Thursday, December 30, 2021

पुस्तक नाव- फॉरेस्ट बाथिंग

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य.
परिचय कर्ता नाव -  दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक ५१
पुस्तक नाव- फॉरेस्ट बाथिंग
एकूण पृष्ठ संख्या -१७६
प्रकाशक  - my mirror publication

    मनुष्याला स्वतःची प्रगती कळते .. त्या सोबत होणारी निसर्गाची हानी ही कळते पण कळतं पण वळत नाही असं आहे. निसर्गाच्या सनिघ्यात राहिले की ताजेतवाने वाटते, उत्साह वाटतो हे आपण जाणतो पण त्याच झाडांच्या जपवणुकीसाठी काही करतो का हा मोठा प्रश्न. 

    हे पुस्तक म्हणजे निसर्ग आणि आरोग्य यांचे ऋणानुबंध उलगडून दाखवते.शहरी लोकांना छळणारे आजार, दुःख, वेदना या बहुतांश वेळा निसर्गाकडे पाठ फिरवल्यामुळे होतात. याचा अर्थ ज्या मातेने जन्म दिला तिच्यापासूनच पोरके होण्यासारखे आहे.डॉक्टरांनी दिलेल्या औषधांपेक्षा जंगलातील वास्तव्याने रुग्णांमध्ये अधिक सुधारणा होते..याचा अर्थ औषध न घेणे असा नाही पण सानिध्यता ही तितकीच महत्वाची आहे. 

   येथे शिनरिन योकु ही संकल्पना मांडली आहे. शिनरिन म्हणजे जंगल आणि योकु म्हणजे स्नान...हिरव्या रानातील स्नान ..म्हणजे हलकी फुलकी काम करत जंगलात मस्त भटकणे. झाडं, फुलं, पाकळ्यांचा सडा, गारवा , हिरवळ, पक्ष्यांचे आवाज, वारा या सर्वांचा आनंद घेणे. बहरलेली झाडं मनाची स्थिती एकदम बदलुन टाकतात.आपल्या आजूबाजूला एखादे फुलले फुल पाहिल्यावर किती आनंद होतो आपल्याला तर घनदाट वानाचा फेरफटका केला तरी कितीतरी मोठा सकारात्मक बदल होईल.निसर्ग एक प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आहे आपली प्रसन्नता उत्तेजित करते. जसे चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिले की मन शांत होते तसे झाडाला मिठी मारली तर आपली मनातील बॅटरी चार्ज होते आणि सगळ्या चिंता ,तणाव दूर होतात.
सध्याचा बळावणार कॅन्सर तर जंगलात आपल्यापासून दूर पळून जातो. महान योगीं ना देखील वृक्षाच्या छायेत बसूनच आत्मज्ञान प्राप्त झाले. 

    सदर पुस्तकात प्राचीन गोष्टी ही आहेत आणि शास्त्रीय कारणेही आहेत. दोन्ही बाजूंनी निसर्ग सानिध्याचे पुरेपूर महत्त्व समजावले आहे... 

     मला एक परिच्छेद खूप आवडला तो असा...
" सजीवसृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्राचे निसर्गाशी अतूट नाते आहे. हे सर्व सजीव आपले बहीण भाऊ आहेत. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जादू भरलेली आहे..ते फक्त अनुभवण्याची , समजून घेण्याची आपली कुवत हवी! " 

    दररोज नाही तर कमीतकमी शनिवार रविवार जरी आपण निसर्गाच्या सानिध्यात घालवले तर पुढचे पाच दिवस पुरेल एवढी एनर्जी निसर्ग आपल्याला देतो.  जंगलात कोणताच रस्ता सरळ नसतो , तिथे कशालाच अंत नसतो कारण तो अपूर्ण असतो म्हणूनच निखळ असतो, जेव्हा आपण अपूर्ण असतो तेव्हांच यशाची संधी आहे याची जाणीव आपणास होते. 

      अॅलन वँतस् यांनी म्हटल्याप्रमाणे,
"ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटांचे कार्य म्हणजे समुद्राचे कार्य तसेच या विश्वातील घडामोडी सुरळीत चालण्यासाठी तुमचा सहभाग महत्वाचा आहे " 

@दिपाली जोशी

Tuesday, December 28, 2021

Sunday, December 26, 2021

Employment-news- 25th December 2021 to 31st December 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 25th December 2021 to 31st December 2021

Saturday, December 18, 2021

Technician Apprentice (Mechanical) / (Civil) @ INDIAN OIL CORPORATION LIMITED

 VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR-PUNE 413106

 Job Alert 2021

INDIAN OIL CORPORATION LIMITED (Marketing Division) Southern Region, IndianOil Bhavan, No.139, Uttamar Gandhi Road, Chennai - 600034

Advertisement No. IOCL/MKTG/SR/APPR/2021-22 Phase-II Notification for Engagement of Trade/Technician Apprentices under the Apprentices Act , 1961 at IOCL-Southern Region (MD)

For Discipline Code – 26/32/38/44/50 –Technician Apprentice (Mechanical) –3 years Diploma in Mechanical Engineering with minimum 50% marks in aggregate for General and OBC & 45% in case of SC/ST/PwBD candidates for reserved positions from a recognized

For Discipline Code – 29/35/41/47/53- Technician Apprentice (Civil) – 3 years Diploma in Civil Engineering with minimum 50% marks in aggregate for General and OBC & 45% in case of SC/ST/PwBD candidates for reserved positions from a recognized Institute/University. 

Candidates are advised to carefully read the full advertisement for details of Educational Qualification and other eligibility criteria before submission of online application on or before 27th December 2021 @ 5 p.m. 

FOR DETIAL ADVT. CLICK HERE


REFER- EMPLOYMENT NEWS  11 -17 Dec 2021

Employment-news- 18th December 2021 to 24th December 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 18th December 2021 to 24th December 2021

Employment-news- 11th December 2021 to 17th December 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 11th December 2021 to 17th December 2021

Thursday, December 16, 2021

पुस्तक :Deep Work लेखक - कँल न्यूपोर्ट लेखमाला : भाग तिसरा

पुस्तक :Deep Work
  लेखक - कँल न्यूपोर्ट
       लेखमाला : भाग तिसरा

#गहनतेने_कार्य_कसे_करायचे 
       गहन कार्य करायचे तर लागते तीव्र इच्छाशक्ती
पण कधीकधी इच्छाशक्ती कमजोर पडू शकते 
त्यामुळे गहन कार्यासाठी वेळ निश्चित करणे ही पहिली गरज आहे 
आणि व्यवस्था बनवणे ही दुसरी गरज आहे आणि त्यानंतर  मुद्राभय ,समविचारी लोकांची सोबत आणि  Professionalism च्या साहाय्याने गहन कार्य आपण करू शकतो.

🔶 वेळनिश्चिती
वेळ निश्चित करताना आपले खालीलपैकी कोणतेतरी एक तत्व निश्चित करावे लागेल

1. #वैराग्यदर्शन
यात कमी महत्त्वाच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करून एका ध्येयासाठी समर्पित राहून गहन कार्यासाठी सगळा वेळ देणं
उदा. प्राचीन ऋषींनी केलेली तपसाधना 

2.#द्विरुप_दर्शन
यात आपला उपलब्ध वेळ दोन हिश्श्यात भागायचा अर्धा भाग गहन कार्याला आणि अर्धा भाग इतर कामांना
उदा. आठवड्यातील चार दिवस गहन कार्याला आणि उरलेले तीन दिवस इतर कार्यासाठी ठेवायचा. हयात फक्त एकच दोष आहे की लवचिकतेचा अभाव आढळतो.

3.#लयबध्द_दर्शन
हयात कामाची एक लय किंवा एक साखळी बनवली जाते जी निरंतर सवयींच्या रूपाने पाळली जाते
हयाने गहन कार्याला सवयीच्या रूपाने पाहिले जाते.
उदाहरणार्थ : सकाळी 12 ते 1  आणि रात्री 9-10 हा वेळ गहन कार्यासाठी राखीव ठेवायची आणि सवयी प्रमाणे त्याचे पालन करायचे

4.#पत्रकारिता_दर्शन
हया पद्धतीत जेव्हा जसा  जिथे जेवढा वेळ मिळेल तिथे गहन कार्यासाठी वापरला जातो .
सध्याच्या काळात वेळ साधण्यासाठी ही पद्धत उत्तम आहे
उदाहरणार्थ : पत्रकार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा संपादकीय अथवा शोधलेख लिहून काढतात

🔶 व्यवस्था बनवा 
अशी व्यवस्था बनवा ज्यात आपण वेळ ,स्थान, नियमांसहीत निश्चितपणे विनाअडथळा गहन कार्य सुरू करू शकतो.

🔶मुद्राभय 
गहन कार्याचे आपल्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न आणि पैसा हया दोघांची उत्तम गुंतवणूक होणे गरजेचे आहे ज्यामुळे आपली काम टाळायची वृत्ती कमी होईल आणि वचनबद्धता वाढेल.
उदा. पुस्तक लिहायचे असेल तर महागड्या हाँटेल मध्ये काही दिवसांसाठी रूम आरक्षित करणे

🔶 समविचारी लोकांची सोबत
गहन कार्य व्यवधानाशिवाय पार पाडणे जरी महत्त्वाचे असले तरीही वेळोवेळी योग्य सल्ला मार्गदर्शन सहकार्य आणि प्रेरणा तेवढीच गरजेची आहे त्यामुळे तसे समविचारी सहकारी मार्गदर्शक यांच्या बरोबर गहन कार्य करा

🔶 Professionalism
लक्ष्य गाठण्यासाठी गहन कार्य करताना आपण रणनीती ठरवणे आणि तिची शिस्तबद्ध काटेकोर अमंलबजावणी करणे गरजेचे आहे
त्यासाठी 4DX अनुशासन पद्धती खूपच फायदेशीर ठरते
1.फक्त महत्त्वपूर्ण गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे आणि ध्यान भटकवणार्या गोष्टींना स्पष्ट नाही म्हणायला शिकणे.
2.मुख्य युक्तींवर काम करा
आपल्या कार्याचे मूल्यमापन करताना जिथे आपण मागे आहोत अशा चुका सुधारा आणि जिथे अग्रेसर आहोत तिथे आणखी सुधारणा कशा करता येईल यावर भर द्या
3.स्कोरबोर्ड बनवा
आपली स्वतः शी स्पर्धा असावी त्यासाठी चुका सुधारण्यांसाठी आणि यशाच्या मार्गावर प्रेरित करण्यासाठी स्कोरबोर्ड चा वापर करता येईल 
तसेच गहन कार्य आणि त्यावर घालवलेला कालावधी आणि त्याची उत्पादक रिझल्ट तपासता येईल
4. उत्तरदायित्व भावना निर्माण करा
सप्ताहातून एकदा नियमितपणे कार्याची समीक्षा करून आपल्या कार्याची प्रगतीची खात्री करून घ्यावी.

उर्वरित भाग लेखमालेच्या पुढील अंकात

Nilesh Shinde 

Wednesday, December 15, 2021

पुस्तक :Deep Work लेखक - कँल न्यूपोर्ट लेखमाला : भाग दुसरा

पुस्तक :Deep Work
  लेखक - कँल न्यूपोर्ट
  लेखमाला : भाग दुसरा

आपण दोन प्रकारची कामे करू शकतो
1.सहजगत्या करता येणारी कामे
2.गहन अथवा सखोल कामे

▪️गहन किंवा सखोल कार्य म्हणजे एखादे संशोधन, एखाद्या समस्येवर खोलवर विचार करून शोधून काढलेला तोडगा जो व्यावसायिक  आणि व्यक्तीगत आयुष्याची पातळी उंचावेल. 
नवी मूल्ये प्रस्थापित केली जातील. समाज बदलेल आणि एकूणच अर्थव्यवस्था आणि बरोबरीने राष्ट्राचा विकास होईल
▪️गहन कार्य हे एकप्रकारे मानसिक परिश्रम असतात ज्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे
▪️सखोल किंवा गहन कार्य आजही अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रात गरजेचं आहे उदा. अकाउंटंट, डॉक्टर, आर्किटेक्ट, सायंन्टिस्ट प्रोग्रामर इत्यादी...हयांनाही नवी टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठीही सखोल कार्य करण्याची गरज असते

#सखोल_कार्याचे_महत्त्व_काय_आहे
जीवनात यशस्वी व्हायचे असेल माणसाला  दोन गोष्टींवर लक्ष द्यावे लागते एकतर स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वतःच्या काम करण्याची पद्धत

आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला खालील तीनपैकी एका समूहात  सामील व्हावे लागेल 

1.High Skilled worker  
हे असे लोक असतात जे जटिल मशीनवर काम करण्याचे कौशल्य सहजगत्या शिकून घेतात 
उदाहरणार्थ .Analytics, High speed communication,Data Visualization

2.Superstar Worker:
हे असे लोक असतात जे कंपनीतील Top Position ला पोहचलेले प्रतिभावान व्यक्ती ज्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आतंरराष्ट्रीय  बाजारावर छाप पाडतात

3.Owner:
अर्थव्यवस्थेत तेजीने विकसित होणारया क्षेत्रात  इन्व्हेस्ट करणारे लोक जे टेक्नॉलॉजी जाणतात

हया समूहात जाण्यासाठी दोन उपाय आहेत
1. अवघड कार्यात महारथ प्राप्त करून
2.उत्तम गुणवत्ता आणि तेज गतीने उत्पादन करण्याची योग्यता वाढवून

1.आजकाल नवीनीकरणाच्या आणि तेजीने बदलणार्या अर्थव्यवस्थेत अवघड महारथ प्राप्त करण्यासाठी जास्त वेळ आपल्याकडे नसते त्यावेळी गहनता आणि एकाग्रतेने कौशल्य लवकरात लवकर शिकून त्यावर महारथ प्राप्त करावे लागेल.
त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि मनाला वश करावे लागेल.संपूर्ण ध्यानपूर्वक मेंदूच्या मायलिन न्यूराँन्सच्या सर्किटचा विकास करावा लागेल.

2. गहन कार्यातून उच्च उत्पादकता मिळवण्यासाठी
आपली उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला कामाला अलग अलग हिश्श्यात वाटून त्यासाठी निश्चित कालावधी ठरवावी लागते.
ठरवलेली कामे पूर्ण करायची असेल तर मोठ्या कालावधी साठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. तसेच कामे ठरवल्यानुसार  होतात की याचीही वेळोवेळी समीक्षा करणे गरजेचे आहे.

#गहन_कार्य_दुर्लभ_का_आहे
गहन कार्य अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचे आहे हे आपण पाहिलेच आहे , पण इन्स्टंट मँसेज,इमेल्स,फोन काँल्स,मिटींग्ज ,प्रेझेन्टेशन तसेच सोशल मिडीयावर सतत आँनलाईन आणि अँक्टिव्ह राहणे हया सार्यामुळे सूचनेच्या आदान प्रदानातच खूप सारा वेळ खर्ची जातो. आणि त्यामुळे गहन कार्य व्यक्ती कडून होत नाही. 
तसेच यामुळे व्यक्तीची वैयक्तिक उत्पादकता आणि योगदान मोजता सुद्धा येत नाही.

▪️न्यूनतम प्रतिरोध सिद्धांत
सोप्या आणि सुविधाजनक व्यवहार ज्यात कुठल्याही अडथळा येत नाही अशा क्रिया  कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय करत राहणेच माणसे पसंद करतात आणि अल्पसंतुष्टीसाठी दीर्घकालीन सुख लाथाडणे,योजनाबद्ध विकास नाकारणे,
ध्यानकेंद्रितपणे गहन कार्य नाकारणे हयाला न्यूनतम प्रतिरोधाचा सिद्धांत मानली जाते.

#गहन_कार्याची_महत्त्वपूर्ण_कशी_आहे
गहन कार्य तीन कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे
1.तांत्रिक (Neurological)
2.मानसिक (Psychological)
3.तात्विक (Philosophical)

1.तांत्रिक :
जिथे आपण आपले लक्ष केंद्रीत करू त्याच गोष्टीचे मेंदू विचार निर्माण करतो
त्यामुळे सकारात्मक गोष्टी वर ध्यान केंद्रित केले तर आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू शकतील
2. मानसिक 
सुनिश्चित लक्ष्य,अडचणीवर मात करायची तयारी, तनमन व ध्यानकेंद्रित समर्पित जीवन ही माणसाची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. त्यामुळे माणूस फ्लोमध्ये येतो
आणि पोटापुरते न जगता स्वविकासा व जगदकल्याण यावर भर देतो
3. तात्विक 
मनापासून स्वीकारलेले काम माणसाला संतुष्टी प्रदान करते आणि जबरदस्तीने थोपवलेले असेल थकवा आणते
उद्देशाशी ,विकासाशी नाते जुडल्याने माणूस उच्च कार्य करू शकतो अन्यथा तो एकदिवस असाच नामशेष होऊन जातो

उर्वरित लेखमालेच्या पुढील भागात

Sunday, December 12, 2021

शरद पवार यांच्यावरील माहितीपट

 


                                                                     VIDYA PR ATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

शरद पवार यांच्यावरील माहितीपट 


शरद पवार यांच्यावरील पीएच.डी प्रबंध

 

 
VIDYA PR ATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

शरद पवार यांच्यावरील पीएच.डी प्रबंध 


भारताच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व

 


VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

भारताच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व


Books of Hon. Sharadchandraji Pawar (Book Review)

  


VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

Books of Hon. Sharadchandraji Pawar (Book Review)


Saturday, December 11, 2021

अधिकतमाहुन अधिकतर

अधिकतमाहुन अधिकतर
लेखक- महात्रिया रा

घरची जबाबदारी निभावण्यासाठी अव्यक्तला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी नोकरी जाॅईन करावी लागली. घरची सारी जबाबदारी अचानक त्याच्यावर येऊन पडली. 

पुण्यात पिटरच्या हाताखाली नोकरी सुरू झाली. कडक शिस्तीचा भोक्ता असणारा पिटर त्याला खलनायक वाटु लागला.
माझं तरूणपण मरतंय असं त्याला वाटु लागलं. 
माझं वय सिनेमा पाहण्याचं आहे, मुलींसोबत फिरण्याचं आहे. नि मी ते न करता गाढवओझे वाहतोय जीवनाचे. असेच अव्यक्तला वाटते. म्हणुन अव्यक्त राजिनामा देतो. 
पिटर म्हणतो, "तू ऑफिसमध्ये माझ्यासमोर खुलुन बोलणार नाहीस. बाहेर भेट मला. एकदा बोलु भरपूर. मगच राजिनामा स्विकारेन."

ठरल्याप्रमाणे भेट होते.
"तुला इतर तरूण मुलांसारखी मजा करायची असेल, तर तू एक सामान्य तरूणच राहशील. पण "वेगळी वाट" धरून चिकाटीने, जिद्दीने, नीतीने, कष्टाला न घाबरता मार्गक्रमण करशील, तर असामान्य तरूण बनशील. तुला "कुणीही" बनायचंय की "कुणीतरी खास" बनायचंय?"असं बोलत पिटर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो.
अव्यक्तला तो खांद्यावर ठेवलेला हात आधाराचा, मैत्रीचा वाटतो. पिटरचे बोलणे खोल खोल ह्रदयात उतरते. 
आणि मग पिटर राजिनामा फाडुन टाकतो.

जीवन हे भूतकाळातली रडगाणी गात बसण्याचं साधन नाही. तर भविष्यकाळासाठी नियोजनबद्ध पावले टाकण्याचं साधन आहे.

या आणि अशा अनेक सकारात्मक गोष्टी वाचायच्या असतील, तर वाचा अधिकतमाहुन अधिकतर.

हु मुव्हड् माय चीज?

हु मुव्हड् माय चीज?
लेखक- स्पेन्सर जाॅन्सन
(स्टोरीटेल या अॅपवर ऐकलेले पुस्तक)

आपल्या आयुष्यात सवयींना फार महत्व आहे. 
एखादी गोष्ट वारंवार केल्याने आपल्याला त्याची सवय लागते. 
एकदा एखादी सवय लागली की ती बदलणं आपल्याला अवघड वाटतं.
मग ती कोणतीही गोष्ट असो.

एखाद्याला मोठ्या घरातुन छोट्या घरात रहायला जावं लागलं, तर तो ते पटकन स्विकारत नाही.
एखाद्याची व्यवसायाच्या ठिकाणी ट्रान्स्फर झाली, तर तो ती बदली पटकन स्विकारत नाही.
एखाद्याला साधा ड्रेसकोड बदललेला सुद्धा स्विकारणे मुश्किल होते.
गाव बदलले, खाणे बदलले, मित्र मैत्रिण बदलले, तरी व्यक्ती बेचैन होते.

पण बदल हा नेहमी वाईटासाठीच होत नसतो. कधीकधी बदल हा भल्यासाठी सुद्धा असतो. प्रगतीकारकही असतो. 

पण आपल्या मनातल्या भीतीपायी आपण तो स्विकारायला तयार होत नसतो.

असा एखादा बदल घडल्यावर तो कसा सहजतेने स्विकारावा, त्यानुसार आपल्यातही कसे बदल घडवुन आणावेत, हे जाणण्यासाठी उपयुक्त/ मदतगार पुस्तक म्हणजे "हु मुव्हड् माय चीज?".
शैलजा दीक्षित.

Human Rights Day

                                                                           


                           

Vidya Pratishthan Polytechnic College Library, Indapur, 

                         ONLINE QUIZ ON

                        Human Rights Day Quiz 2021     
The United Nations has announced that the theme of Human Rights Day this year will be “equality”. It has taken the theme from Article 1 of the UDHR, which says: “All human beings are born free and equal in dignity and rights.”
Vidya Pratishthan Polytechnic College Library, Indapur, organizing the online Quiz on the occasion of Human Rights Day 

Participate in online Quiz and receive e-Certificate  of the participation to your correct email Id. 

CLICK HERE TO ATTEND ONLINE QUIZ

Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--चंदनाचे हात

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-८०
 पुस्तकाचे नांव--चंदनाचे हात
 लेखकाचे नांव--लेखक - प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे
प्रकाशक-संस्कृती प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जून २०१८/तृतीय आवृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१२४
वाङमय प्रकार --ललित
मूल्य--१४०₹

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 ८०||पुस्तक परिचय
         चंदनाचे हात
लेखक - प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे 

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
"एखादा एखादा गुणधर्म सांगण्यासाठी आपण प्रतिकांचा वापर करतो. जे चिरंतर आहे त्याला 'अमृत' म्हणतो.जे अखंड आहे त्याला'आकाश' म्हणतो.आणि जे स्वतः झिजून इतरांना सुगंध देते. त्याला 'चंदन' म्हणतो. चंदन हे त्याग,प्रेम मांगल्य, करुणा, सेवा अशा मूल्यांचे प्रतीक आहे. ही मूल्य देणारे हात ज्ञानोबा-तुकोबा, विवेकानंदांसारख्या संतमहंतांना लाभले होते.अशी दातृत्वाची धन्यता ज्या हातांना लाभते त्यांनाच'चंदनाचे हात' म्हणतात.हे हात आम्हाला दातृत्वाचा सुगंध आणि सुसंस्कृत मानव्याचा प्रकाश देतात." हे विचार सुगंध 'चंदनाचे हात' या वैचारिक ग्रंथातील प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या लेखणीच्या अक्षर प्रकाशाने...आपण सगळेजण या प्रकाश किरणांत मन उजळून घेऊया.विवेकदीप प्रज्वलित करूया!

जीवन उन्नत करणारे साहित्य आकाराने छोटे-मोठे असो ते काळाच्या उदरात गडप होत नाही. जीवनाला उन्नत करणाऱ्या या साहित्य कृतींना समाजाच्या विस्मृतीचा शाप नसतो.रसिक वाचकांच्या अंत:करणात पिढ्यान पिढ्या सत्ता प्रस्थापित केलेल्या साहित्यकृती आणि त्यांचे वाचक हे सदैव चिरतरुणच राहतात. निदान आपले उमदेपण जपण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी, मनव्यापक उदार होण्यासाठी अंतर्यामी हे साहित्याचे झरेखळाळले पाहिजेत.हे झरे जीवनाला प्रवाही ठेवतात.जगण्याला नाद देतात.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते वाचण्याची तृष्णा भागवून मनाला तृप्त करतात.मनाचे बळ वाढवायला असे काही ग्रंथ असावेत.त्यापैकीच एक वैचारिक प्रबोधन करणारा ग्रंथ 'चंदनाचे हात' हा ख्यातनाम साहित्यिक व्याख्याते म्हणून नावलौकिक असलेले प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचा आहे.

गेल्या तीन दशकांपासून मानवतेचा अखंड जागर मांडणारे साध्या सरळ विचारांचे जागरण करणारे,समाज सुधारकांना दैवत मानून सुधारणांचे विचारवैभव लोकांपर्यंत अमोघ वाणी आणि लेखणीने पोहचविणारे प्रभावी प्रसिध्द व्याख्याते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचा हा ग्रंथ आहे.त्यांना अनेक पारितोषिके आणि पुरस्कार देऊन  सन्मानित केले आहे.महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार व उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यकृतिसही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 'चंदनाचे हात'हा ग्रंथ साहित्य वाचनाचा आस्वाद घेऊन, आपण जीवनात आनंद कसा मिळवावा याची जाणीव करून देतो.असे विचारधन डॉक्टर यशवंत पाटणे यांनी ललित प्रबोधनात्मक लेखातून व्यक्त केले आहे.या ग्रंथांत प्रतिभावंत साहित्यिक वाणीचे माधुर्य आणि विचारांचे ऐश्वर्य लाभलेले प्राचार्य यशवंत पाटणे यांची,वैचारिक पुष्पे उद्याच्यापिढीला ऊर्जा,प्रेरणा,भक्ती शक्ती आणि करण्याची प्रेरणा आणि संस्कार देतील.

संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक ज्येष्ठ आणि सन्मित्र कीर्तनकार हरिभक्त परायण श्री प्रमोद महाराज  यांच्या स्नेहसंवाद आणि सात्त्विक सहवासामुळे 'चंदनाचे हात'हा ग्रंथ साकारला यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे जीवन कार्य म्हणजे चंदनी वृक्ष असल्याची प्रचिती'चंदनाचे हात'हा वैचारिक अमृतकुंभ ग्रंथाचा रसास्वाद घेताना  येते. संकटाच्या महाभयानक सर्पांनी वेढलेले असताना आपल्या अभंगातून सात्त्विक गंध देणाऱ्यांचे जीवनव्रत त्यांनी निष्ठेने जपले.आणि मराठा सारस्वताला ज्ञानाचा अमृतकुंभ बहाल केला.त्यांचे अभंग जगण्याचे आत्मभान देतात. अंतकरणातल्या माणुसकीला ईश्वराची साद घालतात.वैचारिक लेखांचे रसग्रहण करताना अखंड वाचनदीप तेवत ठेवावा वाटतो.

'चंदनाचे हात'हा सुविचारांचा प्रबोधनात्मक ग्रंथ असून यात जगतगुरु संत तुकोबारायांचे अभंग, ओवींचे निरुपम  विविध उदाहरणे दाखले गोष्टी सुविचार चरण कथा आदी शब्दांच्या सात्त्विक सौंदर्यातून गुंफले आहे.संपूर्ण लेखमालिका
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग व ओवींचा अर्थ सांगणारी आहे.संत सज्जन थोर व्यक्तींची लक्षणे आणि सद् वर्तन यांचीमाहिती लेखाचे वाचन करताना पानोपानी लक्षात येते.

लेख वाचतानाच लेखणीची खासियत आणि प्रतिभा तर लेखकांच्या संतसाहित्य अभ्यासाची व प्रगल्भतेची ओळख अधोरेखित होते.इतकं प्रवाही रुचेल आणि पटेल अशा मधाळ रसदार ओजस्वी भाषेत ३४ लेखांचे निरुपण आणि प्रवचन असल्याची अनुभूती येते.

यातील 'वैचारिक अवतरणे' वाचताना मनस्वी आनंद मिळतो. लिखित संग्रह करण्याचा मनात येते.वास्तव,यथार्थ व समर्पक विवेचनातून जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या आदर्श जीवनाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. कारण जीवन कार्य आणि अभंगवाणीचे चित्रण म्हणजे 'चंदनाचे हात'हा प्रबोधनात्मक ग्रंथ वाटतो. इतका निर्मळ,सकस व सात्त्विक विचारांचा अक्षरदीप आहे. निवेदक तथा सूत्रसंचालनकरणेसाठी या पुस्तकातील उपयोगी संस्मरणे व परिच्छेद वेचक व वेधक आहेत. संग्राह्य असणे अत्यंत आवश्यक वाटते.इतकं अवीट,मधाळ व रसाळ शैलीत संस्कारातील अभंगांचे निरुपम केले आहे. बहुसंख्य अभंग, ओवी,संस्मरणे आणि वेचे विचार प्रवर्तक आहेत.'एक तरी ओवी अनुभवावी' या अभंगवाणीने 'अनुभवाचे भावमहात्म्य' या लेखाने पुस्तकाचे अंतरंग प्रथमतःउलगडते.
'छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण घेतलेल्या अनुभवांचे वाचक,लेखक आपणच असतो. आपला जीवनग्रंथ नानाविध अनुभवातून सिध्द होत असतो. 'शाळेतल्या धड्यापेक्षा अनुभवातून मिळालेला धडा सदैव उपयोगी पडतो.
'वेळेचे महत्त्व' सांगताना संत ज्ञानेश्वरांच्या ओवींचे ममत्त्व उलगडतात.'तो जात वेल्हाळ| ज्ञानाचे वेळाऊळ|हे असो निखळ|ज्ञानचि तो||
बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हे मानवी जीवनातील तीन महत्त्वाचे टप्पे.तसे तीन गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असतात.वेळ, ऊर्जा आणि पैसा (संपत्ती).बालपणात वेळ व ऊर्जा पुष्कळ असते.तेथे पैसा दुय्यम.तारुण्यात ऊर्जा भरपूर ,त्या जोरावर पैसा कमविता येतो.पण कुटुंबाने कुठं फिरायला जाऊया म्हटले तर वेळ नसतो.वृद्धवात गाठीला वेळ व पैसा पण ऊर्जा कोठून आणायची? म्हणून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात ऊर्जा आवश्यक आहे.ती विचारातून येते. जीवनाचे सोने करते.म्हणून, "आयुष्यात येणारे क्षण आनंदाने, उत्साहाने आणि वृत्तीच्या प्रसन्नतेने उजळून टाकते.हाच खराजीवनगौरव होय.

संवाद कौशल्य म्हणजे बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या अंत:करणात प्रवेश करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संवाद. संवादातील शब्द कोरडे नसतात.शब्दांना भावार्थ असतात.  संवादात कधी मृदू भावनांचे पाझर असतात, तर कधी उद्रेकाचे कठोर प्रहार असतात. शब्दांना फुलांचा गंध असतो तर कधी शस्त्राची धार असते. शब्द दुवा असतात, दवा असतात. तर कधी शब्दच उभा दावा निर्माण करतात. शब्द जीवाचे जीवन असतात. संत तुकोबाराय शब्दालाच देव मानतात..
' शब्दां नाही धीर| ज्याची बुद्धी नाही स्थिर| त्याचे न व्हावे दर्शन|

ईश्वराने माणसाला जीभ दिली, त्या जिभेची दोन कार्ये असतात.एक ताटातले अन्न पोटात टाकणे आणि दुसरे पोटातले शब्द ओठातून बाहेर टाकणे.त्या संवादातील शब्दांना मांगल्याचा स्पर्श असेल तर शब्दांची ओवी होते.पण त्या शब्दांना क्रौर्याचा स्पर्श असेल तर त्या शब्दांची शिवी होते.आपण ठरवायचे ओवी गायची की शिवी द्यायची. लागट बोलायचे की लगट करायचे.संवाद माणसांना जिंकण्याची, हरलेल्या माणसांना उभारी देण्याची कला आहे.बोचरे जीवन हसरे करण्याची किमया संवादातूनच साधता येते. संंवादातील कटुता शक्यतो टाळून,गोडवा जपला तर  हृदयाहृदय एक होतात नि तिथेच मग जगणे एक आनंदाचे गाणं होतं.

संत म्हणजे समाजाच्या प्रांगणातील मानवतेची वृंदावने.माणूस हाच संतांच्या चिंतनाचा विषय असतो. मराठी संस्कृतीवर जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा खोलवर अक्षरठसा उमटविला आहे. वाळवंटात झरा भेटावा तसे संत भेटतात.झरा हा निसर्गनिर्मित असतो.पण संतांच्या अंतरंगातील मानवतेचा झरा हा स्वनिर्मित असतो. तहानलेल्या जीवांनासुखावण्यासाठी यांचा जन्म असतो.त्यांचे अवघे जीवन परोपकारी असते. वंदनीय असते.

उमलते फुल उगवता सूर्य आणि उगाळलेले चंदन यातले सौंदर्य आणि सुगंध सार्‍या मानव सृष्टीला मोहवून टाकते.या सौंदर्याची आणि सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही.संत तुकोबा हे सांगतात,' ना लगे चंदना पुसावा परिमळ| वनस्पती मिळेल हाकारूनी||'सुगंध सृष्टीला बहाल करण्यातच चंदनी वृक्षाची सार्थकता असते.पावसाची सर पडली की, मयूर मातीच्या गंधाने धुंद होतो आणि पिसारा फुलवून नाचू लागतो. मेघाला हे सांगावे लागत नाही,' हे मयुरा, मी कोसळलो रे…आता नाच.' सूर्याला सांगावे लागत नाही, मी प्रकाशलो... आता जागे व्हा.' चंदनाचे आणि सुगंधाचे, मेघाचे आणि मयूराचे, सूर्याचे आणि प्रकाशाचे नाते अतूट असते.असे नाते माणूस आणि माणुसकीचे, ईश्वरी भक्तीचे आणि सात्विक शक्तीचे असते.जगतगुरु संत तुकोबांचे अभंग या अशा नात्याला बळकटी देतात.त्यांचे उपदेश मनाचे उन्नयन आणि सत् प्रवृत्तीचे संवर्धन करणारा आहे.मानवी स्वभावातील विसंगतीचे मजेशीर दर्शन वाचकांना घडत जाते.

दातृत्वाची धन्यता ज्या हातांना लाभते त्यांनाच 'चंदनाचे हात' म्हणतात.हे हात आम्हाला दातृत्वाचा सुगंध आणि माध्यमांचा प्रकाश देतात.समाजात बाभळीची झाडे पुष्कळ आहेत.पण चंदनाची झाडे मात्र शोधावी लागतात.तर  महामानवांच्या रुपाने ती इतिहासाच्या पानांवर विराजमान आहेत.त्याग, सेवा, प्रेम अशा मूल्यांमुळे ती संस्कृतीला प्रकाशमान करतात.'तमसो या ज्योतिर्गमय'हा संस्कृतीचा मंत्र आहे.

'काय सांगू संतांचे उपकार| मज निरंतर जागवती||' आमचा प्रत्येकदिवस गोड करणाऱ्या, आम्हाला जागविणाऱ्या जगतगुरु संत तुकोबारायांचे अभंग सदैव जगाच्या कल्याणासाठीअंत:स्फूर्ती  देत राहतील.आपण या संत विभुतीला विनम्र वंदन करुया. अनुभव, व्यावहारिक शहाणपण आणि दूरदृष्टी यांचे घट्ट नाते जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगात दिसते.मायमराठीला विश्वपातळीवर विराजमान करण्याचे कार्य ज्ञानोबा-तुकोबाच्या ओवी- अभंगांनी केले आहे.

लेखक प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अत्यंत सुंदर शब्दांत अभ्यासपूर्ण लेखमालिकारसाळ शैलीत प्रवाही केली आहे.'चंदनाचे हात' या पुस्तकातील मौलिक विचारधन रसिकांना वाचायला निश्चितच आवडतील. संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.

परिचयकर्ता-श्री रवींद्ररकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक -३०ऑक्टोंबर २०२१
 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿

पुस्तकाचे नांव--मी माणूस शोधतोय!

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-८५
पुस्तकाचे नांव--मी माणूस शोधतोय!
लेखकाचे नांव--व.पू.काळे
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण फेब्रुवारी, २०२१
एकूण पृष्ठ संख्या-१४०
वाड्मय प्रकार ---कथासंग्रह

मूल्य--१३०₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
              ८५|पुस्तक परिचय
               मी माणूस शोधतोय!
              लेखक: व.पु.काळे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
 वपुंच्या लेखनामागचा हेतू काय असेल?
त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर---माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला.कधी खऱ्या स्वरुपात,कधी खोट्या स्वरुपात, तर कधी संपूर्ण स्वरुपात; पुष्कळदा तो निसटलाही. या माणसानं मला  कधी रडवलं,कधी हसवलं, कधी भुलवलं,कधी हरवलं, कधी पुरवलं,कधी थकवलं,कधी बैचेन केलं,तर कधी अंतर्मुख….
तरीही माझा शोध चालूच आहे. आणि चालूच राहणार; माझा 'पेशन्स'दांडगा आहे.याचं श्रेयही पुन्हा माणसांनाच आहे.वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.प्रत्येक शोधाचा काही निष्कर्ष असतो. सिद्धांत असतो माझा शोध पूर्ण झालेला नाही; पण निष्कर्ष सापडला आहे.जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.वपुंना भेटलेल्या या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपु 'स्टाइल'मध्ये 'मी माणूस शोधतोय!' 

हा कथासंग्रह रसिक वाचकांना माणसांची अनेकविध व्यक्तिरेखा साकारतो.अन् अशीही स्वभाव गुणांची माणसं असतात.याचा मनात विचार प्रगटतो.आपल्या अवती भवती अशी माणसं काहीअंशी आपणाला भेटलेली असतात. याच्याही स्मृती वाचताना लक्षात येतात.सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी भावस्पर्शी कथा, कादंबरी व विचार वैभवांचे लेखन करणारे जेष्ठ प्रतिभावंत लेखक वसंत पुरुषोत्तम काळे,तथा रसिक वाचकांचे लोकप्रिय 'वपु काळे'. त्यांच्या विचारधनाचे वेचे हल्लीच्या सोशल मिडीयाचा काळातही मनाचा ठाव घेऊन विचार करायला लावतात.अनेकजण स्टेटस् अथवा फेसबुकवर शेअर करतात.पेशाने वास्तुविशारद असणाऱ्या वपुंनी अनेक शब्दांचे राजवाडे आणि महाल उभारुन आपल्या भावस्पर्शी कथांनी रसिक वाचकांच्या मनावर गारूड केले आहे. 

व्यक्तींच्या आचार विचारांच्या पद्धतीला वपु 'पॅटर्न' म्हणायचे. अनेक कथांमध्ये त्यांनी 'पॅटर्न्स' मांडले आहेत. आपल्या बरोबरच आपल्या अवतीभवती दिसतात, असतात म्हणूनच ते पॅटर्न वाचताना वाचक दाद देतात.कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहतं आणि मनाला चटका लावून जातं.ही अशीचजीवनाची तऱ्हा सहज सोप्या शब्दातून त्यांनी अनेक कथांमधून मांडलेली आहे.व.पु. काळे उत्कृष्ट लेखक, कथाकार, व्हायोलिन वादक , हार्मोनियम वादक,उत्तम फोटोग्राफर आणि उत्तम रसिक होते .त्यांच्या सुंदर कथा मनावर व विचारावर आधारीत आहेत.हे मनाचे कंगोरे उत्तम  निरीक्षणामुळे त्यांच्या कथा वाचताना आपणाला पुढे काय घडेल? याची उत्कंठा लागत असते. वपु काळेंनी साहित्यातील अनेक क्षेत्रे काबीज केली आहेत.
कथा कादंबरीतून रसिकांना आनंद वाटला.ही वाट एकटीची,ठिकरी, वपूर्झा,गुलमोहर,पार्टनर ,मोडेन पण वाकणार नाही,गोष्ट हातातली होती, मी माणूस शोधतोय! सखी आणि वपु सांगे वडिलांची कीर्ती आदी अक्षरशिल्पांचे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.अमेरिका येथील मराठी साहित्य संमेलनाचे 'अध्यक्षपद' त्यांना बहाल करून साहित्यिक म्हणून सन्मान केला होता.तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा पु.भा.भावे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.

अनेकजण 'रंग मनाचे' दाखवणाऱ्या वपुंना आपला पार्टनर मानतात. आणि हा पार्टनर आणि त्यांचे लेखन रसिकांच्या मनात अगदी खोलवर विराजमान झाले आहे. हा असाच दोस्ती निभावणारा रसिक वाचकांचा लेखक कथेच्या पॅटर्न मधून भेटत राहिले.असा एक पॅटर्न दाखविणारा 'मी माणूस शोधतोय!' हा कथासंग्रह आहे.यातील माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिंच्या कथा वाचताना काळजाला भिडतात.

या कथासंग्रहात अकरा कथांची अवीट मेजवानी रसास्वादासाठी आहे.यातील प्रत्येक कथानकात माणसाच्या अंतरंगातील आणि व्यक्तिमत्त्वातील इतरांपेक्षा वेगळे स्वभावगुण टिपून त्यांची शब्दचित्र कथा खुमासदार शैलीत मांडलेली आहे.प्रत्येक कथा वाचताना आपले कुतूहल शिगेला पोहचविते.पुढं का? नेमकं काय झाले असेल? असं वाटतं ,त्यामुळे वाचनाची उत्कंठा वाढते.आणि समारोपात त्या कथेचा खरा आशय लक्षात येतो.इतकं आपण कथा वाचताना त्यात रंगून जातो. खास वपु स्टाईल कथांची वेगळीच खासियत आहे.याचा प्रत्यय प्रत्येक कथेचे रसग्रहण करताना लक्षात येतो.
'मी माणूस शोधतोय!'या कथा समुदायात मी माणूस शोधतोय, हप्ता,अंतर, हुतात्मा,रमी, मुहूर्त, टाहो, टेरिलिन, शोध,ऋतू बसंती रुठ गया, आणि नालायक अशा अकरा कथांचा समावेश आहे.लेखकाच्या प्रत्येक कथासंग्रह प्रकाशनानंतर हमखास शुभसंदेश पाठविणारा अवलिया कौतुक सप्तर्षी.पण पत्रावर पत्ता न लिहिणारा पठ्ठ्या. कादंबरी प्रकाशनासाठी निमंत्रण पत्रिका पाठविताना याचं नांव डोळ्यासमोर येते.पण त्याचा तो पत्ता, कसा मिळवितात.तो मिळविल्यावर ते त्याच्या लालबागच्या वस्तीतील खोलीपर्यंत जाऊन त्याच्या बरोबर गप्पा मारुन आणि केलेल्या निरीक्षणाची कथा म्हणजे.'मी माणूस शोधतोय'.

कौतुक सप्तर्षी हा अवलिया माणूस आहे. त्याचे विविध क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेल्या व्यक्तींसोबत फोटो आहेत.त्याचं वर्तमानपत्रा विषयीचे विचार मनात घर करून जातात. "वर्तमानपत्र असं आपण म्हणतो खरं,पण खरं तर सगळी वर्तमानपत्रं भूतकाळ छापतात. तिसरं आणि चौथं पान मात्र भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतात.भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानांवर दिसतात.किती माणसं ते विक्रम वाचतात.

"शाळेत असताना शिस्तप्रिय प्राचार्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र देऊन सुरू झालेला पत्र प्रवास गेली बावीस वर्षे निरंतर व अव्याहतपणे सुरू आहे.लेखक कवी,गायक, नाटककार,आघाडीचे कलाकार अशा सर्वांना तो शुभसंदेश पाठवून कलाकार आणि त्यांच्या साहित्यावर निस्सीम प्रेम करणारा कलारसिक कौतुक सप्तर्षीची कहाणीअप्रतिम शब्दांकनात आहे. त्याचा संपूर्ण जीवनकार्याचा रंगमंच उलगडून दाखवला आहे.शेवटी कथाकार म्हणतात की,एका खारीची म्हणजेच कौतुक सप्तर्षीची अंत्ययात्रा पाहून मी दिपलो.मुग्ध झालो.यात्रेबरोबर चालत होतो. एक माणूस सापडता सापडता हातून निसटला होता.."

'हप्ता' कथेत त्यांच्याच कार्यालयातील कर्ज देणाऱ्या कृष्णाजी विष्णू दोंदे याची कहाणी मांडलीय.त्याच्या जीवन जगण्याच्या पध्दतीचे आणि व्यक्तीचे वर्णन खुमासदार शैलीत केले आहे.अति पैसा मिळविण्यासाठी माणसं कशी जगतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोंदे होय.

'अंतर' या कथानकात नियती माणसाला "एखाद्या दालनात शिखरावर नेऊन बसविते.आणि त्याचा, त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य,अगदी क्षुद्र करुन सोडते. "हेच अंतर सोदाहरण स्पष्ट केले आहे.

'हुतात्मा' ही कथा वस्तीत गुंडगिरी करणाऱ्या रतनची आहे.मेजर नाबर रतनला त्याच्याच अड्यावर व घरी जाऊन मारतात.आणि नंतर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला सैन्यात भरती व्हायला सांगतात.ती कथा छानच रंगविली आहे.कथेची सुरुवात वेगळ्या घटनेतून करून खरंपण शेवटी कळतं.इतकी कथा उत्कंठावर्धक आहे.

रमी नावाच्या मुलीसोबत जोकर नावाचा मुलगा लहानपणापासून ते 'रमी'चे लग्न होईपर्यंत एकत्र असतो.रमी प्रसादतुल्य वाड्यात वडिलां सोबत तर जोकर आईसोबत आउटहाऊस मध्ये रहात असतो. रमीच्या लग्नात जोकर बरोबर न बोलणारा तिचा पती कॅप्टन गोगटे मात्र आठच दिवसात फोन करून बोलावतो.ती कथा 'रमी'अतिशय सुंदर शब्दात मांडली आहे.

मुहूर्त पाहून कार्य सिद्धीस नेणारे बंडोपंत भिडे यांचे व्यक्तीचित्र म्हणजे सहकार्य आणि मदत कशी करावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे 'मुहूर्त'कथा आहे.अगोदर त्यांचं वागणं कोडं वाटतं.पण काळवेळ प्रसंगी आपण कसे वागावे याचा आदर्श वास्तूपाठ या कथेतून प्रकर्षाने जाणवतो.

केशव गाडगीळ जेवत्या ताटावर रुदन करणारा.कारण ताटातील अन्नपदार्थ पाहून त्याला त्याच्या बहिणीची आणि आईची आठवण येते.आणि तो रडतच राहतो.कारण त्याची आई आणि बहीणीचा मृत्यू उपासमारीने त्याच्या देखत झालेला असतो.त्यामुळे तो उपाशीपोटी राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशी हृदयद्रावक आणि भावस्पर्शी कथा'टाहो'आहे.वाचताना मन हेलावून जाते.

'टेरिलिन' ही कथा  माणसाच्या बाह्यांगापेक्षा त्याच्या अंतरंगाचे कवाडं उघडून दाखविणारी आहे. त्याची कृतीच खरं सौंदर्य आहे. मनमोहन आणि त्याची पत्नी यांची कथा.कुरुपता आणि सौंदर्य यांचं अचूक माहिती या कथेत आहे. टेरिलिन कापडाच्या शर्टासारखं मार्मिक उदाहरण असलेली कथा 'टेरिलिन'कथा.

अनु मनोनिग्रह करून स्वत:ची पाच वर्षे एकटीपणाने आयुष्य जगण्यासाठी मुंबईत येते.आणि के.ई.एम.मध्ये नर्सिंगची नोकरी मिळविते.अत्यंत प्रामाणिकपणे काम करत राहते.तिला एका आजारी मुलीनं ती तिच्याशी चांगली वागते म्हणून खाऊसाठी घेतलेली एक रुपयाची नोट आईजवळ निधनापूर्वी देते. तीची आठवण म्हणून अनु ती एक रुपयाची नोट टेबलाच्या काचेखाली आठवण म्हणून ठेवते. तीच नोट सुट्टे पैसे देण्यासाठी भिड्यांना मुक्तता देते.

त्याच एक रुपयाच्या नोटेची कथा. माणसाच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविणारी 'शोध'कथा. हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हा मिळत नाहीत.नर्सिंग आणि रिक्षाचा व्यवसाय या सेवा समानच आहेत. असं रिक्षाचालक अनुला सांगतो. कारण त्याची मुलगी तर कायमची त्याला सोडून गेलेली असते.तर अनुला तिची नोट भिडे काका- रिक्षाचालक- हाॅटेल मालक शंकर असं करत करत मिळते. त्या शोधाची 'शोध'कथा अप्रतिम आहे.

लहान मुले म्हणजे वसंतऋतूच. कथाकाराला  शेजाऱ्यांच्या लहान मीनाचा लळा लागलेला असतो. शेजाऱ्यांच्यात भाच्याचे लग्न असते. त्यामुळं बरेच पाहुणे आलेले असतात.कार्यालयात लवकर जाण्याच्या गडबडीमुळे ते त्यांच्यातील एका पाहुण्या महिलेला मीनाला लग्नाला घेऊन येण्याचं सांगतात.पण अचानक मीना घरातून नाहिशी होते.ते रोमांचक आणि भावस्पर्शी कथानक 'ऋतू बसंती रुठ गयी' आहे.

'नालायक'ही गोष्ट मास्तर आणि भुतपूर्व विद्यार्थ्यांच्या वर्तनाची कथा आहे.तीन वेगवेगळे विद्यार्थी मास्तरांच्या घरी येतात. दोघेजण आमचं करिअर तुमच्या त्या शब्दांमुळे कसं बरबाद झालं याचा लेखाजोखा मांडतात.तर तिसरा विद्यार्थी एम.ए.होऊन पुढील शिक्षणासाठी परदेशी निघालेला असतो. तेंव्हा आशिर्वाद घेण्यासाठी आलेला असतो.तो म्हणतो. "ज्यांच्या नालायक,नालायक या शेऱ्यांनी माझ्या मनात असल्यास करण्याची इच्छा व ईर्षा निर्माण होऊन मी मनापर्यंत पोचलो.ते पहिले यश माझ्या गुरुचरणी."त्याच वेळी मास्तरांच्या डोळ्यात आनंदाश्रु जमतात.अशी कथा.

 'मी माणूस शोधतोय'या कथासंग्रहातील सर्वच कथा रसपूर्ण, भावपूर्ण आणि माणुसकीचे पैलू दर्शविणाऱ्या आहेत.त्या वाचताना कुतुहलाने उत्कंटा वाढते. नातेसंबधातील वीण आणि वागणं,कृती आणि वृत्ती,सहकार्य आणि मदत  यांचं कथेचा रसास्वाद घेताना वपुंची विचारशील शैली, इत्यंभूत वर्णन आणि चपखल शब्दांनी रसिकांना मंत्रमुग्ध करते.

अप्रतिम!लेखणीस आणि शब्दमहर्षी साहित्यिक वपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांस त्रिवार वंदन!!!
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- ९ नोव्हेंबर २०२१

🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾🍂🍃

🍀🌿

पुस्तकाचे नांव--भूतान एक आनंदयात्रा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-८६
 पुस्तकाचे नांव--भूतान एक आनंदयात्रा.....
 लेखकाचे नांव--राजेंद्र वाकडे
प्रकाशक-श्रीशैल्य प्रकाशन, तारळे,पाटण
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- मे २०२१/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१५१
वाङमय प्रकार ----प्रवासवर्णन 
मूल्य--१५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
८६||पुस्तक परिचय
भूतान एक आनंदयात्रा
लेखक-राजेंद्र वाकडे
****************************************
सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदारआणि सिक्किमचे भूतपूर्व महामहिम राज्यपाल आदरणीय माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांचा शुभसंदेश 'भूतान…. एक आनंदयात्रा'या प्रवासवर्णनपर भ्रमणगाथेला लाभलेला आहे. "लेखक आणि भ्रमंतीकार श्री राजेन्द्र वाकडे यांचे निसर्ग ,पर्यावरण व हिमालयावर असणारे प्रेम आनंदयात्रेचे वाचन करताना पानोपानी दिसून येते. सैनिकांविषयी असणारी आत्मियता आणि अनुभव वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.सुक्ष्मपणे स्थळांचे निरीक्षण करून त्यावर चिंतन- मनन करून प्रवासातील त्यांच्या सहलीचे अनुभव मांडले आहेत." 

'कलकत्ता-दार्जिलिंग-सिक्किमसह भूतान एक  आनंदयात्रा' या पुस्तकातील त्यांचे अनुभव  यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात आम्हाला वाचनाची मेजवानी मिळाली होती. व्हाटसअप समूहावर त्यांनी दररोज लेखमालिका प्रसिद्ध करून आम्हा समस्त मित्रपरिवाराला घरबसल्या सहल घडवून आणली होती.ती यथार्थ,समर्पक शब्दांची पखरण करुन बहारदारपणे खुलविलेल्या लेखामालिकेतून. वाचताना प्रत्यक्ष भेटीची अनुभूती मिळत होती. अक्षरशः अप्रतिम शब्दसाजात त्यांनी क्रमशः लेखमालिका गुंफली होती.पुढील भाग वाचण्याचे कुतूहल निर्माण व्हायचे.इतकं दमदार प्रवासवर्णन केलेलं होतं.स्वत:फिरणं आणि त्याचं लेखन वास्तवपणे करणं तसं जिकरिचं आणि कठीण काम असतं.पण हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले.त्यांच्या खुमासदार शैलीमुळे त्यांचा खास चाहतावर्ग लॉकडाऊनच्या काळात विस्ताराने संवर्धित झाला.त्यांची आणि माझी ओळख नावापुरती मर्यादीत होती ती लॉकडाऊनच्या काळात प्रवासवर्णाच्या लेखामुळे तिचा परीघ वाढला.तसेच मी केलेल्या 'साठवणीतल्या आठवणींचे' प्रवासवर्णन ग्रुपवर शेअर करीत होतो.त्याचे त्यांनी अनेकदा फोन वरुन माझ्याशी संवाद साधून कौतुक केले आहे. शुभसंदेशात सदिच्छा दिल्या,आणि लिहिते हात सदैव ठेवण्याचीआत्मप्रेरणा दिली.

लेखक व भ्रमंतीकार  श्री.राजेंद्र  वाकडे बहुआयामी प्राथमिक शिक्षक आहेत. कथा- कविता लेखन, कथाकथन हा त्यांचा छंद असून, सूत्रसंचालन हा त्यांचा आवडीचा व्यासंग आहे.निसर्ग पर्यटनाची व भटकंतीची त्यांना आवड आहे.काही काळ त्यांनी दैनिक सकाळ आणि पुढारी वृत्तसेवेत पत्रकारिता केलेली आहे.शिक्षण आणि शिक्षकांचा दर्पण म्हणून लौकिक असलेल्या 'जीवन शिक्षण' मासिकात त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते उपक्रमशील शिक्षक असून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव तालुकास्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्काराने'झालेला आहे. आयडियल टिचर्स अकॅडमीचे ते क्रियाशील सदस्य आहेत.

योगायोगाने १०नोव्हेंबर रोजी एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटण येथे गेलो होतो.तिथं आमचे साहित्यिक शिक्षकमित्र श्री गणेश तांबे यांच्या भेटीला गेलो असता, सौ.व श्री राजेन्द्र वाकडे सरांची भेट झाली.यापुर्वी आभासी माध्यमातून झालेला संवाद तिथं प्रत्यक्ष भेटीतून हितगुज केले.हॉटेल अशोकात कॉफी-पे एकमेकांच्या पुस्तकांची चर्चा करीत, कॉफीचा आस्वाद घेतला.'लव- फलटण'सेल्फिपॉईंटवर पुस्तकांची स्नेह भेट एकमेकांना दिली.मोबाईलमध्ये ती आठवण भेट टिपली.

भ्रमणगाथेतील आनंदयात्रीचे साक्षीदार असणाऱ्या मित्रवर्य व उपक्रमशील शिक्षक, छांदिष्ट व जय गुरुदेव व इतर समूहातील मित्रांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रेमळ सूचनेतून या प्रवासवर्णनाची लेखमालिका 'भूतान एक आनंदयात्रा' आवृत्ती त्यांनी रसिक वाचकांना लोकार्पण केली आहे. दिमाखदार सोहळ्यात'भूतान एक आनंदयात्रा ' या भ्रमण गाथेचा प्रकाशन सोहळा साहित्यिकांच्या मांदियाळीत, विविध मान्यवरांच्या शुभहस्ते, आनंदयात्रीचे सहप्रवासी आणि हितचिंतकांच्या समवेत संपन्न झाला होता.माझे डी.एड.चे वर्गमित्र आदरणीय दीपक भुजबळ बापू यांनी राजेंद्र बोबडे लिखित 'भूतान एक आनंदयात्रा' हे प्रवासवर्णनपर हे पुस्तक १२ सप्टेंबरला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिले होते.

लेखमालिकेत स्थळ काळाचे वर्णन ओघवत्या व प्रवाहीशैलीत केले आहे.सहज साध्या सोप्या  भाषेत केलेले लेखन वाचताना कुतूहल वाढतच जाते. त्यांचे सर्वच लेखन वाचनीय ठरले होते.व्हाटस अप समूहातील  वाचक मित्रांनी अगोदरच पसंतीची मोहोर उमटवली होती.
"बोलणे असो वा लिहिणे असो, जेंव्हा ते अंत:करणापासून व्यक्त करावेसे वाटते, तेंव्हाच ते अमृतमय होते.आनंदमय होते. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे,की लेखकाने अनुभवलेला प्रांत आणि आसमंत,आपणही प्रत्यक्ष पाहावा. अनुभवावा अशी एक आंतरिक ओढ,हे पुस्तक वाचकांच्या मनात निर्माण करते. लेखक राजेंद्र वाकडे यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला, काळजात जपलेला, निसर्ग सौंदर्याचा हा अक्षरठेवा,'भूतान… एक आनंदयात्रा 'पुस्तक रुपाने रसिक वाचकांना बहाल केला आहे. त्याचा मनस्वी आनंद घेऊया आणि उस्फूर्तस्वागत करुया." प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे जेष्ठ विचारवंत सातारा यांनी मलपृष्ठावर आनंद यात्रेच्या प्रवासाची भ्रमणगाथा अधोरेखित केली आहे. ती मनाला स्पर्शून जाते आणि वाचण्याचे कुतूहल वाढविते.

लेखकाने ही साहित्यकृती स्वर्गीय आई-वडील व त्यांचे प्रेरणास्थान ज्यांनी फिरण्यास आणि लिहिण्यास प्रोत्साहन दिले,आत्मबळ दिले.त्या सौ. शैलजा वहिनी आणि त्यांच्या लाडक्या कन्या प्रियंका व स्वरांजली यांना अर्पण केली आहे.
या भ्रमणगाथेस सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीनिवास पाटील साहेब, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी आदरणीय श्री महेश पालकर साहेब, दैनिक सकाळचे पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे यांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत.

' राजभवनमधील आशीर्वाद भवन हॉलमध्ये., राजभवन मधील flag down कार्यक्रम..,एका बड्या हस्तीचे आगमन,राज्यपाल महोदयांच्या सोबतचे सोनेरी क्षण, मोठ्या मनाचा माणूस, पाटील साहेबांविषयीची एक आठवण..'हे लेख आदरणीय माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या विषयी त्यांच्या कार्याची महती रेखाटली आहे.महोदयांच्या सोबतचे रंगीत फोटोही आकर्षक असून लेखमालिकांची उंची अधोरेखित करतात.

'भूतान एक आनंदयात्रा'या भ्रमण गाथेस निसर्गावर प्रेम करणारे निसर्ग अभ्यासक आणि भ्रमंतीकार व्याख्याते सन्माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री यांची प्रस्तावना लाभली आहे.ते म्हणतात की,"जगातील सर्वात आनंदी देश भूतान.या देशातील प्रेक्षणिय स्थळांचा लिखित दस्तावेज मराठी भाषेमध्ये घेतलेला मोलाचा ठेवा आहे.पुस्तकातील सर्वच छायाचित्रे बोलकी व आकर्षक आहेत.प्रवासातील बारकावे आपण वेधक वेचक नजरेने टिपले आहेत. सृष्टीच्या सौंदर्याचे वर्णानातून दर्शन घडतंय,हा उत्कट अनुभवमिळण्याचं भाग्य वाचक रसिकांना मिळतेय."  

"हे रुक्ष प्रवासवर्णन नसून , पाहिलेल्या ठिकाणांची जंत्री नसून, हिरव्याकंच निसर्गाच्या कुशीत शिरून लुटलेल्या आनंदाची अक्षरदौलत आहे.आपली मराठी अस्मिता जपणाऱ्या माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सहवासातील सुवासिक नोंदी वाचून आपलीही मान अभिमानाने उंचावते."असे कौतुकास्पद सुविचार 'ज्ञानयात्रींची भ्रमणगाथा' या लेखातून मांडतात.

मनोगतात लेखक मैत्री टूर ते पुस्तक आवृत्तीचा प्रवास कसा झाला.हे मनोगतात व्यक्त होतात. सर्व सहकार्य वृत्तीच्या ज्ञातअज्ञात हातांविषयी निरलसपणे कृतज्ञता व्यक्त करतात.प्रवासाचा आनंद मित्रांसोबत घेऊन आनंदानुभवाची अनुभूती रसिक वाचकांना यावी.याच उद्देशाने त्यांनी हा लेखनप्रपंच करुन  प्रवासवर्णनाचे 'भूतान एक आनंदयात्रा' पुस्तक निर्माण केले आहे.सहल यातल्या करणाऱ्या पर्यटकांना  मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून ,गाईड म्हणून उपयोगी पडणारी ही भ्रमणगाथा आहे.

'कलकत्ता-दार्जिलिंग-सिक्किमसह भूतान एक  आनंदयात्रा' या गाथेत ६६लेख आहेत. २०१६ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या सहल प्रवासाचे वर्णन खुमासदार  शैलीत बहारदारपणे खुलविलेले आहे. लेखमालिकेचे नावेही आशय ठळक करणारी आहेत.अनेक घडलेले छोटे छोटे किस्से , गमतीजमती आदी स्थळकाळाची माहिती समर्पक शब्दांत मांडली आहे. पहिल्याच परदेश आणि इतर राज्यांच्या प्रवासाच्या उत्साहाची इच्छापूर्ती कशी झाली याचे वर्णन म्हणजे आनंदयात्रा.ओळखीच्या मित्रांशी दिलखुलासपणे आणि अनोळखी व्यक्तींशी परिचय करून मित्रता वाढवत केलेली भटकंती म्हणजे आनंदयात्रा.भूतान मधील स्वर्गीय निसर्ग सौंदर्याने भुरळ घातल्याने त्यांच्यातील कवीमन जागे झाले. आणि स्वरचित 'तू' कवितेच्या ओळी आठवतात.

जीवनाच्या त्या अनोख्या वाटेवरती
भेट तूझी झाली होती
बरसल्या होत्या चांदण्या
दिवसा रात्रभर झाली होती.
श्वासात तू ,हृदयात तू 
अष्टदिशातील माझा 
परिमल असे तू
आता उरल्या फक्त आठवणी
धुंद त्या क्षणांच्या..
स्वप्नातीत मनातील भावना आज कवितेने खऱ्या केल्या.याचा प्रत्यय आला.

टायगरहिल वरील सूर्योदयाची नजाकत पहायला बोचणाऱ्या थंडीतही पहाटे पर्यटक बहुसंख्येने दिसतात.ती काय सूर्योदयाची विलोभनीय दृश्ये दिसत असतील. त्याचे वर्णन अप्रतिम शब्दसाजात केले आहे.वाचताना प्रत्यक्ष आपणा समोरच सूर्योदय होतोय.असा भास निर्माण होणारं लेखन आहे.वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचते.
"सूर्यनारायणाच्या आगमनाचा रमणीय सोहळा अनिमिष नेत्रांनी बघणारे सहस्रजण." अशा वर्णनिय लेखाचे रसग्रहण करताना आनंद मिळतो. 
भारत व चीन सरहद्दीवरील  नथु-ला या १४०००हजार फुट उंचीच्या ठिकाणाचे वर्णन वाचताना यात्रेकरुंनी पर्यटकांनी कसे नियोजन करावे याची महत्त्वाची माहिती 'नथुलाच्या दिशेने व नथुलाच्या रस्त्यावरील वाढत्या थंडीचा कडाका..'या लेखातून समजते.तसेच नथुला आंतरराष्ट्रीय बॉर्डर ,भारतीय जवानांची राष्ट्रनिष्ठा आणि बाबा हरभजनसिंग मंदिर या लेखातील वर्णन वाचताना अद्भुतरम्य कहाणी वाटते.चैतन्यदायी माहिती समजते. वाचताना आपण भारावून जातो. खडतर वातावरणात देशाची सेवा करणाऱ्या जिद्दी सैनिकांचा अभिमान लेखातील प्रत्येक वाक्यातून समजत जातो.

लेखनमालिकेच्या समारोपात ज्यांनी व्हाटस अपवरुन कौतुक केले. लिखितअभिप्राय दिले. प्रतिक्रिया दिल्या.आनंदयात्रीविषयी मोबाईलवर संवाद साधला, हितगुज केले.त्या समस्त लेखमालिकेतील लेखास दाद देणाऱ्या सर्वंच वाचक मित्रांचा नामोल्लेख आवर्जून केला आहे. लेखनमालिकेचे प्रेरणास्थान आणि लेखाच्या पहिल्या वाचक त्यांची पत्नी सौ.शैलजाताई आणि कन्या स्वरांजली तसेच मोबाईलवर दररोज लेखन (टाईप) करणारी कन्या प्रियांका यांच्या  सहकार्यामुळेच लेखमालिका आणि पुस्तक तयार झाले हे नमूद करतात.

आनंदाची सफर 'भूतान एक आनंदयात्रा' प्रवासाची गाथा मार्गदर्शक म्हणून आपल्या संग्रही असावे असे वाटते.अप्रतिम अनमोल  अक्षरठेवा पुस्तक रुपात रसिकांना बहाल केला आहे. रसग्रहण करुन त्याचा आनंद घेण्यासाठी या पुस्तकाचे स्वागत करुया.

पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- ११ नोव्हेंबर २०२१
यापूर्वीचे पुस्तक परिचय, कविता व भटकंती वाचन्यासाठी
raviprema.blogspot.com या ब्लाॅगला भेट द्या.
############################
पुस्तक मिळण्याचा पत्ता व संपर्क  

 लेखक श्री राजेंद्र पांडुरंग वाकडे
तारळे ता.पाटण जि.सातारा
पिन कोड-४१५०१४
मोबाईल:९४२१६०८२२३

पुस्तकाचे नांव--आत्मप्रेरणा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-८७
पुस्तकाचे नांव--आत्मप्रेरणा
लेखकाचे नांव--लक्ष्मण जगताप
प्रकाशक-परिस पब्लिकेशन्स, सासवड
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी २०२०
एकूण पृष्ठ संख्या-१५२
वाड्मय प्रकार --ललित
मूल्य--१६०₹

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

  ८७||पुस्तक परिचय
       आत्मप्रेरणा
लेखक:लक्ष्मण जगताप

#############################

वाचनयात्री पुरस्काराने सन्मानित झालेले लेखक गणेश तांबे, फलटण यांनी वाचन साखळी समूहातील सदस्य शिक्षक मित्रवर्य लेखक लक्ष्मण जगताप लिखित 'आत्मप्रेरणा' पुस्तकाचा परिचय माहे डिसेंबर २०२०मध्ये करून दिलेला होता.तो परिचय वाचून पुस्तक वाचण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

तदनंतर माझ्या मुलाचे लग्न २७ डिसेंबर ला छोटेखानी समारंभात आयोजित केले होते.लग्नसमारंभात उपस्थित शिक्षकमित्रपाहुणे व निमंत्रितांचे स्वागत शाल-बुके ऐवजी बुक (पुस्तकं) देऊन करण्याचामानस होता.म्हणून गणेश तांबे सरांमार्फत लेखक जगताप सरांनी संपर्क साधून संवाद साधला.पुस्तके देण्याची विनंती केली.त्यांनी त्वरीत तांबे सरांकडे पाठविली.त्याच्याकडून आत्मप्रेरणा पुस्तकाच्या आवृत्या घेऊन,आणि इतर नामवंत लेखकांची मिळून एकंदर ७५ पुस्तकांची सन्मानाने लग्नप्रित्यर्थ पुस्तकभेट उपस्थित सन्माननिय स्नेहीजण व पाहुण्यांना दिली.त्यामुळे 'आत्मप्रेरणा'या पुस्तकाशी आमच्या संपूर्ण कुटूंबियांचा भावनिकओलावा आहे.ऋणानुबंध जुळले आहेत. म्हणूनच आदरणीय लेखक सन्मित्र लक्ष्मण जगताप लिखित 'आत्मप्रेरणा' या पुस्तकाचा परिचय करून देणं,माझं परम कर्तव्य आहे.  परंतु माझ्याकडे एकही आवृत्ती उपलब्ध नव्हती.
योगायोगाने १०नोव्हेंबर २०२१ मध्ये धार्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने फलटणला गेलो होतो.लेखक राजेंद्र वाकडे यांचीही अचानक भेट झाली. त्यावेळी आमचे परमस्नेही वाचकयात्री श्री गणेश तांबे यांनी घरी नेऊन आदरातिथ्य केले.गप्पांची मैफिल रंगली.तदनंतर निरोप घेताना सरांनी प्रेमाने मला शाल व श्रीफळ दिले.आणि पुस्तक भेट देताना नकळतपणे मी बोलून गेलो. 'सर , आत्मप्रेरणा पुस्तक असेल तर द्या, किंवा उपलब्ध करून पाठवून द्या.' त्वरीत सरांनी त्यांच्या सेल्फमध्ये शोधायला सुरुवात केली.अन्  हवे ते पुस्तक गवसले. ते मला आठवण म्हणून सरांनी भेट दिले.आणि परिचयासाठी मला 'आत्मप्रेरणा' पुस्तक मिळाले.
लेखक लक्ष्मण जगताप हे पेशाने शिक्षक असून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी,अभिरुची वाढविण्याचे कार्य करणाऱ्या 'वाचनसाखळी' फेसबुक समूहाचे सदस्य आहेत.त्यांचा लेखन हा व्यासंग आहे. महाराष्ट्रातील नामवंत दैनिक सकाळमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे.विशेषतः दैनिक सकाळमधील मुक्तपीठ, आधारवड, मोकळे व्हा आणि गुदगुल्या आदी सदरामध्ये त्यांनी लेखन केले आहे.
औरंगाबाद येथील जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखनाचा पुरस्कार प्रदान करणेत आला होता.तसेचपावनभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली यांनी सामाजिक कार्याबद्दल 'समाज सेवा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बारामती येथे संपन्न झालेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनात'आत्मप्रेरणा'पुस्तकास उत्कृष्ट ललित साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे, लेखक व संपादक दैनिक सकाळचे (यिनबझ) संदीप काळे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते बारामती येथे संपन्न झाला होता.
लक्ष्मण जगताप यांनी लिहिलेलं 'आत्मप्रेरणा'हे पुस्तक मागण्यांचे मांगल्य आहे.दुसऱ्याला सतत काहीतरी देण्याची वृत्ती जेव्हा बळावते. तेव्हा माणसाची खऱ्या अर्थाने चांगुलपणाकडे वाटचाल सुरू झालेली असते. जगताप यांनी आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचं काम केलय.प्रत्येक लेखात त्यांनी नव्यापिढीला आपला अनुभव आणि चांगुलपणा देण्यात कोणतीही कसर सोडली नाही.व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कार किती महत्त्वाचे असतात,यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त झालेले विचार प्रेरणादायी ठरतीलच.हे पुस्तक तरुणाईसाठी आणि विशेष करून शालेय मुलांसाठी महत्त्वाचे ठरणारआहे. त्यांनी जागल्याची भूमिका पार पाडली आहे.

जसे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सतत मागणी करणारे कैवल्याचे मांगल्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आजही जगताप यांच्यासारख्या शिक्षकांमध्ये आपले काही अंश ठेवून जातात. अशाच देणेकरांच्या भावनेतून हे पुस्तक साकारलय."

अशा अप्रतिम शब्दांत लेखक व संपादक श्री संदीप काळे यांनी प्रस्तावना दिली आहे.ती वाचतानाच पुस्तकाची आशयगर्भता लक्षात येते.

मराठी साहित्याची सेवा करणारे अनेक नवे लेखक अन् कवी येत आहेत.पण त्यांचे लिखाण कथा, कादंबरी आणि कविता याच भोवती सिमीत असते.लक्ष्मण जगताप सरांसारखे फार कमी असे लेखक आहेत,की जे वैचारिकदृष्ट्या काहीतरी सकस आणि दर्जेदार लिहिण्यासाठी पुढं येतात.नव्याने बदल घडावा या भावनेने लिहितात. संत ज्ञानेश्वर- तुकोबा यांच्यापासून चालत आलेल्या तत्वज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासाची कल्पना व परिभाषा अशीच पुढे स्वामी  विवेकानंद ते भारत रत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पर्यत एक सुसंस्कारीत व वैचारिक पायंडा पडला आहे.तरुणाईला त्यांच्या स्वप्नांची पुर्ती करण्यासाठी त्यांचे पुस्तक आदर्श पथदर्शक आहे.याचा प्रत्येक पुस्तकाचा आनंद घेताना लक्षात येते.तसेच हा पुस्तकातील प्रकरणे वाचत असताना त्यातील विचार आणि कृतीयुक्त अनुभव मनाला स्पर्शून जातात.असे प्रोत्साहनात्मक पुस्तके देणारे लेखक विरळेच असतात.  

'आत्मप्रेरणा'पुस्तकास शुभेच्छा देताना प्रसिद्ध लेखक उमेश मोहिते म्हणतात की,"या पुस्तकातील लेख उमलत्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिशा-दिग्दर्शन करण्याच्या हेतूने लिहिलेले आहेत. पालकांचे वैचारिक मंथन या लेख वाचनातून होईल.उद्याचे विश्वाचे आधारस्तंभ वाढत्या वयात वास्तवाच्या कोलाहलात निराश होऊन कोमेजून न जाता चारित्र्यवान व गुणसंपन्न व्हावीत.भावी पिढीचे भविष्य प्रकाशमान व्हावे ,हीच लेखकाची खरी तळमळ आहे.

"ध्येयाप्रती पोहोचण्याची प्रबळ भूक आणि मनाची शक्ती तुमच्याबरोबर असल्यास या विश्वात तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जीवनाची उत्कर्ष करण्याची आस असलेल्या प्रत्येक मुलाला उपयोगी पडते,ती फक्त आत्मप्रेरणा, मनगटातील ताकद आणि अपयशाला तुडवत यशाचा रस्ता धुंडाळण्याची शक्ती,आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द. आजच्या तरुणाईवर माझा खूप विश्वास आहे. फक्त त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणेचीखऱ्या अर्थाने गरज आहे.म्हणूनच लेखनप्रपंच मांडला आहे." असे मनोगतात या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण जगताप तळमळीने व्यक्त होतात. 

'आत्मप्रेरणा'यापुस्तकात एकूण ३९लेखआहेत.प्रत्येक लेख विचारांचा वास्तूपाठ आहे.लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या लेखातील आशययचे सार चौकटीत अधोरेखित केले आहेत.विचार ,सुविचार आणि उदाहरण देऊन लेखाची सहज सुंदर सोप्या ओघवत्या शैलीत समजून देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. याची प्रचिती पानोपानी चाळताना लक्षात येते. त्याच लेखमालिकेतील वैचारिक अमृतकुंभातील आशयगर्भता प्रस्तुत करणारी रचना केली आहे. वैचारिक शब्दसागर काव्यरचनेत गुंफण्याचा प्रयत्न केलाय...

         आत्मप्रेरणा

शब्दांच्या गोडव्याने परीघ ओळखत
मनमोकळा निर्भेळ संवाद साधूया
आत्मप्रेरणेने जिगरीचे झरे शोधत
व्यक्तीमत्त्वाचा विकास साधूया…

तरुणाईत चांगुलपणा शोधण्याची
त्यांच्या स्वप्नांनासत्यातउतरविण्याची
कष्टाच्या पूजेने गगनभरारी घेण्याची
कौतुकाने प्रोत्साहन व प्रेरणा देण्याची…

राग तुलना अहंकाराला द्या मूठमाती
प्रेमळ वर्तनाने बनतील सुखाची नाती
सकारात्मक विचारांची पेरुया भक्ती
सुयशाला प्रयत्नांची इच्छाशक्ती……

मुलांची सातत्यपूर्ण सर्वांगीण  गुणवत्ता
आकड्यांच्या फूटपट्टीने मापू नका 
आवडीच्या क्षेत्रात करीअर करायला 
त्यांच्या पंखात आत्मप्रेरणेचे बळ द्या…

सगळेच लेख वाचनिय आहेत. शब्दबंबाळ करणाऱ्या संज्ञा, आकलनापलीकडील कठीण शब्द आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या भाषेत उलगडून दाखवले आहे.रसाळ मधाळ भाषेतील लेख वाचताना बोजडपणा जाणवत नाही. शिषर्काशी समरसता साधणारा घटक त्याचे सुंदर स्वरुपात विवेचन. सोप्या शब्दात अर्थ उलगडण्याची पध्दत छानच आहे.यातील संस्मरणे, वेचे,कोटेशन्स विचारचक्रच फिरवितात. मंथन करायला प्रवृत्त करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यातील गुणदोषांचा उलगडा होतो.मग सकारात्मकता कशी निर्माण करावी.याची माहिती यातील लेखांचा रसास्वाद घेताना लक्षात येते.याच लेखातील वेगळेपणा आणि पालक शिक्षक आणि बालकांना विचार करायला प्रवृत्त करणारी काही वेचे,सुविचारमौक्तिके आणि शब्दअमृत...
'आपल्या क्षमता व कौशल्य जगापुढे मांडण्यासाठी तुम्हाला आत्मप्रेरणाच उपयोगी ठरते.आपल्या मनात दडलेली प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आपल्याला घडवत असते.'

'शालेय वयात मुलांना खऱ्या मानसिक आधाराची गरज असते. आपण सगळ्यांनाच गुणदोषाच्या तराजूत तोलत असतो.चांगले काय, वाईट काय हे लवकर त्यांच्या लक्षात येत नाही.त्याची जाणीव आपल्याला करुन द्यावी लागते. माणसातील चांगुलपणा आधी पहावा मग दोष, कारण चांगुलपणा पाहिल्याने तो माणूस आपल्याला आवडायला लागतो. विचारांची बैठक कळते.मैत्री निर्माण होते.आणि त्यातूनच स्नेहाची आपुलकी निर्माण होते.' 

'जशी दृष्टी तशी सृष्टी'अतिशय अर्थगर्भित असा उपदेशात्मक सुविचार आहे.चांगल्या नजरेने आणि निर्मळ भावनेने जगाकडे बघितले तर जग निश्र्चितच चांगले वाटते.आणि प्रत्येक माणूसहीचांगला वाटू लागतो.'अप्रतिम भावविभोरता या विचारात सामावली आहे.

'सुंदर अक्षर हा दागिना आहे.'हा विचार सापेक्षपणे व्यक्त करणारा हा लेख आहे.हस्ताक्षर म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे.ते तपासण्याचा हा लेख.
माणसाचा स्वभाव हस्ताक्षरावरुन कसा असेल?याची प्रचिती हा लेख वाचताना येतो.
'कोणतेही काम करताना मनावरील दडपण आणि भीती झुगारून टाकली पाहिजे.मग आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत तयार होतो.जो शेवटपर्यंत आपल्याला पूर्णत्वाकडे आणि यशाकडे घेऊन जातो.धावण्याच्या शर्यतीत धावणारे स्पर्धेत अंतिम रेषेपर्यंत मी जिंकणारच असे मनाला वारंवार सांगून, शेवटच्या क्षणाला विजयश्री खेचून आणतात.ते शक्तीशाली मनामुळेच…' 

आपले मन प्रसन्न आणि आनंदी ठेवायचे असेल तर सतत सकारात्मक विचारांचे चिंतन केले पाहिजे.आपले मनच आपल्यासाठी शक्तीशाली आणि प्रेरणादायी असते. अशक्य गोष्ट शक्य करण्याची किमया आपल्या मनात असते. म्हणनूच म्हणतात की,'' इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर हो ना.'' मनाची शक्तीच आपली कायापालट करु शकते.

 तुम्हाला यश मिळविण्यासाठी कष्टाची पूजा कशी घालावी.कोणत्या पथावरुन मार्गक्रमण करीत जावे. भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल  कलाम विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणतात त्याप्रमाणे,"झोपेत पडतात ती स्वप्ने नव्हेत. तुम्हाला झोपूच देत नाहीत ती खरी स्वप्ने.'' स्वप्नांचा पाठलाग करा, कष्टाशिवाय पर्याय नाही.जबाबदारी खांद्यावर घ्या. इतरांना संगतीला घ्या.त्यांच्या गुणांची व कल्पनांची कदर करा. नावीन्यतेने आणि सर्जनशीलतेने नवर्या कल्पनांना जन्म द्या.यासाठी मळलेल्या वाटेने न जाता वेगळी तुमची वाट तयार करा.स्वप्न सत्यात उतरुन तुम्ही यनस्वी व्हाल!"

संवाद-संभाषण कौशल्य म्हणजे बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या अंत:करणात प्रवेश करण्याचेप्रभावी माध्यम म्हणजे संवाद.नातील विचार प्रकट करण्याचे माध्यम 

"ईश्वराने माणसाला जीभ दिली, त्या जिभेची दोन कार्ये असतात.एक ताटातले अन्न पोटात टाकणे आणि दुसरे पोटातले शब्द ओठातून बाहेर टाकणे.संवादातील शब्दांना मांगल्याचा स्पर्श असेल तर शब्दांची ओवी होते.पण त्या शब्दांना क्रौर्याचा स्पर्श असेल तर त्या शब्दांची शिवी होते.आपण ठरवायचे ओवी गायची की शिवी द्यायची.लागट बोलायचे की लगट करायचे.संवाद माणसांना जिंकण्याची, हरलेल्या माणसांना उभारी देण्याची कला आहे.बोचरे जीवन हसरे करण्याची किमया संवादातूनच साधता येते.संंवादातील कटुता शक्यतो टाळून, गोडवा जपला तर हृदयाहृदय एक होतात नि तिथेच मग जगणे एक आनंदाचे गाणं होतं."

प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे जेष्ठ विचारवंत सातारा यांच्या 'चंदनाचे हात'या पुस्तकातील संवाद कौशल्य पहिला प्रभाव..संभाषण' या लेखातील वरील विचारांची  आठवण येते.
जगतगुरु संत तुकोबाराय शब्दालाच देव मानतात..' शब्दां नाही धीर| ज्याची बुद्धी नाही स्थिर| त्याचे न व्हावे दर्शन|
'शब्दांच्या दुनियेत'हीशब्दमाला म्हणजे शब्दरुपी गंधित फुलांची परडीच वाटते.धीराचा एकच शब्द आयुष्याला उभारी देतो.शब्दांची उत्तम किमया या लेखातून स्पष्ट होते.शब्दार्थ आणि उच्चारण यांचा सुंदर मेळ घातला आहे.शब्दांचे मधाळ निवेदन सोहळ्याचा मंत्रमुग्ध माहोल बनविते.म्हणूनच म्हणतात की,'शब्द हे शस्त्र आहे.'जपून वापरा. .. कारण शस्त्राने अंगावर जखम होते.पण शब्दाने मनावर घाव बसतो. अंगावरची जखम बरी होते.पण मनाची जखम काळजात शिरून भळभळत राहते.यास्तव प्रेमळ शब्दांनी दुसऱ्याच्या हृदयात अढळस्थान मिळविता येते..

"मनमोकळ्या गप्पा मारल्याने मन मोकळे होते. गैरसमजुतीतून काही गोष्टी झाल्या असतील तर एकमेकांना समजतात.चर्चा हे माणसं जवळ आणण्याचे खूप मोठं माध्यम आहे. समर्थक साधकबाधक चर्चेतून प्रश्न सुटण्याच्या दिशेने पावलं पडतात.जीवनातील आनंद आपल्या विचारात आहे."

एकदा का आपले कर्तृत्व आणि धमक दिसली की, दूर गेलेली माणसे हळूहळू आपल्या जवळ यायला लागतात. आजच्या जगात आपलं नाणं खणखणीत वाजलं की माणसांचा मेळा आपल्या भोवती जमतो.

"आपण पेरतो तेच उगवते.दुसऱ्याचे चांगले झालेलं पाहण्याची ज्यांची वृत्ती असते.त्यांना कधीच कशाची कमतरता भासत नाही.ज्यांचं मन मोठं असतं त्यांच्या आयुष्यात आनंदाचे कारंजे बरसणार."

" तसं पाहिलं तर सवयी  माणसाला घडवितात आणि बिघडवितात. माणूस सवयीचा गुलाम आहे. आपल्याला सन्मानाचे आणि आनंदाचे आयुष्य जगायचे असेल तर आपल्या सवयी ही तितक्याच चांगल्या आणि उपयुक्त असलेल्या पाहिजेत.''

आपल्या मनात विचारांचा ओघ सतत प्रवाहीत असतो.एका मागोमाग एक विचार मनात येत असतात.सकारात्मक शुभ विचार येणे हे चांगले लक्षण आहे. विचारांनीच माणूस घडतो."

मोठी माणसे मोठी का होतात?हा लेखही वाचनीय आहे. महान माणसं कशी घडली याचा चढता आलेख विषद केला आहे.'चांगले मित्र,उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि सर्वांनी चांगले संबंध यातूनच खऱ्या अर्थाने जगण्याला मजा येते.तेच खरं जगणं आनंदी होतं.'
'ज्यांना फुलायचं,बहारायचं आणि स्वच्छंदीपणे आयुष्य जगायचंय, अशा मुलांना मोबाईलपासून सांभाळण्यासाठी सावध आणि सजग होण्याची वेळ आली आहे.कारण वेळ निघून गेल्यावर उरेल फक्त पश्र्चाताप….'

प्रत्येक कामात सुख मिळते फक्त आपली दृष्टी तशी पाहिजे. टिपकागदासारखे सुखाचे क्षण टिपता आले पाहिजेत.दृष्टी सकारात्मक असलीकी सुखाचे क्षण ओंजळीत ओतप्रोत येतील..इतकं अप्रतिम  रसभरीत प्रवाही रुचेल आणि पटेल असं वर्णन सर्वच लेखांचे केले आहे. 

किशोरवयीन शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांसाठी आहे. सकारात्मक संस्काराचा पथदर्शी दीपस्तंभ 'आत्मप्रेरणा'हे पुस्तक आहे.अत्यंत अनमोल ठेवा संग्रही असावा असे हे पुस्तक आहे.लेखक श्री. लक्ष्मण जगताप यांच्या लेखणीस सलाम आणि दिसामाजी लिहिते राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!

@#श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- १३ नोव्हेंबर २०२१

*"*"*"*"*"*""*"*"*"*"*"*"*"*"*"*"

पुस्तकाचे नांव--मंतरलेले दिवस

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-८८
पुस्तकाचे नांव--मंतरलेले दिवस

लेखकाचे नांव--ग.दि.माडगूळकर
प्रकाशक-साकेत प्रकाशन, औरंगाबाद
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०२१/ प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१८४
वाड्मय प्रकार--आत्मचरित्रपर लेख
मूल्य--२५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

८८||पुस्तक परिचय
          मंतरलेले दिवस
      लेखक:ग.दि.माडगूळकर
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

ग.दि.माडगूळकर हे मराठी साहित्यसृष्टीला व चित्रपटसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न.या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढविला.'गदिमा'हे मराठी संस्कृतीने जपलेले एक अनमोल अलौकिक साहित्य संस्कार आहे. घराघरांमध्ये, मनामनांमध्ये आणि ओठा- ओठांवर हा संस्कार मोठ्या मनाने जपला आहे.गीत रामायणाने रसिकांच्या हृदयात अढळस्थान मिळविले आहे.

ज्यांची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली. असे महान साहित्यिक 'गदिमा' होते. एकशे पन्नास पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी कथा पटकथा संवाद आणि गीते लिहिली आहेत. काही मोजक्याच मराठी सिनेमात त्यांनी प्रारंभी अभिनयही केलाआहे. त्यांच्या 'मंतरलेले दिवस'या आत्मचरित्रपर कथा पुस्तकास महाराष्ट्र शासनाने साहित्यातील पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.तसेच त्यांच्या साहित्याचा गौरव भारत सरकारने १९६९साली 'पद्मश्री'किताबाने सन्मानित केले आहे.१९७३साली यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्यही होते.तसेच ते विधानपरिषदेचे सदस्यही होते.

‘सुधीर फडके (बाबूजी)- ग.दि.माडगूळकर’ या जोडीचं ‘गीतरामायण’आणि चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या श्रवणीय गाण्यांचे गीतकार, गायक आणि संगीतकार म्हणून रसिक चाहत्यांच्या हृदयात सिंहासनाधीश्वर झालेले लाडके आणि सुप्रसिद्ध अशी ही दोन थोर व्यक्तिमत्त्वं एक आदरणीय सुधीर फडके ( बाबूजी) आणि दुसरे ग.दि.माडगूळकर. 'गदिमा'.'महाराष्ट्राचे वाल्मीकी'ही तमाम सृजन मराठी रसिक चाहत्यांनी स्वयंस्फूर्तीने साहित्यमहर्षी गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात 'गदिमा' यांनी बहाल केलेली गौरवास्पद बिरुदावली आहे. गदिमांची 'गीतरामायण'ही साहित्यकृती म्हणजे त्यांच्या साहित्यातील किर्तीचा कळस आणि सुवर्णपान आहे.असे दिग्गज प्रतिभासंपन्न साहित्यमहर्षी 'गदिमा'यांचे 'मंतरलेले दिवस' या आत्मकथनात्मक पुस्तकात रसिकांना रसग्रहण करायला लेखसंग्रह उपलब्ध करून दिला आहे.

'गदिमा’ हे अष्टपैलू कलाकार होतेच,मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुपेडीहोतं.अभिनेता,कथालेखक,लेखक,कवी, पटकथाकार, संवादकार, गीतकार या त्यांच्या विविध छटा चिमटीत पकडून ठेवणं शक्यच नाही.अनेक कलाप्रांतात एकाच वेळी लीलया संचार करणारे ग.दि. माडगूळकर होते. त्यांची जगावेगळी प्रतिभा व त्यांचा कलाविष्कार असणारी साहित्यसंपदा आपणास मोहित करत राहते.

"गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरण रंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती. असे गदिमांनी म्हटले आहे.ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखातून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा, खुलेपणा आणि साधेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो.ग. दि. माडगूळकर यांचे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा,भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतली चित्रमयता, ओढा आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते.व्यक्ती,प्रसंग,घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते. ''

गतकाळातील स्वतःच्यामन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांचीलेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जड भौतिक तत्त्वांनाही ग.दि. माडगूळकरांच्या लेखणीतल्या वीजेचा स्पर्शही लाभला की, तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात"असं अविनाश सप्रे या 'मंतरलेल्या दिवसांचा' परामर्श व्यक्त करतात.
'मंतरलेले दिवस'हे गदिमांचे आत्मचरित्र आहे.त्यांच्या बालपणात भेटलेल्या आप्तस्वकिय ,स्नेही आणि मैतरांची व्यक्तीचित्रे अस्सल ग्रामीण शैलीत रेखाटली आहेत.बालपणी दोस्तांच्या सहवासात माडगूळे, कुंडल ,औंध किन्हई (पंतांची) ही गावे आणि परिसरातील घटना प्रसंगांचे हुबेहूब वर्णन त्यांनी घडविले आहे.वाचताना अनेक प्रसंगी आपण भावना प्रधान होतो. अनेक घटना प्रसंगांचे वर्णन मनाला स्पर्शून जाते.ते चित्रण आणि व्यक्तींचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते.

गीतकार गदिमांच्या अनेक गीतांमध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडलेलं दिसतं. ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’ या पंक्ती मानवी जीवनाचं सार आहेत.‘जगाच्या पाठीवर’ची गीते तर पराकोटीच्या तत्त्ववेत्त्याने लिहिल्यासारखी वाटतात. ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’......
त्याचप्रमाणे त्यांच्या आत्मचरित्र लेखातून करुण विदारक सामाजिक चिंतन गदिमांनी शब्दातून व्यक्त केले आहे. माणसात माणुसकीचे नाते त्यांनी बालवयातच जोडलेले होते. पुस्तकाच्या प्रवासात त्यांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यातील काहींशी घनिष्ठ सहवास घडला, तर काहींशी दोस्ती तर काहींशी विचित्र व कटू अनुभव आले. प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. कलेच्या ध्यासात मार्गक्रमण करत राहिले.श्री अनंत अंतरकर यांनी 'भूमिका' लेखात पुस्तकाचा आलेख आणि गदिमांचे लेखन याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आत्मचरित्राच्या निवेदनाच्या ओघात त्यांनी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दात आणि सहज शैलीने रेखाटली आहेत.

अकरा जून १९६२साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली होती.ती अवघ्या अकरा महिन्यांत संपली होती. अनेक जाणकारांनी पत्रे पाठवून अभिप्राय कळविले होते.ते म्हणतात की,"मराठी भाषेतील या जागल्या रसिकतेने मी आनंदित झालो होतो." या आत्मचरित्र संग्रहात अकरा लेखमालिका आहेत.हाही निव्वळ अकरा संख्येचा मणिकांचन योग होयअकरा लेखांचे आत्मचरित्र,ते अकरा तारखेस प्रकाशित, अन् अकरा महिन्यांत आवृत्ती संपणे.

'मंतरलेले दिवस'या आत्मचरित्रपर पुस्तकात मंतरलेले दिवस, एक अज्ञात अंगुली लिहिते, मोहोरलेला कडुनिंब,माझा यवन मित्र,बामणाचा पत्रा,पंतांची किन्हई,वेडा पारिजात, औंधाचा राजा, लुळा रस्ता,नेमल्या आणि अरे, दिवा लावा कोणीतरी आणि शेवटी गदिमांच्या चित्र- जीवनपट आहे. त्यांनी मराठी व हिंदी भाषिक कोणकोणत्या चित्रपटात कथा,पटकथा, संवाद, गीते आणि अभिनय साकारला त्या चित्रपटांची वर्षनिहाय व निर्मीती संस्थेसह माहितीचा सारीपाट आहे.

मंतरलेले दिवस या शिर्षक आत्मकथेत त्यांच्या बालपणीच्या सवंगड्यासह केलेल्या स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट आहे.तसेच दोस्तांच्या करामतीचे आणि गमतीजमतीचे खुमासदार शैलीत वर्णंन केले आहे. माणसाला दु:खासारखेच सुखही अनेक वेषांतरांनी माणसाच्या आयुष्यात येऊन जाते.एकांतवेळी अशासुखाचे तोंडावळे दिसतात.मन स्मृतीत रमून जाते.त्यावेळचा काळ डोळ्यासमोर तराळतो.त्यांनी औंध संस्थानातील कुंडल गावातील स्वातंत्र्य पूर्व काळातील घडामोडींचे वर्णन अत्यंत बारकाईने केले आहे. खादी, स्वदेशी, स्वावलंबन आणि अस्पृश्योध्दार या चळवळीचे प्रतिध्वनि तेथे हमखास उमटत राहतो.

१९३६साली गणित विषयात टांग मारल्याने मॅट्रिक अनुत्तीर्ण त्यामुळे घरच्या सर्वांसाठी काहीतरी व्यवसाय करणे गरजेचे असल्याने मी पहिल्यांदा उदबत्ती विकायला सुरुवात केली. मेणासारख्या कोवळ्या मेंदूवर भलत्याच विचार रेखा फैजपुर येथे मुद्रित झाल्या.घरचं सगळं विसरून आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे.बलिदान दिलं पाहिजे म्हणून सेवा संघाच्या आश्रमात गेलो.तिथं मन रमेनाम्हणून गुपचूप कुंडलला आलो.मग तिथंच मित्रांसोबत ''गृहप्रपंच सारेच करतात.मला हुतात्मा व्हायचे आहे!'' हा विचार मनात पक्का ठासला होता. मी फक्त घरी जेवून गावात भटकत होतो. अवलिया पणामुळे शहाणी माणसं आमच्यावर प्रेम करु लागली.आमच्या सवंगड्यात शंकर निकमचा आवाज गोड व भारदस्त आवाज होता.तो शाहिरी कवनं व लावण्या कानावर हात ठेवून  टेचात म्हणायचा..
मी गाणी पोवाडे लिहून त्याला द्यायचो.गावात 'स्वार्थत्याग' नावाचे नाटक लिहून त्याचा प्रयोगही सादर केला होता.इकडं घरची परिस्थिती भयंकर चिघळलेली होती. घरातल्यांना उपासमारी घडू लागली. त्यामुळे ते चाकरीच्या शोधात बाहेर पडले.मंतरलेले मस्तीचे दिवस संपले.अन् ते नेम्याच्या घरातून परस्पर कोल्हापूरला पोहोचलो. सिनेमासारख्या वेगळ्या क्षेत्रात पडलो.लिहिण्याच्या नादाने गाणी लिहायला लागलो.पंधरावीस रुपये पगार मिळायचा.त्यातलेच पाच रुपये ते घरी पाठवित होते.

कविता आणि गाणी लेखनातून बरे दिवस येत होते.ग्रामोफोन कंपनीने गदिमांच्या रचना विकत घेतल्याने पैसे मिळत होते. काहीवर्षांनी ते कुंडलला आले.राष्ट्रीय सभेच्या प्रचारासाठी निकमला पोवाडा रचून दिला.याच काळात ते लग्नाच्या बेडीत अडकले.अनेकवेळा निकमला पोवाडे लिहून देत होतो. भाऊ व्यंकटेश क्रांतिकारकात मिसळून फरारी झालेला असतो त्यामुळे आमच्या बिऱ्हाडाशी पोलिसांची येरझार वाढू लागली. क्रांतिकारकही घरी येऊन जात असत.पत्नीही आजारी पडली होती. त्यावेळी जी.डी.लाड यांनी माझ्या हातीपैश्याचे पुडके सरकावले होते.

तदनंतर गदिमा आपल्या क्रांतिकारक मित्रांच्या  विवाहासाठी कुंडलला येतात.त्यावेळच्या कुंडलचे आणि लग्नाच्या सोहळ्याचे वर्णन बहारदारपणे केले आहे.कुंडल गावावर आधारित रचना समर्पकपणे मांडली आहे.

'एक अज्ञात अंगुली लिहिते' या कथेत अचानक एकाएकी सुखदुःखाच्या घटना अशाकश्या  घडतात.त्याचा आपल्याशी काय संबंध लागतो याचा उहापोह त्यांनी या कथेत केलाय. 'एकदा गदिमा पत्नीला तपासण्यासाठी दवाखान्यात घेऊन जातात. अचानकपणे पत्नीचे पोट वाढत असते.कोणतातरी आजार असल्याने तपासणी साठी जातात.तदनंतर अनाकलनीय संकटाने तिला गाठल्याने तिला भयंकर रोग झाल्याची जाण नव्हती.त्यामुळे तिला सुख देण्याचा मी प्रयत्न करत होतो.' असे ते या आत्मकथेत स्पष्ट करताना पुढे सांगतात.तपासणी नंतर गदिमांना, 'तुमच्या पत्नीला कोणताही आजार नसून तिला मूल होणार आहे.'असे डॉक्टर सांगतात. ती दोघेही पुढे चालले असतात.

त्यावेळी मागून एक सायकलवाला पाठमोऱ्या आकृतीवरुन गदिमांना ओळखतो,आणि थांबून अभिनंदन करतो.यामुळे ते भांबावून जातात. आणि कशाबद्दल अभिनंदन विचारतात. तेव्हा तो सांगतो, 'मघाशीच मी रेडिओवर न्यूज ऐकली की, आपणास बक्षीस मिळाले आहे. 'हे ऐकल्याने त्यांच्या पत्नीचा चेहरा उजाळतो. ती गदिमांशी प्रसन्नतेने संवाद करते.

दिल्लीच्या नाटक अकादमीने या वर्षीचा श्रेष्ठ चित्रकथाकार म्हणून निवड केलेली असते.ते पारितोषिक स्विकारण्यासाठी उभयता दिल्लीला जातात.तिथं एका खासदाराच्या निवासस्थानी अभ्यागत म्हणून मुक्काम करतात.तिथं त्यांचा एक स्नेही असतो.त्याच्या उपाहारगृहात जेवणाची सोय केलेली होती. आसामी खासदाराच्या निवासस्थानी एक म्हातारी असते.सुखदु:खाच्या नात्याप्रमाणे गदिमांची पत्नी आणि ती वृध्दा गप्पा मारत असतात.तिचं व्यक्तिचित्रण अप्रतिम अक्षर वैभवात गदिमांनी लिहिलेले आहे.ती छानपैकी गदिमांचे आणि त्यांच्या पत्नीचे आदरातिथ्य करत असते. अचानकपणे एका दुपारीच ती घरात आत्महत्या करते.

''त्या वृध्द स्त्रीने आत्महत्या का केली असेल?''ते कुणालेच कळले नव्हते. तिच्या आयुष्याचा चित्रपट आगाऊ कोणी लिहिला होता.त्या म्हातारीचा आणि आमचा परिचय का झाला? माझ्या पत्नीची शस्त्रक्रिया अयशस्वी का ठरली?त्याच वेळी मी दिल्लीला पारितोषिक स्विकारण्यासाठी का गेलो.आणि आनंदाच्या प्रसंगात हे दु:खाणे विरजण का पडले.हे सारे आहे तरी काय.कुणा तरी अज्ञात अनामिक हातांनी या घटना आगाऊ लिहून ठेवल्या असल्या पाहिजेत. अशी ही आनंद आणि दु:खाची झालर असणारी 'एक अज्ञात अंगुली लिहिते' आत्मकथा आहे. 

'मोहोरलेला कडुनिंब'या कथेत त्यांनी माडगूळ गावातील निसर्ग सौंदर्याचे,स्थळ ठिकाणांचे, खंडोबाच्या माळरानाचे  वर्णन अस्सल ग्रामीण बोलीत खुलविले आहे.
"वाट मज ती आवडे,ग वाट मज ती आवडे…
बाभळीला बहर पिवळा, वरुन बोले कावळा
आज काना लागतो का साथ त्याचा वेगळा''
या सुंदर गीतांची बांधणी त्यांनी माणदेशी माडगूळ खेड्यातील बाभळीसारखं रुक्ष झाड  बघूनच सुचली. आणि त्यातून गाणं तयार केले आहे.माळरानाबद्दलच्या अनेक दंतकथा असल्याचे ते आवर्जून सांगतात.एकाला  पैक्याचा गडवा सापडलेला असतो.त्यात तांब्याचे पैसे असतात. त्यातील नाणं निरखून पाहिल्यावर लेखकाला ते नाणं म्हणजे 'शिवराई' असल्याचे लक्षात आले.वीजनावाच्या लघुकथेत त्यांनी खंडोबाच्या माळाचे वर्णन केलेले आहे.गावातील गावकुसाबाहेरील वस्त्या,वाडे आणिगावाचा उल्लेख छानच शब्दसाजात मांडलेला आहे.याच गावच्या स्थळकाळावर त्यांनी अनेक गाणी रचली आहेत. त्या गावाचं आकर्षण त्यांना वाटते.ते त्यांनी,"माझा पिंड माझ्या गावच्या वातावरणानं घडला आहे.तसच माझं लेखन माझ्या गावाच्या संस्कारानं मढलेलं आहे. स्वत:इतकाच मला माझ्या गावाचा अभिमान आहे.अनुभवांनी कडवट झालेलं माझं मन, गावाकडच्या आठवणींनी म्हणूनच मोहरुन येतं."अशा शब्दांत त्यांनी गावाचे गावपण टिपकागदासारखं टिपलयं…

'माझा यवन मित्र'या कथेत नजम नकवी या कथालेखक मित्राच्या स्वभावाची गोष्ट सांगितली आहे. त्याने गदिमांनी कथा लेखनाचा एकत्र करार केलेला असतो.त्याचे वर्णन छानच रंगविले आहे.तो अचानक कसा देश सोडून जातो. आणि एकत्र लिहिलेल्या कथेचा सिनेमा काढतो आणि पटकथालेखक म्हणून स्वत:चे नाव लावतो.त्यासाठी पत्र पाठवून अखत्यारपत्र पाठवून द्यायला सांगतो.अशी  'माझा यवन मित्र'ही आत्म कथा आहे.

मला सर्वात आवडलेली आणि अनेकवेळा फेसबुकवर वाचायला मिळालेली कथा म्हणजे 'बामणाचा पत्रा'होय.नाव वाचवेकी वाचनाचे कुतूहल वाढतच जाते.निर्मात्याला सिनेमासाठी नवीन कथा पाहिजे असेलतर तो गदिमांना आर्जव करत असतो.काकुळतीला येतो.मग नवी कथा लिहिण्यासाठी,कथाबीज आठवण्यासाठी, कथेचे बीज पेरण्यासाठी आणि ती तयार होण्यासाठी मला एकांत हवा असतो.त्यासाठी माझी पाऊले गावाकडे वळतात. 

मग पुना ते कुर्डुवाडी आगगाडीचा प्रवास सुरू होतो.तदनंतर माडगूळे गावापर्यंतच्या प्रवासाचे आणि प्रवासात भेटलेल्या माणसांचे व्यक्तिचित्र अप्रतिम अक्षरवैभवात मांडलेले आहे.ते रसग्रहण करताना आपलाही प्रवास होतोय. इतके आपण वाचतात गुंगून जातो.तेथील गावांची वैशिष्ट्ये,भेटणाऱ्या माणसांबरोबरच्या होणाऱ्या गप्पा,माण नदीचे, पीकांचे वर्णन अप्रतिम केले आहे.'बामणाचा पत्रा'ही झोपडी माडगूळ गावातील गदिमांच्या गावंदरी मळ्यातील पाव नावाच्या रानातील आहे.तिला गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने वरील नाव दिले आहे.गांधी हत्येच्या दंगलीत गावातील सर्व ब्राह्मणांची घरे जळाली होती.गावात नांदायला पुन्हा घर बांधणे आवश्यक होते.त्यांच्या धाकट्या भावाने पुन्हा घर बांधले. त्या सामानातून उरलेल्या साहित्यातून ही झोपडी गुरं बांधायला बांधली.पण गुरांच्या झोपडीचे मानवी निवासस्थान झाले होते.

माझ्यासोबत अनेक प्रसिद्ध प्रतिभासंपन्न कलाकारांनी या झोपडीत मुक्काम केलाय.ते म्हणतात की,"दळणाऱ्या बायांच्या गीतांनी उजाडणारी सकाळ आणि जनावरांच्या घुंगर नादाने झेपावत येणारी संध्याकाळ आम्हाला अत्यंत रमणीय वाटते."इथं अनेक चित्रपट कथांचे कथाबीज निर्माण झाले.हे माझे निवासस्थान नसून ते माझे स्फूर्तिस्थान आहे. तिथच मला प्रतिभाशक्ती मिळते. 

तीनच बाजूला भिंती असल्याने झोपडी धर्मशाळेसारखी दिसते. अनेक शेतीच्या वस्तू लटकत असतात.कोनाड्यातील बियांची गाडगी मृगाची वाट पाहत थांबलेली असतात. मी तिथं गेल्यावर सगळ्या वस्तू अदृश्य होतात.खुंट्यावर सदरे कोट जाकिटे लटकू लागतात. बियाणांच्या जागा संदर्भ ग्रंथ घेतात. गोठ्यात गादी तक्क्यांची शुभ्र बैठक ठाण मांडते. तसूतसूने वाढत असलेल्या पिकाला आणि उगवत्या- मावळत्या नारायणाचा साक्षी ठेवून गदिमा लेखनाला सुरुवात करतात..

कथाबीज लेखन,पिकांचे वर्णन,तिथं झोपायला येणाऱ्या माणसांचे वर्णन, न्याहरी,भोजन मेनू आणि रानातल्या मेव्याचा बेत.यांचं खुमासदार शैलीत वर्णंन केलंय. शहरातील धबडग्याचा कंटाळा आला.जीव आंबला की लिहायला काही सुचेनासे होते. कोऱ्या कागदावर अक्षरे उमटत नाहीत.मग माझ्या समोर अभावितपणे रेखाचित्र उतरु लागते. तीन भिंती,वर पत्रा, मागेपुढे गुलमोहराची झाडे, अवतीभवती वाढणारी शेती.असं चित्र तराळले की मला त्या झोपडीत मुक्काम रहावे वाटते.

'पंतांची किन्हई'या आत्मकथेत या गावातील सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या आठवणींची ओळख करून दिली आहे.काही नावे, काही गावे,काही वास,काही सहवास, काही साथ आणि काही नाद माणसाच्या मनात आयुष्यभर हृदयात घर करून राहतात.विसरु म्हटले तरी त्यांचे विस्मरण होत नाही.अशीच किन्हई पंतांची हे गाव आहे.भूतकाळातील अनेक आठवणी गावचं नावं उच्चारलं की डोळ्यासमोर उभ्या राहतात.

त्यांचे वडील औंध देवस्थानचे कारकुन ते वहिवाटदार म्हणून सेवेत होते.सुट्टीच्या काळात गदिमा औंधवरुन या गावी शाळेला सुट्टी पडल्यावर येत असत.इथं त्यांना भेटलेले माणदेशी संस्थानचे राजे पंतप्रतिनिधी,रनर, हवालदार ,भंपक बाबूराव,कुलकर्णी,लिमयेमास्तर ,
पराडकर पंत आदी व्यक्तिची शब्दचित्रे अक्षरवैभवात उभारली आहेत.संस्थानच्या राजवाड्याचे, बाजारपेठेचे, बागेचे,नाटकाच्या प्रयोगाचे आणि सुगंधी गावाचे वर्णन प्रवाही भाषेत केले आहे.

तिथली माणसे,एकवीरेश्वराचा घाट, टेकडीवर सोने उधळणारी सकाळ,तसेच बुक्कागुलालात न्हालेली संध्याकाळ, नदीच्या डोहाच्या पाण्यात विझवलेली जळती दुपार आणि निष्पाप ग्राम कन्यकांचे वेडे कटाक्ष हे सारेच त्यांना आठवते. सुगंधी गावाचे रहस्य उदबत्तीच्या कारखान्याचे वर्णन, साखरगडनिवासिनी कुलस्वामिनी देवीची टेकडी आदी स्थळांचे वर्णन मनाला भावते.

'वेडा पारिजात' या आत्मचरित्रपर लेखात त्यांच्या एककल्ली तात्यांच्या स्वभावलहरींची कथा रेखाटली आहे.वडिलांच्या शब्दाखातर गावदरीच्या रानातल्या झोपडीत एकटाच मुक्काम करणाऱ्या तात्याची कथा.मोठी रंजक तितकेच भावस्पर्शी कथानक आहे.त्यांचे जित्रांबावर आणि लहान मुलांवर लय लळा जिव्हाळा आहे.पण तात्याला एखाद्या वेळी कश्याची सनक येईल याचा काही नेम नाही.

गदिमा झोपडीला सिमेंट प्लॅस्टरिंग कर म्हणून भावाला सांगतात.पण यातल्या काय करुन देत नाही.पण भाव चिडीला पेटून गड्याकरवी सामान हुसकण्यास सुरुवात करतो. या घटनेने तात्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते.तो तडक वळकटी घेऊन पुण्याला गदिमांकडे नसांगता जातो.तिथं बागेत काम करत असतो.एकदा बागेतल्या आवळी व डाळिंबाच्या मधले पारिजातकाचे रोप अलगद उपटून परसदारी लावतो.त्या पारिजात आणि त्यातल्या यांची कथा आहे.

'औंधाचा राजा' या आत्मकथेत श्रीमंत राजे भवानराव पंडित पंतप्रतिनिधी यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती या कथेतून प्रकर्षाने लक्षात येते.राजे आणि गदिमा यांच्यात बालपण ते प्रौढपणात घडलेल्या सहवासाचे हितगुज अत्यंत समर्पक शब्दांत गुंफले आहे.नाटकातील काम पाहून बक्षीस समारंभात पारितोषिक देताना ,राजे यांनी काढलेले उद्गार 

"हा मुलगा हास्याचे डोंगर उत्पन्न करील.बाळ तू टाकीत जा,शिकला नाहीस तरी चालेल.'' टाकी म्हणजे सिनेसृष्टी. तिथंच प्रथम अभिनय आणि गाणी लेखन करणारे गदिमा. श्रीमंत प्रजाहितदक्ष राजे पंतप्रतिनिधी यांचे व्यक्तिचित्रण उत्तुंग राजे ऐश्र्वर्या सारखे, व्यक्तिमत्त्वासारखे शब्दालंकारात वाचायला मिळते.गदिमाही राजाश्रयाने औंधमध्ये शिक्षण घेत होते. 

"दो आॅंखे बारह हाथ'या हिंदी  सिनेमाची बीजकथा औंधसंस्थानात पंतप्रतिनिधी यांनी राबविलेल्या गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा प्रयोग माझ्याच एका मित्राच्या सांगण्यावरून बाबांनी केला होता."हेऔंधचे राजे यांचे चिरंजीव बॅरिस्टर अप्पासाहेब पंत यांनी गदिमांना पत्थर लिहून कौतुक केले होते.

  'लुळा रस्ता'या कथेत मुंबई-पुणे रस्त्यावरील सखूबाई मावशीचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. कजाग, डेरिंगबाज, फटकळ आणि बोलकी असणारी मावशी.तिचा त्या परिसरात चांगलाच वट असतो.ती झाडाखालीबसून भाजीपाला विकत असते.मुलगा गोपाळ हॉटेल चालवत असतो.रोजगारी बायकांची ती भिशी चालवित असते.

गदिमा आणि सखुबाई यांच्या संभाषणाचे किस्से सुंदर शब्दात मांडले आहेत.सखुबाईची गजघंटा पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत वाजत असायची.घर ते हॉटेल व  हॉटेल ते वडाखालचे दुकान अश्या सतत फेऱ्या चालू असायच्या.

एकेदिवशी तिच्या घरात चोरी होते.पण पोलिस काय तपास लावत नाहीत.त्या धक्क्याने ती खचून जाते.त्यातच पक्षाघाताचा झटका येतो. जोडलेल्या नात्याची सारी माणसं तिच्या मदतीला धावतात. त्यातून ती वाचते पण, तिला बोलायला सुधरत नाही.पायाने लंगडत राहते.

स्वभावाने अत्यंत कनवाळूअसणारा गदिमांच्या बालपणीचा सवंगडी स्नेहमित्र नेमिनाथ बलवंत उपाध्ये उर्फ 'नेम्या' याची ही चित्तरकथा आहे.मोत्याच्या दाण्यासारखे सुंदर हस्ताक्षर असणारा गदिमांच्या लाडका नेम्या,कच्च्या कविता फेअर करून ठेवण्यात वाकबगार होता. त्यांच्या घरचे हरेक काम तो करायचा.पण सनक आलीकी न सांगता निघून जायचा. चित्रविचित्र असंबंध्द बोलायचा वागायचा... त्याची कथा 'नेम्या' ते म्हणतात की,''नेम्याचे माझे नाते वेगळे आहे.

त्या नात्याला नांव नाही.दगडाला देवत्व देणारे संत आणि माणसासारखाच मातीच्या पोटी जन्मलेला दगड,यांच्यातील नात्याला नांव काय? तसेच आमचे निनावी नाते आहे."

'अरे, दिवा लावा कोणी तरी'या आत्मकथेतून वडीलांच्या स्वभाव पैलूंचे दर्शन घडते. वडिलांच्या अंत्यसमयी घडलेल्या प्रसंगाचे चित्रण भावस्पर्शी शब्दांनी व्यक्त केले आहे. 

जाताना त्यांचे वडील म्हणाले होते,''कुणी तरी दिवा लावा,''तो आता लागला होता.ते पाहून मला भडभडून आले.वडील गेल्याने निराधार झालो.त्यांच्या अवजड जबाबदाऱ्या पेलाव्या लागणार होत्या.स्नेह आणि तेजाची झळाळी नाहीशी झाली होती.त्यांच्या इच्छेचा मान म्हणून मी दिवा लावलाहोता…..

गदिमांच्याहातून अजाणतेपणी त्याचदिवशी काळोखात कोपऱ्यात काहीतरी हालचाल झाली.म्हणून लाकडाचा फाळ त्या दिशेने भिरकावला.अन् जागीच त्यांचा लाडका श्र्वान टाळल्या गतप्राण झाला.अविचाराने त्यांच्या हातून हत्या झाली.एकाच विचाराची वेडीवाकडी आवर्तने त्यांच्या मस्तकात घुमत राहिली.त्याच वेळी कवडशा बरोबर तो कुत्रा आत आला.त्यावेळी त्यांना वाटले,आपला कुत्रा माघारी आला.ते पिल्लू काळ्याच्याच जातकुळीतलं होतं.

अशा एकापेक्षा एक सरस आणि वास्तव चित्रण ग.दि. माडगूळकर गदिमा यांनी आत्मचरित्र कथा कसदार लेखणीने कथानकाची उंची वाढविली आहे.गीत रामायणा इतकीचं याही लेखांचा परीघ आणि क्षितीज विशाल आहे. गदिमा पटकथाकार आणि गीतकार कसे घडत गेले. लेखनाची ऊर्जा प्रतिभा आणि कथाबीज कुठे आहे.कथानक कसे लिहिले.तसेच जीवनाच्या वाटेवरून जाताना त्यांना जवळच्या लांबच्या नात्यातल्या माणसांची माणूसकी कशी लाभली यांचा उलगडा 'मंतरलेले दिवस'या आत्मचरित्रपर गाथेतून होतो. आदरणीय ऋषीतुल्य शब्दमहर्षी गदिमा आपल्या लेखणीस प्रणाम आणि त्रिवार वंदन!!!

श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- २० नोव्हेंबर २०२१

#############################