Monday, May 31, 2021

आकर्षणाचा_सिद्धांत

#आकर्षणाचा_सिद्धांत
लेखक : मितेश खत्री
प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखकाविषयी:
मितेश एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सुमार बुद्धिमत्तेत कसेबसे MBA पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून प्रायव्हेट कंपनीत जाँब करत होते.
आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल त्यांना प्रथम कळाले तेव्हा त्यांचा यावर विश्वास नव्हता 
पण आयुष्यात एका टप्प्यावर त्यांनी याच सिद्धांताचा वापर करून
स्वतःच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केला 
आज ते प्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर आहेत जे 300 हून आधिक कंपनीच्या लाखो लोकांच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांताने ज्ञानाचा प्रकाश आणून त्यांचे आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवले आहे

#भारतीय_संस्कृती_आणि_आकर्षणाचा_सिद्धांत :
आपल्याला हवी ती गोष्ट आकर्षून घ्यायची अपार जादूई शक्ती माणसाकडे आहे तिचा वापर आत्मविकास /जनकल्याण यासाठी करणारे कितीतरी साधूमुनी हया भूमीत होऊन गेले.
आकर्षणाचा सिद्धांत माहीत नसल्याने हया शक्तीचा वापर स्वतः विरोधात करून वाईट घटना आणि दुःख हयांना अजाणतेपणी लोक आकर्षित करतात.
लेखकाच्या मते आकर्षणाचा सिद्धांत पुरातन काळापासून आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा भाग आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेत याचे पुरावे मिळतात.

#आकर्षणाच्या_सिद्धांतामागचे_विज्ञान :
भौतिकशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्य अथवा पदार्थ उर्जेपासून बनला आहे ...अगदी देव सुद्धा हयाच उर्जेपासून बनला आहे
फक्त प्रत्येकाची कंपन करण्याची क्षमता म्हणजेच कंप्रता (Frequency) वेगवेगळी असते 
सुसंगत कंप्रता असणारे पदार्थ वा मनुष्य एकमेकांना आकर्षित करतात.
जगातील एकूण उर्जेचे प्रमाण कायम स्थिर असते त्यामुळे आपण कितीही उर्जा वापरली रूपांतरित केली तरीही ती संपत नाही
त्यामुळे आपल्याला जे जे हवं आहे ते या संसारात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे

#आकर्षणाच्या_सिद्धांताची_कार्यपद्धती :
भावना -विचार-विश्वास- कृती हया चतुसूत्रीनुसार काम
जशा आपल्या भावना तसाच आपण विचार करतो आणि मग त्या विचारांवर आपण विश्वास ठेवतो आणि तशीच कृती आपल्या हातून घडते.

#भावना
आपल्या मनातील भावनांनुसार परिस्थिती आपण आकर्षित करत असतो 
आनंद,प्रेम,आशा ,स्पष्टता, शांतपणा, उत्साह, सामर्थ्य, धैर्य हया सकारात्मक भावना आहेत तर त्याच्या उलट दु:ख, तिरस्कार, निराशा, गोंधळलेपणा, कंटाळलेपणा,कमजोरी, भीती हया नकारात्मक भावना आहेत
आपल्या मनातील भावनांवर आपले नियंत्रण असावे,
आपल्या मनात सतत कृतज्ञतेचा भाव असावा,
आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आपण धन्यवाद द्या,
जे काही मिळालयं त्यासाठी परमेश्वराचे त्रिकाळ आभार व्यक्त करा,
स्वतः शी आणि दुसऱ्यांशी निगेटिव्ह बोलणे टाळावे...आणि चुकून बोललोच तरी cancel  बटन दाबत असल्याचे चित्र मनासमोर आणा,
अडचणीवर आणि वाईट भावनांवर मात करायला स्वसंवाद करताना नेहमी स्वतःला सकारात्मक प्रश्न विचारा,
क्षमा हे बर्याच मानसिक दुखण्यावर एक नंबरी इलाज आहे त्यामुळे अपराध कसलेही असो स्वतःला आणि इतरांना मनापासून क्षमा करा,
ज्या गोष्टी ,माणसे बदलता येत नाही त्यांना स्वीकारा आणि जे करता येईल ते बदल करत जीवनात पुढे जात रहा

#विचार
विचार हे उर्जेच्या कणांप्रमाणे असतात 
सगळया समान विचारांना एकत्र आणले तर विश्वाकडून आधिक उर्जा आपण आकर्षून घेतो
जसे आपले विचार तशी आपली कंप्रता बदलते
 सकारात्मक विचारांनी धन कंप्रता ( +ve Frequency)   बनते
नकारात्मक विचारांनी ऋण कंप्रता( -ve frequency ) बनते.
धन कंप्रतेमुळे आपल्या यश,धन ,आरोग्य वाढतात आणि ऋण कंप्रतेकडे  आपल्याकडील हया सर्व गोष्टी काढून घेण्याची ताकद आहे. त्यामुळे जे हवयं फक्त त्याचा जास्तीत जास्त विचार करा, प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने करण्याची कृती सांगणारे चित्र  डोळयासमोर आणा.
भूतभविष्याचा विचार न करता वर्तमानात जगा आणि जे हवयं ते हया क्षणी मिळालच आहे अशी कल्पना करा आणि त्या आनंदात जगा
चांगल्या विचारांची अनुमोदने (Positive Affirmation)
"मी सुखी वैभवशाली आरोग्यदायी जीवन जगत आहे......"
लिहून अथवा फोन मध्ये अँडिओ रेकाँर्ड बनवून 
स्वतः ला हया कंप्रतेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा
जास्तीत जास्त Inspirational आणि positive विचारांचा खुराक रोज घ्या

#विश्वास
एखाद्या गोष्टीच्या वैधतेवर शंका नसणे म्हणजे विश्वास
जे हवयं ते मिळवण्याची आपली पात्रता आहे असा आपला ठाम विश्वास हवा 
स्वतः वर मर्यादा लादणारे विश्वासांना ओळखा (Negative Belief) जसे की...
हे काम कठीण आहे ,मला जमणार नाही, माझ्या नशीबात नाही
असे प्रत्येक गोष्टीत आपली वाट अडवणारे मनात दडलेले चुकीचे समज ओळखा
त्या चुकीच्या मर्यादा लादणार्या विश्वासांना वाढीसाठी मदत करणाऱ्या विश्वासात बदला जसे की....
हे काम सोपे आहे, मला जमू शकते  
दररोज असे Positive Belief  किमान दहावेळा कानावर पडले पाहिजेत अशी व्यवस्था करा आणि अनुमोदनाद्वारे असे परिवर्तन घडवून आणा

#कृती  
कृतीशिवाय आकर्षणाचा नियम फोल ठरतो .
आत्मविश्वासपूर्ण ठाम कृती आपल्या इच्छा किती प्रबळ आहे याची पुष्टी देतात
आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उद्दिष्टांच्या अनुषंगाने योग्य कृती आपल्याला विजेता बनवतात.
जसे की उत्तम करियर साठी आपली कामे सर्वोत्कृष्ट करा
चांगल्या नातेसंबंधासाठी प्रेम,आदर, स्नेहभाव दाखवा
आधिक पैसा हवा असेल तर पैसा वाचवा आणि वाढवा
वजन कमी करायचे असेल तर Healthy Diet आणि व्यायाम करा

#आकर्षणाचा_वेग_वाढवण्यासाठी : 🗝️
आकर्षणाच्या सिद्धांताद्वारे आपल्या ईच्छांची लवकरात लवकर पूर्तता होण्यासाठी 
1️⃣आपली ध्येय रोज लिहित राहून मेंदूतील RAS अँक्टिव्ह करायची आणि मग त्याच्या मदतीने नवनव्या संधी आकर्षित करायच्या
व ध्येयपूर्ती साधायची
2️⃣ध्येयफलकावर आपली जे काही ध्येय असतील त्याचे फोटो एका बोर्डवर लावा जेणेकरून मेंदू विचार करायला प्रोत्साहित होईल
3️⃣आकर्षणाच्या सिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवा
त्यामुळे कार्यनिष्पत्तीबाबत का,कधी,कसे असे प्रश्न मनात न आणता काळजी चिंतेला दूर ठेवून सरळ परमेश्वराला शरण जा
4️⃣कमतरतेचे अभावाचे विचार मनात असेल तर कुठलीच गोष्ट परिपूर्ण होणार नाही, रोज रात्री झोपताना माझे आयुष्य परिपूर्ण आहे असे स्वतःला बजावा.
5️⃣आपल्या भूतकाळातील किमान दहा चांगल्या आठवणी लिहून काढा जेणेकरून हया धन संदर्भामुळे आपली धन कंप्रता वाढेल आणि आत्मशंका दूर होतील
6️⃣कायम स्वतःला कुठल्याही कारणाशिवाय आनंदी ठेवा असा हेतूरहीत आनंद आपल्याला निगेटिव्ह एनर्जी पासून दूर ठेवतो
7️⃣आकर्षण सिद्धांत यशस्वी रीत्या वापरणाऱ्या व्यक्तीची भेट घेऊन आपल्या चूका कुठे होतात ते समजून घ्या, त्या सुधारून लवकर परिणाम मिळवा
8️⃣ज्या दिवशी आकर्षणाचा सिद्धांत वापरणे सुखद वाटत नाही अशा दिवसापुरता त्याचा वापर थांबवा आणि योग्यवेळी पुन्हा वापरा.

#आकर्षणाचा_सिद्धांत_कधी_काम_करत_नाही 
🅰️जेव्हा आपली कंप्रता आपणच अडवतो 
➡️ सतत ध्येयाची काळजी करून,
➡️ स्वत:वर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवून,
➡️पुरेशी आणि अनुरूप कृती न करून
➡️ माणसं आणि परिस्थिती विषयी निगेटिव्ह बोलून अथवा ऐकून,
➡️ कृतज्ञता कमी आणि तक्रारी आधिक केल्यामुळे
➡️ आपल्या लक्ष्याशी आपण वचनबद्ध नसल्यामुळे

🅱️नियती 
आपल्या आयुष्यातील 20% भाग नियतीवर अवलंबून असते 
आपला जन्म मृत्यू व्यंग हे आपल्या हातात नसतात
पण आपल्या नशीबातच नाही असे समजून प्रयत्न करणेच सोडल्यास कंप्रता अडवली जाते

#आकर्षणाच्या_सिद्धांताने_इच्छापूर्ती ⛑️💏🚗🛍️
भावना -विचार -विश्वास- कृती या चतूसुत्रीच्या माध्यमातून
मनोचित्र-अनुमोदन-आभार-कृतज्ञता व्यक्त करून आपण आपले परस्परसंबध, आरोग्य सुधारू शकतो तसेच इच्छित धन आकर्षित करू शकतो.

#आकर्षणाचा_सिद्धांत_आणि_वास्तू 🏠
जशी वस्तूत उर्जा असते तशीच उर्जा आपल्या  वास्तूत असते ,
या उर्जेचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक दिशेनुसार पंचतत्व ( अग्नी,वायू ,आकाश,जल,पृथ्वी ) असतात त्या तत्वांनुसार वास्तूची रचना असेल तर त्यांची उर्जा आपल्याला लाभते आणि आपली धन कंप्रता वाढते
धन कंप्रतेसाठी आपले घर कार्यालय हे वास्तुशास्त्रानुसार असावेत आणि नसेल तर योग्य तो सल्ला घेऊन बदल करावे

#आकर्षणाचा_सिद्धांत_आणि_मुले 👫

आकर्षणाचा सिद्धांत वयाच्या 18 व्या वर्षी जर कळाला आणि वापरता आला तर आपण आज काहीतरी वेगळेच असतो 
पण आता आपल्या मुलांना याचे ज्ञान देऊन त्यांची धन कंप्रता वाढवायला आणि त्रुण कंप्रता नियंत्रित ठेवायला मदत करूयात
संदर्भ: निलेश  शिंदे 

इकिगाई

इकिगाई 
लेखक : हेक्टर गार्सिया ,फ्रान्सिस मिरेलस
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस

आजकाल जगभरात सर्व सुख सुविधा उपलब्ध असूनही माणसाचे आयुर्मान मात्र जास्त नाही. याउलट लठ्ठपणा, कँन्सर, ब्लडप्रेशर, डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या जीवनशैलीच्या आजाराने बरीचशी माणसं वयाच्या साठी गाठण्याआधीच दगावतात.
वयाची शंभरी गाठणे अजूनही फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच शक्य आहे.
निरोगी दीर्घायुष्य कसे मिळवायचे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी स्पेनमधील हेक्टर आणि फ्रान्सिस यांनी जगभरातील जास्त आयुर्मान असलेल्या भागांचा अर्थात ब्लू झोनचा अभ्यास केला

ब्लू झोनमधील ओकिनावा जपानचा दक्षिण भाग हया परिसरात त्यांना १२० वर्षे जगणारे अनेक लोक आहेत असे त्यांना आढळले.
लेखकांनी हया भागात काही दिवस मुक्काम केला आणि त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जे काही हाती लागले ते पुस्तकातून मांडण्याचा लेखकांनी प्रयत्न केला तेच हे जगातील लाखो लोकांनी गौरवलेले पुस्तक #इकिगाई

निरोगी दीर्घायुषी जगण्यासाठी ते लोक काय करतात
1️⃣ #आहार
➡️सुशी पद्धतीने बनवलेले इंद्रधनुषी जेवण दिवसातून दोन वेळा घेतात 
➡️यात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सात वेगवेगळ्या भाज्या,फळ एकावेळच्या जेवणात असतात, 
➡️जास्त करून आहारात टोफू , गाजर, कोबी,गोड बटाटा असे Anti oxident पदार्थ असतात
➡️आहारातील साखरेचे आणि मिठाचे प्रमाण जगभरातील लोकांपेक्षा निम्मे आहे
➡️भात, न्यूडल्सशिवाय त्यांचे जेवण परिपूर्ण होत नाही.
➡️ काही मांसाहारी लोक आठवड्यातून तीनदा मासे खातात किंवा एकदा डुकराचे मांस खातात
➡️त्यांचा आहार कमी कँलरीयुक्त असतो ( 1800 Cal per Day)
➡️ ते 80% पोट भरेल इतकेच जेवतात (काहीजण त्याऐवजी ➡️आठवड्यातून एकदा / दोनदा उपवास करतात त्या दिवशी फक्त 500 कँलरी इतकाच आहार घेतात )
➡️दिवसातून तीनदा सँनपिन चहा पितात जो ग्रीन टी आणि जाईच्या चहाचे मिश्रण असतो
➡️प्रोसेस्ड फूड,बेकरी फूड ,फास्ट फूड त्यांच्या आहारात नसते.
➡️कुठल्याही व्यसन आणि नशील्या पदार्थापासून दूर राहतात

2️⃣ व्यायाम 
ओकिनावा चा बराचसा परिसर दुर्गम आहे ,जिथे बुलेट ट्रेन सोडा साधी लोकल सुद्धा जात नाही ,काही ठिकाणी कारने पोहचणे सुद्धा अवघड आहे त्यामुळे येथील लोक बहुतांश सायकल किंवा पायी प्रवास करतात त्यामुळे शरीराची प्रचंड हालचाल दिवसभर होते
रात्री 7-9 तास झोपून ते भल्या पहाटे उठून ते हलकेफुलके व्यायाम करतात (झोपेमुळे अल्झायमर सारख्या आजाराला दूर ठेवून चेहरा टवटवीत ठेवता येतो)

ज्यात खालीलपैकी कुठलातरी व्यायाम केला जातो ज्यामुळे ते तणावमुक्त राहतात
1.#रेडिओ_ताईसो 
रेडिओवरून सूचना ऐकत सर्वांनी हाँल अथवा मैदानात एकत्र येऊन केलेला हातांचा व्यायाम
2.#योगासने मुख्यत्वेकरून सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांगाचा व्यायाम 
3.#क्किगाँग -जीवनातील चेतनेला कार्यरत करणारे श्वसन प्रकार
ज्यातून शरीर, श्वास आणि मन यांचे नियमन करून आत्म(चैतन्य) नियंत्रण केले जाते
4. #शिएत्सु -उच्चारध्वनीमार्फत श्वसनप्रक्रिया नियंत्रित करून शरीराच्या सगळ्या अवयवांचा समतोल साधत ,हालचाली करत अंतरात्म्याला शांत करायची ही व्यायाम प्रणाली
5.#ताईची -मार्शल आर्टचा प्रकार ज्यात कमीतकमी उर्जेत चपळतेने स्वतःचे मन, शरीर, श्वास यात एकसंधता आणून  प्रतिस्पर्ध्यापासून स्वताचे स्वसंरक्षण करण्याचे धडे दिले जातात

3️⃣ इकिगाई (जीवनाचा उद्देश माहिती असणे )
कित्येक जण जिवंत आहेत म्हणून जगतात आणि असेच निराशेत रडतकुढत जगून एखाद्या दिवशी हया जगातून नाहीसे होतात 
सुखी समाधानी आणि दीर्घायुषी जीवनासाठी देवाने आपल्याला हया धरतीवर कशासाठी पाठवलयं हे माहिती हवं  हे जाणून घेण्यासाठी जपानी लोक खालील पद्धती वापरतात
1. #लोगोथेरपी
आपल्या जीवनाचा उद्देश माहिती नसतो म्हणूनच आपल्या जीवनात चिंता ,निराशा पोकळी जाणवते 
लोगोथेरपी स्वतःचा आध्यात्मिक शोधाची नैसर्गिक प्रक्रिया आहे 
ज्यात निराश व्यक्तीच्या समस्या आणि भूतकाळ थेरपिस्ट जाणून घेतो आणि समस्यांच्या मुळाशी जाऊन जीवनातील तो उद्देश शोधायला मदत करतो ज्यामुळे व्यक्तीच्या मनाची द्विधा अवस्था दूर होते
2.#मोरिताथेरपी
ही सुद्धा आध्यात्मिक आधारावर उद्देश शोधणारी आणि निराशेवर मात करणारी पद्धत आहे
यात पहिल्या टप्प्यात निराश माणसाला पाच दिवस एका खोलीमध्ये ठेवले जाते जिथे टिव्ही, पुस्तक ,मित्र अशा कुठल्याच उत्तेजक गोष्टी नसतात फक्त उपचारकर्ता त्याला भेटतो
माणसाला फक्त आराम करुन स्वतःच्या भावनांतील चढउतार अनुभवयाचा असतो
पण माणूस लवकरच याला कंटाळतो
मग दुसऱ्या टप्प्यात पुढील पाच दिवस बागकामासारखी हलकी कामे करत स्वतःच्या भावनांची विचारांची डायरीत नोंद करायची असते 
हयातही उपचारकर्त्याशिवाय इतर व्यक्ती बरोबर बोलायची परवानगी नसते
तिसऱ्या टप्प्यात पुढील पाच दिवस कष्टाची (लाकूड तोडण्यासारखी) कामे करायची असते ,इतरांशी बोलत आपल्या भावना डायरीत नोंदवायच्या असतात
चौथ्या टप्प्यात ध्यानाच्या मदतीने स्वतःच्या भूतकाळाचे चुकांचे सिहांवलोकन करून स्वतःच्या जीवनाचा उद्देश शोधायचा असतो.

3.#नाईकन_ध्यानपद्धती
ध्यानाद्वारे स्वतः कडून तीन प्रश्नांची उत्तरे मिळवायची 
➡️ मला कुणाकडून काय मिळाले?
➡️ मी कुणाला काय दिले?
➡️ माझ्यामुळे कुणाला त्रास झाला? हयातून स्वतःच्या जबाबदारीची जाणीव तर होतेच आणि आपली दुसऱ्याला दोष द्यायची वृत्ती नाहीशी होते.

4. #प्रवाहाचा_शोध
 जी कामे करताना आपण देहभान विसतो, तल्लीन होतो,आपण थकत नाही, आपल्याला वेळकाळेचे भान राहत नाही
काम पूर्ण केल्याशिवाय आपण उठत नाही अशा अवस्थेला 'फ्लो' म्हणतात ( अर्थात तो आहे....आपल्यातील प्रवाह )
फ्लो शोधण्यासाठी एखादे आवडीचे पण थोडेसे अवघड काम करा म्हणजे मेंदू कार्यरत होईल आणि काम पूर्ण झाल्यावर समाधान मिळेल.
हे काम करत असताना आपले ध्येय स्पष्ट असावे जेणेकरून आपल्या कार्यपूर्तीची आणि यशस्वीतेची ओळख पटेल 
अशा छोट्या छोट्या पावलांतून स्वतःचा आत्मविश्वास वाढतो,प्रसन्नता वाढते,आणि भविष्याची चिंता ही उरत नाही
तसेच एकावेळी एकच काम करा म्हणजे मल्टीटास्किंग करुन एक ना धड भराभर चिंध्या अशी कामांची अवस्था होणार नाही

अशी छोटी छोटी कामं पूर्ण झाल्यावर ध्यान करून आपल्याला नक्की कुठल्या कामात फ्लो जाणवला हे शोधा.
त्या कामालाच आपला धर्म माना आणि त्यातच आनंद शोधा हाच आपला इकिगाई असेल 
इकिगाई दुसऱ्याला मदत करणं एवढा सुद्धा छोटा असू शकतो 
पण त्या इकिगाई वर निश्चयपूर्वक ठाम राहा ,दृढतेने त्यावर आयुष्याच्या शेवटापर्यंत वाटचाल करा 

4️⃣ सामाजिक भान
भूत भविष्याची कसलीही चिंता न करता कायम वर्तमानात आलेला प्रत्येक क्षण आणि क्षण ते जगून काढतात
माणसात मिसळतात, शेजारयांशी नातेवाईकांशी सलोख्याचे संबध जपतात, हास्यविनोद करत नाचतात, गातात
सामाजिक कार्यात सहभागी होत मिळेल ती जबाबदारी पार पाडतात
आयुष्य मित्रांच्या टोळया बनवून जगायचे मेडिकलच्या गोळया खाऊन जगायचे नसते यांचे सदैव भान ठेवतात
जीवन क्षणभंगुर आहे ,आपल्यापैकी कुणालाही अमरत्वाचे वरदान नाही त्यामुळे सगळयांना प्रेमाने हसतमुखाने सामोरे जातात.
तणावाखाली जगण्याऐवजी शांत निवांत जगणे त्यांना आवडते
 म्हणून तणावामुळे होणारे आजार आणि त्यांच्या शरीराची झीज होत नाही.
आपल्या पूर्वजांचे आपल्यावर अनंत उपकार आहे त्यामुळेच आपली अन्नपाण्याची इतकी उत्तम व्यवस्था आहे त्यामुळे
त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद देत असतात
निसर्गाच्या सानिध्यात भरभरून जगणे हीच ब्लू झोनची ओळख आहे

हया पुस्तकातून किमान आपल्या तन, मन,आत्मा हयांची जपणूक
करण्यासाठी काही हानिकारक सवयींना चांगल्या सवयीत बदलावे
आणि निरोगी दीर्घायुष्य अनुभवावे.
संदर्भ:निलेश शिंदे 

मी_मस्त_मजेत ( I am Fine Spirit)

#मी_मस्त_मजेत ( I am Fine Spirit )
लेखक - रयुहो ओकावा
अनुवाद - सुवर्णा बेडेकर
प्रकाशक - जयको पब्लिकेशन

आजकाल प्रत्येकजण दुखी आहे
कुणी भलत्या आजारांनी त्रस्त आहे, 
कुणी निरनिराळ्या व्याधींनी ग्रस्त आहे
कुणी गरिबीने गांजलाय
कुणी नातेसंबंधामुळे त्रासलाय
कुणाला काळजींनी घेरलयं
कुणाच्या जीवनातला आनंद हरवलाय
पण आपल्याला कुणीही विचारले कसे आहात ?
तर आपण मात्र म्हणतो मी मस्त मजेत....

पण आपण खरोखरीच मस्त मजेत जगण्यासाठी काय करायचे हयाचे मुद्देसूद मार्गदर्शन हया पुस्तकात करण्यात आलयं

1.#स्थिर_मनं
आपलं मन स्थिर असेल तर मनाची दृढता वाढते, आपण संकटावर मात करायला सज्ज असतो, सकारात्मक आशावादी होतो त्यामुळे रोज ध्यानधारणेद्वारे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा

2 #तुलना_टाळा
प्रत्येकाची शैक्षणिक, सामाजिक क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे त्याच्यासारखे मला का लाभलं नाही याचा विचार करुन दुखी होऊ नका .
कुणा दुसऱ्या सारखे बनण्यापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या क्षमतांना जाणून उत्कृष्ट जीवन जगा
तुलना करायचीच असेल तर पूर्वीचे आपले आयुष्य आणि आजचे आयुष्य हयात झालेली प्रगती हयाची तुलना करा
स्वतःला स्वतःचा प्रतिस्पर्धक बनवा

3 #सकारात्मक_दृष्टिकोन
आपल्या आयुष्यात रोज काही घटना घडत असतात त्या चांगल्या की वाईट हा आपला दृष्टिकोन ठरवत असतो.
त्यामुळे प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी धडा घ्यायचा.
प्रत्येक व्यक्तीला आपला शिक्षक समजायचे आणि आपण एकलव्य बनायचे आणि येणारा प्रत्येक अनुभव आपल्या प्रगतीसाठी पोषक आहे असे विचार करून समरसून जगायचे

4.#विश्वास 
आपल्याला स्वतः वरती आणि स्वतःच्या मनशक्ती वर पूर्ण विश्वास असायला हवा.
आपल्याला दिलेली जबाबदारी मग ती घरातली असो आँफिसमधली असो.. ती 100% चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडा. भलेही काम पूर्ण परफेक्ट नसेलही जमले तरीही हताश न होता सुधारणांवर भर द्या. त्यातूनच आपला आत्मविश्वास वाढेल
संकटाबाबत आणि भविष्याबाबत नकारात्मक विचार करून मनाची शक्ती क्षीण करू नका.
ईश्वर आपल्या सोबत आहे हे सदैव लक्षात ठेवा तसेच निस्वार्थ बुद्धीने दुसर्याला जमेल ती मदत करा आणि त्यातूनही आत्मविश्वास वाढता ठेवा.

5.#स्वआदर  (Self Respect)
आपल्या चुकांची जेवढी दखल घेतली जाते तेवढी आपल्या चांगल्या कामाची स्तुती होत नाही
त्यामुळे आपणच आपल्या चांगल्या गुणांची यादी करायची, लोकांनी केलेले कौतुक आठवायचे,दुर्गुणांचे मोजमाप करायला चांगल्या गुणांची मोजपट्टी वापरायची, आपण आदर्श नाही असे वाटलं तरी स्वतःच्या क्षमतांचे, गुणांचे तटस्थपणे सकारात्मक विचारबुद्धीने आत्मपरीक्षण केलं तर चांगले गुण नक्कीच दिसतील त्यांना वाढवा आणि दुर्गुणांना हटवा
असलेल्या क्षमतांचा विकास करा आणि  सुधारणेतून सर्वोत्कृष्ट होण्याचा विचार करा म्हणजे आत्मविश्वास वाढेल
तसेच शरीर व्यायामाने मजबूत बनवा
म्हणजे सकारात्मक विचार वाढतील, नातेसंबंध उत्तम होतील आणि कामात उत्साह निर्माण होईल आणि स्वतःविषयी आदरही वाढेल.

6.#कर्मप्राधान्य
कुठलेही कामात समस्या येतातच पण म्हणून माघार घ्यायच्या पळवाटा शोधण्यापेक्षा निधड्या छातीने,धैर्याने आणि सकारात्मक विचारांनी समस्यांना सामोरे जा.
समस्यांना मोठे समजणाऱ्या विचारांना दूर सारा .त्यांचा बाऊ करण्यापेक्षा त्या समस्या सुटल्यावर त्याबाबत आपण भविष्यात काय विचार करू हयाची कल्पना करा
आपल्या क्षमतांचा पूरेपूर वापर करण्यासाठी स्वतःवर लादलेल्या मर्यादा शोधा म्हणजे समस्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेल

7 #समजूतदारपणा
एखाद्याला अगदी मनापासून समजून घेणं म्हणजेच प्रेम
त्यामुळे भांडण,कागाळया करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा,
त्यांच्या चुकांना माफ करायला शिका
आपल्याला समजून घेणाऱ्या ,समान विचारक्षमतेच्या लोकांमध्ये वावरा
एखाद्याला मित्र शत्रू अशी लेबल  लावण्यापूर्वी ती व्यक्ती अशी का वागतेय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा

8.#नात्यांची_जपणूक
नाते कुठलेही असो ...घरातील किंवा आँफिसमधले ..नवरा -बायकोचे किंवा बाँस- कामगाराचे
एकमेकांविषयी अनादराची भावना मनात आणण्यापूर्वी त्याच्या गू्ण अवगुणांची यादी करा.
नाते तोडण्याऐवजी त्याला प्रेमपूर्वक सुधारण्याचा प्रयत्न करा तसेच त्याच्या चुकांची त्याला जाणीव करून द्या
वेळोवेळी त्याच्या कामाचे कौतुक करा
 केलेल्या सर्व कामांचे श्रेय टीमला द्या

9.#दयाळूपणा
जो दयाळू असतो त्याच्याकडे अमाप धैर्यशक्ती आणि कोमल अंतकरण असते
तसेच ते सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडायला सक्षम असतात

10.#कृतज्ञता
आपण एखाद्याला मदत करताना निरपेक्षपणे करावी म्हणजे अपेक्षाभंगाचे दुख राहत नाही आणि मदतीच्या बदल्यात आपल्याला काही मिळालेच तर त्याला बोनस समजायचे पण कुणाबद्दल तक्रार करायची नाही 
मात्र जर आपल्याला कुणी मदत केली तर त्याचे सदैव स्मरण ठेवावे

11.#आनंदी_आयुष्य
दुसऱ्या विषयी मनात सदिच्छा आणि आनंद असेल तर तोच आनंद चेहऱ्यावर झळकतो.
आयुष्य नेहमी आनंदी जगण्यासाठी आधिक जबाबदारीने वागावे
मृत्यू अटळ सत्य आहे आणि आपल्याला कधी ना कधी हे जग सोडून जायचे आहे याची जाणीव सदैव ठेवून दुसर्यांना आनंदी ठेवत आपण आनंदी व्हायचे.
अटीशर्तींवर आपला आनंद अवलंबून नसावा ,आनंद संपूर्ण जगात नसला तरी चालेल पण आपल्या मनात तो सदैव असावा, आपल्याभोवती आनंदी वातावरण तयार करण्याची  मनोवृत्ती असली पाहिजे 
सदैव चांगले विचार मनात बाळगा आणि आयुष्य आनंदी बनवा

मजेत आयुष्य जगण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा !!!
संदर्भ: निलेश शिंदे

द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड भाग 7

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                         प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग सातवा

#अंतर्मन_आणि_आनंद

ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे तो सदैव सुखी असतो . तसेही प्रत्येकाला सुख निवडायचा सर्वांना अधिकार आहे. सामान्य माणूस व्हायचे की असामान्य हेही तोच माणूस ठरवतो.सुख  हे मुख्यत्वे माणसाच्या विचारात आणि भावनात असते .

सुखासाठी प्रार्थना :
"ईश्वर माझ्या जीवनाचे संचलन करतोय,मला मार्गदर्शन करतोय
सगळया गोष्टी माझ्या हितासाठीच घडतायत. सगळेजण माझ्यावर विनाअट प्रेम करतायत. आज जे काही मी करेन त्याने सगळयांची भरभराट होईल"

आनंदासाठी टिप्स :
प्रत्येक दिवस गाणे गुणगुणत हसतमुखाने घालवा.
सतत सुखी राहण्याची तीव्र ईच्छा बाळगा.
कुणाची सहानुभूती मिळवायची म्हणून आजारांना जवळ करू नका
नकारात्मक विचार मनात आले की लगेच झटका
मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी तुमच्यातील सर्वोत्तम द्या.
साध्य करा आणि सुखी व्हा
पैश्याने सुख विकत घेता येत नाही हे कायम लक्षात ठेवा

#अंतर्मन_आणि_क्षमाशीलता
आपल्या जीवनातील वेदना, दुख , शोकांतिका, अपघात हया सार्या गोष्टींना ईश्वर नाही तर आपणच जबाबदार असतो.
पण आपण कार्यकारणभाव जाणून न घेता ईश्वराला दोष देतो त्यामुळे नकारात्मक भावना आणि पर्यायाने अंतर्मनात नकारात्मक विचार साकारतात.
राग ,द्वेष,परनिंदा हया गोष्टी सोडून दिल्याशिवाय ह्रदयात परमेश्वराची प्रतिष्ठापना कशी होईल?
सदैव क्षमाशील असलेल्या व्यक्तीच्या जीवनात आकसाला स्थान नसते. 

प्रार्थना:
"मी मनमोकळेपणाने सर्वांना क्षमा करतो
प्रत्येक गोष्टी मी माफ करतो
मी स्वतःला ही माझ्या चुकांसाठी क्षमा करतो. आता मी मुक्ततेची अनुभूती घेतो आहे."

ही प्रार्थना सातत्याने अंतर्मनापर्यंत पोहचवून मनशांती, स्वास्थ्य, बल, सुसंवाद मिळवा

टिप्स :
1.शरीरात प्रत्येक अकरा महिन्यानंतर जुन्या पेशी नव्या होतात त्यामुळे अकरा महिन्यापूर्वी झालेले अपराध आपण केलेलेच नसतात
2. चुकांसाठी आत्मक्लेश करून घेऊ नका
कारण आत्मक्लेश म्हणजे नरक आणि क्षमा म्हणजे स्वर्ग
3.कुणी टीका केली,ट्रोल केले तर त्याला आशिर्वाद समजा, त्यांचे  प्रेम समजा
आपल्यात योग्य त्या सुधारणा करण्याचे द्योतक समजा.
जहाल टीकाकाराच्या शांतीसाठी प्रार्थना करा
 पण स्वतःला विचलित होऊ देऊ नका
ईश्वरावर ठाम श्रद्धा ठेवून जगा.
जेव्हा तुम्हाला दुखावणार्या एखाद्या व्यक्ती विषयी चांगले बोलताना मनात खदखद येत असेल तर तिरस्कार अजूनही आत शिल्लक आहे असे समजा आणि पूर्णपणे क्षमा करा.
क्षमा करणे म्हणजे मनाचा मोठेपणा नाही उलट त्यात आत्मस्वार्थ आहे कारण त्यामुळे आपण रोगांपासून मुक्तही राहतो आणि आपण सगळयांसाठी चांगले चिंततो त्यामुळे आपलेही चांगलेच होते.

#अंतर्मन_आणि_मानसिक_अडथळे

1️⃣वाईट सवयी
सवयी म्हणजे माणसाचा दुसरा स्वभाव
चांगल्या वाईट सवयी आपणच निवडतो
नकारात्मक विचार नकारात्मक सवयी निर्माण करतात.
वाईट सवयी सोडण्यासाठी शरीर रिलँक्स करून शांत अवस्थेत सवय सुटल्याचे कल्पनाचित्र मनःपटलावर रंगवायचे
हळूहळू हा सराव चालू केल्यानंतर परिणाम होतो, शक्यतो वाईट सवयींना चांगल्या सवयींशी बदलत गेलो तर वाईट सवयींपासून मुक्ती मिळते कारण नव्या सवयींचा ठसा अंतर्मनावर बसेपर्यंत आणि त्याची दृढ श्रद्धा होईपर्यंत हया सरावावर ठाम राहावेच लागते.

2️⃣ मीच का ? अभागीपणाचे विचार
आपण कमनशिबी ,अभागी आहोत असे एकदा मनावर बिंबवलेले असेल तर मनात कायम वाईट होईल अशी भीती राहते.
पण तुमची तीव्र इच्छा आणि विचार -ध्येय यांचा ताळमेळ असेल तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही

प्रार्थना
कोणतेच अडथळे, अडचणी, विलंब माझ्या मार्गात येऊ शकत नाही
माझे अंतर्मन माझ्या विचारांना प्रतिसाद देत आहे.
अंतर्मनाच्या अफाट शक्तीपुढे कोणताही अडथळा टिकत नाही त्यामुळे माझी सर्व कामे दिव्य योजनेप्रमाणे पूर्ण होतात

3️⃣ अपराधभावना
मनात अपराधभाव असेल तर माणसाचे मन त्याला खात राहते त्या भावनेतून मुक्त होण्यासाठी माणसे व्यसनी बनतात.
प्रार्थना:
"श्रद्धा, संयम,शांती,आत्मविश्वासाने मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करत आहे 
आता माझे मन आनंदाने भरून गेलयं "

समस्येच्या मुळाशी असलेल्या चुकीच्या धारणा प्रार्थनेने नष्ट होतात आणि माणूस अपराधभावनेतून मुक्त होतो

4️⃣ व्यसन
हीनता ,अपूर्णता, विफलता,आंतरिक शत्रुत्व ही व्यसनाची कारणे आहेत
व्यसनी माणसे आयुष्याचा सामना करायलाच नकार देतात. जबाबदारी पासून दूर पळत राहतात. समस्यांना पेल्यात क्रशमध्ये घालवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतात. पण समस्या कृती केल्याशिवाय संपत नाही हे विसरून जातात ते आपल्याच विचारांचे कैदी बनतात, आपलेच शत्रु बनल्याने शरीराची हेळसांड करतात

प्रार्थना
"मी आनंदसागरात न्हाऊन निघत आहे
माझ्या सार्या चिंता,व्यथा मी परमेश्वर चरणी अर्पण करतो
मी अंतर्मनाच्या शक्तीला आवाहन करतो की तीने मला योग्य मार्गदर्शन करावे"

हया प्रार्थनेची पुनरावृत्ती तिला अंतर्मनात पोहचेल ,व्यसनमुक्ती च्या कल्पनेचे मानसचित्र सातत्याने पाहत राहिल्याने एका दिवशी प्रयत्नांना नक्की यश येईल.
संदर्भ: निलेश शिंदे

मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा भाग 2

#मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा
(How to win Friends and  influence People )

लेखक - डेल कार्नेजी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग दुसरा
आजच्या भागात लोकांशी कसे वागायचे हयावर लेखकाचे अमूल्य विचार मांडण्यात आले आहे.

#लोकव्यवहार
यशस्वी माणसाचे यश हे 15%  तांत्रिक ज्ञान आणि 85% त्याच्या माणसं हाताळण्याच्या कलेवर (Personality & Leadership ability ) अवलंबून असते.
पण दुर्दैवाने माणूस मानसिक आणि शारीरिक ताकदीपैकी निम्मीच वापरतो.
स्वतः वर लादलेल्या मर्यादा मोडून आपली ताकद वाढवण्यास माणसाने भर दिला तर माणूस लोकांवर प्रभाव पाडू शकतो.

लोकांशी कसे वागावे
1️⃣ कुणावरही टीका करू नका
टीका केल्याने माणसाचे मानसिक खच्चीकरण होते, त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो, त्याला राग येतो पण ज्या कारणासाठी टीका केली जाते ते मात्र साध्य होत नाही, माणूस सुधारत नाही
त्यामुळे टीकाटिप्पणी व्यर्थ ठरते.
तसेच टीका करताना माणूस स्वतःच्याच फूटपट्टीतून दुसऱ्याला पाहतो त्यामुळे टीका ही एकांगी आणि धोकादायक असते
त्यामुळे टीका करण्याऐवजी जेवढे चांगले माहिती आहे तेवढेच बोला.

2️⃣ कौतुकाची भूक
हया जगात प्रत्येक माणसाला कौतुकाची आणि आपण कुणीतरी महत्त्वाचे आहोत ही त्याची भावना जपण्याची भूक असते.
जो माणूस आपले प्रामाणिकपणे कौतुक करतो त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे माणसं जपतात,त्याच्यासाठी झटतात, त्याला सुखी करण्यासाठी झटतात. हयाच गोष्टीचा वापर करून आपण माणसाकडून चांगले काम करून घेता येते
➖ कुणाचीही खोटी ,वारेमाप,उथळ स्तुती करू नका कारण स्तुती म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्या चा केलेला हलक्या दर्जाचा गुणगौरव
➖ कौतुक म्हणजे ह्रदयापासून एखाद्या चा चांगल्या गुणांचा गौरव
➖गुणग्राहक नजरेने समोरच्याचा विचार करा कारण प्रत्येक माणसात कुठलातरी चांगला गुण असतोच
➖स्वतःच्या कोशात राहून फक्त स्वतःचीच हुशारी, कौशल्य, गरजा हयांचा विचार करणे सोडा

3️⃣ लोकांचे महत्त्व जपा
आपण महत्वपूर्ण आहोत ,वेगळे आहोत याच इच्छेतून माणूस आजवर इतका प्रगत झाला त्यामुळे संगीत,साहित्य,कला दानशूरता,फँशन ही त्याचीच प्रकट रूपे आहेत.
➖प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपा
➖त्याच्या आवडीच्या विषयावर बोला
➖त्याला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करा
➖समोरच्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा 
➖समोरच्याच्या गरजांवर फोकस करा
आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधा.
➖ फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करू नका
➖समोरच्या व्यक्तीला आनंदी करा
➖समोरच्या व्यक्तीचा स्वाभिमान जागृत करा

4️⃣ प्रथमदर्शनी छाप पाडा
First impression is last impression म्हणतात
पहिल्या वेळी माणसाबद्दल जो ग्रह होतो तोच पुढे बराच काळ टिकतो
➖माणसाच्या चेहरयावर मृदू आणि मैत्रीपूर्ण भाव असावे, चेहऱ्यावर मंत्रमुग्ध करणारे हास्य असावे
➖माणसाचा आवाज आश्वासक हवा 
अगदी फोनवर जरी ऐकला तरी आपलेपणाची जाणीव व्हायला हवी
➖ माणसाचा स्वभाव आनंदी असावा
त्याच्या अंतरंगातून, कृतीतून, चेहऱ्यावर आनंद झळकायला हवा
➖माणसाची मानसिकता सकारात्मक हवी ,त्याच्याकडे धाडसी वृत्ती, मनमोकळेपणा, ध्येयासाठी समर्पण, उदात्त प्रबळ इच्छा हे गुण असावेत
➖ समोरच्याचे सुहास्य वदनाने स्वागत करावे. कौतुक करावे
➖समोरच्याची भेट झाली की त्याची आपुलकीने सगळी माहिती गोळा करावी.
➖नावासहित माणसे लक्षात ठेवायची,
नावाचा चुकीचा उच्चार नको, अवघड असेल तर टोपणनावाने लोक लक्षात ठेवा.
प्रत्येकाला त्याच्या नावाचा अभिमान असतो तो जपा
➖ प्रत्येकाच्या नावातील जादू समजून घ्या ,त्यांच्या लकबीवरून वेगळेपणाने
त्यांना लक्षात ठेवायचे.

5️⃣ संवादकुशल बना
आपल्याला दुसऱ्या शी प्रभावी संवाद साधता आला पाहिजे जेणेकरून आपण आपली इमेज बनवू शकू.
➖ समोरचा बोलत असताना शांतपणे ऐकून घ्या
➖समोरचा बोलत असलेल्या विषयात माहिती नसेल तरीही स्वारस्य दाखवा
कदाचित तुम्हाला उपयुक्त अशी माहिती मिळेल 
➖बोलणार्याकडे आपली नजर असावी आणि संपूर्ण चित्त एकाग्र असावे, कुठलीही चुळबूळ ,हालचाल न करता ऐका
➖समोरचा बोलत असताना आपण मध्ये  बोलण्याचा मोह आवरा फक्त सहानभूतीपूर्वक ऐकत राहा
➖ विचारायचेच असतील तर असे प्रश्न विचारा त्याची उत्तरे देण्यात त्यांना आनंद वाटेल.

6️⃣ प्रियम वदाः
माणसाच्या ह्रदयात शिरण्यासाठी त्याच्या प्रिय असणाऱ्या गोष्टीविषयी  बोलावे लागते त्यामुळे 
➖एखाद्याला भेटण्यापूर्वी त्याला काय आवडते याची माहिती करून घ्या ,अचानक भेट घेत असाल तरी गुणग्राहक नजरेने आवडीची गोष्ट शोधून काढा.
➖त्याच्या आवडीच्या विषयावरून बोलायला सुरूवात करायची. आपण श्रोता व्हायचे.
➖जोपर्यंत तो विचारत नाही तोवर स्वतःचे प्रयोजन आणि माहिती सांगू नये कारण आपल्याला जे हवयं ते आपोआप घडून येत असते.

7️⃣ मनाचा मोठेपणा
दुसर्याला सुखी करूनच आपण सुखी होऊ शकतो, निरपेक्ष बुद्धीने एखाद्यासाठी आपण काहीतरी केल्याचे समाधान चिरकाल आनंद देते त्यामुळे
➖नेहमी दुसऱ्याला मोठेपणा द्या .
➖त्यांचा मान, मान्यता आणि योग्यता जपल्याने तसेच त्यांना केंद्रबिंदू मानले गेल्यामुळे ते खुश होतात.
➖त्यांच्या चांगल्या गोष्टीचे ,छंदाचे ,यशाचे प्रामाणिक कौतुक त्यांना सुखावून जाते.
➖बोलताना कृपाकारक शब्दांचा वापर करा जसे की 
"माफ करा मी तुम्हाला त्रास देतोय "
"तुम्ही हे करून माझ्यावर कृपा कराल का"
"तुम्ही मला मदत केली तर मी तुमचा आभारी राहील"

अपूर्ण

संदर्भ: निलेश शिंदे

E-PUDHARI


धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

 धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

                      -डॉ.श्रीमंत कोकाटे

                             छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या प्रेरणेने देशभर मराठा साम्राज्य निर्माण झाले.त्यांनी दिलेल्या संधीमुळे अनेक कर्तृत्ववान घराण्यांनी पराक्रम गाजविला, त्यापैकी इंदौरचे होळकर हे पराक्रमी, लोककल्याणकारी आणि लोकप्रिय घराणे आहे. या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान, करारी, स्वाभिमानी, निर्भीड, पराक्रमी, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक, मुत्सद्दी महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर ! 

                                पती निधनानंतर सती न जाता होळकरांच्या महान साम्राज्याचे रक्षण करून ते वृद्धिंगत करण्याचे महान कार्य अहिल्याबाईंनी केले. त्यांच्या जीवनात दुःखाची मोठी मालिका आहे. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे १७६६ साली निधन झाले. पती खंडेराव होळकर हे १७५४ साली कुंभेरीच्या वेढयात लढता लढता धारातीर्थी पडले.याप्रसंगी अहिल्याबाई फक्त २९ वर्षाच्या होत्या. एकुलता एक पुत्र मालेराव यांचे १७६७ अकाली अकाली निधन झाले. १७८७ साली नातू नथोबा,१७९१ साली जावई यशवंतराव फणसे आणि कन्या मुक्ताबाई मृत्यू पावले. इतके सर्व दुःख पचवून लोककल्याणासाठी अहिल्याबाई आयुष्यभर लढत राहिल्या. त्या हिंमतवान होत्या. संकटाने नाउमेद न होता, त्यांनी हिमतीने राज्यकारभार केला. त्या संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. वैधव्याने खचून न जाता, त्यांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. रयतेवर पुत्रवत माया केली.

                            अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे सीना नदी काठावरील त्यांचे गाव. ३१ मे १७२५ रोजी त्यांचा जन्म झाला. माणकोजी शिंदे यांच्या त्या कन्या. त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांचेबरोबर पुणे येथे झाला. शिंदेची कन्या होळकरांची सून झाली. अहिल्याबाई या लहानपणापासूनच अत्यंत हुशार, हजरजबाबी, विनयशील तितक्याच स्वाभिमानी आणि दयाळू होत्या. मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी त्यांना मुलीप्रमाणे सांभाळले. मल्हारराव, खंडेराव यांनी पराक्रम गाजवावा आणि अहिल्याबाईनी दरबारचा कारभार चोखपणे सांभाळावा, असा राज्यकारभार चालू होता. अहिल्याबाईचा दरबारातील अधिकाऱ्यावर मोठा वचक होता. त्यांनी उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. रयतेवर अन्याय होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली.

                        अहिल्याबाईनी आपल्या राज्यातील सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवला. त्यांचे आधुनिकीकरण केले. शस्त्रास्त्र साठा सुसज्ज ठेवला. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत दक्ष होते. पुत्र मालेराव यांचे निधन झाल्यानंतर पुण्याचे राघोबादादा इंदौरचे राज्य गिळंकृत करण्यासाठी निघाले, तेव्हा अहिल्याबाईंनी ठणकावून सांगितले "आमचे दौलतीची अभिलाषा धरून सेनेसह आपण चालून आलात हे समजल्यावर बहुत कष्ट होत आहेत, पण ही दौलत आमच्या बापजाद्यांनी खुशमस्करी करून नव्हे, तर पराक्रम गाजवून मिळवलेली आहे.दान म्हणून मागत असाल तर दानधर्माचा वाटा मिळेल, पण युद्ध करून सर्व दौलत (राज्यच) समेटावे म्हणाल तर त्यालाही आमची तयारी आहे. माझ्यासंगे दोनशे स्त्रियांची हत्यारबंद फौज आहे. मी बाईमाणूस मानू नका. खांद्यावर भाला टाकून उभी राहील. माझा पराभव झाल्यास कोणी नावं ठेवणार नाही.उलट अटकेपार झेंडे लावणाऱ्याचा पराभव केला म्हणून माझी कीर्ती होईल, पण तुमचा पराभव झाला तर तुमच्या सर्वत्र हसे होईल" अहिल्याबाईंचे हे करारी रूप पाहिल्यानंतर राघोबादादा पेशवा वरमला आणि सारवासारवीची भाषा करु लागला."मालेरावांच्या मृत्यूमुळे सांत्वन करण्यासाठी आलो आहे". असे उत्तर त्याने पाठवले. तेव्हा अहिल्याबाई म्हणाल्या "फौजेची गरज काय? एकटे पालखीत बसून यावे". या प्रसंगावरून स्पष्ट होते की अहिल्याबाई जशा राजशिष्टाचारामध्ये निष्णांत होत्या, तशाच त्या निर्भीड आणि स्वाभिमानी देखील होत्या. त्यांनी आक्रमण करणाऱ्या पेशव्यांचा देखील मुलाहिजा बाळगला नाही. घरात कर्ता पुरुष नाही म्हणून स्त्रीपणाचा न्यूनगंड त्यांनी बाळगला नाही. त्यांनी पुरूषांप्रमाणेच महिलांचेदेखील सैन्य उभारलेले होते. 

                              अहिल्याबाई स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्यांनी आपले राज्य टिकविले आणि वाढविले. तुकोजी होळकर यांना सुभेदारी देऊन राजस्थानात मोहीमेवर पाठवले. त्या मोहिमेबाबतची माहिती गुप्तहेरामार्फत नियमितपणे घेत असत. तुकोजी होळकर यांना रसद, शस्त्रास्त्रे आणि सैन्याचा पुरवठा त्यांनी नियमितपणे केला. त्यांनी आपल्या राज्याचा स्वतः दौरा करून सुरक्षितता, कृषीव्यवस्था, करप्रणाली याबाबतची माहिती घेतली. रयतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसवली. शेतसार्‍यात सवलती दिल्या. आपल्या राज्यात हुंडाबंदीचा हुकुम काढला. लग्नात हुंडा देणारे व घेणारे यांना दंड आकारला व दंडाची रक्कम सरकारात भरण्याची आज्ञा केली.

                             अहिल्याबाई धार्मिक होत्या, परंतु धर्मभोळ्या नव्हत्या, श्रध्दाळू होत्या पण अंधश्रध्दाळू नव्हत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, हे वास्तव त्यांना माहिती होते. आपल्या परंपरेचा त्यांना अभिमान होता. पण यश मिळवण्यासाठी दैवी शक्ती नव्हे, तर प्रयत्नवादच कामी येतो याची कल्पना त्यांना होती. त्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. सती प्रथेला त्यांचा विरोध होता, परंतु धार्मिक दहशतवाद इतका कठोर होता की अनेक महिलांना सती जावे लागत असे. त्यांनी विधवांचा सन्मान केला. महिलांना सैन्यात संधी दिली. महिलाही शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक असतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. सर्व जातीधर्मीयांना अत्यंत मायेने वागवले. स्वतःच्या एकुलत्या एक कन्येचा -मुक्ताबाईचा- विवाह त्यांनी स्वयंवराप्रमाणे केला. एखाद्या राजघराण्यातील राजपुत्राला मुलगी देण्यापेक्षा आपल्या राज्यातील कर्तृत्ववान, निर्भिड गुणी तरुणाला त्यांनी आपली कन्या दिली. त्यांनी घोषणा केली  "जो तरुण दरोडेखोर, गुंडांचा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल त्याच्याबरोबर मुक्ताबाईचा विवाह होईल"  यशवंतराव फणसे यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त केला, तेव्हा अहिल्याबाईनी मुक्ताबाईचा विवाह त्याच्याबरोबर लावून दिला. अहिल्याबाईंच्या या धोरणामुळेच पुढे अहिल्याबाईंच्या घराण्यातील यशवंतराव होळकर यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर गादीचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची बहीण रत्नप्रभादेवी यांच्याबरोबर निश्चित केला आणि तो पुढे मोठ्या आनंदाने संपन्न झाला.

                             अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात आमूलाग्र बदल केला. प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्यांना पडीक जमिनी देऊन त्यांच्या हाताला काम दिले. लुटारूंना संरक्षण खात्यात घेऊन प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली व प्रवाशावर नाममात्र संरक्षण कर लावला व त्यातून त्यांच्या पगाराची व्यवस्था केली. गुन्हेगारांना मारण्यापेक्षा त्यांना उदरनिर्वाहाचे साधन दिली.

                              अहिल्याबाईनी आपल्या राज्यातील व राज्याबाहेरील अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्यांनी महेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर, परळी वैजनाथ, श्रीशैलम, तारकेश्वर, काशी, त्रंबकेश्वर,घृष्णेश्वर, चारधाम, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,  द्वारका, जेजुरी खंडोबा, पंढरपूर, मथुरा, बद्रीकेदारनाथ, गया, आलमपूर, रेणुका मंदिर, चौंडी, पुष्कर, उज्जैन इत्यादी ठिकाणी मंदिरे, घाट बांधले.ग्रामस्थ आणि यात्रेकरूंना नदीपात्रात उतरताना ,चढताना, प्रवास करताना त्रास होऊ नये, म्हणून देशात अनेक ठिकाणी त्यांनी घाट बांधले. राज्यातील उत्पन्न कौटुंबिक हितासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी वापरणाऱ्या अहिल्याबाई या महान लोककल्याणकारी लोकमाता होत्या. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. भ्रष्टाचार करणाऱ्यायांचा त्यांनी बंदोबस्त केला. प्रशासनावर त्यांचा वचक होता. कुटुंबातील व्यक्तींना देखील उधळपट्टी करण्याची त्यांनी कधीही संधी मिळू दिले नाही. अनेक वेळा त्या स्वतः हिशोब तपासत असत. स्वतःच्या राज्याबरोबरच इतर राज्यात देखील त्यांनी लोकोपयोगी कार्य केले.

                      अहिल्याबाईनी इंदौर बरोबरच महेश्वर या ठिकाणी भव्य राजवाडा उभारला. अनेक देवालय आणि स्मृतिस्थळ उभारले. त्यांचे भव्य असे ग्रंथालय होते. त्यामध्ये देश-विदेशातील असंख्य दुर्मिळ ग्रंथ होते. त्यांनी अनेक गुणी जनांना राजाश्रय दिला. त्यांचे कौतुक केले. बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.  फटका लिहिणारे नामवंत कवी अनंत फंदी यांना कविराज हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. गुणीजनांचा सन्मान करणे, त्यांना आधार देणे, याबाबत त्या दक्ष असत. त्या जशा करारी होत्या तशाच त्या दयाळू देखील होत्या. त्यांनी सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. त्यांनी निपक्षपाती असा न्यायनिवाडा केला. त्यांनी घोड्यावर बसून रणांगण गाजविले. त्या न्यायनिष्ठुर होत्या. त्या धार्मिक होत्या, परंतु यशप्राप्तीसाठी पराक्रम गाजवावा लागतो याची जाण असणाऱ्या त्या विज्ञानवादी राज्यकर्त्या होत्या. त्या यशाने हर्षभरित होणाऱ्या आणि दुःखाने नाउमेद होणाऱ्या नव्हत्या.

                       स्त्री हिंमतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, पराक्रमी, मुत्सद्दी, करारी, शूर, उत्तम राज्यकर्ती असते, हे अहिल्याबाईनी जगाला दाखवून दिले. विधवानी देखील इतिहास घडविला.हे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ, राणी चन्नम्मा, रजिया सुलतान, राणी दुर्गावती, चांद बीबी, महाराणी ताराबाई, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, स्वातंत्र्यसेनानी हौसाअक्का पाटील इत्यादी कर्तृत्ववान महिलानी दाखवून दिले आहे.

                           अहिल्याबाई यांचे कार्य केवळ एका राज्यापुरते, एका जातीपुरते, देशापुरते मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. त्या पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता आहेत. अशा कर्तृत्ववान लोकमाताअहिल्‍याबाईंचा मृत्‍यू 13 ऑगस्ट १७९५ रोजी महेश्वर या ठिकाणी झाला. त्यांना सत्तर वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांची आज जयंती, जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !

                --डॉ श्रीमंत कोकाटे

Devi Ahilyabai Holkar Jayanti 2021

 

QUIZ on the occasion of Devi Ahilyabai Holkar Jayanti 2021




                                                                                                 VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR - LIBRARY 

Organizes QUIZ on the occasion of   Devi Ahilyabai Holkar Jayanti 2021

E-Certificate will be send after attending the Quiz to your registered E-mail ID 

Click on given link below to participate in Quiz

https://forms.gle/6xHRMhTu3yDLU4r29

With Thanks and Regards  

Atul Chandanvandan

Saturday, May 29, 2021

जादू

जादू 
लेखिका : रोंडा बर्न
प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

रोंडा बर्न यांच्या सिक्रेट सीरीज मधील हे तिसरे पुस्तक ज्यात कृतज्ञतेच्या जादूने आयुष्यात कसा बदल घडवून आणायचा हयावर मार्गदर्शन केलेले आहे.

 कृतज्ञतेच्या जादूवर विश्वास का ठेवायचा ?
1.माणूस सगळ्याच गोष्टी पैश्यांनी नाही विकत घेऊ शकत आणि विज्ञान पुढे गेलेले असले तरी अजूनही रक्तासारख्या बर्याच गोष्टी प्रयोगशाळेत तयार होत नाही
2.. न्यूटन आईनस्टाईन सारखे शास्त्रज्ञ सुद्धा आपल्या संशोधनासाठी ज्या Insight मिळाल्या त्यासाठी त्यांनी कृतज्ञतेच्या जादूचाच उल्लेख केलाय.
3.कृतज्ञतेच्या जादूमुळे माणसाच्या नुसत्या आरोग्याच्या नाही तर जीवनातील सर्व समस्या संपून जातात
4.कृतज्ञतेच्या जादूमुळे माणसाचे ह्रदय मेंदू मन कार्यक्षम बनते, नवनवे पर्याय सापडतात 
5.कृतज्ञतेच्या जादूमुळे चिंता भीती यासारख्या नकारात्मक भावना जाऊन आनंद, स्पष्टता, धैर्य, दयाळूपणा, करुणा यासारख्या सकारात्मक भावना वाढतात  त्यामुळे मनशांतीसह माणसं आधिक आनंदी निरोगी धनवान बनतात.
6.कृतज्ञतेच्या जादूने सकारात्मकतेतून समृद्धीकडे जाताना ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या कितीतरी पटीने वाढवतात.

कृतज्ञता जीवनात कशी आणायची
1.आपल्याला जे काही मिळालयं त्याची कदर करा 
त्याबाबत आभार माना.
2.आभार व्यक्त करताना वरवर कोरडे धन्यवाद न देता अगदी मनापासून आभार माना म्हणजे ओठातील शब्द आणि मनातील भावनांचा संगम होईल.
3.प्रत्येक दिवशी आणि दिवसातील जास्तीत जास्त वेळा कृतज्ञता अनुभवा, "धन्यवाद " शब्दाला वर्तमान आणि भविष्याला जोडणारा सेतू बनवा.
4.नकारात्मक विचार करणं जास्तीत जास्त टाळा
5.आपल्याला आपल्या जीवनात काय काय हवयं याची यादी करा
आरोग्य, पैसा, नातेसंबंध हयाविषयी सविस्तर व स्पष्ट इच्छा किंवा स्वप्ने हया यादीत मांडा.यादीतील इच्छा वा स्वप्ने कधी पूर्ण व्हाव्यात त्यानुसार 6 महिने /1 वर्ष /3 वर्षे / 5 वर्षे / 10 वर्ष त्यानुसार श्रेणीबद्ध करा.

आयुष्यात जादू घडवून आणण्याचे उपाय

#जादूई_दगड :
एक छोटा मुठीत मावेल असा दगड बेडजवळ दृष्टिस पडेल अशा जागी ठेवा. दररोज झोपायला जाताना तो दगड हातात आज काय चांगले घडले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
हयामुळे आपल्या आयुष्यात बर्याच चांगल्या गोष्टी घडतात याची तुम्हाला खात्री पटेल तसेच कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीमुळे
तशा आणखी गोष्टी घडतील
जशीजशी ही चुंबकीय शक्ती प्रबळ होईल तशा मनोवांचित गोष्टीही घडू लागतील

#जादूई_छडी :〽️
माणसाला जादूच्या छडीचे कायम आकर्षण राहिले आहे 
पण तो हे विसरतो की माणूस स्वतःच एक जादूची छडी आहे
त्यामुळे ओळखीच्या वा अनोळखी लोकांच्या पैसा स्वास्थ्य आणि सुखातील अडचणींसाठी देवाची प्रार्थना करा.
दुसऱ्याच्या सुखाची कामना करणे सुद्धा महानतम कार्य आहे त्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीमुळे तुमच्याही समस्या ही सहज सुटून जातात

#जादूई_नातेसंबंध : 👨‍❤️‍💋‍👨
आपल्याला ज्या नात्याबद्दल बर्याच तक्रारी आहेत त्या माणसाबद्दलच्या चांगल्या दहा गोष्टी आठवा आणि त्याचा फोटो समोर ठेवून त्या माणसाबद्दल कृतज्ञता अनुभवा
तसेच आपल्याला प्रोत्साहित करणाऱ्या वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या ,आयुष्याला दिशा देणारया सर्वाबद्दल आपण आभारी असायला हवे.यांना प्रत्यक्ष भेटून अथवा पत्राद्वारे आपली सकारण कृतज्ञता कळवा.
हयामुळे आपण चांगल्या गोष्टींंना आणि चांगल्या माणसांना जास्त महत्त्व देतो आणि आपले त्यांच्याबरोबरचे संबंध बिघडले किंवा तुटलेले असतील तरी दुरूस्तही होतात आणि मधुर ही बनतात

#जादूई_स्वास्थ्य: ⛑️
भूतकाळातील आपल्या निरोगी उर्जावान शरीराला आठवा त्यावेळेच्या स्वास्थ्यासाठी त्रिवार आभार माना.
ज्यामुळे वर्तमानात आपण जगातील सर्व सुखांची अनुभूती घेतोय अशा आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांचे आणि इंद्रियांचे आभार माना. त्याचबरोबरीने मेंदू आणि ह्रदयाचे पण आभार माना.
ज्या हवेत आपण श्वास घेतो त्याबद्दल वातावरणाचे आभार माना
प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर कृतज्ञता अनुभवा आणि त्या चेतनेलाही धन्यवाद द्या.
भविष्यात आपल्या शरीराची जी आदर्श अवस्था हवीय त्याचे चित्र मनःचक्षूसमोर उभे करा आणि त्याबद्दल कृतज्ञता अनुभवा.
आपला हात ह्रदयावर ठेवून प्रत्येक ईच्छा मनावर उमटवा आणि इच्छा बोलून झाल्यावर शेवटी धन्यवाद द्या
जेणेकरून भावनांची खोली वाढेल.आणि मनशांती व आनंदाची वृद्धी होईल. तसेच आपल्या सर्व शरीराचे काम सुरळीत चालू राहील आणि आपण कायम निरोगी आणि स्वस्थ राहू.

#जादूई_धन :💰
एक शंभराची नोट घ्या तिच्यावर लिहा "जीवनात मिळालेल्या भरपूर सार्या पैशासाठी धन्यवाद"
ती नोट कायम पर्समध्ये ठेवा आणि तिच्याकडे दिवसातून किमान दोनदा पाहून  कृतज्ञता अनुभवा.
#मँजिक_चेक : 🎫
एक स्वतःच्या नावाने चेक बनवा ज्यावर आपली मनोवांचित रक्कम टाका, ती रक्कम मिळाल्यावर आपण काय करणार हयाचे मनोचित्र डोळयासमोर आणा ,
तो चेक नेहमी नजरेस पडेल अश्या जागी ठेवा ,
आपण या पैशांनी खरेदी करतोय असे समजून रोमहर्षितपणे आभार माना
#मँजिक_बिल :📰
प्रत्येक बिल भरताना मिळालेल्या सेवेसाठी  पुरवठादारांचे आभार माना.पैश्याविषयी  समृद्ध जीवनासाठी सदैव कृतज्ञ राहा.
हयामुळे आपण पैश्याबाबत तक्रार करणार नाही आणि कुठलीही खरेदी करताना गरीबीचा विचार न करता संपन्नतेचा विचार करु आणि कृतज्ञतेच्या जादूमुळे आपण संपत्ती आकर्षित करू शकू.

#जादूई_कर्म :🙇
आपण करत असलेल्या कामावर मग ते नोकरी असो वा धंदा त्यावर प्रेम करा, कामावर जाण्यासाठी नेहमी आतूर राहा
आपणच आपले मँनेजर बना.
आपले ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा नेहमी आदर करा 
तसेच आपल्या कामात मदत करणाऱ्या मशिनिरीचे आभार माना.
हयामुळे आपण आपल्या कामाबाबत कुठलाही नकारात्मक विचार करणार नाही आपल्या चुकांबद्दल आपण कुणाच्याही माथी दोष मारणार नाही, आधिक जोमाने मेहनत करू आणि सफलतेच्या वाटेवर अग्रेसर राहू आणि कृतज्ञतेच्या जादूमुळे आपण सफल धनवान आणि आनंदी होऊ

#जादूई_तत्त्व : 🛍️
आपल्याला जगण्यासाठी विचार करण्यासाठी आणि चांगले वाटण्यासाठी अन्नपाण्याची गरज आहे
अन्न हा आपल्याला मिळालेला उपहार आहे आणि पाणी तर पृथ्वीवर असलेली जादूच आहे त्यामुळे रोज जेवताना शेतकऱ्यांचे आणि धरणीमातेचे तसेच आपल्या अन्न आपल्या ताटापर्यंत पोहचवणार्या सर्वांचे आभार माना
हया कृतज्ञतेच्या जादूमुळे अन्नपाणी शुद्ध बनते आणि जेवणाला स्वाद येतो आणि एकूणच जीवनावर त्याचा परिणाम होतो.

#जादूई_कार्यसूची : 🗒️
आपल्याला करावयाच्या सर्व कामांची एक कार्यसूची बनवा त्यांच्या निकडीनुसार त्यांना श्रेणीबद्ध करा
जी कामे इच्छा असूनही करता येत नाही किंवा वेळ नाही अशा तीन गोष्टींवर फोकस करा ,त्या कामांसाठी जगातील सार्या शक्ती
परिस्थिती अनुकूल आहे आणि आपल्याला मदत करत आहेत आणि ते कार्य पूर्ण झाल्याचा विचार करा आणि त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करा.
हयामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील आणि मनशांती लाभेल

#जादूई_संकेत: 🔮
सृष्टीला आपली सतत पर्वा असते त्यामुळे ती आकर्षणाची शक्ती वापरून आपल्याला योग्य संकेत पाठवत असते
हया दैवी संकेतांना चौकसपणे समजून घ्या त्यानुसार योग्य ते बदल कराच पण त्याबरोबर सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
समजा चुका झाल्याच तर त्या स्वीकारा त्यातून योग्य तो धडा घ्या आणि चुकांना वरदानात बदला.

#जादूई_आरसा ⭕
आरशात स्वतःला पाहिल्यावर जो सुंदर माणूस दिसतो त्याचे कौतुक करा ,तसेच आभार माना
हया कृतज्ञतेमुळे तुम्ही स्वतःला दोष देणार नाही ,नावे ठेवणार नाही जेणेकरून तुम्ही सुखद माणसं आणि सुखद परिस्थिती आकर्षित करू शकाल.

#जादूई_सकाळ :🌄
सकाळी उठाल तेव्हा जिवंत असल्याबद्दल नव्या सुसंधीचा दिवस मिळाल्याबद्दल आणि रात्रीची शांत झोपेबद्दल तसेच जीवनात मिळालेल्या सर्व सुखसोयीबद्दल परमेश्वराचे त्रिवार आभार माना 
हया कृतज्ञतेमुळे प्रत्येक दिवसाची सकाळ आणि एकुणच दिवस उत्साहात होईल 

#जादूई_दिवस : ♨️
प्रत्येक दिवस हा वेगळा आणि खास असतो त्या दिवसात खूप काही चांगल्या गोष्टी घडतात. रोज रात्री त्यांचा आढावा घ्या. आणि त्याबद्दल देवाचे आभार माना
हया यादीत रोज भर पडेल तशी ती विस्तृत होत जाईल.
जसजसे दिवस पुढे जातील तशी कृतज्ञतेच्या जादूमुळे तुमची वरदान वाढत जातील

#जादूई_भविष्य :🚗
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि कृतज्ञतेच्या जादूमुळे तुमच्या जीवनाची बहुमजली भक्कम इमारत उभी राहते.
त्यामुळे रोज भावनांना खोलवर अनुभवून 
कृतज्ञतेच्या कुठल्याही पर्यायाला मार्गदर्शक बनवा आणि सुख ऐश्वर्य आरोग्य  यांचा मनमुराद आस्वाद घ्या


Source :- Nilesh Shinde 

स्वतः वर विश्वास ठेवा

स्वतः वर विश्वास ठेवा
                                                            लेखक - डाँ .जोसेफ मर्फी
                                                           अनुवाद - रवींद्र भयवाल
                                                          प्रकाशक -मंजुळ पब्लिकेशन

माणसाचा स्वतः वर विश्वास का नसतो कारण त्याने स्वतःला ओळखलेले नसते.
माणूस हा ईश्वराचे प्रतिरूप आहे 
ज्या शक्ती ईश्वराकडे आहे त्याच त्याच्याकडेही आहे पण त्या शक्तींची आणि त्यांच्या वापराविषयी मनुष्याला माहिती नाही.
आणि आपल्या हया अज्ञानास्तव तो नकारात्मक गोष्टीसाठी ईश्वराला जबाबदार धरतो.

प्रत्येक माणसाला स्वतःची अशी काही स्वप्ने असतात , 
प्रत्येकाच्या माणसाला त्याचे असे आदर्श असतात ,त्यांच्यासारखे आयुष्य , राहणीमान, श्रीमंती,बुद्धिमत्ता, आरोग्य आपल्याला लाभावी अशी त्याची इच्छा असते पण त्या ईच्छापूर्तीचा मार्ग त्याचेच नकारात्मक विचार ,शंकाकुशंका,भीती अडवत असतात, मर्यादा घालत असतात
 
हयावर मात करायची असेल तर 

1..#प्रबळ_ईच्छाशक्ती
सर्वप्रथम आपल्या अंतरीची यशस्वी होण्याची इच्छा प्रबळ हवी,
आपल्या स्वप्नांसाठी झोकून द्यायची तयारी हवी.

2.#ईश्वरावर_श्रद्धा
एखाद्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो आणि ती प्रत्यक्षात असो वा नसो आपल्याला काही फरक पडत नाही हयाला आपण श्रद्धा म्हणू शकतो.
आपली ईश्वरावर अखंड श्रद्धा हवी, तो जगन्नियंता आपल्याला मार्गदर्शन , सामर्थ्य, शांती यांच्या रूपाने आपल्या विचारांना नक्कीच प्रतिसाद देत असतो.

3. #चुकीच्या_धारणा_हटवणे
आपल्या कल्पना,धारणा,पूर्वग्रह तपासून पाहायला हव्यात,
जाणते अजाणतेपणी आपण चुकीच्या धारणा आणि कल्पना आपल्या आईवडील  गुरुजनांनी जसे सांगितले तसे स्वीकारलेले असतात.
जर धारणा चुकीच्या असतील तर खुल्या मनाने नवीन ज्ञान स्वीकारले पाहिजे.आणि त्या धारणा बदलल्या पाहिजे.

4.#मनाचा_योग्य_वापर 
आपल्याला दोन मन असतात एक असते बाहयमन आणि दुसरे असते ते अंतर्मन....
बाहय मन हे प्रत्येक गोष्टीत कठोर असते त्याला तुलना करता येते, विश्लेषण करता येते ,अनुमान लावता येते, तर्काधिष्ठीत विचार करता येतो
हयाउलट आपले अंतर्मन अतिशय शक्तीशाली असते पण ते बाहयमनाचे गुलाम असते आणि त्याच्याच आज्ञेने जगत असते म्हणून योग्य विचार अंतर्मनात पोहचवणे महत्त्वाचे आहे

विचार एकाग्र आणि एकदिशीय असतील तरच ते बाहयमनातून अंतर्मनात पोहचतात त्यामुळे ध्यानधारणेद्वारे मन एकाग्र करावे 
म्हणजे बाहयघटकांचा हया प्रक्रियेत व्यत्यय होणार नाही.

कल्पनाशक्तीद्वारे आपल्या इच्छित स्वप्नाचे चलचित्र तयार करून ते वारंवार कल्पना करत राहिल्याने त्याचे छाप अंतर्मनावर उमटतात

त्यानंतर इच्छा फलद्रूप झाल्याची कल्पना  वारंवार करत राहावी लागते आणि हे करत असताना कुठल्याही चिंता,नैराश्य हया प्रक्रियेत बाधा आणू शकतात त्यामुळे स्वतःला कायम आनंदी ठेवणे 
सुद्धा महत्त्वाचे असते त्यामुळे आवडीची कामे करत राहून हे साध्य करावे लागते

5.#यशाची_कल्पना
ईश्वर त्याच्या बुद्धिमत्ता, ज्ञान आणि सामर्थ्याने प्रत्येक कार्यात यशस्वी होतो ,मग आपण मनुष्यही ईश्वरी अंशच आहोत 
त्यामुळे आपणही यशस्वी होऊच शकतो
आपल्या कल्पनाशक्तीला आपले सामर्थ्य बनवा ,
आपल्या बुद्धिमत्तेने चुकीच्या धारणांवर घाव घाला, 
चांगले उदात्त उत्तम विचार मनात रूजवा 
सर्वांशी प्रेमाने वागा, 
यशस्वी झाल्याच्या कल्पनेत कायम तल्लीन रहा .
त्या जाणिवेची अवस्था वारंवार जगा आणि तिची सवयच जडवून घ्या,
प्रत्येक दिवशी रात्री झोपताना यशाची आणि समाधानाची भावना उरात ठेवून झोपा. 
एक दिवस असा उगवतो ज्या दिवशी आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतील आणि तुमची स्वप्न नक्कीच वास्तवात उतरतील

Source :- Nilesh Shinde 

द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                    प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग सहावा

#अंतर्मन_आणि_भीती
भीती हा माणसाचा मोठा शत्रू आहे.
भित्रा माणूस स्वतःच्याच विचारांनी भयभीत होतो त्यातले आधिकतर विचार बेसलेस आणि अवास्तव असतात.
 सकारात्मक विधाने / प्रार्थनेने  ठामपणे विचार बाहयमनातून अंतर्मनात पोहचवून आपण उपचारक शक्तींना जागृत करायचे आणि भीतीचा अंत अंतर्मनाच्या साहाय्याने करायचा असतो.

वेगवेगळ्या भीती माणसाला सतावत असतात
1️⃣ भाषण देण्याची भीती ( Stage Fear)
भाषण द्यायला स्टेजवर पोहचताच बर्याच जणांचे पाय लटलट कापतात, भीतीने घाबरगुंडी उडते, काय बोलायचं ते विसरून जातो .

प्रार्थना :
"मी सुंदर भाषण करतो ,छान बोलतो
मी शांत, संयत ,संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे"

ही प्रार्थना एकांतात बसून शरीर स्थिर करून शांत मनाने दहा वेळा म्हणायची,विषयाची उत्तम तयारी करायची, आरशासमोर प्रँक्टिस करायची, याने तुमचे भाषण उत्तम जोशपूर्ण होईल याबाबत खात्री बाळगा.

2️⃣ अपयशाची भीती (Success Fear)
केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल का हया विचारांनी माणूस चिंताग्रस्त होतो. माणसाचे नकारात्मक विचार सक्रीय होतात आणि शेवटी
भीतीचा हाच विचार अंतर्मन खरा करतो.

प्रार्थना
"मी माझ्या यशासाठी सदैव प्रयत्नशील असतो, माझ्या प्रयत्नांना नक्कीच यश भेटेल हयाबद्दल मला खात्री आहे."

शरीर रिलँक्स करून उज्वल यशाची कल्पना करायची,त्या यशात आनंद अनुभवायचा, आपले अंतरंग त्यावर पूरक प्रतिक्रिया देईल ,मनस्थिती बदलायला तसेच आपली प्रतिभा व्यक्त करायला बाहयमनाला प्रेरक मार्गदर्शन करेल

3️⃣ पाण्याचे भय
बरेच जण पाण्यात उतरण्यास घाबरतात मग स्विमिंग तर दूरच राहते.फुटभर पाण्यात उभे राहिले तरी गांगरून जातात.

प्रार्थना
"मी तुझ्यावर ताबा मिळवला आहे 
मी मनाच्या शक्तीद्वारे तुझ्यावर वर्चस्व गाजवणार आहे"

ही प्रार्थना म्हणून मनात नवा दृष्टिकोन जन्म घेतो, सर्वशक्तिमान अंतर्मन श्रद्धा शक्ती विश्वास पुरवते. आणि त्यानंतर त्याला पोहण्याचे धडे देता येतात.

4️⃣ नोकरी गमावण्याची भीती
मनातील रोगीट,चिंतातूर विचार नकारात्मकतेला आमंत्रण देतात
माणसाची कार्यक्षमता त्यामुळे घटते
तो अनेक चुका करतो आणि शेवटी तो नोकरी गमावतो

प्रार्थना
"मी माझ्या कामालाच ईश्वर मानतो
माझे काम प्रामाणिकपणे करण्यात मला आनंद वाटतो."

 ही प्रार्थना रोज निस्तब्ध ध्यानमग्न अवस्थेत म्हणायची आपल्या आत दडलेल्या खोल शांतीचा महासागराची अनुभूती घ्यायची आणि त्या उर्जेच्या सहाय्याने भीतीवर अडचणीवर मात करायची

5️⃣हयाच पद्धतीने आपण लिफ्टची भीती, रोगाची भीती,नुकसानीची भीती , हरवण्याची भीती हयावरही अंतर्मनाच्या साहाय्याने मात करू शकतो.

#काही_भीती_पळवणार्या_टिप्स
1.भीती वाटणार्या गोष्टी केल्या की भीती पळून जाते
2.भीती वाटली की सर्जनशील गोष्टी करा
चित्र काढा, काहीतरी लिहा 
3.देव , शुभ गोष्टीवरील आपली श्रद्धा, आपला आत्मविश्वास यापेक्षा कुठलीही भीती मोठी नाही
4. भयामुळे आपण आजाराला आमंत्रण देतो त्यामुळे सदैव निरोगी राहण्यासाठी भय टाळा
5.प्रामाणिकपणा,एकात्मता, न्याय,चांगुलपणा, सद्भाव,यश हयांच्या प्रेमात पडा.
6.सामान्य भय माणसाच्या भल्यासाठी, जीव वाचवण्यासाठी उपयुक्त आहेत पण असामान्य भय बाळगू नका.
7.भित्यापाठी ब्रम्हराक्षस हया म्हणीप्रमाणे आपल्या भीतीला तर्कावर घासून पहा की आपण उगाच तर भीत तर नाही ना?
8.आपले लक्ष कशावर त्यावरच भीतीचा अवलंबून असतो
अपयशाची भीती असेल तर यशाकडे लक्ष द्या
आजाराची भीती वाटत असेल तर स्वास्थ्य कसे मिळेल याचे चिंतन करा.
अपघाताची भीती वाटत असेल तर ईश्वरी मार्गदर्शन आणि संरक्षणाचे मनन करा.
मृत्यूची भीती वाटतेयं तर चिरंतन शाश्वत जीवनाचा विचार करा.
9.सदैव देव आपल्याबरोबर असल्याचा भाव मनात असू द्या
10.भयाच्या सूचनेचा जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत कुठलेच भय आपले नुकसान करू शकत नाही.

Source :- Nilesh Shinde 

चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा

#चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा
(How to Stop Worrying and start living )

लेखक - डेल कार्नेगी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग तिसरा

चिंतामुक्त होण्यासाठी काय करायचे हया प्रश्नाचा उर्वरित भाग आजच्या लेखमालेत अंतर्भूत केलेला आहे.

10. सकारात्मक विधानांची आठवण
        रोज प्रेरणादायी विचार आणि वचनांची जाणीव करणारया विचारांत राहिलात की सकारात्मकता वाढेल आणि चिंता पळून जाईल.
➖ तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता
➖ काळजी करणे म्हणजे निरूपयोगी विचारात अडकणे
➖मनाची ताकद अशी आहे की ते विचाराने एखाद्या ठिकाणाला स्वर्ग नरक बनवू शकते.
➖जेवढे शरीराच्या जखमांची काळजी घेता तितकीच मनावरील जखमांची काळजी घ्या
➖जर आपण आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवले तर भावना आपोआप नियंत्रित राहतात
➖कितीही वाईट प्रसंग असू देत चेहऱ्यावरचे हसू मावळले नाही पाहिजे.
➖आपले दुखाने निर्माण झालेला मनातील कडवटपणा पसरवण्याऐवजी आनंद पसरवा.
➖आपल्या आयुष्याला आकार देणारे देवत्व आपल्यामध्ये असते त्यामुळे विचार बदला जग बदलेल

11.स्वतः ची लाज नाही अभिमान वाटू द्या
आपल्यातले चांगले गुण शोधा, आपले व्यक्तिमत्त्व खुलवा.
कुणाचीही नक्कल बनू नका ..अस्सल रहा
माणसाच्या आयुष्यात वेगळे वळण तेव्हाच येते जेव्हा त्याला कळतं की मत्सर हाच अडाणीपणा आणि मर्यादा हया आत्महत्या आहेत.

12. संधीचे सोने करा.
जे आपल्याला मिळालयं किंवा आहे त्या प्राप्त परिस्थितीत सुधारणा करून त्यावर मात करून आपल्याला यश मिळवायचे आहे म्हणून शाररीक दोर्बल्याचा बाऊ करु नका जबाबदारीने नाउमेद न होता प्रयत्न करत राहा.

13.नैराश्यावर मात करायचा कानमंत्र
   ➖    जे नेहमी दुसऱ्यांना मदत करतात
दुसर्याच्या आनंदासाठी झटतात ते कधीच नैराश्याचे शिकार होत नाही तसेच लोक त्यांचा कधी मत्सर करत नाही.
➖मित्र जोडा. सुखदुःख वाटा आणि चिंतामुक्त व्हा
➖स्वतः पेक्षा जास्त महत्त्वाचे भव्यदिव्य स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचा.
➖ आपण हया जगात एकटेच नाही आहोत त्यामुळे आत्मकेंद्री होऊ नका
➖आपण आणि आपल्या कुटुंबापलीकडे   ज्यांना जशी मदत करता येईल तशी करा तुम्हाला आशिर्वाद आणि आनंद दोन्ही भेटेल. 
➖जो स्वतः साठी जगला तो संपला ,जो दुसऱ्या साठी जगला तो खरा जगला
➖आयुष्य छोटे आहे आणि हा जन्म पुन्हा नाही

14. धार्मिक श्रध्दा
धर्म माणसाला नीतीमूल्ये शिकवतो, जगण्याची उमेद देतो,आयुष्याला अर्थ देतो
प्रार्थना माणसाला विश्वास देते ,
देवावर प्रेम करणारा माणूस आपल्या सारया चिंता देवाला सोपवून निश्चिंत राहतो त्यामुळे चिंतामुक्त राहतो आणि अल्सर सारखे आजार त्याला होत नाही.
(ढोंगी धार्मिकता नको तर पूर्ण श्रद्धा असलेली सात्विक विचारांची धार्मिकता )
ज्याला अर्धवट ज्ञान असते ते नास्तिक होतात कारण पूर्ण ज्ञानी माणूस धार्मिकच असतो.

15. टीकेकडे पाहायचा सकारात्मक दृष्टिकोन
➖टीका त्यांच्यावरच होते जे काम करतात ,झटतात त्यामुळे आपल्यावर टीका झाली तर तिला कामाच्या कौतुकाची छुपी पावती समजायची.
➖टीका करून माणसाला आसुरी आनंद मिळवायचा असतो कारण तो यशस्वी माणसाबद्दल द्वेष बाळगत असतो.
➖टीकाकाराला सत्य जाणून घेण्यात रस नसतो
➖टीकाकारांना आपण रोखू शकत नाही पण आपण आपले विचार मात्र रोखू शकतो त्यामुळे टीकेमुळे मनशांती बिघडू द्यायची नाही.
➖ तुम्ही तुमच्या नजरेत योग्य असाल तर तुम्हाला कोण काय म्हणतयं हयाची चिंता करायची गरज नाही फक्त आपले काम चांगले कसे करता येईल हयावरच लक्ष द्या
➖टीकांवरून आपल्यात काही सुधारणा होत असेल तर टीकाकारांचे आभार माना 
➖रोज आपले आत्मपरीक्षण करायची सवय लावा ,स्वतः च स्वतः चे टीकाकार बना
➖ टीका, ट्रोल एन्जॉय करा कुणालाही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू नका आणि दिले तरी ते नम्र आणि बुद्धीवादी असावे.

16. थकव्यापासून दूर ठेवा
➖कामाच्या महत्त्वानुसार क्रम लावून कामांचा निपटारा करा.
➖समस्या आली की रेंगाळत न ठेवता लगेचच निवारण करा
➖एखाद्या माणसाची उणीदुणी काढत असाल तर तोच हया जगात अस्तित्वात नाही राहिला तर काय होईल याची कल्पना करा
➖ आपली कामे जास्तीच्या जबाबदारया योग्य व्यक्तींना सोपवा.
➖वामकुक्षी व योग्य विश्रांती घेत राहा
➖एखाद्या मीटींग वा भाषणापूर्वी वीस मिनिटे डोळे मिटून शांत बसले तरीसुद्धा थकवा जाणवत नाही आणि भाषणातील प्रभावीपणा वाढतो
➖जिथे बसणे शक्य आहे तिथे उभं राहू नका आणि जिथे झोपणं शक्य असेल तिथे बसू नका
➖ डोळे सगळयात जास्त नकारात्मकता जाळतात त्यामुळे डोळयांच्या विश्रांतीची योग्य काळजी घ्या
➖चेहऱ्याचे स्नायू, जबडा,मान खांदा काही काळानंतर रिलँक्स करणे गरजेचं आहे
➖ मानसिक ,भावनिक दृष्टिकोन व्यवस्थित ठेवा
➖मांजराप्रमाणे अंगाचे मुटकुळे करून विश्रांती घेतली की थकवा जाणवत नाही
➖स्वतःला अधूनमधून विचारा की इतक्या कष्टाची खरेच गरज आहे का?
हे काम आणखी सोपे कसे करता येईल?
➖दिवसाच्या शेवटी जर माणूस दमत असेल तर कुठले काम चुकीच्या पद्धतीने झालयं का? कुठल्या विचारांनी मला थकवलयं का? 
➖थकवा टाळण्यासाठी आपल्या अडचणी तीव्र भावनांना मोकळी वाट करून देणारे आणि आपले दुख समजून घेणारे कुणीतरी आपल्या आयुष्यात असावे
➖डायरी लिहिण्याची सवय लावा
➖ रोज व्यायाम करून प्राणवायूचे प्रमाण  व्यवस्थित ठेवा
➖ कुटुंबाला वेळ द्या
➖ आपले काम एकतर आवडून घ्या किंवा आवडीचे काम शोधा
➖ स्फूर्तिदायक विचार आणि माहितीपूर्ण  कात्रणे एका वहीत सांभाळून ठेवा जे वाचून तुमच्या मनाला उभारी येईल.
➖सभोवतालच्या लोकांमध्ये रूची दाखवा, उच्चनीच धर्मजातीभेद न मानता निरोगी मैत्री करा.

17. निद्रानाशावर मात
माणसाच्या आयुष्याचा एक तृतीयांश वेळ झोपण्यात जातो.झोप माणसाला रिफ्रेश करते. पण प्रत्येकाची झोपेची गरज वेगवेगळी आहे त्यामुळे कमी झोप होतेय म्हणून तळमळत जागू.नका किंवा आता कसे होणार याची चिंताही करत बसू नका कारण निद्रानाशापेक्षाही त्याची चिंता धोकादायक आहे, त्यापेक्षा झोप लागत नसेल तर त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा विचार करा.
निद्रादेवीची कृपा व्हावी म्हणून 
➖ झोपायला जाण्यापूर्वी देवाची प्रार्थना करा
➖ दिवसभरातील सगळया अपराधाबद्दल क्षमा मागा 
➖ झोपायला जाताना कुठलीही असुरक्षिततेची भावना मनात राहणार नाही याची काळजी घ्या
➖सगळया चिंता देवावर सोपवून चिंतामुक्त होऊन शांत मनाने बेडवर जा
➖ बेडवर गेल्यावर सगळे शरीर रिलँक्स करा
➖रोज व्यायामाने,कामाने,कष्टाने शरीराची दमणूक होईल असे पाहा
➖डोळयातील बुबुळांच्या गोल हालचाली करा याने लवकर झोप येईल
➖रात्रीचा आहार हलका ठेवा
➖ झोपण्यापूर्वी कँफेनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा

Source :- Nilesh Shinde 

मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा

#मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा
(How to win Friends and  influence People )

लेखक - डेल कार्नेगी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग पहिला

लेखकाविषयी : 
माणूस नावीन्यपूर्ण कल्पनेने पछाडलेला आणि उत्साहाने भारलेला असेल तर तो मोठे यश मिळवू शकतो हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे "डेल कार्नेगी"
त्यांचा जन्म वायव्य अमेरिकेतील मिसुरी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबातला झाला. 
एकेकाळी काऊबाँय असणारा मुलगा पुढे जाऊन मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चाधिकार्यांना व्यक्त कसे व्हावे हे शिकवणारा सर्वात जास्त फी आकारणारा प्रशिक्षक बनेल असे स्वप्नात सुद्धा कुणाला खरे नसते वाटले.
 घरचे अठराविश्व दारिद्रय ,काबाडकष्ट आणि कर्जाचा वाढता डोंगर हया कशानेच नाउमेद न होता शिकत होता.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्न करून त्याने वक्तृत्व कलेवर प्रभुत्व मिळवले.
शिक्षणांतर काही काळ विक्रेत्याचे काम करून काही काळ अभिनय केल्यानंतर त्याला लेखक होण्याचे वेध लागले.
दिवसभर पुस्तक वाचन लिखाण आणि रात्री प्रौढ शिक्षण वर्ग असा त्याचा दिनक्रम बनला. 
त्यांचे पब्लिक स्पिकींग कोर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले
त्यांचे विद्यार्थी असलेले व्यवसायिक नोकरदार हयांना मित्रांवर छाप पाडायची, व्यवसाय नोकरीत तत्काळ वापरता येतील अशी व्यवहारी तंत्र जाणून घ्यायची होती
त्यानुसार  त्यांनी व्यावहारिक शहाणपणाचा कोर्स बनवला ज्यात भाषण,विक्री, नातेसंबंध आणि हयासर्वामागचे मानसशास्त्र शिकवायचे त्यांनी ठरवले
 हयातूनच  पुढे ज्या पुस्तकाचा जन्म झाला ते म्हणजे
 " मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा"

पुस्तकाविषयी : 
हया पुस्तकातून लेखकाने लोकांना कसे हाताळावे जेणेकरुन ते तुमचे ऐकतील, तुमच्या विचारांशी सहमत होतील, तुमचे जिवलग बनतील.
लोकांवर छाप पडण्यासाठी लागणारी संवाद कौशल्य आणि पथ्ये सांगितली आहेत.
लोकांना प्रेमाने जिंकण्यासाठी वादविवाद कसे टाळावेत तसेच चांगले वागण्यासाठी आव्हान कसे द्यायचे तसेच प्रतिकूल परिस्थितीत संयम ढळू न देता बाजी कशी पलटवायची याची सूत्रे सांगितली आहोत तसेच लोकांना राग येऊ न देता टीका न करता त्यांच्यात बदल कसे घडवायचे
त्यांच्या चुका सह्रदयतेने कशा सुधारायच्या
हयाबाबत पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Source :- Nilesh Shinde 

Friday, May 28, 2021

Swatantryaveer Savarkar Quiz 138th Birth Anniversary 2021

 

QUIZ on the occasion of Swatantryaveer Savarkar Quiz 138th Birth Anniversary 2021



                                                             

VIDYA PRATISHTHAN'S 
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR - LIBRARY 

Organizes QUIZ on the occasion of 

Swatantryaveer Savarkar Quiz 138th Birth Anniversary 2021

E-Certificate will be send after attending the Quiz to your registered E-mail ID 

Click on given link below to participate in Quiz

https://forms.gle/rntqtUsC4jugtD4H7


With Thanks and Regards  

Atul Chandanvandan

Thursday, May 27, 2021

लेखमाला - भाग पाचवा

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड 
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                    प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग पाचवा

#अंतर्मन_आणि_मधुर_नातेसंबंध

अंतर्मनाच्या मदतीने आपण उत्तम जीवनसाथी मिळवू शकतो, वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण करू शकतो
तसेच घटस्फोट रोखू शकतो आणि शाश्वत सुखी सहजीवनाची अनुभूती घेऊ शकतो.
तसेच कुटुंबीय,मित्र सहकारी अथवा वरिष्ठ यांच्यांशी उत्तम बाँंडिग आपण तयार करु शकतो

1️⃣आदर्श पार्टनर मिळवण्यासाठी खालील सकारात्मक विधान किंवा प्रार्थना शांतपणे स्थिर मन करून अंतर्मनात पोहचवायचे. आणि आपली प्रार्थना स्वीकारली जाईल हयाबाबत ठाम विश्वास ठेवा.
प्रार्थना :
"मी योग्य व्यक्तीला माझ्या जीवनात आकृष्ट करत आहे.ज्याचा माझ्याशी उत्तम ताळमेळ आहे.दैवी प्रेम तिच्या रूपाने साकार झाले आहे. जिच्यात मी पूर्णपणे एकरूप होणार आहे.
ती व्यक्ती सोज्वळ, प्रामाणिक, विश्वासू,निरागस,सुशील,आनंदी आहे आणि तिला मी माझी आदर्श जीवनसाथी म्हणून स्वीकारले आहे" 

2️⃣ घटस्फोट टाळण्यासाठी आणि उत्तम सुसंवादी साहचर्यासाठी
आपले अंतर्मन सर्वात आधी शांती,सुसंवाद , प्रेमाच्या सरींनी भिजवा.
📛जीवनसाथी चिडखोर असेल तर 
त्याला प्रेमाची आपलेपणाची कमी जाणवतेय,ती पूर्ण करा.
जीवनसाथी जर मनातल्या मनात कुढणारा, सतत नकारात्मक गोष्टी उकरून काढणारा असेल तर मानसिक प्रयत्नाद्वारे विरोध करण्याची सवय सोडा. त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा,चतुराईने वाद टाळा
🏮जीवनसाथी चुगली करणारा असेल तर
आपल्या उणीवांची चर्चा तो शेजारी, नातलंगाशी करतो आणि मग आपण त्यांच्या सुद्धा नजरेतुन उतरतो 
त्यामुळे भांडणे फक्त दोघात मर्यादित ठेवावे.
आजचे भांडण आजच मिटवायचे.
एकतर स्वतःला बदला किंवा जुळवून घ्यायचे पण दुसऱ्याला बदलायचा अट्टाहास करायचा नाही.
हया जगात कुणीच परफेक्ट नाही हे कायम लक्षात ठेवायचे
धार्मिक ग्रंथ आणि स्तोत्रपठण पण फायदेशीर ठरू शकते

3️⃣इतरांशी मधुर संबधासाठी
अंतर्मन रेकाँडींग मशीनसारखे असते त्यावर जे आपण रेकॉर्ड करतो तेच आपल्याला अनुभवायला मिळते.

मधुर संबंधासाठी प्रार्थना :
"माझ्या विश्वाचा मीच एकमेव विचारक आहे, दुसऱ्याबद्दल मी काय विचार करतो त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे.
मी कोणत्याही व्यक्ती, स्थळ अथवा गोष्टीला मला अस्वस्थ किंवा विचलित करण्याचा अधिकार देत नाही.
मी नेहमी सर्वांचे भले चिंतितो
सर्वांना सुख शांती आरोग्य ऐश्वर्य लाभो अशीच मी कामना करतो."

ही प्रार्थना /सकारात्मक विधान रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणून अंतर्मनावर कोरायची.
आणि सगळयांशी मधुर नातेसंबंध बनवण्यासाठी स्वतःला सज्ज बनवायचे

काही टिप्स
➡️ ज्याची आपल्याला इतरांकडून अपेक्षा आहे ते आधी तुम्ही त्यांच्यासाठी करा.
➡️ इतरांशी जुळवून घेण्यापूर्वी आपण स्वतःशी जुळवून घ्या, भावनिक दृष्ट्या परिपक्व,प्रगल्भ व्हा
➡️ इतरांच्या वागण्याची चिकित्सा नको
➡️ जरूरीपेक्षा जास्त प्रतिक्रिया नको
म्हणजेच टाकून बोलणे, मारहाण इत्यादी
➡️ कुणाबद्दल नकारात्मक भाव मनात नको कारण त्यामुळे आजार निर्माण होतात
➡️प्रत्येकाने आपल्या मताशी सहमत व्हावे हा दुराग्रह सोडा
➡️ कुणाच्या टीकेला,द्वेषाला नकारात्मक प्रतिसाद देण्याचा बालिशपणा करु नका
वाईटावर चांगुलपणाने मात करा
➡️ काही माणसे त्यांच्या गतानुभवामुळे विकृत बनलेली असतात त्यामुळे ते वाद उकरून काढतात त्यांच्या बद्दल करूणा भाव बाळगा
➡️ काही लोकांना आपण सुखी झालेले पाहवत नाही ते त्यांच्या निराशेच्या पातळीवर आपल्याला ओढू पाहतात
त्यांच्या वागण्याला बळी पडू नका
➡️ कुणालाही तुमचा आणि तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका
➡️ तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा अधिकार कुणालाही देऊ नका.

Source :- Nilesh Shinde 

लेखमाला - भाग दुसरा

#चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा
(How to Stop Worrying and start living )

लेखक - डेल कार्नेजी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग दुसरा

#चिंता

चिता आणि चिंता एकसमान मानल्या जातात कारण दोन्ही माणसं जाळायची कामे करतात फक्त एक मेल्यावर तर एक
एक जगत असताना..

#चिंतेचा_जन्म
चिंता उद्भवतात माणसाच्या अतिविचारांतून...
चिंता करणारया माणसाला सतत कशाची न कशाची काळजी करायची सवयच जडलेली असते.
काळजी करताना माणसाचे मन नुसते इकडून तिकडे उड्या मारत असते त्यामुळे त्याचे विचार भरकटतात आणि पर्यायाने माणूसही भरकटतो.
वास्तविक पाहायला गेलो तर असे जाणवते की 99% चिंता हया अगदीच क्षुल्लक आणि अवास्तव असतात पण आपण त्यांच्याशी लढायचे सोडून त्यातच गढून जातो.

#चिंतेचे_दुष्परिणाम
वेगवेगळ्या काळज्या करत राहिल्याने काळज्यामधून भीती जन्म घेते.
मग भीतीतून वाईट विचार, ताणतणाव, नैराश्य, वैफल्यता, थकवा यांना आमंत्रण मिळते.
 मग सर्वप्रथम माणसाची त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि
तो सतत सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांना बळी पडतो.
 सततची भीती शरीरात उच्च रक्तदाब, ह्दयरोग,पोटाचे अल्सर,संधिवात, मधुमेह, थायरॉईड समस्या, अनिद्रा, पांढरे केस,चेहऱ्यावर सुरकुत्या, मुरूमे अशा बर्याच समस्या निर्माण करते.
काळजीचा अतिरेक माणसाला मानसिक आजारी किंवा क्वचित प्रसंगी वेडे सुद्धा बनवू शकतो.
आजवर चिंता केली म्हणून कुणी मरण पावले नाही पण वेळीच चिंतेला आवरले नाही तर मात्र अनर्थ ओढवू शकतो.

चिंतामुक्त होण्यासाठी काय करायचे
1️⃣ कामात व्यग्रता
सतत स्वतःला कामात व्यग्र ठेवायचे
मोकळे मन सैतानाचे घर असते त्यामुळे माणूस जेव्हा पण फ्री असतो तेव्हाच काळजीचा राक्षस अँक्टिव्ह असतो.
म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत सतत स्वतःला वेगवेगळ्या कामात इतके गुंतवून ठेवायचे की दुसरा विचार करायला फुरसतच मिळू नये.
लेखकाचे मते माणसाने कृतीशील व्हावे आणि घर,नोकरीधंदा हयाव्यतिरिक्त
विधायक कार्यात,सामाजिक उपक्रमातही
भाग घ्यावा.

2️⃣ बंदिस्त दिवस
दिवसाला बंदिस्त करायचे
भूतकाळ कसाही असला तरीही तो सरलाय आणि भविष्यकाळ अजून जन्मायचाय.
मग भूतकाळाची खंत आणि भविष्याचे भय बाळगत आजचा दिवस कुढत का जगायचा?
आपण फक्त आजच्या दिवसाचाच विचार करायचा आणि फक्त आजच्याच सार्या कामाचे व्यवस्थित नियोजन करुन ,त्यावर लक्ष केंद्रित करून, आपली पूर्ण क्षमता , बुद्धिमत्ता,उत्साह  वापरून आजची कामे पूर्ण करायची.
शांतपणे ,आनंदाने,प्रेमाने, सात्विकतेने आजचा दिवस जगायचा हयालाच जीवन म्हणतात.

3️⃣ चिंतामुक्तीचा प्रथमोपचार

➡️ पहिल्यांदा प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे परिस्थितीचा आढावा घेऊन स्वतःला विचारायचे की सर्वात जास्त वाईट काय घडू शकेल ?
आजपर्यंत जगावर कितीतरी संकट आले तरीही जग टिकून आहे मग आपण इतके का घाबरतोय
➡️ जे काही वाईट घडणार आहे त्याचा स्वीकार करायची मनाला परवानगी द्या आणि मनशांती अनुभवा.
➡️ जे वाईट घडणार आहे  त्याने जे आपले नुकसान होईल ते कमी करण्याचे उपाय शोधा.

4️⃣ समस्यांच्या मूळावरच घाव घाला
सर्वप्रथम आपल्या काळज्या हया वास्तविक आहेत की खुळचट कल्पना ते पाहायचे. नंतर मनातील पूर्वग्रह दूर ठेवून काळजीमागचे कारण शोधायचे, आणि ती लिहून ठेवायचे.
मग या समस्येवर काय उपाय करता येईल त्यावर विचार करा आणि त्या सार्या उपायांची व्यवहार्यता तपासून अंतिम निर्णयाप्रत पोहचायचे. जो काही निर्णय ठरेल त्याची लगेचच अंमलबजावणी सुरू करायची कुठलाही पुनर्विचार, शंकाकुशंका मनात न आणता बेधडक कृती करायची. हीच पद्धत आपण व्यावसायिक चिंता सुद्धा दूर करू शकतो

5️⃣ सरासरीचा नियम 
कुठल्याही काळजीला आपण सरासरीचा नियम लावला तर त्यांची काल्पनिकता समजून येईल.
समजा आपल्याला अपघात होईल अशी चिंता वाटत असेल तर सर्वप्रथम शांतपणे विचार करा
➡️ हया मार्गावरून रोज कितीजण जातात ?
➡️ आजपर्यंत किती जणांचा अपघात झालाय ?
➡️ एकूण नागरिकांपैकी अपघात झालेल्यांची सरासरी किती
➡️ सरासरी इतकी कमी आहे तर आपण का घाबरायचे?

6️⃣ अटळ ते स्वीकारा
जे घडून गेलयं ते आपण बदलू शकत नाही
अशा गोष्टीबाबत खेद आणि खंत कशाला करायची ?
अपरिहार्य गोष्टी स्वीकारल्या नाही तर परिस्थितीत काही फरक पडत नाही पण आपल्या मनात कडवटपणा ,आत्मक्लेश निर्माण होतो जो पुढे जाऊन मानसिक आजारांचे कारण बनतो.
त्यामुळे ताकद आणि इच्छाशक्ती हयापलीकडील गोष्टीबाबत चिंता करणे थांबवा

6️⃣ काळजीला स्टाँपलाँस
स्टाँपलाँस लावून शेअर मार्केट मध्ये जसे नुकसान रोखता येते तसाच स्टाँपलाँस आपल्या रागाला,इच्छाआकांक्षाना,खेदाला
आणि इतर भावनांना लावून आपले वैयक्तिक नुकसान रोखायचे.
कोणत्याही गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व द्यायचे नाही. त्याच त्याच गोष्टी पुन्हा उगाळून मनशांती गमवायची नाही.

7️⃣ भूतकाळाकडून शिका
घडलेल्या घटना आपण बदलू शकत नाही
त्यामुळे त्याबाबत खंत करण्यापेक्षा आपण त्यापासून बोध घेऊ शकतो.
महापुरुषांची चरित्रे वाचून त्यांनी संकटावर कशी मात केली ते समजू शकेल त्या चुका आपण टाळायच्या आणि आपले आयुष्य आपण घडवायचे.

8️⃣सूडाची किंमत
एखाद्याचा तिरस्कार करताना आपण सतत त्याचाच विचार करतो आणि सूडाच्या भावनेने आपण पेटून उठतो आणि शिवीगाळ, अपमान, नीचपणा..अगदी खून अशा खालच्या थराला जातो
आपले सुखचैन गमावतो. आजारी पडतो.आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेतो.
त्यामुळे बदला घेण्याऐवजी गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीला आपल्या लिस्ट मधून बेदखल करा.
आपल्या शत्रूवर प्रेम करा असे साधूसंत शिकवतात पण प्रेम नाहीतर किमान आपण त्यांच्या चुकांसाठी त्यांना माफ तरी करू शकतोच.
आपण आपल्या स्वतः वर प्रेम करू, आपला आनंद हिरावून घेण्याची त्यांना परवानगी देऊ नये.
आपल्या अहंकारापेक्षा मोठ्या गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्यायचे म्हणजे सूडभावनेचा विचार करायला आपल्याला वेळच उरणार नाही.
आपण इतके दयाळू व्हायचे की जोवर आपल्याला दुसऱ्याचे दुःख समजत नाही तोवर त्याच्याशी सहानुभूतीने वागायचे.

9️⃣ कृतघ्नता
सगळीच माणसे उपकाराची जाण ठेवणारी कृतज्ञ नसतात कारण तो व्यक्तीच्या संस्काराचा भाग आहे. त्यामुळे आपल्या मदतीबद्दल कुणी आभार मानले नाही म्हणून खंत करत बसू नका.दुखी होऊ नका.
पण आपल्या मुलांवर आपल्या कृतीमधून कृतज्ञतेचे संस्कार करायला मात्र अजिबात विसरू नका.
प्रेम आणि कृतज्ञता हया गोष्टी मागून मिळवायच्या नसतात. मदत करताना आपल्याला जो आनंद मिळतो तो महत्त्वाचा मानायचा आणि कृतज्ञता कुणी दाखवलीच तर तिला बोनस समजायचा.

अपूर्ण
Source :- Nilesh Shinde