Monday, May 31, 2021

द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड भाग 7

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                         प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग सातवा

#अंतर्मन_आणि_आनंद

ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे तो सदैव सुखी असतो . तसेही प्रत्येकाला सुख निवडायचा सर्वांना अधिकार आहे. सामान्य माणूस व्हायचे की असामान्य हेही तोच माणूस ठरवतो.सुख  हे मुख्यत्वे माणसाच्या विचारात आणि भावनात असते .

सुखासाठी प्रार्थना :
"ईश्वर माझ्या जीवनाचे संचलन करतोय,मला मार्गदर्शन करतोय
सगळया गोष्टी माझ्या हितासाठीच घडतायत. सगळेजण माझ्यावर विनाअट प्रेम करतायत. आज जे काही मी करेन त्याने सगळयांची भरभराट होईल"

आनंदासाठी टिप्स :
प्रत्येक दिवस गाणे गुणगुणत हसतमुखाने घालवा.
सतत सुखी राहण्याची तीव्र ईच्छा बाळगा.
कुणाची सहानुभूती मिळवायची म्हणून आजारांना जवळ करू नका
नकारात्मक विचार मनात आले की लगेच झटका
मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी तुमच्यातील सर्वोत्तम द्या.
साध्य करा आणि सुखी व्हा
पैश्याने सुख विकत घेता येत नाही हे कायम लक्षात ठेवा

#अंतर्मन_आणि_क्षमाशीलता
आपल्या जीवनातील वेदना, दुख , शोकांतिका, अपघात हया सार्या गोष्टींना ईश्वर नाही तर आपणच जबाबदार असतो.
पण आपण कार्यकारणभाव जाणून न घेता ईश्वराला दोष देतो त्यामुळे नकारात्मक भावना आणि पर्यायाने अंतर्मनात नकारात्मक विचार साकारतात.
राग ,द्वेष,परनिंदा हया गोष्टी सोडून दिल्याशिवाय ह्रदयात परमेश्वराची प्रतिष्ठापना कशी होईल?
सदैव क्षमाशील असलेल्या व्यक्तीच्या जीवनात आकसाला स्थान नसते. 

प्रार्थना:
"मी मनमोकळेपणाने सर्वांना क्षमा करतो
प्रत्येक गोष्टी मी माफ करतो
मी स्वतःला ही माझ्या चुकांसाठी क्षमा करतो. आता मी मुक्ततेची अनुभूती घेतो आहे."

ही प्रार्थना सातत्याने अंतर्मनापर्यंत पोहचवून मनशांती, स्वास्थ्य, बल, सुसंवाद मिळवा

टिप्स :
1.शरीरात प्रत्येक अकरा महिन्यानंतर जुन्या पेशी नव्या होतात त्यामुळे अकरा महिन्यापूर्वी झालेले अपराध आपण केलेलेच नसतात
2. चुकांसाठी आत्मक्लेश करून घेऊ नका
कारण आत्मक्लेश म्हणजे नरक आणि क्षमा म्हणजे स्वर्ग
3.कुणी टीका केली,ट्रोल केले तर त्याला आशिर्वाद समजा, त्यांचे  प्रेम समजा
आपल्यात योग्य त्या सुधारणा करण्याचे द्योतक समजा.
जहाल टीकाकाराच्या शांतीसाठी प्रार्थना करा
 पण स्वतःला विचलित होऊ देऊ नका
ईश्वरावर ठाम श्रद्धा ठेवून जगा.
जेव्हा तुम्हाला दुखावणार्या एखाद्या व्यक्ती विषयी चांगले बोलताना मनात खदखद येत असेल तर तिरस्कार अजूनही आत शिल्लक आहे असे समजा आणि पूर्णपणे क्षमा करा.
क्षमा करणे म्हणजे मनाचा मोठेपणा नाही उलट त्यात आत्मस्वार्थ आहे कारण त्यामुळे आपण रोगांपासून मुक्तही राहतो आणि आपण सगळयांसाठी चांगले चिंततो त्यामुळे आपलेही चांगलेच होते.

#अंतर्मन_आणि_मानसिक_अडथळे

1️⃣वाईट सवयी
सवयी म्हणजे माणसाचा दुसरा स्वभाव
चांगल्या वाईट सवयी आपणच निवडतो
नकारात्मक विचार नकारात्मक सवयी निर्माण करतात.
वाईट सवयी सोडण्यासाठी शरीर रिलँक्स करून शांत अवस्थेत सवय सुटल्याचे कल्पनाचित्र मनःपटलावर रंगवायचे
हळूहळू हा सराव चालू केल्यानंतर परिणाम होतो, शक्यतो वाईट सवयींना चांगल्या सवयींशी बदलत गेलो तर वाईट सवयींपासून मुक्ती मिळते कारण नव्या सवयींचा ठसा अंतर्मनावर बसेपर्यंत आणि त्याची दृढ श्रद्धा होईपर्यंत हया सरावावर ठाम राहावेच लागते.

2️⃣ मीच का ? अभागीपणाचे विचार
आपण कमनशिबी ,अभागी आहोत असे एकदा मनावर बिंबवलेले असेल तर मनात कायम वाईट होईल अशी भीती राहते.
पण तुमची तीव्र इच्छा आणि विचार -ध्येय यांचा ताळमेळ असेल तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही

प्रार्थना
कोणतेच अडथळे, अडचणी, विलंब माझ्या मार्गात येऊ शकत नाही
माझे अंतर्मन माझ्या विचारांना प्रतिसाद देत आहे.
अंतर्मनाच्या अफाट शक्तीपुढे कोणताही अडथळा टिकत नाही त्यामुळे माझी सर्व कामे दिव्य योजनेप्रमाणे पूर्ण होतात

3️⃣ अपराधभावना
मनात अपराधभाव असेल तर माणसाचे मन त्याला खात राहते त्या भावनेतून मुक्त होण्यासाठी माणसे व्यसनी बनतात.
प्रार्थना:
"श्रद्धा, संयम,शांती,आत्मविश्वासाने मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करत आहे 
आता माझे मन आनंदाने भरून गेलयं "

समस्येच्या मुळाशी असलेल्या चुकीच्या धारणा प्रार्थनेने नष्ट होतात आणि माणूस अपराधभावनेतून मुक्त होतो

4️⃣ व्यसन
हीनता ,अपूर्णता, विफलता,आंतरिक शत्रुत्व ही व्यसनाची कारणे आहेत
व्यसनी माणसे आयुष्याचा सामना करायलाच नकार देतात. जबाबदारी पासून दूर पळत राहतात. समस्यांना पेल्यात क्रशमध्ये घालवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतात. पण समस्या कृती केल्याशिवाय संपत नाही हे विसरून जातात ते आपल्याच विचारांचे कैदी बनतात, आपलेच शत्रु बनल्याने शरीराची हेळसांड करतात

प्रार्थना
"मी आनंदसागरात न्हाऊन निघत आहे
माझ्या सार्या चिंता,व्यथा मी परमेश्वर चरणी अर्पण करतो
मी अंतर्मनाच्या शक्तीला आवाहन करतो की तीने मला योग्य मार्गदर्शन करावे"

हया प्रार्थनेची पुनरावृत्ती तिला अंतर्मनात पोहचेल ,व्यसनमुक्ती च्या कल्पनेचे मानसचित्र सातत्याने पाहत राहिल्याने एका दिवशी प्रयत्नांना नक्की यश येईल.
संदर्भ: निलेश शिंदे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know