Saturday, May 29, 2021

द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                    प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग सहावा

#अंतर्मन_आणि_भीती
भीती हा माणसाचा मोठा शत्रू आहे.
भित्रा माणूस स्वतःच्याच विचारांनी भयभीत होतो त्यातले आधिकतर विचार बेसलेस आणि अवास्तव असतात.
 सकारात्मक विधाने / प्रार्थनेने  ठामपणे विचार बाहयमनातून अंतर्मनात पोहचवून आपण उपचारक शक्तींना जागृत करायचे आणि भीतीचा अंत अंतर्मनाच्या साहाय्याने करायचा असतो.

वेगवेगळ्या भीती माणसाला सतावत असतात
1️⃣ भाषण देण्याची भीती ( Stage Fear)
भाषण द्यायला स्टेजवर पोहचताच बर्याच जणांचे पाय लटलट कापतात, भीतीने घाबरगुंडी उडते, काय बोलायचं ते विसरून जातो .

प्रार्थना :
"मी सुंदर भाषण करतो ,छान बोलतो
मी शांत, संयत ,संतुलित आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे"

ही प्रार्थना एकांतात बसून शरीर स्थिर करून शांत मनाने दहा वेळा म्हणायची,विषयाची उत्तम तयारी करायची, आरशासमोर प्रँक्टिस करायची, याने तुमचे भाषण उत्तम जोशपूर्ण होईल याबाबत खात्री बाळगा.

2️⃣ अपयशाची भीती (Success Fear)
केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल का हया विचारांनी माणूस चिंताग्रस्त होतो. माणसाचे नकारात्मक विचार सक्रीय होतात आणि शेवटी
भीतीचा हाच विचार अंतर्मन खरा करतो.

प्रार्थना
"मी माझ्या यशासाठी सदैव प्रयत्नशील असतो, माझ्या प्रयत्नांना नक्कीच यश भेटेल हयाबद्दल मला खात्री आहे."

शरीर रिलँक्स करून उज्वल यशाची कल्पना करायची,त्या यशात आनंद अनुभवायचा, आपले अंतरंग त्यावर पूरक प्रतिक्रिया देईल ,मनस्थिती बदलायला तसेच आपली प्रतिभा व्यक्त करायला बाहयमनाला प्रेरक मार्गदर्शन करेल

3️⃣ पाण्याचे भय
बरेच जण पाण्यात उतरण्यास घाबरतात मग स्विमिंग तर दूरच राहते.फुटभर पाण्यात उभे राहिले तरी गांगरून जातात.

प्रार्थना
"मी तुझ्यावर ताबा मिळवला आहे 
मी मनाच्या शक्तीद्वारे तुझ्यावर वर्चस्व गाजवणार आहे"

ही प्रार्थना म्हणून मनात नवा दृष्टिकोन जन्म घेतो, सर्वशक्तिमान अंतर्मन श्रद्धा शक्ती विश्वास पुरवते. आणि त्यानंतर त्याला पोहण्याचे धडे देता येतात.

4️⃣ नोकरी गमावण्याची भीती
मनातील रोगीट,चिंतातूर विचार नकारात्मकतेला आमंत्रण देतात
माणसाची कार्यक्षमता त्यामुळे घटते
तो अनेक चुका करतो आणि शेवटी तो नोकरी गमावतो

प्रार्थना
"मी माझ्या कामालाच ईश्वर मानतो
माझे काम प्रामाणिकपणे करण्यात मला आनंद वाटतो."

 ही प्रार्थना रोज निस्तब्ध ध्यानमग्न अवस्थेत म्हणायची आपल्या आत दडलेल्या खोल शांतीचा महासागराची अनुभूती घ्यायची आणि त्या उर्जेच्या सहाय्याने भीतीवर अडचणीवर मात करायची

5️⃣हयाच पद्धतीने आपण लिफ्टची भीती, रोगाची भीती,नुकसानीची भीती , हरवण्याची भीती हयावरही अंतर्मनाच्या साहाय्याने मात करू शकतो.

#काही_भीती_पळवणार्या_टिप्स
1.भीती वाटणार्या गोष्टी केल्या की भीती पळून जाते
2.भीती वाटली की सर्जनशील गोष्टी करा
चित्र काढा, काहीतरी लिहा 
3.देव , शुभ गोष्टीवरील आपली श्रद्धा, आपला आत्मविश्वास यापेक्षा कुठलीही भीती मोठी नाही
4. भयामुळे आपण आजाराला आमंत्रण देतो त्यामुळे सदैव निरोगी राहण्यासाठी भय टाळा
5.प्रामाणिकपणा,एकात्मता, न्याय,चांगुलपणा, सद्भाव,यश हयांच्या प्रेमात पडा.
6.सामान्य भय माणसाच्या भल्यासाठी, जीव वाचवण्यासाठी उपयुक्त आहेत पण असामान्य भय बाळगू नका.
7.भित्यापाठी ब्रम्हराक्षस हया म्हणीप्रमाणे आपल्या भीतीला तर्कावर घासून पहा की आपण उगाच तर भीत तर नाही ना?
8.आपले लक्ष कशावर त्यावरच भीतीचा अवलंबून असतो
अपयशाची भीती असेल तर यशाकडे लक्ष द्या
आजाराची भीती वाटत असेल तर स्वास्थ्य कसे मिळेल याचे चिंतन करा.
अपघाताची भीती वाटत असेल तर ईश्वरी मार्गदर्शन आणि संरक्षणाचे मनन करा.
मृत्यूची भीती वाटतेयं तर चिरंतन शाश्वत जीवनाचा विचार करा.
9.सदैव देव आपल्याबरोबर असल्याचा भाव मनात असू द्या
10.भयाच्या सूचनेचा जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत कुठलेच भय आपले नुकसान करू शकत नाही.

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know