Friday, September 24, 2021

SYLLABUS MECHANICAL ENGINEERING 5th SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

MECHANICAL  ENGINEERING 
5th  SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/drive/folders/1QVVuJPA-Lz5dOM0CGE0jNMwbtbjf3_5h?usp=sharing

SYLLABUS ELECTRONICS AND TELECOMMUNICATION ENGINEERING 5th SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

ELECTRONICS AND TELECOMMUNICATION  ENGINEERING 
5th  SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/drive/folders/1Wl0Wc0X1GNebhimPug9E1xkF0mzn9rGL?usp=sharing

SYLLABUS COMPUTER ENGINEERING 5th SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

COMPUTER ENGINEERING 
5th  SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/drive/folders/1dUTaWmda4M6Pu7EnxbvF2KgRNWGkgWPd?usp=sharing

SYLLABUS CIVIL ENGINEERING 5th SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

CIVIL  ENGINEERING 
5th  SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/drive/folders/1D2moR234Qbz715pb3XurCAKooVVkD2DT?usp=sharing

SYLLABUS AUTOMOBILE ENGINEERING 5th SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

AUTOMOBILE  ENGINEERING 
5th  SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/drive/folders/1w6rHLdIGsAU-oUnM8ndU1xR1jFi_uEJg?usp=sharing

Wednesday, September 22, 2021

START_WITH_WHY

#START_WITH_WHY
              लेखक -सायमन सिनेक
               अनुवाद - प्रतिक पुरी
               प्रकाशक - मंजुळ पब्लिशिंग हाऊस

लेखकाविषयी :
ब्रिटनमध्ये जन्मलेला आणि अमेरिकेत वाढलेला मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून जगाला ज्ञात असलेला सायमन ग्रँज्युएशन नंतर वकीली करण्यासाठी Law चे शिक्षण घेत होता.
पण तिथे त्याच्या मैत्रिणीने त्याला त्याच्या या चुकीची जाणीव करून दिली आणि मग त्याने लाँ चे शिक्षण सोडून दिले आणि अँडव्होकेट होण्याऐवजी अँडव्हर्टायझिंग क्षेत्रात करिअर सुरू केले.
त्याने या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञानाच्या  जोरावर start with why हे पुस्तक 2009 साली प्रकाशित केले.
जगभर नावाजले गेलेल्या या पुस्तकानंतर त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला
विविध विद्यापीठ, संस्था , टेडटाँक, हया त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना आमंत्रित करतात आणि आता ते पूर्णवेळ मोटिव्हेटर बनून हजारो डाँलर कमावतोय.

पुस्तकाविषयी :
हे पुस्तक एकूणच उद्देश आणि त्यावरील कार्यवाही यातील सातत्य यांच्या जोरावर  काही कंपन्या,संघटना, आंदोलन कशा यशस्वी होतात.
तसेच काही उत्तम कंपन्या उद्देशापासून भरकटल्या तर कशा काळाच्या पडद्याआड जातात हे सप्रमाण दाखवून देतो.
भूत,वर्तमान आणि भविष्य हया तिन्ही काळात हेच त्रिकालाबाधित सत्य राहिले आहे हे वेगवेगळ्या सत्यकथांमधून लेखक आपल्या नजरेस आणून देतो.
 
लेखकाच्या मतांना थोडक्यात जाणून घेऊया आजपासून लेखमालेच्या रूपात
Nilesh Shinde 

START WITH WHY

START WITH WHY
              लेखक -सायमन सिनेक
       प्रकाशक - मंजुळ पब्लिशिंग हाऊस

लेखमाला :भाग दुसरा

#Why_ची_गरज 
 ▪️बुद्धिमत्ता, प्रतिभा, उत्तम लोकसंग्रह, धनसंपदा हे सगळे असूनही माणसं यशस्वी होत नाही कारण त्याला त्याचे लक्ष्यच निश्चित नसते 
         उदाहरणार्थ लेंगली यांच्याकडे सर्व काही साधनसामग्री होती पण राईट बंधूच विमानाचा शोध लावण्यात यशस्वी झाले
▪️लक्ष्य निश्चित असेल तरच इच्छाशक्ती च्या जोरावर माणूस स्वतः प्रेरित होतो आणि इतरानाही प्रेरित करू शकतो.
    उदाहरणार्थ मार्टिन ल्यूथर किंग यांचा वर्णभेदाविरोधी लढ्यात
"माझ्याकडे स्वप्न आहे " हया एकाच वाक्याने लोक प्रेरित झाले
▪️माणूस आवडीने राजीखुशीने काम करतो आणि तो उत्पादक,रचनात्मक बनून कमी साधनसामग्री मध्येही परिवर्तन घडवून आणतो.
  उदाहरणार्थ इन्फोसिस ही नारायणमूर्ती यांची कंपनी बायकोकडून घेतलेल्या कर्जावर सुरू झाली पण सुरूवातीपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांमुळे टाँप आयटी कंपनी बनली

1.लक्ष्यनिश्चिती:
लक्ष्य ठरवण्यासाठी माणसाच्या धारणा ,विचार आणि माहिती उपयोगी पडते त्यासाठी पाँडकास्ट,पुस्तके, संमेलन सहभाग, गुरूतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.
ध्येय ठरवताना स्वतःचे मूल्य वाढवणे, समाजाच्या उपयोगी पडून समस्यांची सोडवणूक हया गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

2.प्रेरणा :
एखादी गोष्ट का करायची आहे  हे जोवर निश्चित नसते तोवर माणूस स्वतःच प्रेरित नसतो मग तो आपल्या ग्राहकांना , कर्मचाऱ्यांना, कार्यकर्त्यांना प्रेरित करू शकत नाही. मग ते फक्त साम-दाम-दंड- भेद  वापरून हेराफेरीने माणसांना प्रेरित करू पाहतात.
हेराफेरी करण्याचे अनेक मार्ग आहेत
👉साम: 
सेलिब्रिटींना घेऊन वेगवेगळ्या जाहिराती केल्या जातात
 मित्रपरिवाराच्या द्वारे  Affilate marketing केली जाते.
वेगवेगळे  सर्व्हे ,तज्ञ यांचे रिझल्ट दाखवून Peer pressure निर्माण केला जातो ज्यामुळे माणसाला असे वाटत राहते की आपणच फक्त चुकीचे आहोत आणि बहुसंख्याप्रमाणे वागण्यास भाग पाडले जाते.

👉दाम: कंपन्या दरयुद्ध करून ग्राहकांना आकर्षित करू पाहतात.
         कमी दरांचे ग्राहकांना व्यसन लावले जाते, त्यांना मोहात          पाडले जाते जेणेकरुन जास्तीत जास्त खरेदी करवून अल्प फायदा परतावा म्हणून दिला जातो.
🔶 कँशबँक आँफर
🔶 रिबेट
🔶 बाय वन गेट वन फ्री 
🔶 मूल्यवर्धित दर
🔶 सेंकडरी स्कीम
🔶 फ्री व्हाउचर
कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बढतीची अमिषे दाखवतात आणि शेअरधारकांना डिव्हिडंड ची आमिषे दाखवत राहतात.
राजकारणी कार्यकर्त्यांना पदांची लालूच दाखवतात आणि  मतदारांना वन टाइम कस्टमर समजून पैसे वाटप करून निवडून येण्याचा प्रयत्न करतात 

👉दंड : ग्राहकांच्या मनात असुरक्षिततेची जाणीव निर्माण केली जाते. आँफर स्वीकारली नाही तर मोठे नुकसान होईल आणि खूप                 काही गमवावे लागेल असा अविर्भाव दाखवला जातो
कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती दाखवली जाते
राजकारणात आँफर स्वीकारली नाही तर पोलीस / तपाससंस्थेमार्फत जेरीस आणले जाते

👉भेद : इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हयासाठी नवनव्या कल्पना आणि वैशिष्ट्ये उत्पादनात आणल्या जातात आणि ग्राहक आकर्षित केले जातात ...काहीकाळ उत्पादन आकर्षक वाटते पण लवकरच इतर कंपन्याही तोच मार्ग अवलंबला जातो आणि मग स्पर्धा वाढत जाते आणि नफा घटत जातो. वारंवार वाढणारा तोटा कंपनीला कर्जाच्या खाईत लोटतात आणि मग कंपनी नामशेष होते.
राजकारणी आपला पक्ष पार्टी इतरांपेक्षा वेगळी आहे असे दर्शवतात

  हे हेराफेरी करण्याचे अनेक उपाय आहेत पण त्या माणसाची निष्ठा आणि विश्वास खरेदी करता येत नाही हे मात्र जाणूनबुजून विसरतात.

हयावर उपाययोजना पाहूया उद्याच्या भागात....

Nilesh Shinde 

e_EMPLOYMENT NEWS 18 September To 24 September 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

18 September To 24 September 2021

https://drive.google.com/file/d/1SxjaOY89udxQFP61L5MbGsQ5k1Y-UzNC/view

SYLLABUS MECHANICAL ENGINEERING 3RD SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

MECHANICAL ENGINEERING 
3RD SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/file/d/1S_Uy-ml1aPaF7BAYwRm24YlvPyz9B08Q/view?usp=sharing

SYLLABUS ELECTRONICS AND TELECOMMUNICATION ENGINEERING 3RD SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

ELECTRONICS AND TELECOMMUNICATION ENGINEERING 
3RD SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/file/d/1YPUocPKUuM4vKGDu-3C8fUihsuWPmiII/view?usp=sharing

SYLLABUS COMPUTER ENGINEERING 3RD SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

COMPUTER ENGINEERING 
3RD SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/file/d/1iT6kpuvdPqWSU-ZZ_NT6bldc4gGfIvAr/view?usp=sharing

SYLLABUS CIVIL ENGINEERING 3RD SEMESTER "I" SCHEME

 

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

CIVIL ENGINEERING 
3RD SEMESTER "I" SCHEME

https://drive.google.com/file/d/17yOX6sjsjbe5NxRc7Qn9fni4kDtej-lK/view?usp=sharing

SYLLABUS AUTOMOBILE ENGINEERING 3RD SEMESTER "I" SCHEME

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

SYLLABUS 

AUTOMOBILE ENGINEERING 
3RD SEMESTER "I" SCHEME

 https://drive.google.com/file/d/1KaeHaZLeAgvNouA6JVfXtbowSUQjKtRU/view?usp=sharing


पुस्तकाचे नाव: इचिगो इची

#वाचनसाखळी 
पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव: इचिगो इची

एकच चित्रपट चार वेळेला पाहिल्यावर दरवेळेस तितकाच आनंद मिळतो का ?
एकाच सहलीच्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तेवढीच मजा येते का ?
रोज ऑफिसला गेल्यावर आणि ऑफिसमधून घरी आल्यावर तेवढ्याच उत्साहाने आपण सर्वांना भेटू शकतो का ?
भविष्य आणि भूतकाळ सोडून वर्तमानात जगणं गरजेचे आहे हे माहीत असूनही मन कायम पळतं का ?
जीवन क्षणभंगुर आहे पण तितकंच आनंददायी आहे हे कळत पण वळत नाही असं होतं का ?
ज्या आनंदासाठी आपण सर्वकाही करतो ते करत असताना आनंद घ्यायचाच राहतो का ?
या आणि अशा कितीतरी महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे म्हणजे इचिगो इची.
इकिगाई या जागतिक बेस्टसेलर पुस्तकांमधून हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानी लोकांच्या दिर्घायुषी आणि कार्यक्षम जीवनाचं रहस्य लोकांसमोर मांडले. आता हेच दिर्घायुष्य वर्तमानात राहुन त्यातील प्रत्येक क्षण आनंदाने कसा जगायचा याचं उत्तर त्यांनी इचिगो इची या पुस्तकात लिहिले आहे.
इचिगो इची म्हणजे प्रत्येक क्षण वर्तमानात जगण्याची कला.
जपानी लोक असं मानतात की चित्रपट किंवा सहलच काय पण रोजची चहा पिण्यासारखी लहान आणि दिनचर्येतील कृती सुद्धा जर योग्य पद्धतीने केली तर असामान्य आनंद देऊ शकते.
पंचेंद्रिय जी आपल्याला भरकटवतात तीच भुतकाळ आणि भविष्यात पळणाऱ्या मनाला वर्तमानात आणू शकतात.
ध्यान ही दोन तास वेळ काढून करायची प्रक्रिया न राहता जीवनाचा अंग कशी बनू शकते या आणि अशा कितीतरी विषयांवर लेखकाने अतिशय सोप्या भाषेत आणि जपानी संस्कृतीचा आधार घेत मते मांडली आहेत.
         इचिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. जसं की,

🍁भूतकाळ आणि भविष्यकाळ यापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि अद्वितीय कसा करायचा?

🍁स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे आत्मसात करावे?

🍁योगायोग वाटणाऱ्या गोष्टींमागील संकेत कसे समजून घ्यावेत?

🍁जागरूकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी?

🍁वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये 'इचिगो इची' क्षण कसे निर्माण करावेत?

🍁जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कसा निर्माण करावा?

🍁माईंडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवावा?

'प्रत्येक क्षण वर्तमानात जगा', आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.

लेखक: हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस्क मिरेलस.
प्रकाशन: मायमिरर पब्लिशिंग हाऊस.
किंमत: १७५/-
Mahesh sakunde 

Tuesday, September 14, 2021

Engineer's Day Quiz Sept 2021

 VIDYA PRATISHTHAN’S
POLYTECHNIC COLLEGE INDAPUR 
Approved by AICTE New Delhi,Recognized by DTE,Mumbai Affiliated to MSBTE, Maharashtra.
Vidyanagari,Indapur,Pune-413106

LIBRARY

Engineer's Day Quiz Sept 2021


Organizes QUIZ on the occasion Engineer's Day Sept 15, 2021

Librarian

Atul Chandanvandan

Vidya Pratishthan's Polytechnic College, Indapur

E-Certificate will be send after attending the Quiz to your registered E-mail ID 

Click on given link to participate in Quiz

https://forms.gle/GhM1R5zAAqNwk3EF8


Sunday, September 12, 2021

Zero_to_one

#Zero_to_one 
              लेखक - पीटर थील
       प्रकाशक - मधुश्री प्रकाशन

#लेखकाविषयी :
जर्मनीत जन्मलेले आणि अमेरिकेत वाढलेले पीटर ग्रँज्युएशन नंतर कोर्टात जजच्या हाताखाली क्लार्क आणि मग वकील म्हणून काम करत होते.
त्यानंतर फ्यूचर आँप्शन ट्रेडर आणि नंतर Paypal हया आँनलाईन पैसे ट्रान्सफर करणाऱ्या पहिल्या वहिल्या कंपनीचा सहसंस्थापक होते
1996 ते 2002 हया वर्षांत त्यांनी Paypal भरभराटीला आणली आणि नंतर ती कंपनी Ebay ला विकून टाकली.
त्यानंतर भागीदारीत capital mgmt कंपनी काढली.
2005 साली दूरदृष्टीने Social मिडीयाचे प्रस्थ ओळखून त्याने फेसबुकचा पहिला Outsider investor होण्याचे ठरवले.
व्हेंचर capitalist म्हणून आजपर्यंत त्यांनी अनेक स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केलीयं 
आज त्याची एकूण संपत्ती 7 Billion dollar इतकी आहे आणि Forbes च्या जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीतही ते झळकले आहेत.

#पुस्तकाविषयी :
हे पुस्तक एकूणच त्याच्या स्टार्टअप विषयी आणि त्याच्या अनुभवाविषयी आहे ज्यात त्याने अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. शून्यातून विश्व करण्याचा लेखकाचा अनुभव हया पुस्तकात कव्हर करण्यात आला आहे. 
            स्टार्टअप हा आजकाल परवलीचा शब्द बनलाय, 
नव्या तंत्रज्ञानावर आधारित नवा उद्योग म्हणजेच "स्टार्टअप"
भारतीय तरूणांनी स्वतःचा बिझनेस करावा हयासाठी अगदी सरकारी पातळीवर प्रयत्न झालेत.
1996 च्या काळात नव्या संकल्पनेला उद्योगात परावर्तित करणाऱ्या पीटर थील यांनी आपली मते ,सल्ले आणि सूचना हया मार्गदर्शनदायी पुस्तकातून मांडणल्या आहेत 

लेखकाच्या मतांना थोडक्यात जाणून घेऊया

#कल्पना_स्टार्टअपची
▪️माणसाने इतरांची नक्कल करण्यापेक्षा स्वतः चे स्वंतत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी आपले ज्ञान, कौशल्य, बुद्धिमत्ता यांचा सर्वोतोपरी वापर करावा
▪️नव्या तंत्रज्ञानाशी आपली मैत्री व्हायला हवी कारण तेच आपल्याला प्रगतीच्या, समृद्धीच्या दिशेने नेऊ शकते.
▪️चुकांमधून शिकत, लवचिकतेने बदलांना सामोरे जात, कालसुसंगत, तर्कसंगत नव्या विचारांनी, संशोधनाने सिद्ध झालेला अभिनव उद्योग निवडा
▪️स्टार्टअपचे मिशन फक्त लोकांना सेवा पुरवणे नाही तर लोकांच्या समस्या सोडवणे हे आहे.
▪️मार्केट मध्ये सतत वेगवेगळ्या बूम येत असतात  आणि त्या बूमच्या मागे आपण धावत असू तर आपण गर्दीचा एक भाग होतोय...वेगळे नाही
▪️नेहमी असा व्यवसाय निवडा जिथे कमीतकमी काँम्पिटीशन असेल किंवा आपली मोनोपाँली असेल
▪️मोनोपाँलीमुळे आधिक सुरक्षित प्रगती करता येते कारण तिथे वारंवार प्रतिस्पर्ध्याने काय केले हयावर लक्ष देण्याची गरज उरत नाही आणि वाचलेल्या वेळात उत्पादनात सुधारणा आणि नवे संशोधन यावर भर देता येतो.
▪️तीव्र स्पर्धा असेल तिथे नफ्यावर परिणाम होणे अटळ आहे आणि नफा तुटला की व्यवसाय बुडायला वेळ लागत नाही
▪️मोनोपाँली मध्ये आपण प्रिमियम किमंतीत प्राँडक्ट आणले तरीही ते अन्य विकल्प नसल्यामुळे स्वीकारले जातात
ते Status Quo बनतात
उदाहरणार्थ: Apple चे आयफोन
▪️व्यवसायाच्या स्पर्धेत कधीही समानता येत नाही ,तिथे कायम कुणीतरी पुढे आणि कुणीतरी मागे असते. तिथे फक्त स्वतःला सिद्ध करण्याचा, समृद्ध  करण्याचा खटाटोप चाललेला असतो.
▪️व्यवसायात शाँर्टकट वापरून दीर्घकालीन विकास साधता येत नाही
▪️स्वतःच्या गर्वात राहणारे, मानसन्मानाला अतिमहत्त्व देणारे लोक व्यवसायात टिकत नाही.
▪️आज जरी धंदा छोटा असला म्हणून त्याला कमी समजायचे नसते तर त्याच्या फ्यूचर कँशफ्लोच्या अनुमानावरून त्याची पारख करावी
▪️कंपनीने स्वतःच्या नव्या तंत्रज्ञानाने (पेटंटेड ) ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडवणं, ग्राहकांचे नेटवर्क निर्माण करून, स्वतःचा मजबूत ब्रँड निर्माण करून उत्पादन खर्च कमी ठेवून विक्रीतून जास्तीत जास्त नफा कमावण्यावर भर द्यावा.
▪️सुरुवात छोटी आणि ध्यानपूर्वक निवडलेल्या बाजारपेठेत असावी
हळूहळू विस्तार करताना धीराने अडथळयांना स्पर्धेला तोंड देत प्रतिस्पर्ध्यापेक्षा उत्तम सेवा सुविधा देत व्हा
विचार नेहमी  दीर्घकालीन असावा.

#नशीब
▪️चांगली वेळ, चांगले भाग्य, उत्तम कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर
यांच्या संगमातून कठोर मेहनतीने यशप्राप्ती साध्य होते.
▪️आपले भविष्याला आकार देण्यासाठी आपले वर्तमानातील प्रयत्न तितकेच कारणीभूत आहे
▪️आपण पूर्णपणे नशीबावर अवलंबून राहत असू तर आपण केवळ एका लाँटरी तिकीटासारखे बनू त्यामुळे नशीबाबरोबर कर्मालाही तेवढेच महत्त्व द्यावे लागेल

#बाजारपेठ
बाजारात आशावादी /निराशावादी दोन्ही प्रकारचे लोक असतात आणि सर्व परिस्थितींचा आपल्याला आपल्या व्यवसायासाठी फायदा करून घेता आला पाहिजे (उदा. फ्यूचर आँप्शन ट्रेडर  )
▪️अनिश्चित निराशावादी : गोष्टी आहे त्यापेक्षा भविष्यात आणखी खराब होणार असे विचार करणारे
▪️असीम निराशावादी: गोष्टी वाईट होणार याची खात्री असल्यामुळे तयारीत असणारे
▪️अनंत आशावादी: आपण भविष्यासाठी उत्तम योजना बनवत असू तर आपले भविष्य नक्की उज्ज्वल असणार
▪️अनिश्चित आशावादी : भविष्य चांगले असणार आहे पण नक्की काय होईल माहित नाही त्यामुळे सध्या आहे त्यातच समाधान मानणारे
पैशाची अनिश्चितताच पैसा बनवण्याचा एकमात्र उपाय आहे तीच नव्या नव्या योजनांना जन्म देते
अनिश्चित राजकारण असेल सरकारी पक्षाच्या ,कायदेनियमांनुसार कंपनीला आपल्या कार्यशैलीत बदल करावा लागतो.
 मानवी जीवनाची क्षणभंगुरता सुद्धा कंपन्यांना बदलावे लागते.

#गुंतवणूक 
 कंपाउडिंगचा फायदा घेत कंपन्या 2× किंवा 4× फायदा कमावतात 
पण कितीही विश्वास असला तरीही सगळेच पैसे एकाच योजनेत गुंतवू नये

#लक्ष्य
▪️काही ध्येय कमी प्रयासाने गाठता येतात  तर काहीसाठी गंभीरपणे प्रयत्न करावे लागतात तर काही असाध्य असतात
त्यामुळे विचारपूर्वक ध्येय निवडा

#शोधक_नजर
    या जगातल्या समस्या कधीच संपणार नाहीत त्यामुळे लोकांच्या समस्या शोधण्यासाठी आपली शोधक नजर जागृत असावी , अल्पसंतुष्ट बनू नका आणि बदलांना नाकारणारे कर्मठ विचार सोडा.
     समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हयावर विचार करा त्यासाठी ज्ञान, बुद्धिमत्ता, टेक्नॉलॉजी हया सार्यांच्या परीने योजना बनवा
निश्चित योजना फायनल होईपर्यंत कुठेही वाच्यता करू नका.

#स्टार्टअपची_पायाभरणी
      स्टार्टअप स्थापना करण्यापूर्वी कंपनीत  भागीदार, त्यांचे कार्यक्षेत्र, पद, कामाचे नियंत्रण ठरवावे लागते.
#भागीदार: ज्यांना आपण चांगले ओळखतो, सोबत काम करू शकतो अशाच माणसांना आपण भागीदार निवडू शकतो. (शक्यतो 2-3 बोर्ड मेंबर असावे)
#स्वामित्व : कंपनीत कुणाचे किती शेअर्स असतील ,कुणाचे कामावर नियंत्रण असेल हे सारे आधीच ठरवावे लागेल.
#कर्मचारी: कंपनीत शक्यतो सर्वच पूर्णकालिक कामगार असावेत (सल्लागार सोडून)
योग्य कर्मचाऱ्यांना ESOP आणि योग्य सुविधा देण्याबाबतही विचार करावा जेणेकरुन कंपनीचे कर्मचारी
खुश ठेवता येईल आणि Retain करता येईल. तसेच 
कामात आंतरिक शांती बाळगत 
जबाबदारीने काम करणारे असावेत.
माणसाला मशीन समजण्यात येऊ नये
तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या आणि लोकांच्या समस्या योग्य प्रकारे सोडवता येईल.
#कन्सल्टंट: हुशार ,कर्तबगार, कार्यकुशल, कंपनीशी सुसंगत आचरण असणारे असावेत

#सेल्स: अनन्यसाधारण महत्त्व असलेला कंपनीचा विभाग ज्यावरच संपूर्ण कंपनी चालते. सेल्स ही एक कला आहे आणि सेल्समन एक कलाकार असतो फक्त तो इमानदार असावा एवढीच अपेक्षा असते.
उत्पादन आपले उत्तम क्वालिटीचे असावे जेणेकरून जाहिरातींवर कमी भार असेल.
विक्रीचे अनेक तंत्रे असतात तसेच वितरणाचे वेगवेगळे चँनेल आहेत ,आपल्या स्टार्टअपनुसार योग्य निवड करावेत.

समाप्त

Nilesh Shinde 

Monday, September 6, 2021

द लव्हर बॉय ऑफ बहवालपूर -राहुल पंडिता

द लव्हर बॉय ऑफ बहवालपूर   -राहुल पंडिता 

"गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त"  अमिर खुसरो च्या या पंक्ती वाचल्या तर एव्हाना सर्वांना भारतातील नव्हे जगातील स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मिर ची आठवण जरूर झाली असणार ,पण भारताचे हे नंदनवन खरोखरच नंदनवन आहे की शापित नंदनवन आहे.

हे नंदनवन का शापित आहे त्याची कारण मीमांसा विविध अंगाने होऊ शकते . पण आजच्या पुस्तकाचा विषय काश्मिरात कायम अशांतता माजवण्यासाठी अहोरात्र चालविण्यात येणारे अतिरेकी कारवाया पैकीच २०१९ साली लेथपुरा (Lethpora) जिल्हा पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( सि आर पी एफ ) वाहन ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची कहाणी आहे .

१९९० नंतर काश्मिरात अतिरेकी कारवायात लक्षणीय वाढ झाली त्याचा परिणाम म्हणून काश्मिर खोऱ्यातील  पंडित (काश्मीर खोरे -ज्यात १० जिल्हे आणि १५००० चौ किमी भूभाग येतो ) हे विस्थापित झाले . त्या काळात जे काही काश्मिरी पंडितांचे स्थलांतरण झाले ते कलाशिकानोव्हच्या (एके -४७ रायफली ) जोरावर घडवून आणण्यात आलेले . त्या काळात अतिरेकी कारवायांनी अगदी कळस गाठला होता भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कन्येचे देखील ह्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते . परंतु तदनंतर गेल्या ३ दशकांत काश्मिरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .भारतीय भूमीवर काही राज्याच्या अपवाद वगळता बऱ्याच राज्यात देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न भूतकाळात होते आणि  काही राज्यात अजूनही आहेत त्यात बऱ्याच आंतरराष्ट्रीय शक्ती , शेजारील शत्रू राष्ट्रे सहभागी आहेत आणि त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे.अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानात बऱ्याच प्रकारचे (मानवी बॉम्ब , कार बॉम्ब इ.) आत्मघातकी हल्ले भूतकाळात झालेत .या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात भारताच्या माजी पंतप्रधानांना पण त्यांचे प्राण गमवावे लागले .

तसा जम्मू काश्मिरात आत्मघातकी हल्ला हा प्रकार नवीन नाही किंबहुना २०१९ चा पुलवामा हल्ला घडण्याच्या अगोदर असे हल्ले झालेच नाहीत असेही नाही .२००१ मध्ये जैश ए मोहंमद ह्या अतिरेकी संघटनने श्रीनगर मध्ये जम्मू काश्मीर च्या जुन्या विधान भवनावर स्फोटकांनी भरलेली सुमो कार द्वारे मोठा आत्मघातकी हल्ला घडवला होता . त्यात ३८ नागरिक मृत पावली होती . त्या हल्ल्याचे मास्टर माईंड तसेच हल्लेखोर हे पाकिस्तानी नागरिक होते .

लेखकाच्या पुस्तकातील निवेदनाप्रमाणे काश्मीरी व्यक्ती तसा खूप धाडसी वा आक्रमक नसतो . कारण पुलवामा हल्ल्यात हल्लेखोर वाचण्याची काडी मात्र शंका नव्हती . पण पुलवामा हल्ल्याच्या हल्लेखोर (ज्याने प्रत्यक्ष स्फोटकांनी भरलेली कार सी आर पी एफ च्या ताफ्याला जावून धडकवली ) हा भारतीय होता . 

१९८९-९० च्या अतिरेकी कारवाया पराकोटीला पोहचल्या होत्या बऱ्याच जणांना काश्मीर हा भारताच्या ताब्यातून जाणार ही शक्यता वाटायला लागली होती . त्याच स्वरूपाचे काहीशी अनिश्चितता ही काश्मीर खोऱ्यात २०१६ च्या जुलै महिन्यात आली होती . इंटरनेट वरील समाज माध्यमे (फेसबुक, युट्युब , व इतर) भारतातील इतर भागात रुजून तरुणाई ला आकर्षित करत होती आणि  तरुणाईचे  आयडॉल या माध्यमातून निर्माण व्हायला लागली होती . अनियमित व विस्कळीत इंटरनेट सेवा असून पण काश्मिर ची तरुणाई ही यात कोठेही मागे नव्हती . काश्मीरी अतिरेक्यांच्या पटलावर बुरहान वानी ह्या हिजबुल मुजाहिद्दीन ह्या अतिरेकी संघटनेच्या नवीन तरुण अतिरेक्यांचा उदय होत होता आणि त्याची मोडस ओपरेंडी ही परंपरागत अतिरेक्यापेक्षा काहीशी वेगळी होती.त्याने समाज माध्यम तून (फेसबुक व  युट्युब द्वारे  ) प्रसिध्दी मिळवायला सुरुवात केली होती आणि त्याचा एक फॅन फॉलोवर वर्ग काश्मीर खोऱ्यात तयार झाला होता.  त्या प्रसिद्धीच्या परमोच बिंदू वर असताना ०८-जुलै -२०१६ ला तो एका लष्करी कारवाईत मारला गेला . त्या नंतर काश्मिरात हिंसेचा एक आग डोंब उमळला होता .लष्करी पथके ,अर्धसैनिक दले यांच्या वरील दगडफेकी च्या कारवायात लक्षणीय वाढ झाली होती . तदनंतरच्या हिंसाचारात १०० हून अधिक माणसे मृत्यू मुखी पडली तर १५००० माणसे जखमी झाली होती .

बुऱ्हान वानी च्या खात्म्यानंतर काश्मिरात आत्मघातकी हल्ल्याच्या घटना ह्या घडतंच होत्या मधल्या काळात उरी हल्ला आणि त्याचे प्रतिउत्तर ही भारतीय संरक्षक दलांनी दिले होते . उरी हल्ल्याच्या सर्जिकल स्ट्राइकवर अगदी सिनेमा पण येउन गेला होता . परंतु २०१९ चा सी आर पी एफ च्या ताफ्यावर जो आत्मघातकी हल्ला झाला तो इतका भयंकर आणि भीषण होता की अगदी ४० जवानाच्या शरीराच्या चिंध्या झाल्या होत्या आणि अवयव हे घटनेच्या संपूर्ण परिसरात विखुरले गेले होते . ज्या वाहनात स्फोटके भरून धडकवण्यात आले होते ते वाहन अगदी चक्काचूर झाले  त्यामुळे ह्या हल्लयांचे गूढ उकलने हे एनआयए ह्या तपास यंत्रणे समोरील एक मोठे आव्हान होते .

वरील सर्व आव्हान तपास यंत्रणेनं कसे पेललेले एनआयए चे कोण निष्णात अधिकारी होते की ज्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर मिळलेल्या एका किल्ली आणि अंगठ्याच्या साह्याने ह्या सर्व हल्ल्याचे गूढ उकलून काढले. प्रस्तुत पुस्तक अगदी आपणास गाझी बाबा (२००१ साली भारतीय ससंद भवनावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड ) याचा संरक्षक दलांनी कसा खात्मा केला. श्रीनगर मध्ये अतिरेक्यांना लपण्यासाठी कश्याप्रकारची भूलभुलैया रचना असणारी घरा अंतर्गत  गुप्त रचना असलेल्या जागा निर्माण केल्या जातात . याउपर वरील सर्व हल्ल्यासाठी आत्मघातकी हल्ल्यासाठी हल्लेखोरांची निवड कशी करण्यात आली . ह्या सर्व हल्ल्याच्या घटनेत वापरण्यात आलेला मोबाइल फोन हा ह्या हल्ल्याच्या ऑपेरेटरचे आदेश असूनही नष्ट करण्यात आला नाही  आणि तो मोबाइल संच तपास यंत्रणेला कसा मिळाला आणि त्यात तपास यंत्रणांना काय मिळाले,सर्व भारतीयाचा आवडता असा चर्चेचा मुद्दा बालाकोट सर्जिकल स्ट्राइक (ज्या वरून नंतर बरेच राजकारण ही रंगले ) ह्या आणि अजून सर्व तपशीलासाठी प्रस्तुत पुस्तक वाचणे हे जरुरीचे आहे .

 

हे पुस्तक २०१९ च्या सी आर पी एफ दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचे आणि तदनंतरच्या तपासाचे तसेच हल्ल्याच्या पार्श्वभूमीचे व त्या संबंधीच्या घटनांच्या बाबतीत एक निश्चित महत्वपूर्ण दस्तऐवज आहे यात काडी मात्र शंका नाही आणि असायचे काही कारण ही नाही . परंतु ह्या वेळी पुस्तक परिचय लिहिण्याच्या अगोदर मी पुस्तकाच्या लेखकाच्या बऱ्याच मुलाखती मी विविध समाज माध्यमात ऐकल्यात त्याच मुलाखतीतील एक स्मरणीय मुलाखत ही द वायर ह्या वाहिनीचे पत्रकार श्री करण थापर यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या ह्या पुस्तकाबद्दलच्या केलेल्या खालील विधानामुळे जास्त स्मरणात राहिली.

Pandita has an incredible story to tell which some may find hard to believe. Others may be sceptical [...] But there will also be many who will accept Pandita’s detailed story

वरील करण थापर यांच्या विधानाचा स्वैर मराठी अनुवाद

पंडिताची (राहुल पंडितांची ) एक अविश्वसनीय कथा आहे ज्यावर काहींना विश्वास ठेवणे कठीण वाटेल. इतरांना शंका असू शकते [...] पण असे बरेच लोक असतील जे पंडितांची तपशीलवार कथा स्वीकारतील 

राहुल पंडिता हे मुक्त पत्रकार असून त्यांचे हॅलो बस्तर (नक्षलवाद ) ,आवर मून हॅज ब्लड क्लाट्स (काश्मीर आणि काश्मिरी पंडित ) ही पुस्तके देखील वाचनीय आहेत.

Rahul Pandita 

#बुक 
#Rahulpandita 
#kashmir 
#PulwamaTerrorAttack

Saturday, September 4, 2021

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक : ग्रंथ, व इतर माहिती


विद्या प्रतिष्ठान संचलित 
तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर 
ग्रंथालय विभाग 


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा  ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....

आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली, म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जाऊ लागला.

डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यााचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहिल. १९६२  मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.  डॉ. राधाकृष्णन्‌ यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८  रोजी मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला. वयाच्या अवघ्या १५  व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 'तत्त्वज्ञान' हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी 'वेदांतातील नीतिशास्त्र' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची  साऱ्या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे पार परदेशा‍त त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्याबसाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक :  ग्रंथ, व इतर माहिती 





श्री चंदनवंदन अतुल 
ग्रंथपाल 

मिनी हॅबिटस्

मिनी हॅबिटस्* ........
  छोट्या कृतीतूनच होते मोठ्या बदलाची सुरुवात
              प्रत्येकालाच जीवनात काही बदल घडवून आणायचे असतात. लोक तसा प्रयत्नही करतात. काही प्रमाणात बदल घडतातही. पण ते बदल तात्पुरतेच असतात. पण मिनी हॅबिट्स च्या या पद्धतीमध्ये कुठलीही प्रकारे स्वतःच्या मनाविरुद्ध न जाता आपण जगातल्या या महान गोष्टी साध्य करू शकतो, विशेष म्हणजे त्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करण्याची अजिबात गरज नाही.
     मिनी हॅबिट ही एक अशी छोटीशी कृती आहे जी रोज करण्यासाठी तुम्ही स्वतःला सहज प्रवृत्त करु शकता. छोटी सवय ही बाबच अतिशय छोटीशी असल्यामुळे त्यात अपयश येण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आचरणात आणण्यासाठी साहजिकच हलकी फुलकी पण अतिशय शक्तिशाली असते. म्हणूनच चांगल्या मिनी हॅबिटस् निर्माण करणे हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे, जो आपल्याला या पुस्तकातून मिळेल.
मिनी हॅबिट्स या पुस्तकामध्ये सात मुख्य भाग दिले आहेत.
१. छोट्या सवयीची ओळख
२. तुमचा मेंदू कसा काम करतो
३. प्रेरणा विरुद्ध इच्छाशक्ती
४. छोट्या सवयीची पद्धत
५. छोट्या सवयीचे वेगळेपण
६. मोठ्या बदलासाठी आठ छोट्या पायऱ्या
७. मिनी हॅबिट्स चे आठ नियम
  वरील दिलेल्या भागांपैकी  पहिल्या तीन भागांमध्ये सवय निर्माण करणं, मेंदू, इच्छाशक्ती, प्रेरणा आणि या सर्व गोष्टी कशा एकमेकांशी संबंधित आहेत या विषयी चर्चा केलेली आहे. पुढच्या दोन भागांमध्ये या माहितीचा उत्तम प्रकारे कसा उपयोग करून घेता येईल तसेच यामागे काय शास्त्र आहे हे सांगितले आहे. शेवटचे तीन भाग, या गोष्टी कशा वापरायच्या हे सांगतात.आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.....
लेखक – स्टीफन गुज
प्रकाशक – मायमिरर पब्लिशिंग हाऊस
किंमत :१४०/-
संपर्क:९८८११८६६६३(व्हाट्सअप)
#mymirrorbooks
#minihabits

Friday, September 3, 2021

कैकयी

कैकयी
रामायणाची नायिका म्हणावे की खलनायिकातिच्या?जिच्या पुत्रमोहापोटी  रामायण घडले!स्वतःहून प्रिय असलेल्या श्रीरामाला वनवासी केलं म्हणून जगाचा तिरस्कार जिच्या वाट्याला आला!ज्या पुत्रसाठी हे घडवले त्या पुत्राने ही तिची, "माता न तू वैरिणी!" अशी संभावना केली ती राजा दशरथ यांची प्रिय पत्नी! अश्वविद्या निपुण! विरांगणा! युद्ध कला निपुण! पराक्रमी! सहाशी! सुरासुर युद्धात राजा दशरथाचे सारथ्य करून त्यांचा जीव वाचवनारी निपुण सारथी!जिला पाहताच युवराज दशरथ घायाळ झाला होता!जणू ती स्वर्गातील अप्सरा! लावण्यवती! सौंदर्यवती! पट्टराणी कैकयी!श्रीरामाची प्रिय छोटी आई कैकयी!महाराणी कैकयी वरील मराठीमधील ही पहिलीच कादंबरी!मुळ रामायण आधार मानून लिहिलेले एक सुंदर कादंबरीमय चरित्र!

पुस्तक: कैकयी

लेखक:डॉ नि. रा.पाटील पिलोदेकर

कैकय देशाची राजकुमारी कैकयी! पिता केकयनरेश अश्वनाथ म्हणून प्रसिद्ध! घोड्यांवर असलेला अत्यंतिक प्रेम! त्यांची केलेली मनोभावे सेवा आणि औषधोपचार यामुळे वसू प्रसन्न होऊन पशू पक्षी यांची भाषा समजण्याचा वर प्राप्त! पण पशु पक्षी यांचा संवाद कोणाला सांगितला तर त्या क्षणी मृत्यू! असा एक विलक्षण वर की शाप?आपल्याच पत्नीकडून जेंव्हा विचारणा होते तेंव्हा ,"माझा मृत्यू होईल यामुळे!", राजा सांगतो.पण हट्ट धरून बसलेली राणी क्रोधित होऊन, "मेलात तर मेलात पण मला सांगा!" असे जेंव्हा म्हणते तेंव्हा राजा त्या आपल्या प्रिय राणीचा त्याग करतो.गांधारदेशी माहेरी सोडून येतो! पण राजकुमारी कैकयी साठी आई नसते.तिचा सांभाळ करण्यासाठी ,तिला स्वतःचे दूध पाजण्यासाठी एक कुणबीन राजवाड्यात आणली जाते....तीच मंथरा! जी पाठराखिन म्हणून कैकयी च्या सोबत येते कायमची!

कैकयी आई सारखीच अनुपम सुंदर!पित्यासारखी अश्व विद्येत आणि युद्धकलेत निपुण! शस्त्र घेऊन रणात पराक्रम गाजवणारी! पुढे अश्व खरेदीसाठी आणि स्पर्धेसाठी आलेला युवराज दशरथ या सुंदर रुपवतीमुळे घायाळ होतो!लग्नाची मागणी घालतो.प्रसंगी युद्ध करून पळवून नेण्याची तयारी करतो!कैकयी चां भाऊ आणि पिता वेगळाच कट रचून मागणी ला नकार देण्याचा प्रयत्न करतात. कौशल्या आणि सुमित्रा या दोन राण्यानंतर आपल्या मुलीला तिसरी पत्नी म्हणून द्यावेसे वाटत नाही.

'कैकयी पुत्र पुढे राजा म्हणून घोषित करणार असाल तर आम्ही कैकयीचा विवाह करून देऊ!' असे वचन युवराज दशरथ यांच्याकडून मागितल्या जाते.यावर 'ज्येष्ठ पुत्र राजा केला जाईल मग तो कैकयी चां असो किंवा सुमित्रा कौशल्याचा!' असा शब्द दशरथ देतो. कौशल्या आणि सुमित्रा यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती ही गोष्ट ही चर्चिली जाते.विवाह होऊन ती अयोध्येत येते!

लेखकाने ही कादंबरी अतिशय सुंदर आणि तटस्थ राहून लिहिलेली आहे.वाचकाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे!

कैकयी शुर होती! वीर होती! कमालीची हुशार आणि प्रेमळ होती! राज्याभिषेकाच्या प्रसंगापर्यंत ती साऱ्यांची आवडती महाराणी होती! 
रामाची तर अतिशय प्रिय आई होती!ती प्रेमळ आहे.मोठ्या दोन सवतींच्या सेवेत रमणारी आहे.तिला स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार नाही ना शौर्याचा!

भयकंपित देवेंद्र राजा दशरथ यांना दानव शंभरासुर याच्या विरुद्ध मदत मागतो.राजा दशरथ युद्धाला जाताना कैकयी सोबत जाते.ऐन युद्धात राजा दशरथ यांचे सारथ्य करून त्यांचे कौशल्याने प्राण वाचवते.त्यावर खुश होऊन राजा दशरथ दोन वर देतात...या प्रसंगा नंतर कैकयी अधिकच नम्र होऊन राहते.ना शौर्याचा ना दिलेल्या वराचा ती कधी उल्लेख करते.इंद्राच्या दरबारात महिनाभर स्वर्गसुख उपभोगण्याचे भाग्य दशरथ राजाला कैकयी मुळे मिळते.स्वाभाविकपणे राजा कैकयी च्या प्रेमात अधिकच पडतो...पण याचाही ती कधी तेंभा मिरवत नाही.मुळ रामायणात ही याचा कोठे उल्लेख येत नाही! 

युवराज रामाला राज्याभिषेक होणार म्हणून ती अत्यानंदाने बेभान होते.मिठाई वाटण्याचे काम स्वतः करते.आपले आभूषणे मंथरेला देते....पण त्या नंतर जे घडते ...त्या प्रसंगानंतर ती निंदनीय होते.तिचा जग तिरस्कार करतो.तिच्या वाट्याला केवळ शिव्या आणि अपमान येतो!

त्या कैकयी ला स्वतःचा पुत्र भरत माहीत नव्हता का?श्रीराम हा त्याचा प्राण आहे हे तिला माहीत नव्हते का? भरत धर्मशील आहे हे तिला माहीत नसेल का? त्याच्या परस्पर त्यासाठी राज्य मिळवले तर मुलगा भरत ते राज्य स्वीकारणार नाही याचा अंदाज ही तिला नसेल का?

प्रजा आपल्या विरुद्ध बंड करून उठेल याची भीती कैकयी च्या मनात नसेल का?

ही खरच खलनायिका आहे का? का राक्षसांच्या अत्याचाराला संपवून टाकण्यासाठी केलेल्या दीर्घ योजनेतील मोठी जबाबदारी असलेली नायिका आहे?

श्रीराम कधी दोष देताना का दिसत नाहीत? त्यांच्या तोंडी कधीच अपशब्द का नाहीत?त्यांना का कैकयी ची काळजी वाटते? 

जगाच्या कल्याणासाठी,मानवजातीच्या हितासाठी श्रीराम वनवास धारण करत असतील आणि त्यातून राक्षस जातीचा अत्याचार मोडून काढत असतील तर ते एका अर्थाने महान कार्य आहे.
अतिदुर उत्तरेतील राजकुमार वनवासी होऊन दक्षिणेत येतों कशाला?ना सैन्य ना संपदा!कोणत्याही राजाची व सम्राटाची मदत न घेता अतिशय बलाढ्य आणि शक्तिशाली राक्षसांचा बीमोड केला जातो तो सामान्य वानर , वनवासी जनतेकडून!सामान्य माणसाला संघटित करून आणि प्रेरित करून आंदोलन उभे केले जाते आणि सम्राट असलेल्या रावणाला ठार केले जाते.पृथ्वी भयमुक्त केली जाते.

पण बदनामी मात्र कैकयी ची होते! इतकी मोठी बदनामी होणार याची कल्पना तिला नसेल का?

काय म्हणतात भारद्वाज मुनी?

भरतास भारद्वाज मुनी म्हणाले ,"वत्सा तुझी माता कैकयी वर मुळीच दोष दृष्टी ठेवू नकोस. तिचे काहीही चुकलेले नाही. तुला वाटते तशी तुझी माता नसून ती धोरणी व हुशार आहे. श्रीरामावर नितांत प्रेम करणारी तुझी माता अशी वागते, यामागे काही तरी कारण असलेच पाहिजे असे तुला नाही का वाटत? पुत्र भरतास राज्य मिळाले तरी बंधू प्रेमामुळे तो ,ते स्वीकारणार नाही हेसुद्धा तिला माहीत होते.  श्रीरामास वनवास व भरतास राज्य मागण्याचे तिचे हे कार्य तिन्ही  लोकांत आपली फक्त निर्भत्सना समाजात होईल हे सुद्धा तिला चांगलेच माहीत होते. तरीही ती वीरांगना क्षात्रणी त्या निर्भत्सना चे विष पचवण्यासाठी तयार झाली. या मागे तुझ्या राज्य नाकारून मिळणाऱ्या कीर्ती यशापेक्षा श्री रामाने वनवासाला जाऊन त्यास मिळणारे राक्षस संहाराचे यश अधिक त्रिकालबाधित राहणार आहे हे ही तिने ओळखले आहे!"

ही एक विचार करण्यास प्रवृत्त करणारी कादंबरी आहे. हे निश्चित!

सोपी भाषा ,ओघवती शैली आणि लालित्य ही वैशिष्ट्य वाचकाला खिळवून ठेवतात!

उर्मिला, लक्ष्मण यांच्या मनोगतमुळे या कादंबरीला अधिकच उंची मिळाली आहे.त्यांच्या तोंडून आपल्याला कळणारे वर्तमान अधिक संवेदनशील आणि मानवीय भावनांना जोडणारे बनवते.

या कादंबरीत कैकयी ला नायिका म्हणून दाखवण्याचा कोठेही आततायी प्रयत्न झालेला नाही हे विशेष! जनाच्या दृष्टीने ती खलनायिका आहेच! पण श्रीराम आणि ध्यानस्थ ऋषी, भारद्वाज ऋषी यांचे ही मते यात पुढे आणल्यामुळे वाचकाला हे मानावे लागते की रामायणात कैकयी ने लोकनिंदा स्वतःहून ओढवून घेतली.जनातेपणी ओढवून घेतली!

प्रकाशन: विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठ:२८६ मूल्य:४००/ 

सवलत मूल्य:३५०/ टपाल:३०/ एकूण:३८०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता,पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा!

फोन पे, गुगल पे, Paytm:9421605019

ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी व्हॉट्सअप:9421605019

व्हॉट्सॲप कधीही! कॉलिंग टाईम:सकाळी८:३० ते:रात्री:९!

टिप:कॅश ऑन डिलिव्हरी ची व्यवस्था नाही!क्षमस्व!