Monday, May 31, 2021

मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा भाग 2

#मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा
(How to win Friends and  influence People )

लेखक - डेल कार्नेजी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग दुसरा
आजच्या भागात लोकांशी कसे वागायचे हयावर लेखकाचे अमूल्य विचार मांडण्यात आले आहे.

#लोकव्यवहार
यशस्वी माणसाचे यश हे 15%  तांत्रिक ज्ञान आणि 85% त्याच्या माणसं हाताळण्याच्या कलेवर (Personality & Leadership ability ) अवलंबून असते.
पण दुर्दैवाने माणूस मानसिक आणि शारीरिक ताकदीपैकी निम्मीच वापरतो.
स्वतः वर लादलेल्या मर्यादा मोडून आपली ताकद वाढवण्यास माणसाने भर दिला तर माणूस लोकांवर प्रभाव पाडू शकतो.

लोकांशी कसे वागावे
1️⃣ कुणावरही टीका करू नका
टीका केल्याने माणसाचे मानसिक खच्चीकरण होते, त्याच्या स्वाभिमानाला धक्का बसतो, त्याला राग येतो पण ज्या कारणासाठी टीका केली जाते ते मात्र साध्य होत नाही, माणूस सुधारत नाही
त्यामुळे टीकाटिप्पणी व्यर्थ ठरते.
तसेच टीका करताना माणूस स्वतःच्याच फूटपट्टीतून दुसऱ्याला पाहतो त्यामुळे टीका ही एकांगी आणि धोकादायक असते
त्यामुळे टीका करण्याऐवजी जेवढे चांगले माहिती आहे तेवढेच बोला.

2️⃣ कौतुकाची भूक
हया जगात प्रत्येक माणसाला कौतुकाची आणि आपण कुणीतरी महत्त्वाचे आहोत ही त्याची भावना जपण्याची भूक असते.
जो माणूस आपले प्रामाणिकपणे कौतुक करतो त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे माणसं जपतात,त्याच्यासाठी झटतात, त्याला सुखी करण्यासाठी झटतात. हयाच गोष्टीचा वापर करून आपण माणसाकडून चांगले काम करून घेता येते
➖ कुणाचीही खोटी ,वारेमाप,उथळ स्तुती करू नका कारण स्तुती म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्या चा केलेला हलक्या दर्जाचा गुणगौरव
➖ कौतुक म्हणजे ह्रदयापासून एखाद्या चा चांगल्या गुणांचा गौरव
➖गुणग्राहक नजरेने समोरच्याचा विचार करा कारण प्रत्येक माणसात कुठलातरी चांगला गुण असतोच
➖स्वतःच्या कोशात राहून फक्त स्वतःचीच हुशारी, कौशल्य, गरजा हयांचा विचार करणे सोडा

3️⃣ लोकांचे महत्त्व जपा
आपण महत्वपूर्ण आहोत ,वेगळे आहोत याच इच्छेतून माणूस आजवर इतका प्रगत झाला त्यामुळे संगीत,साहित्य,कला दानशूरता,फँशन ही त्याचीच प्रकट रूपे आहेत.
➖प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपा
➖त्याच्या आवडीच्या विषयावर बोला
➖त्याला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करा
➖समोरच्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा 
➖समोरच्याच्या गरजांवर फोकस करा
आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधा.
➖ फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करू नका
➖समोरच्या व्यक्तीला आनंदी करा
➖समोरच्या व्यक्तीचा स्वाभिमान जागृत करा

4️⃣ प्रथमदर्शनी छाप पाडा
First impression is last impression म्हणतात
पहिल्या वेळी माणसाबद्दल जो ग्रह होतो तोच पुढे बराच काळ टिकतो
➖माणसाच्या चेहरयावर मृदू आणि मैत्रीपूर्ण भाव असावे, चेहऱ्यावर मंत्रमुग्ध करणारे हास्य असावे
➖माणसाचा आवाज आश्वासक हवा 
अगदी फोनवर जरी ऐकला तरी आपलेपणाची जाणीव व्हायला हवी
➖ माणसाचा स्वभाव आनंदी असावा
त्याच्या अंतरंगातून, कृतीतून, चेहऱ्यावर आनंद झळकायला हवा
➖माणसाची मानसिकता सकारात्मक हवी ,त्याच्याकडे धाडसी वृत्ती, मनमोकळेपणा, ध्येयासाठी समर्पण, उदात्त प्रबळ इच्छा हे गुण असावेत
➖ समोरच्याचे सुहास्य वदनाने स्वागत करावे. कौतुक करावे
➖समोरच्याची भेट झाली की त्याची आपुलकीने सगळी माहिती गोळा करावी.
➖नावासहित माणसे लक्षात ठेवायची,
नावाचा चुकीचा उच्चार नको, अवघड असेल तर टोपणनावाने लोक लक्षात ठेवा.
प्रत्येकाला त्याच्या नावाचा अभिमान असतो तो जपा
➖ प्रत्येकाच्या नावातील जादू समजून घ्या ,त्यांच्या लकबीवरून वेगळेपणाने
त्यांना लक्षात ठेवायचे.

5️⃣ संवादकुशल बना
आपल्याला दुसऱ्या शी प्रभावी संवाद साधता आला पाहिजे जेणेकरून आपण आपली इमेज बनवू शकू.
➖ समोरचा बोलत असताना शांतपणे ऐकून घ्या
➖समोरचा बोलत असलेल्या विषयात माहिती नसेल तरीही स्वारस्य दाखवा
कदाचित तुम्हाला उपयुक्त अशी माहिती मिळेल 
➖बोलणार्याकडे आपली नजर असावी आणि संपूर्ण चित्त एकाग्र असावे, कुठलीही चुळबूळ ,हालचाल न करता ऐका
➖समोरचा बोलत असताना आपण मध्ये  बोलण्याचा मोह आवरा फक्त सहानभूतीपूर्वक ऐकत राहा
➖ विचारायचेच असतील तर असे प्रश्न विचारा त्याची उत्तरे देण्यात त्यांना आनंद वाटेल.

6️⃣ प्रियम वदाः
माणसाच्या ह्रदयात शिरण्यासाठी त्याच्या प्रिय असणाऱ्या गोष्टीविषयी  बोलावे लागते त्यामुळे 
➖एखाद्याला भेटण्यापूर्वी त्याला काय आवडते याची माहिती करून घ्या ,अचानक भेट घेत असाल तरी गुणग्राहक नजरेने आवडीची गोष्ट शोधून काढा.
➖त्याच्या आवडीच्या विषयावरून बोलायला सुरूवात करायची. आपण श्रोता व्हायचे.
➖जोपर्यंत तो विचारत नाही तोवर स्वतःचे प्रयोजन आणि माहिती सांगू नये कारण आपल्याला जे हवयं ते आपोआप घडून येत असते.

7️⃣ मनाचा मोठेपणा
दुसर्याला सुखी करूनच आपण सुखी होऊ शकतो, निरपेक्ष बुद्धीने एखाद्यासाठी आपण काहीतरी केल्याचे समाधान चिरकाल आनंद देते त्यामुळे
➖नेहमी दुसऱ्याला मोठेपणा द्या .
➖त्यांचा मान, मान्यता आणि योग्यता जपल्याने तसेच त्यांना केंद्रबिंदू मानले गेल्यामुळे ते खुश होतात.
➖त्यांच्या चांगल्या गोष्टीचे ,छंदाचे ,यशाचे प्रामाणिक कौतुक त्यांना सुखावून जाते.
➖बोलताना कृपाकारक शब्दांचा वापर करा जसे की 
"माफ करा मी तुम्हाला त्रास देतोय "
"तुम्ही हे करून माझ्यावर कृपा कराल का"
"तुम्ही मला मदत केली तर मी तुमचा आभारी राहील"

अपूर्ण

संदर्भ: निलेश शिंदे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know