लेखक -सायमन सिनेक
अनुवाद - प्रतिक पुरी
प्रकाशक - मंजुळ पब्लिशिंग हाऊस
लेखकाविषयी :
ब्रिटनमध्ये जन्मलेला आणि अमेरिकेत वाढलेला मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून जगाला ज्ञात असलेला सायमन ग्रँज्युएशन नंतर वकीली करण्यासाठी Law चे शिक्षण घेत होता.
पण तिथे त्याच्या मैत्रिणीने त्याला त्याच्या या चुकीची जाणीव करून दिली आणि मग त्याने लाँ चे शिक्षण सोडून दिले आणि अँडव्होकेट होण्याऐवजी अँडव्हर्टायझिंग क्षेत्रात करिअर सुरू केले.
त्याने या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर start with why हे पुस्तक 2009 साली प्रकाशित केले.
जगभर नावाजले गेलेल्या या पुस्तकानंतर त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला
विविध विद्यापीठ, संस्था , टेडटाँक, हया त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना आमंत्रित करतात आणि आता ते पूर्णवेळ मोटिव्हेटर बनून हजारो डाँलर कमावतोय.
पुस्तकाविषयी :
हे पुस्तक एकूणच उद्देश आणि त्यावरील कार्यवाही यातील सातत्य यांच्या जोरावर काही कंपन्या,संघटना, आंदोलन कशा यशस्वी होतात.
तसेच काही उत्तम कंपन्या उद्देशापासून भरकटल्या तर कशा काळाच्या पडद्याआड जातात हे सप्रमाण दाखवून देतो.
भूत,वर्तमान आणि भविष्य हया तिन्ही काळात हेच त्रिकालाबाधित सत्य राहिले आहे हे वेगवेगळ्या सत्यकथांमधून लेखक आपल्या नजरेस आणून देतो.
लेखकाच्या मतांना थोडक्यात जाणून घेऊया आजपासून लेखमालेच्या रूपात
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know