Thursday, July 15, 2021

आर्य_भारत

#आर्य_भारत 
(खंड पहिला- भारताच्या दहा हजार वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आराखडा)
          - हर्षद सरपोतदार

युरोपीय इतिहासकारांनी बायबल खोटं ठरू नये म्हणून वेद प्राचीन नसल्याचं भासवलं, ख्रिश्चनिकरणाच्या हेतूने भारतीय पुराण- इतिहास क्षुद्र ठरविले, खऱ्या इतिहासावर ताशेरे ओढून तो पुसण्याचा कट या सर्व गोष्टी ब्रिटिश विद्वानांनी हेतुपुरस्सर केल्या. या सगळ्याचा पर्दापाश् प्रस्तुत पुस्तकात लेखकाने केला आहे.

भारतीय प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आणि इथल्या लोकांना आपण कसे बरोबर आहोत हे दाखवून गुलाम बनवण्यासाठी ब्रिटिशांनी दोन कलमांवर भर दिला.
कलम एक: लष्करी दबावाने भारताचा जास्तीत जास्त प्रदेश ताब्यात घेणे.
कलम दोन: भारतीयांना अभिमानास्पद वाटणाऱ्या त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करून त्याचं ख्रिश्चनीकरण करणे. 
याचा कळस म्हणजे ब्रिटिशांनी वेदांचा विकृत अनव्यार्थ लावण्यासाठी मॅक्समुल्लर या जर्मन शिक्षकाची जास्तीचा पगार देऊन निवड केली. अश्या बहाद्दरांनी खोटा कालक्रम रचून महाभारतोत्तर इतिहासातील किमान १२०० वर्ष खाल्ली.

इंग्रज गेल्यावर तत्कालीन भारत सरकार पण कमी नव्हते, वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननात अनेक आर्य- पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडायला लागल्यावर सरकारने हस्तक्षेप करून उत्खननच बंद करून टाकले.

प्रस्तुत पुस्तकात या सर्वाचा उल्लेख केलेला असून आर्य भारतात आल्यापासून ते इ.स.९०० म्हणजे यादव काळापर्यंत सर्वच इतिहासाचा तपशील वंशावळी आणि पुरावे देऊन मांडलेला आहे. त्यात प्रामुख्याने विशेष कालखंड तपशीलवार दिलेले आहेत ते पाहू.
रामचंद्र- यांच्या समकालीन राजाच्या जवळपास २८ पिढ्या नंतर धृतराष्ट्र राजा झाले.
युधिष्ठिराचे राज्यारोहन(कलियुग सुरवात)- इ.स.पूर्व ३१०१
बुद्धांचा जन्म- इ.स.पूर्व १६७६
हर्षवर्धन राजाने शालिवाहन शक सुरू केला- इ.स.७८
महम्मद पैगंबरांचा जन्म- इ.स.५७०

येशूच्या काळापासून इसवी सनाला सुरवात झाली अस म्हणतात, त्याआधीच्या घटनांना इ.स.पूर्व म्हणले जाते, अश्या युधिष्ठिर सिंहासनावर बसल्यापासून इ.स. सुरू होईपर्यंतच्या ३१०१ वर्षांमध्ये होऊन गेलेल्या राजांच्या वंशावळीदेखील पुस्तकात मांडल्या आहेत.

याचबरोबर मनू कोण?वेदांमध्ये कोणती माहिती आहे? ४वर्ण कसे तयार झाले?, ४ युग कोणत्या राजांच्या कालखंडाला म्हणतात? वैगरे गोष्टी तपशीलवार लेखक हर्षद सरपोतदार यांनी मांडल्या आहेत. 

अभ्यासकांसाठी आणि अज्ञान लोकांसाठी अत्यंत महत्वाचे असे पुस्तक, अवश्य वाचा🙏
     
           -आदित्य अरुण गरुड

#वाचनप्रेमी 
#आर्य_भारत
#हर्षद_सरपोतदार

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know