Wednesday, September 22, 2021

START WITH WHY

START WITH WHY
              लेखक -सायमन सिनेक
       प्रकाशक - मंजुळ पब्लिशिंग हाऊस

लेखमाला :भाग दुसरा

#Why_ची_गरज 
 ▪️बुद्धिमत्ता, प्रतिभा, उत्तम लोकसंग्रह, धनसंपदा हे सगळे असूनही माणसं यशस्वी होत नाही कारण त्याला त्याचे लक्ष्यच निश्चित नसते 
         उदाहरणार्थ लेंगली यांच्याकडे सर्व काही साधनसामग्री होती पण राईट बंधूच विमानाचा शोध लावण्यात यशस्वी झाले
▪️लक्ष्य निश्चित असेल तरच इच्छाशक्ती च्या जोरावर माणूस स्वतः प्रेरित होतो आणि इतरानाही प्रेरित करू शकतो.
    उदाहरणार्थ मार्टिन ल्यूथर किंग यांचा वर्णभेदाविरोधी लढ्यात
"माझ्याकडे स्वप्न आहे " हया एकाच वाक्याने लोक प्रेरित झाले
▪️माणूस आवडीने राजीखुशीने काम करतो आणि तो उत्पादक,रचनात्मक बनून कमी साधनसामग्री मध्येही परिवर्तन घडवून आणतो.
  उदाहरणार्थ इन्फोसिस ही नारायणमूर्ती यांची कंपनी बायकोकडून घेतलेल्या कर्जावर सुरू झाली पण सुरूवातीपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांमुळे टाँप आयटी कंपनी बनली

1.लक्ष्यनिश्चिती:
लक्ष्य ठरवण्यासाठी माणसाच्या धारणा ,विचार आणि माहिती उपयोगी पडते त्यासाठी पाँडकास्ट,पुस्तके, संमेलन सहभाग, गुरूतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.
ध्येय ठरवताना स्वतःचे मूल्य वाढवणे, समाजाच्या उपयोगी पडून समस्यांची सोडवणूक हया गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

2.प्रेरणा :
एखादी गोष्ट का करायची आहे  हे जोवर निश्चित नसते तोवर माणूस स्वतःच प्रेरित नसतो मग तो आपल्या ग्राहकांना , कर्मचाऱ्यांना, कार्यकर्त्यांना प्रेरित करू शकत नाही. मग ते फक्त साम-दाम-दंड- भेद  वापरून हेराफेरीने माणसांना प्रेरित करू पाहतात.
हेराफेरी करण्याचे अनेक मार्ग आहेत
👉साम: 
सेलिब्रिटींना घेऊन वेगवेगळ्या जाहिराती केल्या जातात
 मित्रपरिवाराच्या द्वारे  Affilate marketing केली जाते.
वेगवेगळे  सर्व्हे ,तज्ञ यांचे रिझल्ट दाखवून Peer pressure निर्माण केला जातो ज्यामुळे माणसाला असे वाटत राहते की आपणच फक्त चुकीचे आहोत आणि बहुसंख्याप्रमाणे वागण्यास भाग पाडले जाते.

👉दाम: कंपन्या दरयुद्ध करून ग्राहकांना आकर्षित करू पाहतात.
         कमी दरांचे ग्राहकांना व्यसन लावले जाते, त्यांना मोहात          पाडले जाते जेणेकरुन जास्तीत जास्त खरेदी करवून अल्प फायदा परतावा म्हणून दिला जातो.
🔶 कँशबँक आँफर
🔶 रिबेट
🔶 बाय वन गेट वन फ्री 
🔶 मूल्यवर्धित दर
🔶 सेंकडरी स्कीम
🔶 फ्री व्हाउचर
कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बढतीची अमिषे दाखवतात आणि शेअरधारकांना डिव्हिडंड ची आमिषे दाखवत राहतात.
राजकारणी कार्यकर्त्यांना पदांची लालूच दाखवतात आणि  मतदारांना वन टाइम कस्टमर समजून पैसे वाटप करून निवडून येण्याचा प्रयत्न करतात 

👉दंड : ग्राहकांच्या मनात असुरक्षिततेची जाणीव निर्माण केली जाते. आँफर स्वीकारली नाही तर मोठे नुकसान होईल आणि खूप                 काही गमवावे लागेल असा अविर्भाव दाखवला जातो
कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती दाखवली जाते
राजकारणात आँफर स्वीकारली नाही तर पोलीस / तपाससंस्थेमार्फत जेरीस आणले जाते

👉भेद : इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हयासाठी नवनव्या कल्पना आणि वैशिष्ट्ये उत्पादनात आणल्या जातात आणि ग्राहक आकर्षित केले जातात ...काहीकाळ उत्पादन आकर्षक वाटते पण लवकरच इतर कंपन्याही तोच मार्ग अवलंबला जातो आणि मग स्पर्धा वाढत जाते आणि नफा घटत जातो. वारंवार वाढणारा तोटा कंपनीला कर्जाच्या खाईत लोटतात आणि मग कंपनी नामशेष होते.
राजकारणी आपला पक्ष पार्टी इतरांपेक्षा वेगळी आहे असे दर्शवतात

  हे हेराफेरी करण्याचे अनेक उपाय आहेत पण त्या माणसाची निष्ठा आणि विश्वास खरेदी करता येत नाही हे मात्र जाणूनबुजून विसरतात.

हयावर उपाययोजना पाहूया उद्याच्या भागात....

Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know