Monday, May 31, 2021

मी_मस्त_मजेत ( I am Fine Spirit)

#मी_मस्त_मजेत ( I am Fine Spirit )
लेखक - रयुहो ओकावा
अनुवाद - सुवर्णा बेडेकर
प्रकाशक - जयको पब्लिकेशन

आजकाल प्रत्येकजण दुखी आहे
कुणी भलत्या आजारांनी त्रस्त आहे, 
कुणी निरनिराळ्या व्याधींनी ग्रस्त आहे
कुणी गरिबीने गांजलाय
कुणी नातेसंबंधामुळे त्रासलाय
कुणाला काळजींनी घेरलयं
कुणाच्या जीवनातला आनंद हरवलाय
पण आपल्याला कुणीही विचारले कसे आहात ?
तर आपण मात्र म्हणतो मी मस्त मजेत....

पण आपण खरोखरीच मस्त मजेत जगण्यासाठी काय करायचे हयाचे मुद्देसूद मार्गदर्शन हया पुस्तकात करण्यात आलयं

1.#स्थिर_मनं
आपलं मन स्थिर असेल तर मनाची दृढता वाढते, आपण संकटावर मात करायला सज्ज असतो, सकारात्मक आशावादी होतो त्यामुळे रोज ध्यानधारणेद्वारे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा

2 #तुलना_टाळा
प्रत्येकाची शैक्षणिक, सामाजिक क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे त्याच्यासारखे मला का लाभलं नाही याचा विचार करुन दुखी होऊ नका .
कुणा दुसऱ्या सारखे बनण्यापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या क्षमतांना जाणून उत्कृष्ट जीवन जगा
तुलना करायचीच असेल तर पूर्वीचे आपले आयुष्य आणि आजचे आयुष्य हयात झालेली प्रगती हयाची तुलना करा
स्वतःला स्वतःचा प्रतिस्पर्धक बनवा

3 #सकारात्मक_दृष्टिकोन
आपल्या आयुष्यात रोज काही घटना घडत असतात त्या चांगल्या की वाईट हा आपला दृष्टिकोन ठरवत असतो.
त्यामुळे प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी धडा घ्यायचा.
प्रत्येक व्यक्तीला आपला शिक्षक समजायचे आणि आपण एकलव्य बनायचे आणि येणारा प्रत्येक अनुभव आपल्या प्रगतीसाठी पोषक आहे असे विचार करून समरसून जगायचे

4.#विश्वास 
आपल्याला स्वतः वरती आणि स्वतःच्या मनशक्ती वर पूर्ण विश्वास असायला हवा.
आपल्याला दिलेली जबाबदारी मग ती घरातली असो आँफिसमधली असो.. ती 100% चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडा. भलेही काम पूर्ण परफेक्ट नसेलही जमले तरीही हताश न होता सुधारणांवर भर द्या. त्यातूनच आपला आत्मविश्वास वाढेल
संकटाबाबत आणि भविष्याबाबत नकारात्मक विचार करून मनाची शक्ती क्षीण करू नका.
ईश्वर आपल्या सोबत आहे हे सदैव लक्षात ठेवा तसेच निस्वार्थ बुद्धीने दुसर्याला जमेल ती मदत करा आणि त्यातूनही आत्मविश्वास वाढता ठेवा.

5.#स्वआदर  (Self Respect)
आपल्या चुकांची जेवढी दखल घेतली जाते तेवढी आपल्या चांगल्या कामाची स्तुती होत नाही
त्यामुळे आपणच आपल्या चांगल्या गुणांची यादी करायची, लोकांनी केलेले कौतुक आठवायचे,दुर्गुणांचे मोजमाप करायला चांगल्या गुणांची मोजपट्टी वापरायची, आपण आदर्श नाही असे वाटलं तरी स्वतःच्या क्षमतांचे, गुणांचे तटस्थपणे सकारात्मक विचारबुद्धीने आत्मपरीक्षण केलं तर चांगले गुण नक्कीच दिसतील त्यांना वाढवा आणि दुर्गुणांना हटवा
असलेल्या क्षमतांचा विकास करा आणि  सुधारणेतून सर्वोत्कृष्ट होण्याचा विचार करा म्हणजे आत्मविश्वास वाढेल
तसेच शरीर व्यायामाने मजबूत बनवा
म्हणजे सकारात्मक विचार वाढतील, नातेसंबंध उत्तम होतील आणि कामात उत्साह निर्माण होईल आणि स्वतःविषयी आदरही वाढेल.

6.#कर्मप्राधान्य
कुठलेही कामात समस्या येतातच पण म्हणून माघार घ्यायच्या पळवाटा शोधण्यापेक्षा निधड्या छातीने,धैर्याने आणि सकारात्मक विचारांनी समस्यांना सामोरे जा.
समस्यांना मोठे समजणाऱ्या विचारांना दूर सारा .त्यांचा बाऊ करण्यापेक्षा त्या समस्या सुटल्यावर त्याबाबत आपण भविष्यात काय विचार करू हयाची कल्पना करा
आपल्या क्षमतांचा पूरेपूर वापर करण्यासाठी स्वतःवर लादलेल्या मर्यादा शोधा म्हणजे समस्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेल

7 #समजूतदारपणा
एखाद्याला अगदी मनापासून समजून घेणं म्हणजेच प्रेम
त्यामुळे भांडण,कागाळया करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा,
त्यांच्या चुकांना माफ करायला शिका
आपल्याला समजून घेणाऱ्या ,समान विचारक्षमतेच्या लोकांमध्ये वावरा
एखाद्याला मित्र शत्रू अशी लेबल  लावण्यापूर्वी ती व्यक्ती अशी का वागतेय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा

8.#नात्यांची_जपणूक
नाते कुठलेही असो ...घरातील किंवा आँफिसमधले ..नवरा -बायकोचे किंवा बाँस- कामगाराचे
एकमेकांविषयी अनादराची भावना मनात आणण्यापूर्वी त्याच्या गू्ण अवगुणांची यादी करा.
नाते तोडण्याऐवजी त्याला प्रेमपूर्वक सुधारण्याचा प्रयत्न करा तसेच त्याच्या चुकांची त्याला जाणीव करून द्या
वेळोवेळी त्याच्या कामाचे कौतुक करा
 केलेल्या सर्व कामांचे श्रेय टीमला द्या

9.#दयाळूपणा
जो दयाळू असतो त्याच्याकडे अमाप धैर्यशक्ती आणि कोमल अंतकरण असते
तसेच ते सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडायला सक्षम असतात

10.#कृतज्ञता
आपण एखाद्याला मदत करताना निरपेक्षपणे करावी म्हणजे अपेक्षाभंगाचे दुख राहत नाही आणि मदतीच्या बदल्यात आपल्याला काही मिळालेच तर त्याला बोनस समजायचे पण कुणाबद्दल तक्रार करायची नाही 
मात्र जर आपल्याला कुणी मदत केली तर त्याचे सदैव स्मरण ठेवावे

11.#आनंदी_आयुष्य
दुसऱ्या विषयी मनात सदिच्छा आणि आनंद असेल तर तोच आनंद चेहऱ्यावर झळकतो.
आयुष्य नेहमी आनंदी जगण्यासाठी आधिक जबाबदारीने वागावे
मृत्यू अटळ सत्य आहे आणि आपल्याला कधी ना कधी हे जग सोडून जायचे आहे याची जाणीव सदैव ठेवून दुसर्यांना आनंदी ठेवत आपण आनंदी व्हायचे.
अटीशर्तींवर आपला आनंद अवलंबून नसावा ,आनंद संपूर्ण जगात नसला तरी चालेल पण आपल्या मनात तो सदैव असावा, आपल्याभोवती आनंदी वातावरण तयार करण्याची  मनोवृत्ती असली पाहिजे 
सदैव चांगले विचार मनात बाळगा आणि आयुष्य आनंदी बनवा

मजेत आयुष्य जगण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा !!!
संदर्भ: निलेश शिंदे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know