Saturday, May 29, 2021

चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा

#चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा
(How to Stop Worrying and start living )

लेखक - डेल कार्नेगी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग तिसरा

चिंतामुक्त होण्यासाठी काय करायचे हया प्रश्नाचा उर्वरित भाग आजच्या लेखमालेत अंतर्भूत केलेला आहे.

10. सकारात्मक विधानांची आठवण
        रोज प्रेरणादायी विचार आणि वचनांची जाणीव करणारया विचारांत राहिलात की सकारात्मकता वाढेल आणि चिंता पळून जाईल.
➖ तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता
➖ काळजी करणे म्हणजे निरूपयोगी विचारात अडकणे
➖मनाची ताकद अशी आहे की ते विचाराने एखाद्या ठिकाणाला स्वर्ग नरक बनवू शकते.
➖जेवढे शरीराच्या जखमांची काळजी घेता तितकीच मनावरील जखमांची काळजी घ्या
➖जर आपण आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवले तर भावना आपोआप नियंत्रित राहतात
➖कितीही वाईट प्रसंग असू देत चेहऱ्यावरचे हसू मावळले नाही पाहिजे.
➖आपले दुखाने निर्माण झालेला मनातील कडवटपणा पसरवण्याऐवजी आनंद पसरवा.
➖आपल्या आयुष्याला आकार देणारे देवत्व आपल्यामध्ये असते त्यामुळे विचार बदला जग बदलेल

11.स्वतः ची लाज नाही अभिमान वाटू द्या
आपल्यातले चांगले गुण शोधा, आपले व्यक्तिमत्त्व खुलवा.
कुणाचीही नक्कल बनू नका ..अस्सल रहा
माणसाच्या आयुष्यात वेगळे वळण तेव्हाच येते जेव्हा त्याला कळतं की मत्सर हाच अडाणीपणा आणि मर्यादा हया आत्महत्या आहेत.

12. संधीचे सोने करा.
जे आपल्याला मिळालयं किंवा आहे त्या प्राप्त परिस्थितीत सुधारणा करून त्यावर मात करून आपल्याला यश मिळवायचे आहे म्हणून शाररीक दोर्बल्याचा बाऊ करु नका जबाबदारीने नाउमेद न होता प्रयत्न करत राहा.

13.नैराश्यावर मात करायचा कानमंत्र
   ➖    जे नेहमी दुसऱ्यांना मदत करतात
दुसर्याच्या आनंदासाठी झटतात ते कधीच नैराश्याचे शिकार होत नाही तसेच लोक त्यांचा कधी मत्सर करत नाही.
➖मित्र जोडा. सुखदुःख वाटा आणि चिंतामुक्त व्हा
➖स्वतः पेक्षा जास्त महत्त्वाचे भव्यदिव्य स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचा.
➖ आपण हया जगात एकटेच नाही आहोत त्यामुळे आत्मकेंद्री होऊ नका
➖आपण आणि आपल्या कुटुंबापलीकडे   ज्यांना जशी मदत करता येईल तशी करा तुम्हाला आशिर्वाद आणि आनंद दोन्ही भेटेल. 
➖जो स्वतः साठी जगला तो संपला ,जो दुसऱ्या साठी जगला तो खरा जगला
➖आयुष्य छोटे आहे आणि हा जन्म पुन्हा नाही

14. धार्मिक श्रध्दा
धर्म माणसाला नीतीमूल्ये शिकवतो, जगण्याची उमेद देतो,आयुष्याला अर्थ देतो
प्रार्थना माणसाला विश्वास देते ,
देवावर प्रेम करणारा माणूस आपल्या सारया चिंता देवाला सोपवून निश्चिंत राहतो त्यामुळे चिंतामुक्त राहतो आणि अल्सर सारखे आजार त्याला होत नाही.
(ढोंगी धार्मिकता नको तर पूर्ण श्रद्धा असलेली सात्विक विचारांची धार्मिकता )
ज्याला अर्धवट ज्ञान असते ते नास्तिक होतात कारण पूर्ण ज्ञानी माणूस धार्मिकच असतो.

15. टीकेकडे पाहायचा सकारात्मक दृष्टिकोन
➖टीका त्यांच्यावरच होते जे काम करतात ,झटतात त्यामुळे आपल्यावर टीका झाली तर तिला कामाच्या कौतुकाची छुपी पावती समजायची.
➖टीका करून माणसाला आसुरी आनंद मिळवायचा असतो कारण तो यशस्वी माणसाबद्दल द्वेष बाळगत असतो.
➖टीकाकाराला सत्य जाणून घेण्यात रस नसतो
➖टीकाकारांना आपण रोखू शकत नाही पण आपण आपले विचार मात्र रोखू शकतो त्यामुळे टीकेमुळे मनशांती बिघडू द्यायची नाही.
➖ तुम्ही तुमच्या नजरेत योग्य असाल तर तुम्हाला कोण काय म्हणतयं हयाची चिंता करायची गरज नाही फक्त आपले काम चांगले कसे करता येईल हयावरच लक्ष द्या
➖टीकांवरून आपल्यात काही सुधारणा होत असेल तर टीकाकारांचे आभार माना 
➖रोज आपले आत्मपरीक्षण करायची सवय लावा ,स्वतः च स्वतः चे टीकाकार बना
➖ टीका, ट्रोल एन्जॉय करा कुणालाही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू नका आणि दिले तरी ते नम्र आणि बुद्धीवादी असावे.

16. थकव्यापासून दूर ठेवा
➖कामाच्या महत्त्वानुसार क्रम लावून कामांचा निपटारा करा.
➖समस्या आली की रेंगाळत न ठेवता लगेचच निवारण करा
➖एखाद्या माणसाची उणीदुणी काढत असाल तर तोच हया जगात अस्तित्वात नाही राहिला तर काय होईल याची कल्पना करा
➖ आपली कामे जास्तीच्या जबाबदारया योग्य व्यक्तींना सोपवा.
➖वामकुक्षी व योग्य विश्रांती घेत राहा
➖एखाद्या मीटींग वा भाषणापूर्वी वीस मिनिटे डोळे मिटून शांत बसले तरीसुद्धा थकवा जाणवत नाही आणि भाषणातील प्रभावीपणा वाढतो
➖जिथे बसणे शक्य आहे तिथे उभं राहू नका आणि जिथे झोपणं शक्य असेल तिथे बसू नका
➖ डोळे सगळयात जास्त नकारात्मकता जाळतात त्यामुळे डोळयांच्या विश्रांतीची योग्य काळजी घ्या
➖चेहऱ्याचे स्नायू, जबडा,मान खांदा काही काळानंतर रिलँक्स करणे गरजेचं आहे
➖ मानसिक ,भावनिक दृष्टिकोन व्यवस्थित ठेवा
➖मांजराप्रमाणे अंगाचे मुटकुळे करून विश्रांती घेतली की थकवा जाणवत नाही
➖स्वतःला अधूनमधून विचारा की इतक्या कष्टाची खरेच गरज आहे का?
हे काम आणखी सोपे कसे करता येईल?
➖दिवसाच्या शेवटी जर माणूस दमत असेल तर कुठले काम चुकीच्या पद्धतीने झालयं का? कुठल्या विचारांनी मला थकवलयं का? 
➖थकवा टाळण्यासाठी आपल्या अडचणी तीव्र भावनांना मोकळी वाट करून देणारे आणि आपले दुख समजून घेणारे कुणीतरी आपल्या आयुष्यात असावे
➖डायरी लिहिण्याची सवय लावा
➖ रोज व्यायाम करून प्राणवायूचे प्रमाण  व्यवस्थित ठेवा
➖ कुटुंबाला वेळ द्या
➖ आपले काम एकतर आवडून घ्या किंवा आवडीचे काम शोधा
➖ स्फूर्तिदायक विचार आणि माहितीपूर्ण  कात्रणे एका वहीत सांभाळून ठेवा जे वाचून तुमच्या मनाला उभारी येईल.
➖सभोवतालच्या लोकांमध्ये रूची दाखवा, उच्चनीच धर्मजातीभेद न मानता निरोगी मैत्री करा.

17. निद्रानाशावर मात
माणसाच्या आयुष्याचा एक तृतीयांश वेळ झोपण्यात जातो.झोप माणसाला रिफ्रेश करते. पण प्रत्येकाची झोपेची गरज वेगवेगळी आहे त्यामुळे कमी झोप होतेय म्हणून तळमळत जागू.नका किंवा आता कसे होणार याची चिंताही करत बसू नका कारण निद्रानाशापेक्षाही त्याची चिंता धोकादायक आहे, त्यापेक्षा झोप लागत नसेल तर त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा विचार करा.
निद्रादेवीची कृपा व्हावी म्हणून 
➖ झोपायला जाण्यापूर्वी देवाची प्रार्थना करा
➖ दिवसभरातील सगळया अपराधाबद्दल क्षमा मागा 
➖ झोपायला जाताना कुठलीही असुरक्षिततेची भावना मनात राहणार नाही याची काळजी घ्या
➖सगळया चिंता देवावर सोपवून चिंतामुक्त होऊन शांत मनाने बेडवर जा
➖ बेडवर गेल्यावर सगळे शरीर रिलँक्स करा
➖रोज व्यायामाने,कामाने,कष्टाने शरीराची दमणूक होईल असे पाहा
➖डोळयातील बुबुळांच्या गोल हालचाली करा याने लवकर झोप येईल
➖रात्रीचा आहार हलका ठेवा
➖ झोपण्यापूर्वी कँफेनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know