Thursday, May 27, 2021

लेखमाला - भाग पाचवा

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड 
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                    प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग पाचवा

#अंतर्मन_आणि_मधुर_नातेसंबंध

अंतर्मनाच्या मदतीने आपण उत्तम जीवनसाथी मिळवू शकतो, वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण करू शकतो
तसेच घटस्फोट रोखू शकतो आणि शाश्वत सुखी सहजीवनाची अनुभूती घेऊ शकतो.
तसेच कुटुंबीय,मित्र सहकारी अथवा वरिष्ठ यांच्यांशी उत्तम बाँंडिग आपण तयार करु शकतो

1️⃣आदर्श पार्टनर मिळवण्यासाठी खालील सकारात्मक विधान किंवा प्रार्थना शांतपणे स्थिर मन करून अंतर्मनात पोहचवायचे. आणि आपली प्रार्थना स्वीकारली जाईल हयाबाबत ठाम विश्वास ठेवा.
प्रार्थना :
"मी योग्य व्यक्तीला माझ्या जीवनात आकृष्ट करत आहे.ज्याचा माझ्याशी उत्तम ताळमेळ आहे.दैवी प्रेम तिच्या रूपाने साकार झाले आहे. जिच्यात मी पूर्णपणे एकरूप होणार आहे.
ती व्यक्ती सोज्वळ, प्रामाणिक, विश्वासू,निरागस,सुशील,आनंदी आहे आणि तिला मी माझी आदर्श जीवनसाथी म्हणून स्वीकारले आहे" 

2️⃣ घटस्फोट टाळण्यासाठी आणि उत्तम सुसंवादी साहचर्यासाठी
आपले अंतर्मन सर्वात आधी शांती,सुसंवाद , प्रेमाच्या सरींनी भिजवा.
📛जीवनसाथी चिडखोर असेल तर 
त्याला प्रेमाची आपलेपणाची कमी जाणवतेय,ती पूर्ण करा.
जीवनसाथी जर मनातल्या मनात कुढणारा, सतत नकारात्मक गोष्टी उकरून काढणारा असेल तर मानसिक प्रयत्नाद्वारे विरोध करण्याची सवय सोडा. त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा,चतुराईने वाद टाळा
🏮जीवनसाथी चुगली करणारा असेल तर
आपल्या उणीवांची चर्चा तो शेजारी, नातलंगाशी करतो आणि मग आपण त्यांच्या सुद्धा नजरेतुन उतरतो 
त्यामुळे भांडणे फक्त दोघात मर्यादित ठेवावे.
आजचे भांडण आजच मिटवायचे.
एकतर स्वतःला बदला किंवा जुळवून घ्यायचे पण दुसऱ्याला बदलायचा अट्टाहास करायचा नाही.
हया जगात कुणीच परफेक्ट नाही हे कायम लक्षात ठेवायचे
धार्मिक ग्रंथ आणि स्तोत्रपठण पण फायदेशीर ठरू शकते

3️⃣इतरांशी मधुर संबधासाठी
अंतर्मन रेकाँडींग मशीनसारखे असते त्यावर जे आपण रेकॉर्ड करतो तेच आपल्याला अनुभवायला मिळते.

मधुर संबंधासाठी प्रार्थना :
"माझ्या विश्वाचा मीच एकमेव विचारक आहे, दुसऱ्याबद्दल मी काय विचार करतो त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे.
मी कोणत्याही व्यक्ती, स्थळ अथवा गोष्टीला मला अस्वस्थ किंवा विचलित करण्याचा अधिकार देत नाही.
मी नेहमी सर्वांचे भले चिंतितो
सर्वांना सुख शांती आरोग्य ऐश्वर्य लाभो अशीच मी कामना करतो."

ही प्रार्थना /सकारात्मक विधान रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणून अंतर्मनावर कोरायची.
आणि सगळयांशी मधुर नातेसंबंध बनवण्यासाठी स्वतःला सज्ज बनवायचे

काही टिप्स
➡️ ज्याची आपल्याला इतरांकडून अपेक्षा आहे ते आधी तुम्ही त्यांच्यासाठी करा.
➡️ इतरांशी जुळवून घेण्यापूर्वी आपण स्वतःशी जुळवून घ्या, भावनिक दृष्ट्या परिपक्व,प्रगल्भ व्हा
➡️ इतरांच्या वागण्याची चिकित्सा नको
➡️ जरूरीपेक्षा जास्त प्रतिक्रिया नको
म्हणजेच टाकून बोलणे, मारहाण इत्यादी
➡️ कुणाबद्दल नकारात्मक भाव मनात नको कारण त्यामुळे आजार निर्माण होतात
➡️प्रत्येकाने आपल्या मताशी सहमत व्हावे हा दुराग्रह सोडा
➡️ कुणाच्या टीकेला,द्वेषाला नकारात्मक प्रतिसाद देण्याचा बालिशपणा करु नका
वाईटावर चांगुलपणाने मात करा
➡️ काही माणसे त्यांच्या गतानुभवामुळे विकृत बनलेली असतात त्यामुळे ते वाद उकरून काढतात त्यांच्या बद्दल करूणा भाव बाळगा
➡️ काही लोकांना आपण सुखी झालेले पाहवत नाही ते त्यांच्या निराशेच्या पातळीवर आपल्याला ओढू पाहतात
त्यांच्या वागण्याला बळी पडू नका
➡️ कुणालाही तुमचा आणि तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका
➡️ तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा अधिकार कुणालाही देऊ नका.

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know