Sunday, September 12, 2021

Zero_to_one

#Zero_to_one 
              लेखक - पीटर थील
       प्रकाशक - मधुश्री प्रकाशन

#लेखकाविषयी :
जर्मनीत जन्मलेले आणि अमेरिकेत वाढलेले पीटर ग्रँज्युएशन नंतर कोर्टात जजच्या हाताखाली क्लार्क आणि मग वकील म्हणून काम करत होते.
त्यानंतर फ्यूचर आँप्शन ट्रेडर आणि नंतर Paypal हया आँनलाईन पैसे ट्रान्सफर करणाऱ्या पहिल्या वहिल्या कंपनीचा सहसंस्थापक होते
1996 ते 2002 हया वर्षांत त्यांनी Paypal भरभराटीला आणली आणि नंतर ती कंपनी Ebay ला विकून टाकली.
त्यानंतर भागीदारीत capital mgmt कंपनी काढली.
2005 साली दूरदृष्टीने Social मिडीयाचे प्रस्थ ओळखून त्याने फेसबुकचा पहिला Outsider investor होण्याचे ठरवले.
व्हेंचर capitalist म्हणून आजपर्यंत त्यांनी अनेक स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केलीयं 
आज त्याची एकूण संपत्ती 7 Billion dollar इतकी आहे आणि Forbes च्या जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीतही ते झळकले आहेत.

#पुस्तकाविषयी :
हे पुस्तक एकूणच त्याच्या स्टार्टअप विषयी आणि त्याच्या अनुभवाविषयी आहे ज्यात त्याने अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. शून्यातून विश्व करण्याचा लेखकाचा अनुभव हया पुस्तकात कव्हर करण्यात आला आहे. 
            स्टार्टअप हा आजकाल परवलीचा शब्द बनलाय, 
नव्या तंत्रज्ञानावर आधारित नवा उद्योग म्हणजेच "स्टार्टअप"
भारतीय तरूणांनी स्वतःचा बिझनेस करावा हयासाठी अगदी सरकारी पातळीवर प्रयत्न झालेत.
1996 च्या काळात नव्या संकल्पनेला उद्योगात परावर्तित करणाऱ्या पीटर थील यांनी आपली मते ,सल्ले आणि सूचना हया मार्गदर्शनदायी पुस्तकातून मांडणल्या आहेत 

लेखकाच्या मतांना थोडक्यात जाणून घेऊया

#कल्पना_स्टार्टअपची
▪️माणसाने इतरांची नक्कल करण्यापेक्षा स्वतः चे स्वंतत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी आपले ज्ञान, कौशल्य, बुद्धिमत्ता यांचा सर्वोतोपरी वापर करावा
▪️नव्या तंत्रज्ञानाशी आपली मैत्री व्हायला हवी कारण तेच आपल्याला प्रगतीच्या, समृद्धीच्या दिशेने नेऊ शकते.
▪️चुकांमधून शिकत, लवचिकतेने बदलांना सामोरे जात, कालसुसंगत, तर्कसंगत नव्या विचारांनी, संशोधनाने सिद्ध झालेला अभिनव उद्योग निवडा
▪️स्टार्टअपचे मिशन फक्त लोकांना सेवा पुरवणे नाही तर लोकांच्या समस्या सोडवणे हे आहे.
▪️मार्केट मध्ये सतत वेगवेगळ्या बूम येत असतात  आणि त्या बूमच्या मागे आपण धावत असू तर आपण गर्दीचा एक भाग होतोय...वेगळे नाही
▪️नेहमी असा व्यवसाय निवडा जिथे कमीतकमी काँम्पिटीशन असेल किंवा आपली मोनोपाँली असेल
▪️मोनोपाँलीमुळे आधिक सुरक्षित प्रगती करता येते कारण तिथे वारंवार प्रतिस्पर्ध्याने काय केले हयावर लक्ष देण्याची गरज उरत नाही आणि वाचलेल्या वेळात उत्पादनात सुधारणा आणि नवे संशोधन यावर भर देता येतो.
▪️तीव्र स्पर्धा असेल तिथे नफ्यावर परिणाम होणे अटळ आहे आणि नफा तुटला की व्यवसाय बुडायला वेळ लागत नाही
▪️मोनोपाँली मध्ये आपण प्रिमियम किमंतीत प्राँडक्ट आणले तरीही ते अन्य विकल्प नसल्यामुळे स्वीकारले जातात
ते Status Quo बनतात
उदाहरणार्थ: Apple चे आयफोन
▪️व्यवसायाच्या स्पर्धेत कधीही समानता येत नाही ,तिथे कायम कुणीतरी पुढे आणि कुणीतरी मागे असते. तिथे फक्त स्वतःला सिद्ध करण्याचा, समृद्ध  करण्याचा खटाटोप चाललेला असतो.
▪️व्यवसायात शाँर्टकट वापरून दीर्घकालीन विकास साधता येत नाही
▪️स्वतःच्या गर्वात राहणारे, मानसन्मानाला अतिमहत्त्व देणारे लोक व्यवसायात टिकत नाही.
▪️आज जरी धंदा छोटा असला म्हणून त्याला कमी समजायचे नसते तर त्याच्या फ्यूचर कँशफ्लोच्या अनुमानावरून त्याची पारख करावी
▪️कंपनीने स्वतःच्या नव्या तंत्रज्ञानाने (पेटंटेड ) ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडवणं, ग्राहकांचे नेटवर्क निर्माण करून, स्वतःचा मजबूत ब्रँड निर्माण करून उत्पादन खर्च कमी ठेवून विक्रीतून जास्तीत जास्त नफा कमावण्यावर भर द्यावा.
▪️सुरुवात छोटी आणि ध्यानपूर्वक निवडलेल्या बाजारपेठेत असावी
हळूहळू विस्तार करताना धीराने अडथळयांना स्पर्धेला तोंड देत प्रतिस्पर्ध्यापेक्षा उत्तम सेवा सुविधा देत व्हा
विचार नेहमी  दीर्घकालीन असावा.

#नशीब
▪️चांगली वेळ, चांगले भाग्य, उत्तम कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर
यांच्या संगमातून कठोर मेहनतीने यशप्राप्ती साध्य होते.
▪️आपले भविष्याला आकार देण्यासाठी आपले वर्तमानातील प्रयत्न तितकेच कारणीभूत आहे
▪️आपण पूर्णपणे नशीबावर अवलंबून राहत असू तर आपण केवळ एका लाँटरी तिकीटासारखे बनू त्यामुळे नशीबाबरोबर कर्मालाही तेवढेच महत्त्व द्यावे लागेल

#बाजारपेठ
बाजारात आशावादी /निराशावादी दोन्ही प्रकारचे लोक असतात आणि सर्व परिस्थितींचा आपल्याला आपल्या व्यवसायासाठी फायदा करून घेता आला पाहिजे (उदा. फ्यूचर आँप्शन ट्रेडर  )
▪️अनिश्चित निराशावादी : गोष्टी आहे त्यापेक्षा भविष्यात आणखी खराब होणार असे विचार करणारे
▪️असीम निराशावादी: गोष्टी वाईट होणार याची खात्री असल्यामुळे तयारीत असणारे
▪️अनंत आशावादी: आपण भविष्यासाठी उत्तम योजना बनवत असू तर आपले भविष्य नक्की उज्ज्वल असणार
▪️अनिश्चित आशावादी : भविष्य चांगले असणार आहे पण नक्की काय होईल माहित नाही त्यामुळे सध्या आहे त्यातच समाधान मानणारे
पैशाची अनिश्चितताच पैसा बनवण्याचा एकमात्र उपाय आहे तीच नव्या नव्या योजनांना जन्म देते
अनिश्चित राजकारण असेल सरकारी पक्षाच्या ,कायदेनियमांनुसार कंपनीला आपल्या कार्यशैलीत बदल करावा लागतो.
 मानवी जीवनाची क्षणभंगुरता सुद्धा कंपन्यांना बदलावे लागते.

#गुंतवणूक 
 कंपाउडिंगचा फायदा घेत कंपन्या 2× किंवा 4× फायदा कमावतात 
पण कितीही विश्वास असला तरीही सगळेच पैसे एकाच योजनेत गुंतवू नये

#लक्ष्य
▪️काही ध्येय कमी प्रयासाने गाठता येतात  तर काहीसाठी गंभीरपणे प्रयत्न करावे लागतात तर काही असाध्य असतात
त्यामुळे विचारपूर्वक ध्येय निवडा

#शोधक_नजर
    या जगातल्या समस्या कधीच संपणार नाहीत त्यामुळे लोकांच्या समस्या शोधण्यासाठी आपली शोधक नजर जागृत असावी , अल्पसंतुष्ट बनू नका आणि बदलांना नाकारणारे कर्मठ विचार सोडा.
     समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हयावर विचार करा त्यासाठी ज्ञान, बुद्धिमत्ता, टेक्नॉलॉजी हया सार्यांच्या परीने योजना बनवा
निश्चित योजना फायनल होईपर्यंत कुठेही वाच्यता करू नका.

#स्टार्टअपची_पायाभरणी
      स्टार्टअप स्थापना करण्यापूर्वी कंपनीत  भागीदार, त्यांचे कार्यक्षेत्र, पद, कामाचे नियंत्रण ठरवावे लागते.
#भागीदार: ज्यांना आपण चांगले ओळखतो, सोबत काम करू शकतो अशाच माणसांना आपण भागीदार निवडू शकतो. (शक्यतो 2-3 बोर्ड मेंबर असावे)
#स्वामित्व : कंपनीत कुणाचे किती शेअर्स असतील ,कुणाचे कामावर नियंत्रण असेल हे सारे आधीच ठरवावे लागेल.
#कर्मचारी: कंपनीत शक्यतो सर्वच पूर्णकालिक कामगार असावेत (सल्लागार सोडून)
योग्य कर्मचाऱ्यांना ESOP आणि योग्य सुविधा देण्याबाबतही विचार करावा जेणेकरुन कंपनीचे कर्मचारी
खुश ठेवता येईल आणि Retain करता येईल. तसेच 
कामात आंतरिक शांती बाळगत 
जबाबदारीने काम करणारे असावेत.
माणसाला मशीन समजण्यात येऊ नये
तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या आणि लोकांच्या समस्या योग्य प्रकारे सोडवता येईल.
#कन्सल्टंट: हुशार ,कर्तबगार, कार्यकुशल, कंपनीशी सुसंगत आचरण असणारे असावेत

#सेल्स: अनन्यसाधारण महत्त्व असलेला कंपनीचा विभाग ज्यावरच संपूर्ण कंपनी चालते. सेल्स ही एक कला आहे आणि सेल्समन एक कलाकार असतो फक्त तो इमानदार असावा एवढीच अपेक्षा असते.
उत्पादन आपले उत्तम क्वालिटीचे असावे जेणेकरून जाहिरातींवर कमी भार असेल.
विक्रीचे अनेक तंत्रे असतात तसेच वितरणाचे वेगवेगळे चँनेल आहेत ,आपल्या स्टार्टअपनुसार योग्य निवड करावेत.

समाप्त

Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know