Monday, May 31, 2021

आकर्षणाचा_सिद्धांत

#आकर्षणाचा_सिद्धांत
लेखक : मितेश खत्री
प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखकाविषयी:
मितेश एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सुमार बुद्धिमत्तेत कसेबसे MBA पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून प्रायव्हेट कंपनीत जाँब करत होते.
आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल त्यांना प्रथम कळाले तेव्हा त्यांचा यावर विश्वास नव्हता 
पण आयुष्यात एका टप्प्यावर त्यांनी याच सिद्धांताचा वापर करून
स्वतःच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केला 
आज ते प्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर आहेत जे 300 हून आधिक कंपनीच्या लाखो लोकांच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांताने ज्ञानाचा प्रकाश आणून त्यांचे आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवले आहे

#भारतीय_संस्कृती_आणि_आकर्षणाचा_सिद्धांत :
आपल्याला हवी ती गोष्ट आकर्षून घ्यायची अपार जादूई शक्ती माणसाकडे आहे तिचा वापर आत्मविकास /जनकल्याण यासाठी करणारे कितीतरी साधूमुनी हया भूमीत होऊन गेले.
आकर्षणाचा सिद्धांत माहीत नसल्याने हया शक्तीचा वापर स्वतः विरोधात करून वाईट घटना आणि दुःख हयांना अजाणतेपणी लोक आकर्षित करतात.
लेखकाच्या मते आकर्षणाचा सिद्धांत पुरातन काळापासून आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा भाग आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेत याचे पुरावे मिळतात.

#आकर्षणाच्या_सिद्धांतामागचे_विज्ञान :
भौतिकशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्य अथवा पदार्थ उर्जेपासून बनला आहे ...अगदी देव सुद्धा हयाच उर्जेपासून बनला आहे
फक्त प्रत्येकाची कंपन करण्याची क्षमता म्हणजेच कंप्रता (Frequency) वेगवेगळी असते 
सुसंगत कंप्रता असणारे पदार्थ वा मनुष्य एकमेकांना आकर्षित करतात.
जगातील एकूण उर्जेचे प्रमाण कायम स्थिर असते त्यामुळे आपण कितीही उर्जा वापरली रूपांतरित केली तरीही ती संपत नाही
त्यामुळे आपल्याला जे जे हवं आहे ते या संसारात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे

#आकर्षणाच्या_सिद्धांताची_कार्यपद्धती :
भावना -विचार-विश्वास- कृती हया चतुसूत्रीनुसार काम
जशा आपल्या भावना तसाच आपण विचार करतो आणि मग त्या विचारांवर आपण विश्वास ठेवतो आणि तशीच कृती आपल्या हातून घडते.

#भावना
आपल्या मनातील भावनांनुसार परिस्थिती आपण आकर्षित करत असतो 
आनंद,प्रेम,आशा ,स्पष्टता, शांतपणा, उत्साह, सामर्थ्य, धैर्य हया सकारात्मक भावना आहेत तर त्याच्या उलट दु:ख, तिरस्कार, निराशा, गोंधळलेपणा, कंटाळलेपणा,कमजोरी, भीती हया नकारात्मक भावना आहेत
आपल्या मनातील भावनांवर आपले नियंत्रण असावे,
आपल्या मनात सतत कृतज्ञतेचा भाव असावा,
आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आपण धन्यवाद द्या,
जे काही मिळालयं त्यासाठी परमेश्वराचे त्रिकाळ आभार व्यक्त करा,
स्वतः शी आणि दुसऱ्यांशी निगेटिव्ह बोलणे टाळावे...आणि चुकून बोललोच तरी cancel  बटन दाबत असल्याचे चित्र मनासमोर आणा,
अडचणीवर आणि वाईट भावनांवर मात करायला स्वसंवाद करताना नेहमी स्वतःला सकारात्मक प्रश्न विचारा,
क्षमा हे बर्याच मानसिक दुखण्यावर एक नंबरी इलाज आहे त्यामुळे अपराध कसलेही असो स्वतःला आणि इतरांना मनापासून क्षमा करा,
ज्या गोष्टी ,माणसे बदलता येत नाही त्यांना स्वीकारा आणि जे करता येईल ते बदल करत जीवनात पुढे जात रहा

#विचार
विचार हे उर्जेच्या कणांप्रमाणे असतात 
सगळया समान विचारांना एकत्र आणले तर विश्वाकडून आधिक उर्जा आपण आकर्षून घेतो
जसे आपले विचार तशी आपली कंप्रता बदलते
 सकारात्मक विचारांनी धन कंप्रता ( +ve Frequency)   बनते
नकारात्मक विचारांनी ऋण कंप्रता( -ve frequency ) बनते.
धन कंप्रतेमुळे आपल्या यश,धन ,आरोग्य वाढतात आणि ऋण कंप्रतेकडे  आपल्याकडील हया सर्व गोष्टी काढून घेण्याची ताकद आहे. त्यामुळे जे हवयं फक्त त्याचा जास्तीत जास्त विचार करा, प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने करण्याची कृती सांगणारे चित्र  डोळयासमोर आणा.
भूतभविष्याचा विचार न करता वर्तमानात जगा आणि जे हवयं ते हया क्षणी मिळालच आहे अशी कल्पना करा आणि त्या आनंदात जगा
चांगल्या विचारांची अनुमोदने (Positive Affirmation)
"मी सुखी वैभवशाली आरोग्यदायी जीवन जगत आहे......"
लिहून अथवा फोन मध्ये अँडिओ रेकाँर्ड बनवून 
स्वतः ला हया कंप्रतेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा
जास्तीत जास्त Inspirational आणि positive विचारांचा खुराक रोज घ्या

#विश्वास
एखाद्या गोष्टीच्या वैधतेवर शंका नसणे म्हणजे विश्वास
जे हवयं ते मिळवण्याची आपली पात्रता आहे असा आपला ठाम विश्वास हवा 
स्वतः वर मर्यादा लादणारे विश्वासांना ओळखा (Negative Belief) जसे की...
हे काम कठीण आहे ,मला जमणार नाही, माझ्या नशीबात नाही
असे प्रत्येक गोष्टीत आपली वाट अडवणारे मनात दडलेले चुकीचे समज ओळखा
त्या चुकीच्या मर्यादा लादणार्या विश्वासांना वाढीसाठी मदत करणाऱ्या विश्वासात बदला जसे की....
हे काम सोपे आहे, मला जमू शकते  
दररोज असे Positive Belief  किमान दहावेळा कानावर पडले पाहिजेत अशी व्यवस्था करा आणि अनुमोदनाद्वारे असे परिवर्तन घडवून आणा

#कृती  
कृतीशिवाय आकर्षणाचा नियम फोल ठरतो .
आत्मविश्वासपूर्ण ठाम कृती आपल्या इच्छा किती प्रबळ आहे याची पुष्टी देतात
आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उद्दिष्टांच्या अनुषंगाने योग्य कृती आपल्याला विजेता बनवतात.
जसे की उत्तम करियर साठी आपली कामे सर्वोत्कृष्ट करा
चांगल्या नातेसंबंधासाठी प्रेम,आदर, स्नेहभाव दाखवा
आधिक पैसा हवा असेल तर पैसा वाचवा आणि वाढवा
वजन कमी करायचे असेल तर Healthy Diet आणि व्यायाम करा

#आकर्षणाचा_वेग_वाढवण्यासाठी : 🗝️
आकर्षणाच्या सिद्धांताद्वारे आपल्या ईच्छांची लवकरात लवकर पूर्तता होण्यासाठी 
1️⃣आपली ध्येय रोज लिहित राहून मेंदूतील RAS अँक्टिव्ह करायची आणि मग त्याच्या मदतीने नवनव्या संधी आकर्षित करायच्या
व ध्येयपूर्ती साधायची
2️⃣ध्येयफलकावर आपली जे काही ध्येय असतील त्याचे फोटो एका बोर्डवर लावा जेणेकरून मेंदू विचार करायला प्रोत्साहित होईल
3️⃣आकर्षणाच्या सिद्धांतावर पूर्ण विश्वास ठेवा
त्यामुळे कार्यनिष्पत्तीबाबत का,कधी,कसे असे प्रश्न मनात न आणता काळजी चिंतेला दूर ठेवून सरळ परमेश्वराला शरण जा
4️⃣कमतरतेचे अभावाचे विचार मनात असेल तर कुठलीच गोष्ट परिपूर्ण होणार नाही, रोज रात्री झोपताना माझे आयुष्य परिपूर्ण आहे असे स्वतःला बजावा.
5️⃣आपल्या भूतकाळातील किमान दहा चांगल्या आठवणी लिहून काढा जेणेकरून हया धन संदर्भामुळे आपली धन कंप्रता वाढेल आणि आत्मशंका दूर होतील
6️⃣कायम स्वतःला कुठल्याही कारणाशिवाय आनंदी ठेवा असा हेतूरहीत आनंद आपल्याला निगेटिव्ह एनर्जी पासून दूर ठेवतो
7️⃣आकर्षण सिद्धांत यशस्वी रीत्या वापरणाऱ्या व्यक्तीची भेट घेऊन आपल्या चूका कुठे होतात ते समजून घ्या, त्या सुधारून लवकर परिणाम मिळवा
8️⃣ज्या दिवशी आकर्षणाचा सिद्धांत वापरणे सुखद वाटत नाही अशा दिवसापुरता त्याचा वापर थांबवा आणि योग्यवेळी पुन्हा वापरा.

#आकर्षणाचा_सिद्धांत_कधी_काम_करत_नाही 
🅰️जेव्हा आपली कंप्रता आपणच अडवतो 
➡️ सतत ध्येयाची काळजी करून,
➡️ स्वत:वर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवून,
➡️पुरेशी आणि अनुरूप कृती न करून
➡️ माणसं आणि परिस्थिती विषयी निगेटिव्ह बोलून अथवा ऐकून,
➡️ कृतज्ञता कमी आणि तक्रारी आधिक केल्यामुळे
➡️ आपल्या लक्ष्याशी आपण वचनबद्ध नसल्यामुळे

🅱️नियती 
आपल्या आयुष्यातील 20% भाग नियतीवर अवलंबून असते 
आपला जन्म मृत्यू व्यंग हे आपल्या हातात नसतात
पण आपल्या नशीबातच नाही असे समजून प्रयत्न करणेच सोडल्यास कंप्रता अडवली जाते

#आकर्षणाच्या_सिद्धांताने_इच्छापूर्ती ⛑️💏🚗🛍️
भावना -विचार -विश्वास- कृती या चतूसुत्रीच्या माध्यमातून
मनोचित्र-अनुमोदन-आभार-कृतज्ञता व्यक्त करून आपण आपले परस्परसंबध, आरोग्य सुधारू शकतो तसेच इच्छित धन आकर्षित करू शकतो.

#आकर्षणाचा_सिद्धांत_आणि_वास्तू 🏠
जशी वस्तूत उर्जा असते तशीच उर्जा आपल्या  वास्तूत असते ,
या उर्जेचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक दिशेनुसार पंचतत्व ( अग्नी,वायू ,आकाश,जल,पृथ्वी ) असतात त्या तत्वांनुसार वास्तूची रचना असेल तर त्यांची उर्जा आपल्याला लाभते आणि आपली धन कंप्रता वाढते
धन कंप्रतेसाठी आपले घर कार्यालय हे वास्तुशास्त्रानुसार असावेत आणि नसेल तर योग्य तो सल्ला घेऊन बदल करावे

#आकर्षणाचा_सिद्धांत_आणि_मुले 👫

आकर्षणाचा सिद्धांत वयाच्या 18 व्या वर्षी जर कळाला आणि वापरता आला तर आपण आज काहीतरी वेगळेच असतो 
पण आता आपल्या मुलांना याचे ज्ञान देऊन त्यांची धन कंप्रता वाढवायला आणि त्रुण कंप्रता नियंत्रित ठेवायला मदत करूयात
संदर्भ: निलेश  शिंदे 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know