लेखक : जेम्स क्लियर
प्रकाशक : जयको पब्लिकेशन
अँटोमिक हँबिट म्हणजे सवयींचे अणुरूप
किंवा सवयींना लहान लहान तुकड्यात विभागून त्या अमलात आणायच्या.
आपल्या प्रत्येकाला काही सवयी असतात त्यापैकी काही चांगल्या असतात तर काही वाईट असतात.
सवयी कधीच संपवता येत नाहीत पण वाईट सवयी बदलून चांगल्या सवयी मात्र लावता येऊ शकतात.
खरेतर चांगल्या सवयी लावणे आणि त्या टिकवणे हे शेती करण्यासारखे आहे आणि वाईट सवयी बदलणे हे मोठा वटवृक्ष हलवण्यासारखे अवघड आहे पण ठरवले तर अशक्य असे काहीच नाही.
सवयी बदलणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे जी सातत्याने करावी लागते. त्यात खंड पडू द्यायचा नसतो.
हया सवयी बदलण्याच्या प्रक्रियेत माणसाला अडसर ठरू शकतात
तणाव : जबाबदाऱ्यांचा ताण, संयमाचा अभाव, आरोग्य समस्या
नकारात्मक विचार : स्वतःला कमी लेखणे
हया सवयी बदलण्याच्या प्रक्रियेत माणसाला मदत करू शकतात
ज्ञानपिपासूपणा : आजीवन ज्ञान मिळवण्याची तयारी
उत्पादकता : कौशल्ये, कामे हाताळण्याची पद्धत
संबंध : विस्तृत आणि सशक्त माणसांचे नेटवर्क
सवयी बदलणे ही तीन टप्प्याची प्रोसेस आहे
पहिला टप्पा : लक्ष्य निश्चित करणे
दुसरा टप्पा : धारणांमध्ये बदल
तिसरा टप्पा : अमंलबजावणी
उदाहरण द्यायचे झाले तर सिगारेटची सवय सोडायची हे लक्ष्य निश्चित केले की , त्या सवयीमागच्या आपल्या चुकीच्या धारणा शोधायच्या ( सिगारेटमुळे चिंतामुक्ती ) आणि त्या बदलण्यासाठी ज्ञानमार्ग वापरायचा (चिंतामुक्तीचे खरे पर्याय शोधायचे )आणि बदलासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहायचे. नवे पर्याय आपल्याला योग्य वाटतील ते अंमलात आणायचे.
वाईट सवयीपासून रोज 1% फारकत घ्या आणि फरक अनुभवा....
अपूर्ण..
#ज्ञानयज्ञ
#सवयी
#atomichabits
#स्वसुधारणा
#selfhelp
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know