Thursday, May 27, 2021

लेखमाला - भाग दुसरा

#चिंता_सोडा_आणि_सुखाने_जगा
(How to Stop Worrying and start living )

लेखक - डेल कार्नेजी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग दुसरा

#चिंता

चिता आणि चिंता एकसमान मानल्या जातात कारण दोन्ही माणसं जाळायची कामे करतात फक्त एक मेल्यावर तर एक
एक जगत असताना..

#चिंतेचा_जन्म
चिंता उद्भवतात माणसाच्या अतिविचारांतून...
चिंता करणारया माणसाला सतत कशाची न कशाची काळजी करायची सवयच जडलेली असते.
काळजी करताना माणसाचे मन नुसते इकडून तिकडे उड्या मारत असते त्यामुळे त्याचे विचार भरकटतात आणि पर्यायाने माणूसही भरकटतो.
वास्तविक पाहायला गेलो तर असे जाणवते की 99% चिंता हया अगदीच क्षुल्लक आणि अवास्तव असतात पण आपण त्यांच्याशी लढायचे सोडून त्यातच गढून जातो.

#चिंतेचे_दुष्परिणाम
वेगवेगळ्या काळज्या करत राहिल्याने काळज्यामधून भीती जन्म घेते.
मग भीतीतून वाईट विचार, ताणतणाव, नैराश्य, वैफल्यता, थकवा यांना आमंत्रण मिळते.
 मग सर्वप्रथम माणसाची त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि
तो सतत सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांना बळी पडतो.
 सततची भीती शरीरात उच्च रक्तदाब, ह्दयरोग,पोटाचे अल्सर,संधिवात, मधुमेह, थायरॉईड समस्या, अनिद्रा, पांढरे केस,चेहऱ्यावर सुरकुत्या, मुरूमे अशा बर्याच समस्या निर्माण करते.
काळजीचा अतिरेक माणसाला मानसिक आजारी किंवा क्वचित प्रसंगी वेडे सुद्धा बनवू शकतो.
आजवर चिंता केली म्हणून कुणी मरण पावले नाही पण वेळीच चिंतेला आवरले नाही तर मात्र अनर्थ ओढवू शकतो.

चिंतामुक्त होण्यासाठी काय करायचे
1️⃣ कामात व्यग्रता
सतत स्वतःला कामात व्यग्र ठेवायचे
मोकळे मन सैतानाचे घर असते त्यामुळे माणूस जेव्हा पण फ्री असतो तेव्हाच काळजीचा राक्षस अँक्टिव्ह असतो.
म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत सतत स्वतःला वेगवेगळ्या कामात इतके गुंतवून ठेवायचे की दुसरा विचार करायला फुरसतच मिळू नये.
लेखकाचे मते माणसाने कृतीशील व्हावे आणि घर,नोकरीधंदा हयाव्यतिरिक्त
विधायक कार्यात,सामाजिक उपक्रमातही
भाग घ्यावा.

2️⃣ बंदिस्त दिवस
दिवसाला बंदिस्त करायचे
भूतकाळ कसाही असला तरीही तो सरलाय आणि भविष्यकाळ अजून जन्मायचाय.
मग भूतकाळाची खंत आणि भविष्याचे भय बाळगत आजचा दिवस कुढत का जगायचा?
आपण फक्त आजच्या दिवसाचाच विचार करायचा आणि फक्त आजच्याच सार्या कामाचे व्यवस्थित नियोजन करुन ,त्यावर लक्ष केंद्रित करून, आपली पूर्ण क्षमता , बुद्धिमत्ता,उत्साह  वापरून आजची कामे पूर्ण करायची.
शांतपणे ,आनंदाने,प्रेमाने, सात्विकतेने आजचा दिवस जगायचा हयालाच जीवन म्हणतात.

3️⃣ चिंतामुक्तीचा प्रथमोपचार

➡️ पहिल्यांदा प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे परिस्थितीचा आढावा घेऊन स्वतःला विचारायचे की सर्वात जास्त वाईट काय घडू शकेल ?
आजपर्यंत जगावर कितीतरी संकट आले तरीही जग टिकून आहे मग आपण इतके का घाबरतोय
➡️ जे काही वाईट घडणार आहे त्याचा स्वीकार करायची मनाला परवानगी द्या आणि मनशांती अनुभवा.
➡️ जे वाईट घडणार आहे  त्याने जे आपले नुकसान होईल ते कमी करण्याचे उपाय शोधा.

4️⃣ समस्यांच्या मूळावरच घाव घाला
सर्वप्रथम आपल्या काळज्या हया वास्तविक आहेत की खुळचट कल्पना ते पाहायचे. नंतर मनातील पूर्वग्रह दूर ठेवून काळजीमागचे कारण शोधायचे, आणि ती लिहून ठेवायचे.
मग या समस्येवर काय उपाय करता येईल त्यावर विचार करा आणि त्या सार्या उपायांची व्यवहार्यता तपासून अंतिम निर्णयाप्रत पोहचायचे. जो काही निर्णय ठरेल त्याची लगेचच अंमलबजावणी सुरू करायची कुठलाही पुनर्विचार, शंकाकुशंका मनात न आणता बेधडक कृती करायची. हीच पद्धत आपण व्यावसायिक चिंता सुद्धा दूर करू शकतो

5️⃣ सरासरीचा नियम 
कुठल्याही काळजीला आपण सरासरीचा नियम लावला तर त्यांची काल्पनिकता समजून येईल.
समजा आपल्याला अपघात होईल अशी चिंता वाटत असेल तर सर्वप्रथम शांतपणे विचार करा
➡️ हया मार्गावरून रोज कितीजण जातात ?
➡️ आजपर्यंत किती जणांचा अपघात झालाय ?
➡️ एकूण नागरिकांपैकी अपघात झालेल्यांची सरासरी किती
➡️ सरासरी इतकी कमी आहे तर आपण का घाबरायचे?

6️⃣ अटळ ते स्वीकारा
जे घडून गेलयं ते आपण बदलू शकत नाही
अशा गोष्टीबाबत खेद आणि खंत कशाला करायची ?
अपरिहार्य गोष्टी स्वीकारल्या नाही तर परिस्थितीत काही फरक पडत नाही पण आपल्या मनात कडवटपणा ,आत्मक्लेश निर्माण होतो जो पुढे जाऊन मानसिक आजारांचे कारण बनतो.
त्यामुळे ताकद आणि इच्छाशक्ती हयापलीकडील गोष्टीबाबत चिंता करणे थांबवा

6️⃣ काळजीला स्टाँपलाँस
स्टाँपलाँस लावून शेअर मार्केट मध्ये जसे नुकसान रोखता येते तसाच स्टाँपलाँस आपल्या रागाला,इच्छाआकांक्षाना,खेदाला
आणि इतर भावनांना लावून आपले वैयक्तिक नुकसान रोखायचे.
कोणत्याही गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व द्यायचे नाही. त्याच त्याच गोष्टी पुन्हा उगाळून मनशांती गमवायची नाही.

7️⃣ भूतकाळाकडून शिका
घडलेल्या घटना आपण बदलू शकत नाही
त्यामुळे त्याबाबत खंत करण्यापेक्षा आपण त्यापासून बोध घेऊ शकतो.
महापुरुषांची चरित्रे वाचून त्यांनी संकटावर कशी मात केली ते समजू शकेल त्या चुका आपण टाळायच्या आणि आपले आयुष्य आपण घडवायचे.

8️⃣सूडाची किंमत
एखाद्याचा तिरस्कार करताना आपण सतत त्याचाच विचार करतो आणि सूडाच्या भावनेने आपण पेटून उठतो आणि शिवीगाळ, अपमान, नीचपणा..अगदी खून अशा खालच्या थराला जातो
आपले सुखचैन गमावतो. आजारी पडतो.आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेतो.
त्यामुळे बदला घेण्याऐवजी गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीला आपल्या लिस्ट मधून बेदखल करा.
आपल्या शत्रूवर प्रेम करा असे साधूसंत शिकवतात पण प्रेम नाहीतर किमान आपण त्यांच्या चुकांसाठी त्यांना माफ तरी करू शकतोच.
आपण आपल्या स्वतः वर प्रेम करू, आपला आनंद हिरावून घेण्याची त्यांना परवानगी देऊ नये.
आपल्या अहंकारापेक्षा मोठ्या गोष्टीत स्वतःला गुंतवून घ्यायचे म्हणजे सूडभावनेचा विचार करायला आपल्याला वेळच उरणार नाही.
आपण इतके दयाळू व्हायचे की जोवर आपल्याला दुसऱ्याचे दुःख समजत नाही तोवर त्याच्याशी सहानुभूतीने वागायचे.

9️⃣ कृतघ्नता
सगळीच माणसे उपकाराची जाण ठेवणारी कृतज्ञ नसतात कारण तो व्यक्तीच्या संस्काराचा भाग आहे. त्यामुळे आपल्या मदतीबद्दल कुणी आभार मानले नाही म्हणून खंत करत बसू नका.दुखी होऊ नका.
पण आपल्या मुलांवर आपल्या कृतीमधून कृतज्ञतेचे संस्कार करायला मात्र अजिबात विसरू नका.
प्रेम आणि कृतज्ञता हया गोष्टी मागून मिळवायच्या नसतात. मदत करताना आपल्याला जो आनंद मिळतो तो महत्त्वाचा मानायचा आणि कृतज्ञता कुणी दाखवलीच तर तिला बोनस समजायचा.

अपूर्ण
Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know