WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Saturday, December 4, 2021

पुस्तक नाव- माझी काटेमुंढरीची शाळा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य.

परिचय कर्ता नाव -  दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक - ४९
पुस्तक नाव- माझी काटेमुंढरीची शाळा
लेखक नाव- गो .ना. मुनघाटे
एकूण पृष्ठ संख्या - १३६
वाङमय प्रकार - कथा
प्रकाशक - साधना प्रकाशन

    काटेमुंढरीची कथा म्हणजे  आत्मकथन नाही तर अनुभवांची थैली आहे. लेखक सांगतात काटेमुंढरी हे असे कोणते गाव नाही पण यात ज्या घटना घडतात, आदिवासी भागात जे लोक राहतात ते असेच असतात.. फक्त शहरी भागातील लोकांनां ते जाणवत नाहीत. 

    अश्या गावात पहिली नेमणूक जिथे आधीच्या शिक्षकाचा खून झालेला असतो. गावाला ना येण्या जाण्याची सोय, तालुक्यापासून ५० मैल दूर आणि जातानाच ट्रक ड्रायवरचा प्रश्न .." बाबूजी काटेमुंढरी को कायको मरने को जाते? तरीही मनाचा निश्चय अश्या परिस्थिती गावात आगमन.शिक्षकी नोकरी पोटासाठी स्वीकारत असले तरी अध्यापन हा धर्म समजणारे हे शिक्षक.गावात पोहोचल्यावर पाटलांच्या राखीव पडवीत राती विसावले आणि सकाळी उठल्यावर तीच शाळा असल्याची जाणीव झाली. 

    २३ पटावर असणारी पण अस्तित्वात २-३ मुलंच येणारी शाळा सुरू झाली . विश्वास निर्माण करण्यापासून 
ते मुलांना शाळेत आण्यापर्यंत सगळी कामे. गोंड भाषा प्रचलीत मराठी भाषा कळतच नाही. तोडकी मोडकी सुरवात. जंगली जीवन , जंगलात भटकणे हा मुख्य रोजगार आणि शिकार व कंदमुळे हे रोजगार. बाकी नागरी संस्कृती चे कोणतेच नामोनिशाण नाही. पण असे वाटते की तथाकथित पुढारलेपणाच्या नावाखाली आपण निसर्गा पासून दूर जात आहोत. 

     मास्तरांना गावचे मडगू पाटील यांचे खूप सहाय्य मिळाले.पूर्ण कपडे नसल्याने आधी शाळेत येण्यास मुलांना बंदी होती पण मुनधाटे गुरुजींनी लंगोटी लावणाऱ्या ही मुलांना ही शाळेत येऊ दिले. डोंगरावर, नदीकाठी , रानात शाळा भरवू लागले फक्त पुस्तकी आभ्यास न करता गुरुजी मुलांनकडून खूप काही नवनवीन गोष्टी शिकू लागले त्यांच्या सण समारंभात ,यात्रेत , सामील होऊ लागले. 

     हळूहळू त्याच्या लक्षात आले की मोठ्या मुलांना लहान बाळाला सांभाळण्यासाठी शाळा सोडावी लागते तर त्यांनी स्वतः च्या खर्चाने पाळणाघर सुरू केले. महिलांसाठी रात्रशाळा सुरू केली. आदिवासी ना शिकरिपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले. या सगळ्या सक्रत्मक प्रयत्नाने शाळा नावारूपास आली. आदिवासी लोकांची खरी बाजू प्रत्येक वेळेस गुरुजींनी समाजासमोर मांडली ...शब्दाचे पक्के, पाटील सांगतील ती पूर्व दिशा मानणारे, एकमत ठेवणारे हे लोक..सारे गाव म्हणजे एक कुटुंबच! 

     गावची शाळा बांधण्यासाठी स्वतः चे शेत विकणारे आणि होत नव्हतं ते सोन देणारे गावचे पाटील - पाटलीन हे ही तितकेच गुरुजींचे पाठबळ. 

     शेवट खुपच सुंदर आहे गुरुजींचा लाडका विद्यार्थी राष्ट्रपती पदक विजेता होतो हा आनंदच अपरिमित आहे.
खूप सखोल येथे देत नाही ..कारण पुस्तक वाचण्यात जो आनंद आहे , जी शिकवणूक आहे ती कथा वाचूनच समजून घेणे आवश्यक आहे .

   खरचं आपल्या सर्वांनच्याच नात्यांना अंतर्मुख करणारी ही कथा आहे. फक्त शिक्षकच नाही तर प्रत्येक पालकाने ही कथा जरूर वाचावी. 

@दिपाली जोशी

पुस्तक नाव- परीघ

परीघवाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य.
परिचय कर्ता नाव -  दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक - ५०
पुस्तक नाव- परीघ
लेखक नाव- सुद्धा मूर्ती ( अनुवाद - उमा कुलकर्णी)
एकूण पृष्ठ संख्या - २२०
वाङमय प्रकार - कादंबरी
प्रकाशक - मेहता पब्लिकेशन
प्रथम आवृत्ती २०१३
 किंमत २००₹

" देवासमोर हात जोडून उभे असताना तो जे देईल तोच प्रसाद नाही का ! सुखाप्रमाणे दुःख हाही एक प्रसाद समजून आपण त्याचा स्विकार केला पाहिजे. म्हणजे मनाला वेदना होत नाहीत." आपल्या सगळ्या भावना एकाच व्यक्तीवर केंद्रात झाल्या तर पदरी निराशा येते. 

  कर्नाटक येथील आलद हळदी येथील मृदुला साधी सरळ तिला ना तामझम आवडतो ना कोणती बिनकामाची चर्चा . सर्वांशी मोकळेपणे बोलणे सर्वांना मदत करणे , हवे नाही ते पाहणे . उलट न बोलता सगळी काम करणारी. गावात जवळपास दवाखाना नाही म्हणून नार्सिंग शिकून थोडीफार मदत करणारी.. तिची ओळख होते एक हुशार आणि कस पणाला लावून काम करणाऱ्या डॉ. संजयसोबत. 

    संजय पैशाने गरीब पण महाकष्टाळू त्याला स्वतः ला असे इतर कोणते छंदच नव्हते फक्त अभ्यास आणि काम. सरकारी दवाखान्यात काम करणे त्याला आवडे , गरिबांची सेवा हवं धर्म. 

   मृदुला श्रीमंत नाही पण संजय पेक्षा चांगल्या आर्थिक परिस्थितीत वाढलेली ..संजय मध्ये जीव अडकला आणि त्याचीच झाली. संजय चा एक हात  छोटा असल्याने आणि वरचा पैसा न कमावणारा म्हणून त्याची कायम अहवेलना होत असे. पण मृदुला शारीरिक व्यंग याबद्द्ल कधीच बोलली नाही आणि त्याचा स्वाभिमानी स्वभावच तीला आवडायचा. ती देखील शिक्षिका होती. घरखर्च संसार सांभाळून पैसे साठवायची. 

    संजय ची आई अति कंजूस कायम पैसे पैसे करून साठवणे एक रुपयाही खर्च करताना विचार करणारी आणि याउलट त्याची बहीण आहि बहिनीचा पती अति उधळपट्टी करणारे. 

     कालांतराने सरकारी नोकरीत सारख्या येणाऱ्या अडचणींमुळे आणि बदलामुळे संजयने त्याचा मित्रांसोबत पार्टनरशिप मध्ये नर्सिंगहोम सुरू केले .. सुरवातीचा सगळा पैसा मृदुलाने घातला , वडिलांकडून थोडे कर्जाऊ घेतले. आणि 3 - 4 वर्षात पैशाचा पाऊस पडू लागला. जिथे कोणी संजयला उभे करून घेत नव्हते आज तिथे त्याला पाहुणे म्हणून निमंत्रण येऊ लागले ..महागडा म्हणजे उत्तमच अशी त्याची ख्याती झाली .. त्याचा गुण चांगलाच होता पण आता स्वार्थ आणि अहं वाढू लागला. महागड्या गाड्या, आलिशान घर, नोकर चाकर सगळे सगळे .. दोन दोन दिवस हॉस्पिटलमध्ये waiting लागू लागले. संजय परदेश वाऱ्या करू लागला , त्यांचा मुलगाही त्याच्यासाखरच बनू लागला. 

     आधी जिथे माणुसकी होती तिथे पैसा येऊ लागला. तो अजून कसा कमावता येईल इतकीच चर्चा मग तो काळा असुदे अगर पांढरा. 

     मृदुला घुसमट होती. त्यात तिला संजय ने केली पैशाची गडबड समजली आणि ती कोसळीच , चर्चेला काही अर्थ च नव्हता.. ती विचार करता करत स्वतः च्या गर्तेत गुंतू लागली ,कोणीही तीच ऐकत नव्हतं आणि कोणाचं तिच्याशिवाय अडत ही नव्हतं. संजयला तर हल्ली त्याची खर्च करणारी सगळी मंडळी चांगली आणि मृदुला काहीही न येणारी, साधं ही न नटणारी, कंजूस , कटकटक करणारी वाटे. घरी आता आधीसारखे खेळकर वातावरणच नसून फक्त व्यावहारीक बोलणे असायचे. 

     ती हळू हळू मनोरुग्ण बनू लागली. तिला याचा अंदाज आल्यावर ती मनोचिकिस्तक कडे गेली पण तेथेही संजय आलाच नाही.  हळू हळू सावरू लागली आणि शेवटी तिने योग्य तो निर्णय घेतलाच..काय ते पाहण्यासाठी कथा नक्की वाचून पहा. 

    प्रत्येक व्यक्तिमत्त्व वेगळं असत..आणि त्यात आपले कष्ट ,अपमान ,पैसा, प्रसिद्धी वेगवेगळी वळणं येतात.पैशात अपार शक्ती असते पण त्याचा वापर कसा करायाचा हे माणसाच्या मनावर अवलंबून असते. स्वतः मध्ये न्यूनगंड निर्माण होत असे वाटल्यास ज्यांच्याशी विश्वास वाटतो मोकळेपणा वाटतो ,त्यांच्यासोबत बोला.

@दिपाली जोशी

.....'इस्राएल: छळाकडून बळाकडे

#इतिहास_चार_हजार_वर्षे_संघर्ष_केलेल्या_उद्योजक_ज्यूंचा_रक्ताने_सिंचून_काढलेल्या_इस्राएलचा!

हजारो वर्षे निर्वासितांचे जीवन जगले.जगभर वणवण भटकत राहिले. करोडो बांधवांचा नरसंहार पाहण्याचे दुर्भाग्य त्यांना लाभले... तरीही ते भक्कमपणे उभे राहिले. लढले, जिंकले. जगातील श्रीमंत आणि बुद्धिमान लोक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली, ते लोक म्हणजे "ज्यू"! त्यांच्या यशाचे मर्म त्यांच्या शिक्षणात आहे! त्यांच्या संस्कारात आहे! त्यांच्या इतिहासात आहे!

"मनुष्य केवळ आळसाने मरतो. मरण टाळायचे असेल, सुखाने जगायचे असेल तर त्याने सतत काम केले पाहिजे. पण जो कामच करत नाही त्याला जेवायचा अधिकार नाही. जेंव्हा तू स्वतःच्या श्रमाच्या भरवशावर जेवतोस तेंव्हाच तू सुखी होतोस नि त्यातच तुझे पुढे हित आहे....

.....'इस्राएल:  छळाकडून बळाकडे' या पुस्तकातून!

पुस्तक: इस्राएल : छळाकडून बळाकडे

लेखक: ना. ह. पालकर

प्रकाशन: अपर्णा प्रकाशन

पृष्ठ: ३०४ मूल्य:३००₹  

पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी व्हॉटसअप करून संपर्क साधावा. पुस्तक देशभरात कोठेही घरपोच मिळेल

ज्ञानसाधना पुस्तकालय मो:9421605019

दोन देशांना जोडणारे रस्ते, लोहमार्ग यांच्याविषयी तर आपण ऐकले, पाहिले असेल. पण दोन देशांना जोडणाऱ्या पुस्तकाची माहिती आहे का? ते हेच पुस्तक ज्या पुस्तकामुळे इस्रायली लोकांमध्ये या लेखकाविषयी अपार श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी त्यांच्या देशात या लेखकाच्या नावाने एक चौक आणि एक रस्ता सुशोभित केला. त्या लेखकाचा नागरी सत्कार योजिला.अर्थात लेखक तो सत्कार स्वीकारण्यास इहलोकात नव्हते, ही गोष्ट वेगळी. असे हे पुस्तक जे वाचून लाखो भारतीयांना इस्रायली लोकांच्या संघर्षमय इतिहासाला समजून घेता आले.

पुस्तकाची सुरुवात होते ती ज्यू अर्थात यहुदी लोकांचा आद्य (इ. स.पूर्व १७५०) पुरुष "अब्राहम" या पासून!  आणि शेवट होतो तो अलीकडील अरब इस्राएल(१९५६)  संघर्ष विरामाने! तब्बल चार हजार वर्षांचा हा रक्तरंजित इतिहास लेखकाने अतिशय ओघवत्या शैलीत रेखाटला आहे. यात लेखकाने यहुदी लोकांचे श्रद्धास्थाने, त्यांचे धर्मग्रंथ, धार्मिक विधी , धार्मिक शिक्षण संस्कार या सोबतच त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा! त्यांच्या मेहनत आणि प्रयोगशीलता यांचे गुणवर्णन  केले आहे. त्यांच्या मेहनतीचे, त्यांच्या जिद्दीचे वर्णन वाचून कोणताही संवेदनशील माणूस अधिक कष्टाळू होईल. वाळवंटात फुलवलेला नंदनवन आज जगाला दिसतो पण त्या साठी जे रक्त आणि घामाचे सिंचन केले, ते या पुस्तकात वाचायला मिळते.

दैवी पुरुष अब्राहम ( यहुदी लोकांचा मूळ पुरुष) यास उर प्रदेश सोडून पॅलेस्टाईनमध्ये वस्ती करण्याचा संदेश दिला. तेथेच उन्नत आणि सुजलाम राष्ट्र विकसित करेन असा आशीर्वाद दिला. हा भाग सुरुवातीला समृद्ध होता.येथे निसर्गाची कृपा होती. त्या भागाचे नाव "कनान". या भूमीवर आस्था निर्माण झाली. समृद्धीमुळे या भागास दुधा मधाचा देश म्हटले जात असे. पुढे कालांतराने  जीवघेण्या दुष्काळामुळे अब्राहमचा नातू जॅकोब, त्याची १२ मुलं आणि ७० नातू घेऊन तो इजिप्तमध्ये विस्थापित झाला. येथे जॅकोबला इस्राएल असे संबोधले जाऊ लागले. त्याची मुलं म्हणजे इस्राएल किंवा इस्रलाईट म्हटले जाऊ लागले. सुमारे १५० वर्षानंतर इजिप्तमध्ये सत्तांतर झाले. राजा फरोहने संपूर्ण ज्यू लोकांना गुलाम बनवले. त्यांच्या जीवनावर अनेक निर्बंध लादले. ज्यू लोकांनी संघटित होऊन उठाव करू नये, त्यांची लोकसंख्या वाढू नये म्हणून प्रत्येक ज्यू दाम्पत्याचा पहिला मुलगा  बळी देण्याचा प्रकार सुरू केला. या गुलामगिरीतून मोजेस याने यांना मार्गदर्शन करून मुक्त केले.(ज्यू लोकांचा प्रेषित...ज्याला येहावा या परमेश्वराचा आशीर्वाद मिळालेला) लोकांना इ.स.पूर्व १२६६ इजिप्त मधून बाहेर काढले. ४० वर्ष हे लोक सिनाई या वाळवंटी पर्वतावर राहिले. मोझेसने Ten Commandments सांगितल्या. त्याच्याच वंशातील डेव्हिड नावाच्या पुजाऱ्याने ज्यूंची राजसत्ता निर्माण केली. भव्य मंदिर उभे केले. जेरूसलेम शहर जिंकून घेऊन राजधानी बनवली. जेरुसलेम शहराला भव्य तटबंदी बांधली. संपूर्ण कनान प्रदेश जिंकून घेतला. एका अर्थाने ज्यू लोकांमध्ये राष्ट्रीयता निर्माण केली. येहोवा या देवाचे मंदिर (आर्क प्रतीक)  ज्यू लोकांसाठी अतिशय प्रिय आणि श्रद्धेचे विषय होत गेले. त्यासाठी ज्यू मारण्यास आणि मारण्यास कधीही तयार असू लागले.

पुढे काळाच्या ओघात अनेकवेळा सत्तांतर झाले. भिन्न वंशीय लोकांनी ज्यू लोकांना पुन्हापुन्हा गुलाम बनवले गेले. यात बॅबिलोन, रोमन ,ग्रीक, अरब , ख्रिश्चन या सर्वांसोबत ज्यू लोकांना संघर्ष करावा लागला. या सर्वांनी त्यांना प्रिय असलेले मंदिर पाडले. जे ज्यू लोकांनी पुन्हा पुन्हा बांधले. मातृभूमी मिळवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. हजारो वर्षांचा हा काळ लेखकाने अतिशय गतिमान पद्धतीने लिहिला आहे. चार हजार वर्षे चार दिवसात समजून जातात.

 बॅबिलोन राजाने इस्राएलचा राजा जेहोआकिनचा  पूर्ण पराभव करून मंदिर आणि राजधानी भुईसपाट केली. या लोकांना गुलाम केले. हजारोंना बॅबिलोनमध्ये गुलाम म्हणून कामाला लावले. पुढे  ४० वर्षांनी हा अनन्वित अत्याचार संपला. सायरस राजाने बॅबिलोन सम्राटाचा पराभव करून इस्रायली लोकांना मुक्त केले. मंदिर पुन्हा बांधले. या काळात  या लोकांना ज्युडिआची जनता म्हणजे ज्यू म्हणून संबोधले जाऊ लागले.या काळात ज्यू लोकांचे राज्य नव्हते.

 रोमन लोकांच्या आक्रमणात ज्यू पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. मातीतून उठून बाहेर फेकली गेलेली झाडं जणू! त्या झाडासारखी त्या समाजाची अवस्था झाली. रोमन सेनापती टायटसने मंदिर पाडले. स्वतःच्या विजयाची कमान उभी करून मंदिरातून आणलेल्या सात मेणबत्या लावण्याचा दीप तेथे स्थापित केला...+जो पुढे चालून इस्रायली लोकांचे राष्ट्रीय प्रतीक  ठरला.) या पूर्वीच  रोमन सुभेदाराने ज्यू लोकांच्या आग्रहावरून येशुला सुळावर चढवले.Ten Commandments त्याने मानल्या नाही. मंदिर पाडून बांधू शकतो असे म्हणाला, असे आरोप होते. रोमन लोकांच्या जाचातून वाचण्यासाठी ज्यू लोकांनी आपली प्रिय मातृभूमी  जड मनाने सोडली.

पुढे जगभर  ज्यू नागरिकांवर प्रचंड अत्याचार  झाले. १६ व्या शतकानंतर ज्यू होऊन जगणे जणू शापच ठरला. त्यांच्यावर संघटित हल्ले होऊ लागले. त्यांच्या विरुद्ध समाजात धार्मिक द्वेष निर्माण केला जाऊ लागला. हा हिंसाचार राजाच्या आशीर्वादाने होऊ लागला. ज्यू लोकांना घोड्यावर बसण्यासाठी बंदी झाली. ख्रिश्चन नोकर ठेवायला बंदी झाली. त्यांच्या मुलींना पळवून लग्न लावून ख्रिश्चन केले जाऊ लागले. मृत ज्यूला ख्रिश्चन पद्धतीने दफन करून त्याला ख्रिस्त म्हटले  जाऊ लागले. त्यांच्या   पवित्र ग्रंथाच्या (पोथी) ठिकठिकाणी होळ्या केल्या जाऊ लागल्या. त्यांना मुक्त संचार नाकारला. गावाबाहेर, दूर , गोल तटबंदीत अतिशय घाणेरड्या आणि दाटीवाटीत वस्त्या  सुरू केल्या. त्यात  बाहेर किंवा आत येण्याचे नियम ठरवले गेले. चर्चमध्ये उपस्थिती अनिवार्य ठरवली गेली. जगभर ज्यू भरडून जावू लागला. येशू ख्रिस्ताचे मारेकरी म्हणून अनन्वित छळ होऊ लागला. फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका वगळता जगात ज्यू म्हणजे मारण्याची वस्तू ठरला. लाखो ज्यू दरवर्षी या देशातून त्या देशात जीव मुठीत घेऊन पळू लागला. जेथे जाऊन स्थिर होई तेथे त्याला त्रास सुरू होत असे. कमवलेले सोडून पळावे लागे. असे एक नाही दोन वर्षे नाही, शतके नाही तर तब्बल १८०० वर्षे ज्यू जगात न्याय मागत भटकत राहिला.

 तरीही या ज्यू लोकांनी जेथे गेले तेथे व्यापार केला. मेहनत केली. शेती केली. प्रंचंड मेहनत आणि प्रयोगशीलता यामुळे ते यशस्वी होत गेले. नव्या वस्तूंचा व्यापार,  व्यवसायासाठी बंदी असल्याने जुने कपडे विकले. ज्या हाताने शेती फुलवली होती ते हात आता तराजू तोलू लगाले. नफा कमावू लागले. श्रीमंती दिसू लागली...ही श्रीमंती देखील त्यांच्या नशिबावर उठली.अनेक कर त्यांच्यावर लादले  गेली...

Getto  अर्थात बंदिस्त ज्यू वस्ती , या मुळे सगळे ज्यू गावोगावी एकत्र राहू लागले. त्याचा त्यांना फायदा झाला. हिब्रू भाषा टिकली.धर्म टिकला.संस्कार टिकले. सर्वात महत्वाचे म्हणजे मातृभूमीची ओढ शिल्लक राहिली. ज्या ज्यू लोकांनी आपली ओळख ख्रिश्चन अशी धारण केली त्यांनाही भविष्यात प्रचंड छळ झाला. त्या सर्वांनी पुन्हा ज्यू नावे धारण केली.

पुस्तकात लेखकाने रशिया, जर्मनी,  पोलंड या प्रदेशात ज्यू  लोकांवर केलेल्या अत्याचाराचे धावते वर्णन केले आहे. त्यानंतर हिटलर प्रणित अत्याचाराचेही  वर्णन केले आहे. या पेक्षा जास्त वाचकाला राग आणणारी गोष्ट म्हणजे इंग्रजांचे राजकारण लेखकाने अतिशय योग्य पद्धतीने रेखाटले आहे. जगात ज्यू  कोठेच सुखी आणि स्थिर होऊ शकत नव्हता. यातून ज्यू लोकांनी स्वतःची भूमी परत मिळवण्यासाठी एक दीर्घ काळाची मोहीम उभी केली. त्या मोहिमेची पार्श्वभूमी, त्यांच्या सभा, बैठका यांचा लेखकाने ठळक आढावा घेतला आहे.सर्व प्रमुख घटना ३०४ पृष्ठांमध्ये मांडण्याचा एक यशस्वी प्रयत्न  लेखकाने केला आहे.

  जगातील वेगवेगळ्या देशांमधून पीडित  ज्यू वाचवून त्यांना  ज्या पद्धतीने इस्राएलमध्ये आणले जाते त्याचे वर्णन तर भारावून टाकते. इस्राएलची भूमी मिळवण्यासाठी ती विकत घ्यावी लागली हे वाचून आश्चर्य वाटते. जू लोकांनी अरबांकडून इस्राईलची इंच-इंच जमीन विकत किंवा लढून मिळवलेली आहे. हे या पुस्तकातून कळते.  जागतिक राजकारण कळते.  इस्राएल म्हटले की आपल्याला अरब आणि ज्यू लोकांचा संघर्ष आठवतो. ती गोष्ट योग्यही आहे. पण त्या पेक्षा जास्त महत्वाचे अनेक पैलू या पुस्तकातून वाचकाला वाचायला मिळतात.

इस्राएल निर्मितीसाठी जसे त्यांच्या महान नेत्यांचे आणि क्रांतिकारकांचे योगदान आहे तसेच त्या समाजातील सामान्य माणसाचे योगदान आहे. तो शेती करत करत  स्वतःला संरक्षण सिद्ध करतो. शेतीची  नांगरट करतो पण बंदूक खांद्याला लटकवून! तेथील मुली, स्त्रियादेखील आपल्या वस्तीचे,  शेतीचे बंदूक घेऊन संरक्षण करताना वाचायला मिळते. त्यातून देशाचे सैन्य दल उभे राहते. दुसऱ्या महायुद्धात लोकांना संधी मिळावी म्हणून अनेक नेते सैन्यभरतीचे आव्हान करतात. हेच ज्यू पुढे अरब-इस्राएल संघर्षात मोलाची भूमिका घेतात.

चहू बाजूंनी अरब लोकांनी वेढलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले की लगेच युद्धाला सामोरे जावे लागते. एका देशाला जन्मतःच युद्धाला सामोरे जावे लागते.शेकडो पटीने अधिक सैन्यापुढे आणि शक्तिसमोर माणूस गर्भगळीत होऊन जाईल.पण या युद्धाचा जेंव्हा शेवट होतो तेंव्हा 30% अधिक भूभाग इस्राएलने कायम  जिंकलेला असतो.

या पुस्तकाचे गोडवे गाऊ तितके कमीच! असे पुस्तक वाचून माणूस अनेक अडचणीत कसा उभा राहू शकतो, एखादे राष्ट्र भूमी नसतानाही केवळ लोकांच्या राष्ट्रभक्ती व इच्छाशक्तीवर कसे जिवंत राहू शकते याचा प्रत्यय येतो.


रावजी लुटे

21 ग्रेट लीडर्स ..

पुस्तक:21 ग्रेट लीडर्स  ....विश्वावर ठसा उमटवणार्‍या नेतृत्वांची कार्यशैली

सामान्यपणे प्रत्येकाला नेतृत्व करायला आवडते.नेता व्हायला आवडते.नेता हा केवळ राजकीय नसतो.एखाद्या दिंडी चे महाराज त्या दिंडीचे नेते असतात.ते अध्यात्मिक नेते होत.एखाद्या कर्मचारी संघटनेचा नेता असतो एखादा व्यक्ती शाळेचा मुख्याध्यापक अर्थात तेथील ते नेते असतात.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणी नेतृत्व करताना आपण पाहतो....अनेक प्रसंगी आपल्याला ही नेतृत्व करावे वाटते....आर्थिक क्षेत्रात,उद्योगात, व्यवसायात नेतृत्व करणे शक्य असते....

नेतृत्व करण्यासाठी नेत्याच्या अंगी किमान काही गुण वैशिष्ट्य असावी लागतात.आपला एक समज आहे की, भाषण करता आले म्हणजे नेता होता येते. स्वतःची कंपनी जगभर प्रसिद्ध करायची असेल तर केवळ भाषणाने काम होईल का?

नेतृत्वासाठी वक्तृत्व आवश्यक आहेच! पण त्याच्या जोडीला कतृत्व ही असावे लागते.नेत्याच्या अंगी कोणते विशेष गुण असावे लागतात त्याचा अंदाज या पुस्तकातून येतो.

लेखकाने यातील सर्व २१ नेत्याच्या विशेष वैशिष्ट्ये प्रकरणाच्या शेवटी दिलेले आहेत.

या पुस्तकात जगातील २१ असे महान लीडर निवडले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा अमीट असा ठसा उमटवला आहे.
 पुस्तकाचे नाव  - 
21 ग्रेट लीडर्स  ....विश्वावर ठसा उमटवणार्‍या नेतृत्वांची कार्यशैली

‘‘21 ग्रेट लीडर्स हे पूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या महान नेत्यांच्या जीवनावर आणि त्यांनी दिलेल्या संदेशावर अत्यंत विचारपूर्वक केलेले भाष्य आहे. लेखकाचे इतिहास आणि लीडरशीपचं सखोल ज्ञान आणि एक लीडर व एक कोच म्हणून त्यांच्याकडे असणारा असामान्य वैयक्तिक अनुभव यामुळे हे पुस्तक अतुलनीय ठरते. ‘21 ग्रेट लीडर्स’ हे मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे, जे तुम्हाला एक उत्तम नेता बनण्यासाठी
नक्कीच उपयुक्त ठरेल.’’
पुस्तकाची वैशिष्ट्ये-

* नेतृत्वाचे सात पैलू
* महान लीडर्सची स्वभाववैशिष्ट्ये
* जीवनशैलीतून मिळणारे मार्गदर्शन
* 21 लीडर्स आणि त्यांचे गुणविशेष
* त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग
* प्रत्येक लीडरकडून मिळणारे नेतृत्वाचे धडे आणि संदेश

(वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्ज, बिल गेटस्, मदर टेरेसा, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, विन्स्टन चर्चिल, मार्टिन ल्युथर किंग, फ्रँकलीन रुझवेल्ट, जॉर्ज वॉशिंग्टन...असे २१ ग्रेट लीडर्स)
 
लेखक -  पॅट विल्यम्स
अनुवाद - नीलिमा करमकर
पाने  -  २४०
किंमत- २७५/-

फ्री होम शिपिंग!

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

ज्ञानसाधना पुस्तकालय:9421605019
रावजी लुटे

आहे मनोहर तरी

सुनीता देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक 'आहे मनोहर तरी'.खर तर यांची प्रथम ओळख म्हणजे पू. ल.देशपांडे यांची पत्नी अशी आहे.पण या पुस्तकामध्ये त्यांच्या लिखाणातून आपणास एका लेखिकेचा परिचय होतो.त्यांनी जर पूर्ण वेळ लेखन केलं असत तर त्या एक प्रसिद्ध लेखिका म्हणून आपल्या समोर असत्या. कॉलेज मध्ये असताना यांचे पुस्तक वाचनात आले होते.तेंव्हा त्यांच्या लेखनास इतकं समजता आले नाही.त्यांचे लेखन समजून घेण्याची प्रगल्भता त्यावेळी नव्हती.
         पुस्तकामध्ये सुनीता ताईंचा लहानपणीचा काळ ते पुस्तक लिही पर्यंत चा काळ येतो.यात त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना,अनुभव त्या सांगतात.सुरवातीलाच त्या म्हणतात की हे आत्मचरित्र नाही.आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती आहे.पाखरांसारखी.त्या आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगतात.त्या वेळेचा काळ आपल्या समोर येतो.तसेच बेचाळीसच्या स्वत्यंत्रालढ्यातील त्यांचा सहभाग त्यावेळचे अनुभव त्या मोकळेपणाने सांगतात.पू. ल.आणि त्यांचे प्रेम,लग्न यांबद्दल सांगताना त्या म्हणतात नवरा म्हणून एखादा माणूस किती चांगला असू शकेल तितका तो चांगला आहे.खरे तर बायको म्हणून मीच त्या योग्यतेची नाही.मझ्या रक्तातली विझायला तयार नसलेली बंडखोरी हाच मुळी बायको होण्यातला मुख्य अडसर आहे.त्या पू. ल. यांच्या बद्दल ज्या तक्रारी करतात तेवढ्याच प्रखरतेने आपल्यातील दोष सुद्धा सांगतात.त्या म्हणतात की गेली चाळीसहून अधिक वर्ष भाई आणि मी,आम्ही दोघांनी एकत्र काढली त्याबद्दल लिहायचे तर मला भाईचे चारित्रच लिहावे लागेल.काहीसे मी घडवलेले आणि बिघडवलेले देखील.जे घडवले त्याबद्दल मीच काय,कसे आणि किती लिहिणार?पण माझे जेजे काही चुकले त्याचा अर्थातच त्याला त्रास ही झाला.मात्र तक्रार करण्याचा त्याचा स्वभाव नाही.
         अनेक क्षेत्रातल्या अनेक नामवंत आणि थोर व्यक्ती यांच्याशी पू. ल.आणि सुनीता ताई यांच्या गाठीभेटी होत.बैठका जमत.त्या म्हणतात बैठकीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,गोविंद तळवकर,श्री.पू.भागवत यांच्यासारखी मंडळी असली तरी वातावरण कधीच गंभीर नसे.सदैव रंगतदार आणि खेळीमेळीचे असे.अशा बैठकी या मझ्या दृष्टीने पर्वणीच असे.त्याकाळच्या इतक्या थोर व्यक्ती त्याची संगत, चर्चा,बैठका यांची वर्णने त्यांच्या लिखाणातून वाचून आपणास क्षणभर असे वाटते की आपण ही त्या बैठकांमध्ये असायला हवे होते.
         सुनीता ताई म्हणतात की लग्न ही गोष्ट पुढल्या जन्मी मझ्यासाठी लिहिली गेली,तर मला भाईच नवरा मिळावा.कारण दुसऱ्या कुठल्याही घरात मला स्वतः च्या तंत्राने वागायचे,जिवतोडून प्रेम करण्याचे तसाच अंत पाहण्याचे,सर्वस्व पणाला लावून मदत करण्याचे आणि तशीच अडवणूक करण्याचे,अगदी सर्व तऱ्हेचे इतके स्वतंत्र मिळणार नाही.आणि सुनीता ताईंच्या शब्दात सांगायचे तर,
शेवटी बर वाईट तर कशाला म्हणायचे?कशापेक्षा अधिक बर अगर काशापेक्षा वाईट? तुलनेला अपल्याहाती समांतर आयुष्य थोडेच आहे?शिवाय आपली मते देखील सारखी बदलत असतात.विशेषतः परतीचे वारे वाहू लागले की त्यांची चाहूल संवेनशील माणसांना लगेच लागते.आणि मग सिंहावलोकन सुरू झालं की सगळ उल्ट्याच पालट दिसू लागत.वातावरणात पृथ्वीपासून दूर वरवर गेलं की आपल वजन कमी होत जात ना तशी इथे ओंजळ रीती होत जाते.आणि उरतात फक्त आठवणींचे तरंगते ढग. सारखा आकार बदलत जाणारे. काळ्याकुट् अस्वलासारखे, पांढरा शुभ्र साश्यांसारखे आणि पोहताना गुदगुल्या करणाऱ्या रंगबेरंगी इवल्या इवल्या माशांसारख्या.
Madhavi surve 

VL IS CODE ME 5I

 

VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

Friday, December 3, 2021

VL PWD HB & BIS CODE FOR CE 3 I

 


VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

PWD HB & BIS CODE FOR CE 3 I