लेखक - कँल न्यूपोर्ट
लेखमाला : भाग तिसरा
#गहनतेने_कार्य_कसे_करायचे
गहन कार्य करायचे तर लागते तीव्र इच्छाशक्ती
पण कधीकधी इच्छाशक्ती कमजोर पडू शकते
त्यामुळे गहन कार्यासाठी वेळ निश्चित करणे ही पहिली गरज आहे
आणि व्यवस्था बनवणे ही दुसरी गरज आहे आणि त्यानंतर मुद्राभय ,समविचारी लोकांची सोबत आणि Professionalism च्या साहाय्याने गहन कार्य आपण करू शकतो.
🔶 वेळनिश्चिती
वेळ निश्चित करताना आपले खालीलपैकी कोणतेतरी एक तत्व निश्चित करावे लागेल
1. #वैराग्यदर्शन
यात कमी महत्त्वाच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करून एका ध्येयासाठी समर्पित राहून गहन कार्यासाठी सगळा वेळ देणं
उदा. प्राचीन ऋषींनी केलेली तपसाधना
2.#द्विरुप_दर्शन
यात आपला उपलब्ध वेळ दोन हिश्श्यात भागायचा अर्धा भाग गहन कार्याला आणि अर्धा भाग इतर कामांना
उदा. आठवड्यातील चार दिवस गहन कार्याला आणि उरलेले तीन दिवस इतर कार्यासाठी ठेवायचा. हयात फक्त एकच दोष आहे की लवचिकतेचा अभाव आढळतो.
3.#लयबध्द_दर्शन
हयात कामाची एक लय किंवा एक साखळी बनवली जाते जी निरंतर सवयींच्या रूपाने पाळली जाते
हयाने गहन कार्याला सवयीच्या रूपाने पाहिले जाते.
उदाहरणार्थ : सकाळी 12 ते 1 आणि रात्री 9-10 हा वेळ गहन कार्यासाठी राखीव ठेवायची आणि सवयी प्रमाणे त्याचे पालन करायचे
4.#पत्रकारिता_दर्शन
हया पद्धतीत जेव्हा जसा जिथे जेवढा वेळ मिळेल तिथे गहन कार्यासाठी वापरला जातो .
सध्याच्या काळात वेळ साधण्यासाठी ही पद्धत उत्तम आहे
उदाहरणार्थ : पत्रकार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा संपादकीय अथवा शोधलेख लिहून काढतात
🔶 व्यवस्था बनवा
अशी व्यवस्था बनवा ज्यात आपण वेळ ,स्थान, नियमांसहीत निश्चितपणे विनाअडथळा गहन कार्य सुरू करू शकतो.
🔶मुद्राभय
गहन कार्याचे आपल्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न आणि पैसा हया दोघांची उत्तम गुंतवणूक होणे गरजेचे आहे ज्यामुळे आपली काम टाळायची वृत्ती कमी होईल आणि वचनबद्धता वाढेल.
उदा. पुस्तक लिहायचे असेल तर महागड्या हाँटेल मध्ये काही दिवसांसाठी रूम आरक्षित करणे
🔶 समविचारी लोकांची सोबत
गहन कार्य व्यवधानाशिवाय पार पाडणे जरी महत्त्वाचे असले तरीही वेळोवेळी योग्य सल्ला मार्गदर्शन सहकार्य आणि प्रेरणा तेवढीच गरजेची आहे त्यामुळे तसे समविचारी सहकारी मार्गदर्शक यांच्या बरोबर गहन कार्य करा
🔶 Professionalism
लक्ष्य गाठण्यासाठी गहन कार्य करताना आपण रणनीती ठरवणे आणि तिची शिस्तबद्ध काटेकोर अमंलबजावणी करणे गरजेचे आहे
त्यासाठी 4DX अनुशासन पद्धती खूपच फायदेशीर ठरते
1.फक्त महत्त्वपूर्ण गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे आणि ध्यान भटकवणार्या गोष्टींना स्पष्ट नाही म्हणायला शिकणे.
2.मुख्य युक्तींवर काम करा
आपल्या कार्याचे मूल्यमापन करताना जिथे आपण मागे आहोत अशा चुका सुधारा आणि जिथे अग्रेसर आहोत तिथे आणखी सुधारणा कशा करता येईल यावर भर द्या
3.स्कोरबोर्ड बनवा
आपली स्वतः शी स्पर्धा असावी त्यासाठी चुका सुधारण्यांसाठी आणि यशाच्या मार्गावर प्रेरित करण्यासाठी स्कोरबोर्ड चा वापर करता येईल
तसेच गहन कार्य आणि त्यावर घालवलेला कालावधी आणि त्याची उत्पादक रिझल्ट तपासता येईल
4. उत्तरदायित्व भावना निर्माण करा
सप्ताहातून एकदा नियमितपणे कार्याची समीक्षा करून आपल्या कार्याची प्रगतीची खात्री करून घ्यावी.
उर्वरित भाग लेखमालेच्या पुढील अंकात
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know