WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Wednesday, September 22, 2021

पुस्तकाचे नाव: इचिगो इची

#वाचनसाखळी 
पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव: इचिगो इची

एकच चित्रपट चार वेळेला पाहिल्यावर दरवेळेस तितकाच आनंद मिळतो का ?
एकाच सहलीच्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तेवढीच मजा येते का ?
रोज ऑफिसला गेल्यावर आणि ऑफिसमधून घरी आल्यावर तेवढ्याच उत्साहाने आपण सर्वांना भेटू शकतो का ?
भविष्य आणि भूतकाळ सोडून वर्तमानात जगणं गरजेचे आहे हे माहीत असूनही मन कायम पळतं का ?
जीवन क्षणभंगुर आहे पण तितकंच आनंददायी आहे हे कळत पण वळत नाही असं होतं का ?
ज्या आनंदासाठी आपण सर्वकाही करतो ते करत असताना आनंद घ्यायचाच राहतो का ?
या आणि अशा कितीतरी महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे म्हणजे इचिगो इची.
इकिगाई या जागतिक बेस्टसेलर पुस्तकांमधून हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानी लोकांच्या दिर्घायुषी आणि कार्यक्षम जीवनाचं रहस्य लोकांसमोर मांडले. आता हेच दिर्घायुष्य वर्तमानात राहुन त्यातील प्रत्येक क्षण आनंदाने कसा जगायचा याचं उत्तर त्यांनी इचिगो इची या पुस्तकात लिहिले आहे.
इचिगो इची म्हणजे प्रत्येक क्षण वर्तमानात जगण्याची कला.
जपानी लोक असं मानतात की चित्रपट किंवा सहलच काय पण रोजची चहा पिण्यासारखी लहान आणि दिनचर्येतील कृती सुद्धा जर योग्य पद्धतीने केली तर असामान्य आनंद देऊ शकते.
पंचेंद्रिय जी आपल्याला भरकटवतात तीच भुतकाळ आणि भविष्यात पळणाऱ्या मनाला वर्तमानात आणू शकतात.
ध्यान ही दोन तास वेळ काढून करायची प्रक्रिया न राहता जीवनाचा अंग कशी बनू शकते या आणि अशा कितीतरी विषयांवर लेखकाने अतिशय सोप्या भाषेत आणि जपानी संस्कृतीचा आधार घेत मते मांडली आहेत.
         इचिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. जसं की,

🍁भूतकाळ आणि भविष्यकाळ यापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि अद्वितीय कसा करायचा?

🍁स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे आत्मसात करावे?

🍁योगायोग वाटणाऱ्या गोष्टींमागील संकेत कसे समजून घ्यावेत?

🍁जागरूकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी?

🍁वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये 'इचिगो इची' क्षण कसे निर्माण करावेत?

🍁जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कसा निर्माण करावा?

🍁माईंडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवावा?

'प्रत्येक क्षण वर्तमानात जगा', आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.

लेखक: हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस्क मिरेलस.
प्रकाशन: मायमिरर पब्लिशिंग हाऊस.
किंमत: १७५/-
Mahesh sakunde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know