WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Saturday, July 3, 2021

आमचा बाप आन आम्ही

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या जाधव कुटुंबीयांची ही कहाणी आहे.वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड होत असल्याच्या काळात या पुस्तकाने देशी-विदेशी १७ भाषांमध्ये अनुवादित होऊन जगभरात केवळ वीस वर्षांत तब्बल ६ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी.
नरेंद्र जाधव यांच्या लहानपणीची ही घटना या पुस्तकातील मुख्य पात्राच्या वैचारिक उंचीची साक्ष देत राहते.
नरेंद्र जाधवांना बालपणी एक प्रश्न विचारला जायचा,की 'तू मोठेपणी कोण होणार?'तर ते इतर लहान मुलांसारखे चुणचुणीत उत्तर द्यायचे.पण जेव्हा हाच प्रश्न त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना विचारला, तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले,"मला लेखक व्हायचंय."तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाची प्रतिक्रिया..'अरेरे! याला भीक मागावी लागणार!"अशीच काहीशी होती.
त्यानंतर दादांनी त्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले,"ह्ये बघ, तुला लोक सांगतील;तू डाक्टर व्हय, इंजनेर व्हय,बालिस्टर व्हय,पन तू कुणाचं काय आयकू नको.तू तुझ्या बुद्धीला जे वाटंल ते होन्याचा प्रयत्न कर.मीबी तुला सांगणार नाही,अमुकच व्हय का धमुकच व्हय.माझं म्हननं एवढंच हाये का तू जे करशील त्यात 'टाप'ला जायाला पायजे. तुला चोर व्हायाचं? कोई बात नही!मग असा चोर व्हय का दूनियाने सलाम केला पायजे. तुला जुगार खेळायची? हरकत नाही,पण मग असा आट्टल जुगारी हो का सगळे लोक बोलले पायजे 'इसको बोलता है जुगारी!' थोडक्यात समाधान मानून गप बसायचं नही. काय?"
पुस्तक वाचताना दादांचे हे रांगडे तत्वज्ञान हळूहळू कळत गेले. मनात झिरपत गेले. आता तर ते मनात घर करून बसले आहे. शेवटीsearch for excellence म्हणजे तरी वेगळे काय? हेच ना? लेखक होईन म्हटल्यानंतर "ह्याला भिकेचे डोहाळे लागलेत" म्हणणारा उच्चविद्याविभूषित भाऊ आणि "काय वाटेल ते कर पण टॉप ला जायचा प्रयत्न कर" म्हणणारे अशिक्षित वडील यांच्यात खऱ्या अर्थाने व्यापक दृष्टिकोन कोणाचा? आज स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे पालक देखील आपल्या मुलांना एवढा ओपन choice देऊ शकतात? शेवटी ते देखील मध्यमवर्गीय भेदरटपणाचे बळी ठरतात. दादा केवळ एक व्यक्ती नव्हती,तर प्रयत्नवादी प्रवृत्ती होती.समाजाच्या प्रत्येक थरामध्ये,प्रत्येक कुटुंबात असे दादा असतात.यशस्वी संघर्षाची ही सच्ची कहाणी प्रत्येकाने वाचावी अशीच आहे.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know