्ती असणारी आपली दृष्टी विचारीत होते, आणि आपण पुढे सरकत जातो. रोज अभ्यासपूर्वक जीवनामध्ये एक तरी प्रगतीचे क्षेत्र निवडून त्यात टॉपला जाण्याचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि ते प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान व रात्रीचा दिवस करीन ही प्रबळ इच्छाशक्ती मनामध्ये ठेवली पाहिजे.

तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या इच्छाशक्तीची, उमेदीची उंची अधिक महत्वाची असते.शरीराचे खुजेपण कुठलीही उंची गाठायला कमी पडू शकत नाही.त्यामुळे प्रशिक्षण घेत असताना बरेच अनुभव त्या ठिकाणी आले.

"कर हर मैदान फ़तेह" या पुस्तकांमध्ये अनेक कथाही त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ससा कासवाची गोष्ट, टोपीवाला व माकड यांची गोष्ट. खरंतर या गोष्टी काळानुरूप कशा बदलत गेल्या तसेच आपणही बदलत गेले पाहिजे. असे त्यांनी सांगताना "पोलव्हाल्ट" सारखी आसमान भरारी ही आपण घेतलीच पाहिजे.

"नवी पिढी आणि आरोग्य" याविषयी बोलताना नांगरे पाटील यांनी आपल्या आतापर्यंत सेवेमध्ये कित्येक वाममार्गाला गेलेल्या नवीन पिढ्यांची याठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे त्यांनी या कालावधीमध्ये बरेच महाविद्यालयांमध्ये, शाळेमध्ये जाऊन मुलांसाठी प्रेरणादायी व्याख्याने दिलेली दिसून येतात त्यांच्यासाठी वाद-विवाद स्पर्धा सुद्धा बरेच ठिकाणी आयोजित केलेल्या दिसून येतात.अलीकडे वयाच्या तिशीतच वजन वाढल्याने रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा विकारांनी युवा पीडी पोखरलेली दिसून येते. त्यांनी मात्र जीवनशैली बदलण्यासाठी 21/90 चा फार्मूला वापरा,असे सांगितले आहे. एखाद्या नवीन गोष्टीचा ध्यास घेतला की 21 दिवसात सवय लागते आणि 90 दिवसात तीच आपली लाइफस्टाइल होऊन जाते. आज नांगरे पाटील यांचं वय 47 वर्ष असतानाही 42 किलोमीटर सलग न थकता ते मॅरेथॉन करू शकतात. तसेच त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या बॅचमेटचे
 "कृष्णप्रकाश" यांचेही अत्यंत सुंदर उदाहरण दिलेले आहे. उसेन बोल्ट ऑलिम्पिकचे ट्रॅकवर किती वेळ  धावला असेल तर फक्त अडीच मिनिटे परंतु यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलेले दिसते. तूप खाऊन लगेच रुप येत नाही. त्यामुळे योग्य आहार,योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती हीच खरी आरोग्याची त्रिसूत्री आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या संपूर्ण सेवेसाठी आयुष्याचे तीन भाग बनवले होते. एक तृतीयांश स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी, एक तृतीयांश आपल्या प्रोेफेशनसाठी आणि एक-तृतीयांश समाजासाठी. त्यासाठी त्यांनी आपली पत्नी आणि मुले यांच्या सोबतच रनिंग, सायकल, स्विमिंग जिम सुरू केले त्यामुळे कुटुंबाचा सहवास आपोआप त्यांना मिळू लागला,आणि त्यांच्या पत्नीही एक दिवस 21 किलोमीटरची अर्धमॅरेथॉन ही पूर्ण केलेली दिसून येते. अत्यंत बारकावे  पाहून त्यांनी त्याचा आपल्या जीवनशैलीमध्ये सातत्याने वापर केलेला दिसून येतो.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव यावेळेस प्रत्येक ठिकाणी तरुण वर्गांची, तरुण मंडळांची बैठका घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात समजवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असत. कोणतेही आंदोलन असेल, कोणतेही सार्वजनिक उत्सव असेल, तरुण पिढीचे रक्त सळसळत असते. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे त्यांना जर अटक झाली तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती व त्यांच्या करिअरवर पाणी फिरणार असते. या सगळ्या बारीकसारीक गोष्टी ते तरुणांना सांगत असत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने  24 तास डुट्या केल्या, त्यांच्याविषयी ते मोलाचे सांगतात, लॉकडाउन,संचारबंदी अमलात आणण्याची मुख्य जबाबदारी पोलिसावर देण्यात आलेली होती.पोलिसांनाही जबाबदारी पार पाडताना या रोगाची लागण होण्याचा धोका ही तितकाच होता. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त साहित्य, संरक्षण यंत्रणा कशी उपयोगी करून कशी पुरवता येईल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात.

विश्वास नागरे पाटील यांनी आपल्या सेवेमध्ये,
 कार्य मूल्यांकन पद्धती, झिरो पेंडन्सी, निर्भया पथक यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले दिसून येतात. आपण ज्या ठिकाणी कार्य करत असतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त आधुनिकतेचा वापर कसा केला जाईल हे त्यांनी सांगितलेले निश्चितच नवीन अधिकारी वर्गासाठी फायद्याचे ठरणार आहे.

आपले दैनंदिन जीवन जगत असताना आयुष्य सहज आणि सोपं नसते.खूप अडथळे आपल्याला येत असतात,तसेच निर्माण केलेले दिसून येतात. पण ते मात्र आपण पचवायला  शिकले पाहिजे. अभिनेता सुशांत यास काय कमी होते, अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण आलेल्या संकटांना ही  आपण ठणकावून सांगावे "आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!"त्यामुळे लहान मुलांना बाहेरचे जगही कळाले पाहिजे.त्यांना मैदानावर खेळू द्यावे, त्यांचे गुडघे फुटले पाहिजे तरच अचानक रक्त पाहिले की,त्यांना चक्कर येणार नाही.न्यूनगंड, भयगंड,उदासीन आणि सुस्ती या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून मुलांचे व आपले आयुष्य सुंदर बनवले पाहिजे.

मोबाईल, नाती आणि मनाचे आरोग्य याविषयी त्यांनी तुकाराम महाराजांचे 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण!' हे अत्यंत उत्तम असे उदाहरण दिले आहे.हल्लीची पिढी ही खूप खोडकर,खट्याळ, हुशार असलेल्याचे दिसून येते. त्यांना गप्प बसण्यासाठी कित्येकदा त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. आणि मग पब्जी, ब्ल्यू व्हेल यासारख्या कितीतरी घातक गेममुळे मुले एकलकोंडी होऊन बदललेली दिसून येतात. मोबाईल नावाचा भस्मासुर की जो पालकच त्यांना देत असतात.बारावीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुले अंदाजे 20,000 तास इंटरनेट वापरत असतात असे त्यांचे म्हणणे आहे. इंटरनेट वापरत असताना इतरही काही वेबसाईट ते उघडत असतात आणि त्यामुळे मनामध्ये विकृती निर्माण झालेली दिसून येते.आज-काल ऑफिसमधून, बाहेरील कामावरून घरी आल्या-आल्या बहुतांश आई-वडील मोबाईलवर सर्रास फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर, टेलिग्राम वापरत असतात आणि मुलेही वापरत असतात.परंतु त्यावर सर्वांचे योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे.नाहीतर 45 वर्षे असणारी व्यक्तीही तीस वर्षाचा डीपी अथवा फोटो ठेवून समोरच्याला वेडसर बनवण्याचा प्रयत्न करत असते, जवळीकता वाढवत असते. यासाठी "युवा संवाद" हे नांगरे पाटील यांनी अत्यंत सुंदर असे पाऊल त्याठिकाणी उचलले.

"अपघात आणि आपण" यामध्ये अपघात असण्याचे प्रमाण जर पाहिले तर आता वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते.कारण मुलगा नववी,दहावीला गेला की त्याच्याकडे लगेच गाडी असते. त्या गाडीवर ट्रिपल सीटवर त्याचे मित्र जाताना आपणास दिसून येतात.
चौदा-पंधरा वर्षाच्या मुलाला ट्यूशनला जायला मोटरसायकल असते परंतु त्याचे स्पिड मात्र आपल्या हातात नसते.

शेवटी "दीक्षांत परेड" याविषयी त्यांनी माहिती दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री.विद्यासागर राव हे दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी होते. यावेळेस सर्व आय.पी.एस अधिकाऱ्यांच्या घरातील सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असतात.तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि नव्या उमेदीचा त्याठिकाणी असतो.संपूर्ण नसानसात या ठिकाणी कार्य करण्याची उर्मी संचारलेली दिसून येते. त्यावेळेस सेवेत सुरू होण्याचा पहिला दिवस जितका महत्त्वाचा असतो तितकाच सेवानिवृत्तीचा दिवस महत्त्वाचा असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले.

अशाप्रकारे "कर हर मैदान फ़तेह" हे विश्वास नांगरे पाटील यांचे दुसरे पुस्तक म्हणजेच त्यांच्या जीवनाचा पूर्वार्ध हा नवीन पिढीला , पालकांना, अधिकाऱ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन देणारे दिसून येते. हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे.
 पृष्ठसंख्या 228
 मूल्य 299 
अभिप्राय शब्दांकन-
                    सिंधुसूत...🖋️

Wednesday, July 7, 2021

पुस्तकाचे नाव-स्टीफन हॉकिंग

*पुस्तक क्रमांक-📗95.🖋️
पुस्तकाचे नाव-स्टीफन हॉकिंग 
लेखक -डॉ.द.व्य.जहागिरदार

स्वतःच्या अपंगत्वावर मात करून एक वेगळं अस्तित्व निर्माण केल्यामुळे जगातल्या लाखो लोकांचे स्फूर्तीस्थान म्हणून" स्टीफन हॉकिंग"यांच्याकडे पाहिले जाते.कष्टाने जगण्याची हिंमत त्यांनी दाखवून दिली.त्यांच्या एकूणच आयुष्याचा थक्क करायला लावणारा प्रवास या पुस्तकात लेखकाने अत्यंत समर्पक शब्दात करून दिलेला आहे.

"स्टीफन हॉकिंग" यांचा जन्म 1942 मध्ये इंग्लंड या ठिकाणी झाला. त्यांचे आई-वडील हे उच्चशिक्षित होते. स्टीफन यांना खेळामध्ये तसा जास्त रस नव्हता. स्टिफन 12 वर्षाचे असताना त्यांच्या दोन मित्रांनी आपापसात पैज लावली होती की,तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही.परंतु दुसऱ्या मित्राला हे मान्य नव्हतं.वर्गामध्ये  पहिल्या 5 मध्येही स्टिफन याचा नंबर नसायचा.मात्र घड्याळ,रेडिओ कसे काम करतात हे पाहण्याचा त्यांचा उत्साह दांडगा होता. 8-9 वर्ष वयाचे असतानाच आपण भविष्यात काहीतरी मोठे शास्त्रज्ञ व्हावे.असे त्यांना मनापासून वाटायचे.विज्ञानामुळे आपल्याला सत्य समजेल.नुसते घड्याळ, रेडिओ बाबतच नाही तर आजूबाजूच्या सर्व वस्तूबाबत देखील माहिती मिळावी असे त्यांना वाटायचे.त्यांना पुस्तक वाचण्याची जास्त आवड नसायची,परंतू पुस्तकाच्या मजकुरातील चुका शोधून काढण्यात त्यांना आनंद वाटायचा. ऑक्सफर्डच्या तिसऱ्या वर्षीचा खास विषय म्हणून त्यांनी "कॉस्मोलॉजी" या विषयाची निवड केली.विश्वाच्या उत्पत्तीचे व घटनेचे हे शास्त्र. 
विश्व कुठून आले? कसे निर्माण झाले?असे प्रश्न या क्षेत्रात निर्माण केले. म्हणूनच पीएचडी करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात त्यांनी अर्ज केला.आणि 1962 मध्ये त्या विद्यापीठात आले. 

 "स्टीफन" यांना वयाच्या 20 व्या वर्षीच असाध्यअशा "मोटर न्यूरॉन डिसीज" रोगाने गाठले .या रोगामुळे शरीरातले स्नायूवरचे नियंत्रण निघून जाते.स्नायूंची नैसर्गिक हालचाल करणारा मेंदूचा भाग निकामी होऊ लागतो. अशक्तपणा,अडखळत बोलणे आणि बोलताना त्रास होणे. आणि हळूहळू चालणे-बोलणे वगैरे सगळंच बंद होऊन जाते.दुरुस्त न होणारा आणि मरण जवळ आणणारा हा आजार, स्टिफन यांना झाल्याची बातमी त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होती. मलाच या रोगाने का गाठले? असे त्यांना वाटायचे. पुढील काळात माझी परिस्थिती दयनीय होईल असे प्रश्न त्यांना पडायचे. पीएचडीचे संशोधन चालू ठेवावे मध्येच खंडित करू नये असे डॉक्टरांचे म्हणणे होते.परंतु स्वतःच्या अंगी असणारा प्रचंड आत्मविश्वास काहीतरी करून दाखवण्याची अफाट ऊर्जा मनामध्ये असल्यामुळे स्टिफन जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष जगतील अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत ते 76 वर्षे जगले.

स्टीफन हे केंब्रिज विद्यापीठात रोज सकाळी 11वाजता यायचे आणि आल्यानंतर त्या ठिकाणी संशोधक बरोबर चर्चा,मुलाखती, सेमीनार हे चालू असायचे, त्यांच्या शारीरिक प्रकृतीमुळे एक परिचारिका त्यांच्यासोबत नेहमी असायची ती त्यांच्या केसांचा भांग पाडणे, चष्मा पुसून देणे तोंडावर, मानेवर आलेली लाल पुसणे अशी कामे त्यांना करावी लागत.परंतु त्यांच्याबरोबर राहणे म्हणजे तेथील विद्यार्थ्यांना व परिचारिकांना एक प्रकारचे बक्षीस वाटायचे.

"स्टीफन हॉकिंग" यांना कुबड्या वर चालणे ही ज्यावेळी शक्य झाले नाही त्यावेळेस ते आपल्या विभागात व्हीलचेअरवर बसून जात. पायावर चालणे त्यांना अगदी अशक्य झाले होते.तरीही ते जास्तीत जास्त संशोधनात वेळ घालवत होते.स्टीफन हॉकिंग यांच्याकडे पाहिले की अपंगत्व ही जीवनातील किती क्षुल्लक गोष्ट आहे, हे आपल्या लक्षात येते.त्यांना आजारी म्हणणे देखील चुकीचे होते.

1974 मध्ये वयाच्या केवळ 32 व्या वर्षी स्टीफन हॉकिंग हे रॉयल सोसायटीचे सन्माननीय सभासद म्हणून निवडून गेले. ते FRS झाले. त्या कार्यक्रमाला प्रत्येक सभासदाला सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन त्यांची प्रतिष्ठापना करतात त्यावेळी एका रजिस्टरवर सही करावी लागते. या रजिस्टरच्या सुरुवातीच्या पानावर न्यूटनची सही आहे. परंपरेप्रमाणे प्रेक्षक गृहातून सभासद स्टेजवर येऊन सही करतात. स्टीफन हॉकिंग च्या बाबतीत मात्र अपवाद करण्यात आला. तेथील अध्यक्ष हे स्वतः रजिस्टर घेऊन स्टीफन हॉकिंग यांच्या जवळ गेले. त्यांना सही करायला बराच वेळ लागला होता. ज्यावेळेस स्टीफन हॉकिंग यांनी सही करून डोके वर केले त्या वेळेस सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.संशोधन क्षेत्रात संपूर्ण जगतात हॉकिंग यांची कीर्ती खूपच वाढली. सहा सन्माननीय डॉक्टरेट, अमेरिकेतील मानाचं अल्बर्ट आईन्स्टाईन पारितोषिक मिळाले. एलिजाबेथ राणीने त्यांना  "Commander of the British Empire CBE" हे मानाचे बिरुद त्यांच्या नावानंतर लावण्याची परवानगी दिली.

"स्टीफन हॉकिंग" हे व्याख्याने देत असताना त्यांचे सहाय्यक त्यांची व्हीलचेअर ढकलत स्टेजवर आणत.व्हीलचेअरच्या एका हाताखाली संगणक पक्का केलेला असायचा. त्यामध्ये व्याख्यानाची सि.डी. टाकण्यात येते. श्रोत्यांना स्टीफन हॉकिंग धीर गंभीर वाटतात, स्थिर बसलेले दिसतात. पण व्याख्यान चालू असताना त्यांच्या पापण्यांची हालचाल होते, नाजुकसे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमलते. त्या ठिकाणी दोन नर्सेस त्यांच्यावर लक्ष ठेवून उभ्या असतात त्यांना मदत लागेल तेव्हा येऊन मदत करत.व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारावे अशी ते विनंती करत. व्याख्यानाच्या दरम्यान त्यांची लाळ पुसणे, चष्मा स्वच्छ करणे, केस मागे नेणे ही कामे त्या नर्सेस करत.

स्टेफिन यांनी 1988 मध्ये"A Brief History of Time" हे पुस्तक लिहिले त्यावेळी त्यांची अपेक्षा एकच होती की, माझे पुस्तक हे शहरातील सर्व ठिकाणी वाचायला उपलब्ध व्हावे. आणि खरोखरच हे पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झाले, जवळपास 30 भाषेत हे पुस्तक अनुवादित झाले. आणि त्याच्या लाखो प्रती सर्वत्र विक्रीत झाल्या. सर्वांचे या पुस्तकावरचे अपार प्रेम,ओथंबून  येणारी पत्रे, मुलाखती, टीव्हीवरील सहभाग वाढू लागले. त्यामुळे स्टिफन हे आणखीन जगभर प्रसिद्ध झाले.परंतु माणसाला जीवनात यश जसे मिळू लागते तसं माणूस आपल्या घरातील मंडळी पासून दूर होत जात असतो. तसेच काही त्यांच्या कुटुंबाबाबतीत झाले, कारण त्यांची पत्नी जेन यांनी जीवनाच्या प्रत्येक प्रवासात स्टिफन यांच्याबरोबर मोलाचं योगदान दिले तसेच मुलांचे शिक्षण, त्यांची सर्व व्यवस्था ती पाहत असत. स्टिफन यांच्यात असाध्य रोगामुळे चिडचिडपणा निर्माण व्हायचा तरीही जेन त्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेत. परंतु दोघांमध्ये घटस्फोट झाला आणि दोघेही विभक्त राहू लागले.स्टिफन यांची पत्नी जेन यांनी 1999 मध्ये"Music to move the starts My life with stephen" पुस्तक लिहिलं ते जवळपास 610 पानांचं त्यामध्ये जेन ने संपूर्ण घडामोडी या पुस्तकात लिहिल्या आहेत. मात्र या गोष्टीच्या दोन्ही बाजू पडताळणे गरजेचे आहे असे काही लोकांचे मत होते.

स्टीफन हॉकिंग यांचा भक्कमपणा, प्रचंड आत्मविश्वास, जबरदस्त व्यक्तिमत्व ,हे त्यांचे वैशिष्ट्य. ते सहसा तडजोड करत नाहीत, आपल्या मतावर ठाम असत. विनोदाची त्यांची वृत्ती, सहज प्रवृत्ती आहे. त्यांचे खूप हितचिंतक आहेत. तसेच त्यांना खूप मित्र आहेत.अपार प्रतिभेचा,अचाट बुद्धिमत्ता असलेला स्टीफन हॉकिंग यांनी अवकाशाची पोकळी रिकामी नाही. कृष्णविवर कृष्ण नाहीत.असे वरवर पाहता अर्थहीन वाटणाऱ्या सिद्धांतांचे जनक. तसेच महास्फोट निर्मितीमुळे विश्वाची सुरुवात खऱ्या काळात झाली आहे, परंतु त्याच बरोबर दुसऱ्या प्रकारचा काळ आहे तो काल्पनिक आहे व तो खरे काळाची काटकोनात आहे. थोडक्यात म्हणजे विश्वाची निर्मिती ही पदार्थ विज्ञानाच्या नियमाने निश्चित करता येते परमेश्वराने लहरी प्रवृत्तीने विश्व निर्मिती केली,आणि विश्व अशा लहरी प्रकारे पुढे जात आहे. असे म्हणता येणार नाही. परमेश्‍वराचे अस्तित्व आहे का नाही याबद्दल हे सिद्धांत कोणतीही टिप्पणी करत नाही.ते तेवढेच म्हणत 'तो लहरी नाही, मनमानी करणारा नाही. ज्या माणसाला पाहताना आपल्याला कणव येते,काळजी वाटते.तो माणूस काळ आणि अवकाश यांच्या सीमारेषा कशा असाव्यात,पण प्रत्यक्षात नाहीत हे दाखवून देतो संपूर्ण विश्वाला एकाच सत्याच्या सर्वकष सिद्धांताने एका सूत्रात मांडणारे दुसरे आईन्स्टाईन? दुसरे न्यूटन?

"स्टीफन हॉकिंग" या पुस्तकातून दुर्धर आजारावर मात करत असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर असाध्य ते साध्य होऊ शकते हे आपणास दिसून येते.जीवन सरळ, साधे, सोपे नसते आपल्या परिस्थितीत सुंदर जगायचा आपण प्रयत्न करायला हवा.हा खूप मोलाचा संदेश या पुस्तकातून मिळतो. तसेच अजून खूप काही या पुस्तकामध्ये वर्णन केले आहे ते वाचण्यासाठी आपण सर्वांनी आवश्य हे पुस्तक वाचावे. 
*पृष्ठसंख्या -70* 
*अभिप्राय शब्दांकन*
          Ganesh Tambe 

Sunday, July 4, 2021

Admission to First Year @ *विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज, इंदापूर*

 
 
 
 
नमस्कार,

*विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज, इंदापूर* आशा करतो की आपण सुरक्षित आहात.

आपणास आम्ही कळवू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावी नंतर *डिप्लोमा इंजीनियरिंगची केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 30 जून २०२१ (मंगळवार)* पासून  सुरू झालेली आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या करियरसाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांविषयी माहिती घेण्यासाठी व इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यानंतर तयार होणाऱ्या नवीन संधी विषयी माहिती घेण्यासाठी अवश्य भेट द्या.

तसेच दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी शासनाच्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिप ची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली जाईल 

*विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज इंदापूर.*

श्री जगताप सर (9860760604)

श्री गायकवाड सर

(8600258136)

Admission to First Year:

Qualifications:

The candidate must have passed SSC examination [10th Std.] of Maharashtra State Board of Secondary & Higher secondary Education.

OR

CBSE/ICSE Examination approved by Govt. of India

Eligibility:       SSC Pass

For First year admissions contact:
Mr Jagtap A.S  -
 9860760604

https://drive.google.com/drive/folders/1KT9kVuLj30BkfSN0alAqo0qfZmaAgBkK?usp=sharing

#ANNA FRANK...The diary of a young girl..

#ANNA FRANK.
..The diary of a young girl.....
तेराव्या वर्षाच्या वाढदिवशी ॲनला भेट मिळालेली डायरी हीच पुढे तुझ्या सुखा-दु:खात खरी साथीदार बनणार आहे याचा तिने कधी विचारही केला नव्हता....ज्यू कुटुंबात जन्मलेल्या ॲनला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरने ज्यूंचा अनन्वित छळ सुरू केल्यामुळे भूमिगत अवस्थेत राहावे लागले... तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला दोन वर्ष अत्यंत असुरक्षित वातावरणात तुरुंगात राहील्याप्रमाणे अत्यंत हाल सोसावे लागले. यादरम्यानच तिने आपली दैनंदिनी लिहायला सुरुवात केली.यामध्ये तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख तर आहेच त्याशिवाय त्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचंही सविस्तर वर्णन तिने केलेलं आहे..!
   ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌  एक १३वर्षांची मुलगी जास्तीत जास्त कुठल्या स्तरापर्यंत विचार करू शकते..? पौगंडावस्थेतील मुली नेहमी अविचारी आणि उथळच असतात का..?त्यांच्या मतांचा,विचारांचा नेहमीच अनादर केला पाहिजे का...?ॲनची ही डायरी वाचल्यानंतर या प्रश्नांना काही अर्थच उरत नाही.... एखाद्या प्रौढ माणसाला ही अशक्य असे विचार जेव्हा ॲन आपल्यापुढे ठेवते आणि अत्यंत तटस्थपणे स्वतःचे परीक्षण करते तेव्हा तर ती एखाद्या तपस्वी योगिनी सारखीच वाटते.अत्यंत सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेली,विचारी, तितकीच संवेदनशील मात्र अत्यंत दुर्दैवी आणि अल्प आयुष्य लाभलेल्या ॲन फ्रँकची ही कथा प्रत्येकाने 
वाचावी अशीच...!
Pragati mane 

पुस्तकाचे नाव :- झपूर्झा

📗✒️
पुस्तकाचे नाव :- झपूर्झा 
लेखक :- अच्युत गोडबोले 
पृष्ठ संख्या :-414
मूल्य :-280
पुस्तकाचे एकूण 3 भाग आहेत. 

          पुस्तकांसारखा प्रामाणिक, सच्चा, निस्वार्थी,  निर्मळ असा मित्र या जगात दुसरा कोणीच नाही. पुस्तकांची सोबत असेल तर आपण कितीही मोठे दुःख असू देत त्यातून बाहेर पडू शकतो. पुस्तके ही आपल्या आयुष्यात मार्गदर्शकाप्रमाणे असतात. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठाम आपल्या पाठीशी उभे राहून नव्हे,  आपला हात हातात घट्ट धरून जीवनाचा मार्ग दाखवतात. नुसताच मार्ग नाही तर आपली वाट ज्ञानमयी  प्रकाशाने उजळून टाकतात !
          'पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात',' पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात', ' जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक'! ही सारी विधाने लेखक अच्युत गोडबोले यांच्या 'झपुर्झा' या पुस्तकाला तंतोतंत लागू पडतात. 
         अतिशय विस्तारलेल्या या मराठी साहित्याच्या प्रांतातील एक नावाजलेले लेखक म्हणजे ' अच्युत गोडबोले 'यांचे अगदी अचानक पणे झपूर्झा नावाचे पुस्तक माझ्या हाती पडले. वाचनाची अतिशय आवड असलेल्या मला शब्दात वर्णन करता येणार नाही इतका आनंद झाला. आणि अगदी असाच आनंद तुम्हाला व्हावा म्हणून त्यांच्या या पुस्तक वाचून माझ्यात निर्माण झालेले भावतरंग तुम्हाला सांगावे असे वाटले.
         अद्वितीय, अद्भुत, आणि चमत्कारिक जगाची ओळख करून देणारे हे पुस्तक माझ्या हाती येताच  माझ्या कल्पनेच्या पलीकडे जगाची ओळख या पुस्तकाने मला करून दिली. या पुस्तकाचे एकूण तीन भाग आहेत. 
         एक पुस्तक वाचल्यावर दुसरा भाग वाचण्याची माझी भूक वाढतच गेली. या जादूगाराच्या पोटलीत  आणखी कोणकोणते चमत्कार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात निर्माण झाली. 
         त्यांचे हे पुस्तक पाश्चात्य विदेशी इंग्रजी साहित्यावर  आधारलेले आहे. या खजिन्यातील मोत्यांप्रमाणे  असलेल्या अगदी मोजक्या लेखकांची फक्त नावे मी ऐकून होते. पण कुबेराचा खजिना हाती लागावा त्याप्रमाणे एक एक अलंकार साहित्यिकांच्या रुपाने डोळे दिपवून टाकणारे अशी एक एक कलाकृती घेऊन माझ्या पुढ्यात येऊ लागले. आपल्या मराठी साहित्यातील लेखकांनाही या साहित्याची भुरळ न पडावी हे तर शक्यच नव्हते !
         आपल्या मराठी साहित्यविश्वाला प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवणारी  साहित्य मंडळी सुद्धा या साहित्याने वेडावली आणि त्यांनी या साहित्यापासून प्रेरित होऊन अजरामर अशा साहित्याची निर्मिती केली. 
         या पुस्तकातील इंग्रजी साहित्यिकांची आयुष्ये  अंगावर काटा आणणारी आहेत. या पुस्तकात आपल्याला त्यांची वादळी आणि आश्चर्यजनक आयुष्य तर वाचायला मिळतातच पण त्यांच्या साहित्यकृतींचा आढावा यात घेतलेला आढळतो इंग्रजी साहित्य आणि साहित्यिक यांचा आढावा घेणे हा 'झपूर्झा' चा हेतू असला तरी त्या त्या लेखकाचा आणि लेखनाचा इतिहास रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न यात लेखकाने केलेला आहे. या पुस्तकाला दिलेला 'झपुर्झा 'हे नाव केशवसुतांच्या एका कवितेवरून लेखकाला सुचले. 
         साहित्य म्हणजे हे त्या त्या लेखकाच्या आयुष्याचे अनुभवांचे प्रतिबिंब तर असतेच !तत्कालीन समाज तसेच सामाजिक, राजकीय,  सांस्कृतिक,  आर्थिक या अंगांचे दर्शन घडवणारे एक चलचित्र देखील असते !औद्योगिक क्रांती आणि दोन महायुद्धे यांचा बराच परिणाम ह्या साहित्यिकांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या साहित्यावर देखील झालेला आढळून येतो. इंग्रजी साहित्याचा इतिहास मला सर्वप्रथम जाणून घेताना तो या पुस्तकामुळे साहित्यिकांची नावे आणि त्यांचे गाजलेले साहित्य यांची  अगदी मुळापासून ओळख झाली. हे पुस्तक भारावून टाकणारे आहे! विचारांना चालना देणारे आहे !आणि नवा दृष्टिकोन देणारे आहे! इंग्रजी साहित्यिकांच्या आयुष्याची आणि साहित्याची रसयात्रा आपण येथे अनुभवू शकतो. 
         सर्व कलांमध्ये साहित्य हे एका बाबतीत इतर कलांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे! याचं कारण साहित्य आपल्याला एकाच वेळेला इतिहास आणि भूगोल या दोन्हींमध्ये खोलवर डुबकी मारू देतं ! आयुष्यातले अनुभव जितके समृद्ध आणि खोलवर तितके ते साहित्यातही सच्चेपणाने उतरतात. डोस्टोव्हस्की,काफ्का,कामू, हेमिंग्वे अशा अनेकांची स्वतःचे आयुष्ये प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळे त्यांचं साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटत होतं. 
         नाहीतरी साहित्य म्हणजे तरी काय असतं? "सामान्यामधलं असामान्यत्व ओळखणं आणि नंतर सामान्य शब्दात काहीतरी असामान्य लिहिणे म्हणजे साहित्य" असं बोरीस पास्तरनाक म्हणायचा." हेच अनुभव मनात साठलेले असताना त्याचे तुकडे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्याचे सुंदर शब्द होतात "असं  खलिल जिब्रान म्हणतं असे !
         या पुस्तकात या सगळ्या लेखकांचे आयुष्य विस्ताराने आली आहेत. हे सगळे लेखक त्यांच्या लेखनाशी प्रामाणिक होते. या लेखकांना जे मांडायचे ते मांडताना ते कधीच कचरले नाहीत. 
         झपुर्झा या पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखकाने विल्यम शेक्सपिअर,चार्ल्स डिकन्स, लिओ टॉलस्टोय, जॉर्ज बर्नाड शॉ, या साहित्यिकांची आयुष्यावर आणि त्यांच्या साहित्यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला आहे.
         हे सगळे वाचताना मात्र चकित व्हायला होतं. आणि आपण एखाद्या गूढ आणि स्वप्नवत जगत आहोत असे भास व्हायला होतात. कुठल्याही कलेवर सामाजिक भौतिक परिस्थिती आणि कौटुंबिक अनुभव यांचा जसा परिणाम होतो त्याप्रमाणे साहित्यही कित्येक वेळा समाज परिवर्तनास कारणीभूत ठरतं.  चार्ल्स डिकन्स च्या कादंबऱ्या मुळे कामगार वस्त्यांमध्ये आणि तुरुंगाच्या परिस्थितीत खूप सुधारणा करणं सरकारला भाग पडलं होतं !
         शेक्सपियर म्हणजे इंग्रजी साहित्यातील एक विलक्षण अजब थरार होऊन गेला, यात शंकाच नाही ! त्याच्या नाटकाचे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर झाले आणि तेही अनेकदा !
         शेक्सपिअरचं गद्य आणि पद्य या दोघांवर तितकच प्रभुत्व होतं. अतिशय तीव्र भावना व्यक्त करताना काव्याचा वापर होतो." सर्वोत्तम नाटक हे काव्यमय नाटकच असतं"  हे टी एस एलियटचे उदगार  शेक्सपिअरच्या बाबतीत तंतोतंत खरे होतात. कुठल्याही उत्तम कलाकृती मागे वेदना आणि दुःख यांचे पाठबळ असते असे म्हणतात. शेक्सपियर सुद्धा याला अपवाद कसा असेल! 1596 साली शेक्सपिअरचा हॅम्नेट हा मुलगा प्लेग चा बळी ठरला. त्यामुळे शेक्सपियर खूप खचून गेला आणि याच काळात त्यांना 'मॅकबेथ' ' किंग लियर' 'ऑथेल्लो ' या शोकांतिका लिहिल्या. पुढे या सगळ्या जगप्रसिद्ध झाल्या. यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही आणि 37 उत्तमोत्तम नाटकं जगाला दिली !
         महादेव शास्त्री कोल्हटकरांनी केलेल्या ऑथेल्लो च्या भाषांतरावर आधारलेलं ' झुंजारराव' हे नाटक गो. ब.  देवल यांनी लिहिले त्यात बाबुराव पेंढारकर,  राजा परांजपे वगैरे मंडळी काम करत. यात त्यांनी कमळजेच्या   तोंडी चक्क गाणी घातली होती. आणि त्यांना संगीत देणारे पु. ल. स्वतः ऑर्गन वर बसत.
         वि वा शिरवाडकर यांच्या ' नटसम्राट 'वर किंग लिअर या नाटकाचा खूप मोठा प्रभाव होता विंदा करंदीकर यांनी किंग लिअर चं अतिशय सुरेख भाषांतर केलं होतं.
        ' एक फुलले फूल आणि फुलून  नुसते राहिले त्या कुणी ना पाहिले' हे गदिमांचं गाणं एमिलीच्या आयुष्याची कहाणी सांगतं. एमिली जिवंत असताना तिच्याकडे खरोखरच कुणाचं लक्ष गेलं नाही. एमिली एक महान अमेरिकन कवयित्री समजले जाते. तिच्या एकांतवासातल्या आयुष्यामुळे तिचं जीवन चरित्र उलट-सुलट चघळलं गेलं.  तिच्या आयुष्याभोवती  एक गूढ वलय निर्माण केलं गेलं.  मात्र तिचं आयुष्य हे रहस्य नव्हतं तर तिच्या कविता हे गुढ होतं. एमिलीचं शब्दांवर असणारा विलक्षण प्रेम ! शब्द या शब्दा वरच एमिलीची   कविता आहे :-
                       A WORD is dead 
                       when it is said, 
                       some say.
                        I say it just 
                        Begins to live 
                        That day. 
         पुस्तकांचे तिन्ही भाग मिळून एकूण 49 साहित्यिक आणि त्यांच्या साहित्य जन्माविषयी च्या रंजक, गूढकथा त्यांचे जीवन,  त्यांचे जगणे,  संकट,  अनुभव त्यांच्यात होत जाणारे बदल या सगळ्या गोष्टींचे विस्तृत विवेचन त्यांनी आपल्या या पुस्तकात फारच ओघवत्या आणि प्रवाही शब्दात साकारलेले आहे,  मांडले आहे. एक अद्भुत,  चमत्कारिक साहित्याच्या विश्वाची सफर घडवून आणणार असं हे आगळेवेगळे पुस्तक होय.
         या पुस्तकाचे तीनही भाग म्हणजे पाश्चिमात्य साहित्यिकांची लखलखणारी आपल्या स्व तेजाने डोळे दिपवणारी असंख्य हिर्‍यांची खाण होय! कोळशाच्या खाणीत हिरा सापडावा त्याप्रमाणे त्या त्या  कालखंडाच्या धूसर,  विषमतेने,  तर्‍हेवाईक परिस्थितीच्या काळ्याकुट्ट अंधारात असंख्य तारे चमकावे आणि तो काळोख उजळून निघावा त्याप्रमाणे हे लकाकणारे हिरे होत.

         असे हे इंग्रजी साहित्याची अगदी जवळून ओळख करून देणारे, आपल्या पुस्तक कोशात भर घालणारे, आपल्या ज्ञानाच्या भांडारात भर घालणारे, नव्या जगाची, विश्वाची, तर्हेवाईक माणसांची ओळख करून देणारे हे पुस्तक खरेदी करून तुम्ही नक्की वाचाल ! अशी अपेक्षा करते. आणि माझ्या पुस्तक परिचयाला विराम देते ! 

सौ. मृगा मंदार पागे 

😊🙂🙏🙏

पुस्तकाचे नाव -माझे मातीतले पाय

पुस्तक क्रमांक-📗93...🖋️
 पुस्तकाचे नाव -माझे मातीतले पाय
 लेखक-प्रा.अरुण कांबळे

 "माझे मातीतीले पाय"हा काव्यसंग्रह कवीने अत्यंत दर्जेदार व आशयरूप कवितेतून वाचकासमोर आणलेला दिसून येतो.तसेच सदर काव्यसंग्रहाचे हे शीर्षक हृदयाला भिडून जाते.

"माझे मातीतले पाय"या काव्यसंग्रहमध्ये एकूण 61 कवितांचा समावेश या ठिकाणी असून सर्व कविता वेगवेगळ्या विषयावरती असून त्या कवितामधील शब्दफेक, कवितातील मर्म, काव्यपंक्ती यातून कवीचे प्रतिभावंत मन आपल्याला दिसून येते. या सुंदर अशा काव्यसंग्रहाला प्रस्तावनाही सुंदर शब्दबद्ध  केलेली आहे, त्या स्वतः एक उत्कृष्ट लेखिका व कवयत्री,आदर्श व उपक्रमशील शिक्षिका सौ.अंजली शशिकांत गोडसे यांनी प्रस्तावनामध्ये अत्यंत समर्पक ,हृदयस्पर्शी शब्दांमधून काव्यसंग्रहाचा संपूर्ण सारच वाचकासमोर मांडलेला दिसून येतो. या दर्जेदार प्रस्तावनामुळे त्यातील शब्दांच्या गुंफणमुळे या काव्यसंग्रहातील कविता वाचण्याची ओढ वाचकाला लागून राहत असल्याचे आपणास दिसून येते.

"माझे मातीतले पाय" या कवितेने या काव्यसंग्रहाची कवीने केलेली सुरुवात सुंदर आहे.

 माझ्या मायेच्या मातीचा,
         टिळा मस्तकी भाळला
 तिच्या परिसस्पर्शाने, 
         आसमंत गंधाळला.

मातीचं आणि मानवाचं नातं हे खूप अतूट आहे. शेतकरी राजा या मातीतूनच जणू सोने पिकवत असतो. या मातीची जादूच वेगळी असते. एखादे बियाणं मातीमध्ये रुजवलं तर त्याच बियाणांपासून टिच्चून भरलेलं कणीस तयार होते.आणि त्या मातीचा टिळा ज्यावेळेस कवी आपल्या कपाळाला लावतो त्यावेळेस त्याच्या स्पर्शानेच जणू त्याला स्वर्गसुख मिळाले असाच त्याला भास होतो.

"हिरवळ दाटे मनी" या कवितेमध्ये कवीने केलेले वर्णन मनामध्ये गारवा व ओलावा तयार करते.

        आसमंती दूर रानी
                शालू पांघरून घेते 
        हिरवळ शालूची या 
                  भूल मनाला पडते,
        धरतीच्या रुपाची या 
                प्रित मनाशी जडते 

लेखकाला जमिनीवरती ज्यावेळेस हिरवागार गालीचा दिसतो. त्यावेळेस तो जणू हिरवा शालूच आहे असं मनाला भासते. त्या शालूची मनाला भूल पडते आणि या जमिनीच्या रुपाची जवळीकता कवीच्या मनाला लागते.

"बैलपोळा" या कवितेमधून ग्रामीण भागातील या लोकप्रिय सणाचे अत्यंत सुंदर चित्रण कवीने या ठिकाणी केलेले दिसून येते. वर्षभर रानात काबाडकष्ट करणारे बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जणू मित्र,सखा असतो. या दिवशी बैलांना गोड नैवेद्य दाखवला जातो. त्याची मिरवणूक काढली जाते. हा एक दिवस म्हणजे काबाडकष्ट करणाऱ्या बैलजोडीच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोठासा प्रयत्न बळीराजा करत असतो.

" पूर " या कवितेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर आलेल्या पुरामुळे किती नुकसान होते. हे यातून कवीने व्यक्त केले आहे.

     पूर आला वाहून गेला
            भरल्या माझ्या घरामध्ये              
     आठवडाभर राहून गेला
            सुखाचं घरटं माझं
     काडीकाडीन उभारलेलं 
            पाण्याचं आक्रीत पाहून
      मन माझं ढगाळलेले..

पावसाच्या पुरामुळे अतोनात नुकसान झालेले आपणास दिसून येते.अशा वेळेस मात्र संकटकाळी माणुसकीचं दर्शन मात्रआपल्याला दिसून येते.

"शाळा" ही अतिशय सुंदर अशी शैक्षणिक घडामोडीवर आधारित कविता...

पाटीवरती गिरवता अक्षर       
        पेन्सिलीचा लागतो लळा 
मग्न होऊन गिरवत जाता
        फुलून येतो अक्षर  मळा.....

पाठीवरती अक्षर गिरवता गिरवता आणि आपले ज्ञान वाढवत असताना कधी पाटीची जागा आता मोबाईलने घेतली. परंतु अशा अवस्थेत ही शिकून-सवरून भविष्याची रंगीत स्वप्न आणि त्या स्वप्नांमध्ये रंग भरण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे धडे गिरवावेच लागणार आहेत.अत्यंत प्रेरणादायक वर्णन या ठिकाणी केलेले आपणास दिसून येते.

"माऊली" या कवितेतील वर्णन हृदयाला हळुवार स्पर्श करून जाते,व ते हृदयाला भिडते.

खांद्यावरती घेऊन मजला
       राब राब राबला होता 
बाप माझा विठूराया 
      माऊली होऊन लाभला होता.

आभाळाएवढा बाप नावाचा देवमाणूस ज्यावेळेस आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करत असतो. चिंब घामाने भिजत असतो. त्यावेळेस तो साक्षात माऊलीचेच रूप वाटत असतो.

"लेक वाचूया" कवितेमधून मुलीचे महत्त्व अत्यंत समर्पक शब्दात कवीने या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने कार्य करताना आपणास दिसून येते.ती दुर्गेचे रूप आहे,आदिशक्ती आहे. जिजाऊ, सावित्री, रमाबाई यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. या कवितेत शेवटी कवी एकच म्हणतो.....

लेक वाचवू घराघरातील           
     स्त्री भ्रूणहत्या रोकूया 
क्षितिजावरील नवक्रांतीची 
       ज्योत अबाधित राखूया.....

असा अत्यंत मोलाचा संदेश कवीने या कवितेच्या शेवटी दिलेला आपणाला दिसून येतो.

"पिकले पान" या कवितेमधून कवीने मानवाच्या आयुष्याच्या संध्याकाळी ज्यावेळेस आपण वयोवृद्ध होत असतो. त्यावेळेस आपण हसत हसत व उर्वरित आयुष्य आनंदाने जगले पाहिजेत असाच जणू संदेश देतो.

मोजून-मापून जगता-जगता     
        आयुष्याचे सजणे झाले, 
चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचे
         खुलून येता विझणे झाले
भाळावरल्या ललाट रेषा       
        हसता-हसता बघणे झाले,
पिकले पान वार्धक्याचे 
          खुलून येता जगणे झाले.

कवीने या कवितेतील प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ हा उर्वरित जीवनाचा जगण्याचा जणू सारच सांगितलेला दिसून येतो.

अशाप्रकारे "माझे मातीतीले पाय"हा काव्यसंग्रह जणू काही सप्तरंगी इंद्रधनुष्य भासतो वाचकाला कधी चिंब पावसात भिजवतो..... तर कधी अश्रुंचा अभिषेक घालतो,तर कधी मनात हिरवेगार वातावरण तयार करतो. असा हा उच्च दर्जाचा काव्यसंग्रह सर्वांनी आवश्य वाचवा.

पृष्ठ संख्या-72
 मूल्य-120
अभिप्राय शब्दांकन
          -  सिंधुसूत...🖋️

Saturday, July 3, 2021

आमचा बाप आन आम्ही

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या जाधव कुटुंबीयांची ही कहाणी आहे.वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड होत असल्याच्या काळात या पुस्तकाने देशी-विदेशी १७ भाषांमध्ये अनुवादित होऊन जगभरात केवळ वीस वर्षांत तब्बल ६ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी.
नरेंद्र जाधव यांच्या लहानपणीची ही घटना या पुस्तकातील मुख्य पात्राच्या वैचारिक उंचीची साक्ष देत राहते.
नरेंद्र जाधवांना बालपणी एक प्रश्न विचारला जायचा,की 'तू मोठेपणी कोण होणार?'तर ते इतर लहान मुलांसारखे चुणचुणीत उत्तर द्यायचे.पण जेव्हा हाच प्रश्न त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना विचारला, तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले,"मला लेखक व्हायचंय."तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाची प्रतिक्रिया..'अरेरे! याला भीक मागावी लागणार!"अशीच काहीशी होती.
त्यानंतर दादांनी त्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले,"ह्ये बघ, तुला लोक सांगतील;तू डाक्टर व्हय, इंजनेर व्हय,बालिस्टर व्हय,पन तू कुणाचं काय आयकू नको.तू तुझ्या बुद्धीला जे वाटंल ते होन्याचा प्रयत्न कर.मीबी तुला सांगणार नाही,अमुकच व्हय का धमुकच व्हय.माझं म्हननं एवढंच हाये का तू जे करशील त्यात 'टाप'ला जायाला पायजे. तुला चोर व्हायाचं? कोई बात नही!मग असा चोर व्हय का दूनियाने सलाम केला पायजे. तुला जुगार खेळायची? हरकत नाही,पण मग असा आट्टल जुगारी हो का सगळे लोक बोलले पायजे 'इसको बोलता है जुगारी!' थोडक्यात समाधान मानून गप बसायचं नही. काय?"
पुस्तक वाचताना दादांचे हे रांगडे तत्वज्ञान हळूहळू कळत गेले. मनात झिरपत गेले. आता तर ते मनात घर करून बसले आहे. शेवटीsearch for excellence म्हणजे तरी वेगळे काय? हेच ना? लेखक होईन म्हटल्यानंतर "ह्याला भिकेचे डोहाळे लागलेत" म्हणणारा उच्चविद्याविभूषित भाऊ आणि "काय वाटेल ते कर पण टॉप ला जायचा प्रयत्न कर" म्हणणारे अशिक्षित वडील यांच्यात खऱ्या अर्थाने व्यापक दृष्टिकोन कोणाचा? आज स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे पालक देखील आपल्या मुलांना एवढा ओपन choice देऊ शकतात? शेवटी ते देखील मध्यमवर्गीय भेदरटपणाचे बळी ठरतात. दादा केवळ एक व्यक्ती नव्हती,तर प्रयत्नवादी प्रवृत्ती होती.समाजाच्या प्रत्येक थरामध्ये,प्रत्येक कुटुंबात असे दादा असतात.यशस्वी संघर्षाची ही सच्ची कहाणी प्रत्येकाने वाचावी अशीच आहे.

Friday, July 2, 2021

डॉ. ब्रुस एच. लिप्टन

आपल्या स्वत:च्या विचारमंथनाबाबतचं तुम्हं मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल. डॉ. ब्रुस एच. लिप्टन या प्रख्यात पेशीशास्त्रज्ञानं आपल्या विचारांचा आपल्या शरीरातल्या पेशींवर कसा प्रभाव पडत असतो, याबद्दलचे धक्कादायक नवीन वैज्ञानिक शोध या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. मेंदूच्या कार्याच्या जैवरासायनिक परिणामांमुळे पेशी प्रभावित होत असतात. विचारांचा पेशींवर कसा परिणाम होतो, हे लिप्टन यांनी अगदी रेण्वीय पातळीवरच्या घडामोडी समजावून देत स्पष्ट केलं आहे. हलकासा विनोदाचा शिडकावा करणाऱ्या साध्या-सोप्या भाषेत मुद्दा समजावून सांगणं आणि दैनंदिन जीवनातली उदाहरणं देणं ही त्यांच्या लिखाणाची उल्लेखनीय वैशिष्ट्यं.

पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं हे संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असं हे संशोधन सांगतं.

For Book Contact - Rudra Enterprises Pune
Visit To Shop At - Appa Balwant Chouk, Shanbramha Complex, Ground Floor, Shop No-3, Pune-02.
Mob No- 9075496977, 8975930258

पुस्तकाचे नाव :- सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुध्द

*वाचाल तर वाचाल...११२*

पुस्तकाचे नाव :- सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुध्द
लेखक :-  डॅा. आ.ह. साळुंखे 
प्रकाशन :- लोकायत प्रकाशन 
किंमत :-   रू. ५८०/-

*जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध नको, तर बुद्ध हवा..!* 
     गोतम बुध्द या ग्रंथात डॅा. आ.ह. साळुंखे यांनी बुध्दांचे जीवनविषयक तत्वज्ञान विशद केले आहे. यात एकूण २१ प्रकरणे आहेत. मानवी जीवन सुखकर होण्याचा उत्तम मार्ग बुध्द तत्वज्ञानातून आपल्याला समजतो. ज्ञानासाठी परंपरेच्या नव्हे तर स्वानुभवाच्या मार्गाने जाऊ या, माझ्या धम्माचे वारसदार व्हा..भौतिक गोष्टींचे नव्हे, सम्मा वाणीखेरीज मनुष्यत्वाचा पूर्ण विकास अशक्य, गृहस्थजीवनाचा आदर..राष्ट्रजीवनाची काळजी, जन्माने वा वर्णाने नव्हे तर शीलाने आणि प्रज्ञेने मनुष्य श्रेष्ठ होतो, मी लाकडे जाळण्याऐवजी  आंतरिक ज्योती उजळवितो, मुलगी जन्मली म्हणून उदास होऊ नका, भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासुखासाठी चालत रहा, नाव घ्या न घ्या, तथागत आपल्या हृदयाच्या स्पंदनात आहेतच अशा प्रकरणातून आपल्याला बुध्द तत्वज्ञान दर्शन होते. 
    तथागत गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय.कारुण्य, प्रेम, शांती व अहिंसा हे त्यांचे जीवनतत्व होते.
       सिद्धार्थला सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आले. त्यांचा विवाह यशोधरेबरोबर झाला.त्यांना राहुल नावाचा मुलगा होता. ऐश्वर्य त्यांच्या पायात लोळत होते.परंतु मानवी जीवनात असणाऱ्या दुःखाने ते अस्वस्थ होते.दुःख नष्ट होऊन सर्वांना सुख मिळावे, या उदात्त हेतूने त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला. ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी आनंददायी जीवनाचा त्याग केला.ते कपिलवस्तूवरून राजगृह आणि नंतर गया येथे आले.तेथे ज्ञानार्जन केले.कठोर कष्ट घेतले.वेद, उपनिषद वाचली.त्यातील निरर्थकता त्यांनी ओळखली.त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले. ते आता बुद्ध झाले.पण ते एकांतात थांबले नाहीत.ते लोकांत जाऊन बोध करू लागले. 
    सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी पहिले प्रवचन वाराणशी जवळील सारनाथ येथे केले. बुद्धाने सांगितलेले तत्वज्ञान पुढीलप्रमाणे आहे.
*"जीवन हे दुःखमय आहे,त्यामागे तृष्णा आहे,पण दुःखाचे निराकरण होऊ शकते,तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे."*  पूर्वजन्म- पुनर्जन्म, कर्मविपाक या अज्ञानी बाबी नाकारून त्यांनी मानवाला आत्मविश्वास दिला. अत्यंत साध्या सोप्या लोकभाषेत म्हणजे पाली भाषेत त्यांनी बोध केला.त्यांनी वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून लोककल्याणासाठी आयुष्याची अखंड ५० वर्षे गावोगावी परिभ्रमण केले.त्यांच्या विचाराने जनसमुदाय प्रभावित झाला.अनेक राजांनी बुद्धांचा विचार अंगिकारला.
      बुध्द म्हणतात,*"जीवंत माणसांचा विचार करा,स्वर्ग,नरक,पूर्वजन्म,पुनर्जन्म,आत्मा या थोतांडात अडकू नका.,"*
        मुलगी सुद्धा शारीरिकदृष्ट्या,मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सामर्थ्यशाली असून ती देखील वंशवर्धक आहे असे सांगून अडीच हजार वर्षांपूर्वी मुलींना वंशाचा दिवा मानून त्यांना  स्वातंत्र्य देणारे बुद्ध होते.ज्या काळात मुलगाच जन्माला(पुत्रकामेष्टी) आला पाहिजे, असे वैदिक(ब्राम्हणी) परंपरा सांगत होती.त्या काळात बुद्ध मुलगी देखील मुलाप्रमाणेच वंशाचा दिवा आहे, असे आग्रहाने सांगत होते.त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव नाकारला. आनंदशी झालेल्या विचारमंथनातून त्यांनी महिलांना संघगणात प्रवेश दिला.त्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार दिला.
    मानव हीच एक जात आहे.त्यामुळे माणसांनी माणसांशी विवाह करणे, हा आंतरजातीय विवाह नव्हे,तर तो एकजातीय विवाह ठरतो. बुद्धाने धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच *अत्त दीप भव* हा सिद्धांत सांगितला. बुद्धाचा धम्म हा निसर्गवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, त्यात विकृतीला थारा नाही. 
   तथागत गौतम बुद्ध हे समता, बुद्धिप्रामाण्यवाद,महिलांचे स्वातंत्र्य सन्मान,अहिंसा,सत्य,अस्तेय,असंग्रह,नैतिकता सांगतात. हिंसेने प्रश्न सुटत नसतात, तर वाढत असतात.सत्याने वागले तर मनस्ताप होत नाही.गरजेपेक्षा जास्त धनसंचय झाला तर प्रबोधनाऐवजी संपत्ती वाचविण्यासाठी शत्रूला शरण जावे लागते.त्यामुळे अतिरिक्त अनाधिकृत संपत्ती शरणांगत बनविते.क्रांतीला अडथळा ठरते.त्यामुळे या नितीमूल्यांचे पालन करण्याचा आग्रह बुद्ध धरतात.
*सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुध्द*हा ग्रंथ आपल्या संग्रही हवाच असा..!! 



*परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा* 

-ॲड.शैलजा मोळक