Friday, September 3, 2021

कैकयी

कैकयी
रामायणाची नायिका म्हणावे की खलनायिकातिच्या?जिच्या पुत्रमोहापोटी  रामायण घडले!स्वतःहून प्रिय असलेल्या श्रीरामाला वनवासी केलं म्हणून जगाचा तिरस्कार जिच्या वाट्याला आला!ज्या पुत्रसाठी हे घडवले त्या पुत्राने ही तिची, "माता न तू वैरिणी!" अशी संभावना केली ती राजा दशरथ यांची प्रिय पत्नी! अश्वविद्या निपुण! विरांगणा! युद्ध कला निपुण! पराक्रमी! सहाशी! सुरासुर युद्धात राजा दशरथाचे सारथ्य करून त्यांचा जीव वाचवनारी निपुण सारथी!जिला पाहताच युवराज दशरथ घायाळ झाला होता!जणू ती स्वर्गातील अप्सरा! लावण्यवती! सौंदर्यवती! पट्टराणी कैकयी!श्रीरामाची प्रिय छोटी आई कैकयी!महाराणी कैकयी वरील मराठीमधील ही पहिलीच कादंबरी!मुळ रामायण आधार मानून लिहिलेले एक सुंदर कादंबरीमय चरित्र!

पुस्तक: कैकयी

लेखक:डॉ नि. रा.पाटील पिलोदेकर

कैकय देशाची राजकुमारी कैकयी! पिता केकयनरेश अश्वनाथ म्हणून प्रसिद्ध! घोड्यांवर असलेला अत्यंतिक प्रेम! त्यांची केलेली मनोभावे सेवा आणि औषधोपचार यामुळे वसू प्रसन्न होऊन पशू पक्षी यांची भाषा समजण्याचा वर प्राप्त! पण पशु पक्षी यांचा संवाद कोणाला सांगितला तर त्या क्षणी मृत्यू! असा एक विलक्षण वर की शाप?आपल्याच पत्नीकडून जेंव्हा विचारणा होते तेंव्हा ,"माझा मृत्यू होईल यामुळे!", राजा सांगतो.पण हट्ट धरून बसलेली राणी क्रोधित होऊन, "मेलात तर मेलात पण मला सांगा!" असे जेंव्हा म्हणते तेंव्हा राजा त्या आपल्या प्रिय राणीचा त्याग करतो.गांधारदेशी माहेरी सोडून येतो! पण राजकुमारी कैकयी साठी आई नसते.तिचा सांभाळ करण्यासाठी ,तिला स्वतःचे दूध पाजण्यासाठी एक कुणबीन राजवाड्यात आणली जाते....तीच मंथरा! जी पाठराखिन म्हणून कैकयी च्या सोबत येते कायमची!

कैकयी आई सारखीच अनुपम सुंदर!पित्यासारखी अश्व विद्येत आणि युद्धकलेत निपुण! शस्त्र घेऊन रणात पराक्रम गाजवणारी! पुढे अश्व खरेदीसाठी आणि स्पर्धेसाठी आलेला युवराज दशरथ या सुंदर रुपवतीमुळे घायाळ होतो!लग्नाची मागणी घालतो.प्रसंगी युद्ध करून पळवून नेण्याची तयारी करतो!कैकयी चां भाऊ आणि पिता वेगळाच कट रचून मागणी ला नकार देण्याचा प्रयत्न करतात. कौशल्या आणि सुमित्रा या दोन राण्यानंतर आपल्या मुलीला तिसरी पत्नी म्हणून द्यावेसे वाटत नाही.

'कैकयी पुत्र पुढे राजा म्हणून घोषित करणार असाल तर आम्ही कैकयीचा विवाह करून देऊ!' असे वचन युवराज दशरथ यांच्याकडून मागितल्या जाते.यावर 'ज्येष्ठ पुत्र राजा केला जाईल मग तो कैकयी चां असो किंवा सुमित्रा कौशल्याचा!' असा शब्द दशरथ देतो. कौशल्या आणि सुमित्रा यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती ही गोष्ट ही चर्चिली जाते.विवाह होऊन ती अयोध्येत येते!

लेखकाने ही कादंबरी अतिशय सुंदर आणि तटस्थ राहून लिहिलेली आहे.वाचकाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे!

कैकयी शुर होती! वीर होती! कमालीची हुशार आणि प्रेमळ होती! राज्याभिषेकाच्या प्रसंगापर्यंत ती साऱ्यांची आवडती महाराणी होती! 
रामाची तर अतिशय प्रिय आई होती!ती प्रेमळ आहे.मोठ्या दोन सवतींच्या सेवेत रमणारी आहे.तिला स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार नाही ना शौर्याचा!

भयकंपित देवेंद्र राजा दशरथ यांना दानव शंभरासुर याच्या विरुद्ध मदत मागतो.राजा दशरथ युद्धाला जाताना कैकयी सोबत जाते.ऐन युद्धात राजा दशरथ यांचे सारथ्य करून त्यांचे कौशल्याने प्राण वाचवते.त्यावर खुश होऊन राजा दशरथ दोन वर देतात...या प्रसंगा नंतर कैकयी अधिकच नम्र होऊन राहते.ना शौर्याचा ना दिलेल्या वराचा ती कधी उल्लेख करते.इंद्राच्या दरबारात महिनाभर स्वर्गसुख उपभोगण्याचे भाग्य दशरथ राजाला कैकयी मुळे मिळते.स्वाभाविकपणे राजा कैकयी च्या प्रेमात अधिकच पडतो...पण याचाही ती कधी तेंभा मिरवत नाही.मुळ रामायणात ही याचा कोठे उल्लेख येत नाही! 

युवराज रामाला राज्याभिषेक होणार म्हणून ती अत्यानंदाने बेभान होते.मिठाई वाटण्याचे काम स्वतः करते.आपले आभूषणे मंथरेला देते....पण त्या नंतर जे घडते ...त्या प्रसंगानंतर ती निंदनीय होते.तिचा जग तिरस्कार करतो.तिच्या वाट्याला केवळ शिव्या आणि अपमान येतो!

त्या कैकयी ला स्वतःचा पुत्र भरत माहीत नव्हता का?श्रीराम हा त्याचा प्राण आहे हे तिला माहीत नव्हते का? भरत धर्मशील आहे हे तिला माहीत नसेल का? त्याच्या परस्पर त्यासाठी राज्य मिळवले तर मुलगा भरत ते राज्य स्वीकारणार नाही याचा अंदाज ही तिला नसेल का?

प्रजा आपल्या विरुद्ध बंड करून उठेल याची भीती कैकयी च्या मनात नसेल का?

ही खरच खलनायिका आहे का? का राक्षसांच्या अत्याचाराला संपवून टाकण्यासाठी केलेल्या दीर्घ योजनेतील मोठी जबाबदारी असलेली नायिका आहे?

श्रीराम कधी दोष देताना का दिसत नाहीत? त्यांच्या तोंडी कधीच अपशब्द का नाहीत?त्यांना का कैकयी ची काळजी वाटते? 

जगाच्या कल्याणासाठी,मानवजातीच्या हितासाठी श्रीराम वनवास धारण करत असतील आणि त्यातून राक्षस जातीचा अत्याचार मोडून काढत असतील तर ते एका अर्थाने महान कार्य आहे.
अतिदुर उत्तरेतील राजकुमार वनवासी होऊन दक्षिणेत येतों कशाला?ना सैन्य ना संपदा!कोणत्याही राजाची व सम्राटाची मदत न घेता अतिशय बलाढ्य आणि शक्तिशाली राक्षसांचा बीमोड केला जातो तो सामान्य वानर , वनवासी जनतेकडून!सामान्य माणसाला संघटित करून आणि प्रेरित करून आंदोलन उभे केले जाते आणि सम्राट असलेल्या रावणाला ठार केले जाते.पृथ्वी भयमुक्त केली जाते.

पण बदनामी मात्र कैकयी ची होते! इतकी मोठी बदनामी होणार याची कल्पना तिला नसेल का?

काय म्हणतात भारद्वाज मुनी?

भरतास भारद्वाज मुनी म्हणाले ,"वत्सा तुझी माता कैकयी वर मुळीच दोष दृष्टी ठेवू नकोस. तिचे काहीही चुकलेले नाही. तुला वाटते तशी तुझी माता नसून ती धोरणी व हुशार आहे. श्रीरामावर नितांत प्रेम करणारी तुझी माता अशी वागते, यामागे काही तरी कारण असलेच पाहिजे असे तुला नाही का वाटत? पुत्र भरतास राज्य मिळाले तरी बंधू प्रेमामुळे तो ,ते स्वीकारणार नाही हेसुद्धा तिला माहीत होते.  श्रीरामास वनवास व भरतास राज्य मागण्याचे तिचे हे कार्य तिन्ही  लोकांत आपली फक्त निर्भत्सना समाजात होईल हे सुद्धा तिला चांगलेच माहीत होते. तरीही ती वीरांगना क्षात्रणी त्या निर्भत्सना चे विष पचवण्यासाठी तयार झाली. या मागे तुझ्या राज्य नाकारून मिळणाऱ्या कीर्ती यशापेक्षा श्री रामाने वनवासाला जाऊन त्यास मिळणारे राक्षस संहाराचे यश अधिक त्रिकालबाधित राहणार आहे हे ही तिने ओळखले आहे!"

ही एक विचार करण्यास प्रवृत्त करणारी कादंबरी आहे. हे निश्चित!

सोपी भाषा ,ओघवती शैली आणि लालित्य ही वैशिष्ट्य वाचकाला खिळवून ठेवतात!

उर्मिला, लक्ष्मण यांच्या मनोगतमुळे या कादंबरीला अधिकच उंची मिळाली आहे.त्यांच्या तोंडून आपल्याला कळणारे वर्तमान अधिक संवेदनशील आणि मानवीय भावनांना जोडणारे बनवते.

या कादंबरीत कैकयी ला नायिका म्हणून दाखवण्याचा कोठेही आततायी प्रयत्न झालेला नाही हे विशेष! जनाच्या दृष्टीने ती खलनायिका आहेच! पण श्रीराम आणि ध्यानस्थ ऋषी, भारद्वाज ऋषी यांचे ही मते यात पुढे आणल्यामुळे वाचकाला हे मानावे लागते की रामायणात कैकयी ने लोकनिंदा स्वतःहून ओढवून घेतली.जनातेपणी ओढवून घेतली!

प्रकाशन: विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठ:२८६ मूल्य:४००/ 

सवलत मूल्य:३५०/ टपाल:३०/ एकूण:३८०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता,पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा!

फोन पे, गुगल पे, Paytm:9421605019

ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी व्हॉट्सअप:9421605019

व्हॉट्सॲप कधीही! कॉलिंग टाईम:सकाळी८:३० ते:रात्री:९!

टिप:कॅश ऑन डिलिव्हरी ची व्यवस्था नाही!क्षमस्व!

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know