परिचय कर्ता नाव - दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक - ४९
पुस्तक नाव- माझी काटेमुंढरीची शाळा
लेखक नाव- गो .ना. मुनघाटे
एकूण पृष्ठ संख्या - १३६
वाङमय प्रकार - कथा
प्रकाशक - साधना प्रकाशन
काटेमुंढरीची कथा म्हणजे आत्मकथन नाही तर अनुभवांची थैली आहे. लेखक सांगतात काटेमुंढरी हे असे कोणते गाव नाही पण यात ज्या घटना घडतात, आदिवासी भागात जे लोक राहतात ते असेच असतात.. फक्त शहरी भागातील लोकांनां ते जाणवत नाहीत.
अश्या गावात पहिली नेमणूक जिथे आधीच्या शिक्षकाचा खून झालेला असतो. गावाला ना येण्या जाण्याची सोय, तालुक्यापासून ५० मैल दूर आणि जातानाच ट्रक ड्रायवरचा प्रश्न .." बाबूजी काटेमुंढरी को कायको मरने को जाते? तरीही मनाचा निश्चय अश्या परिस्थिती गावात आगमन.शिक्षकी नोकरी पोटासाठी स्वीकारत असले तरी अध्यापन हा धर्म समजणारे हे शिक्षक.गावात पोहोचल्यावर पाटलांच्या राखीव पडवीत राती विसावले आणि सकाळी उठल्यावर तीच शाळा असल्याची जाणीव झाली.
२३ पटावर असणारी पण अस्तित्वात २-३ मुलंच येणारी शाळा सुरू झाली . विश्वास निर्माण करण्यापासून
ते मुलांना शाळेत आण्यापर्यंत सगळी कामे. गोंड भाषा प्रचलीत मराठी भाषा कळतच नाही. तोडकी मोडकी सुरवात. जंगली जीवन , जंगलात भटकणे हा मुख्य रोजगार आणि शिकार व कंदमुळे हे रोजगार. बाकी नागरी संस्कृती चे कोणतेच नामोनिशाण नाही. पण असे वाटते की तथाकथित पुढारलेपणाच्या नावाखाली आपण निसर्गा पासून दूर जात आहोत.
मास्तरांना गावचे मडगू पाटील यांचे खूप सहाय्य मिळाले.पूर्ण कपडे नसल्याने आधी शाळेत येण्यास मुलांना बंदी होती पण मुनधाटे गुरुजींनी लंगोटी लावणाऱ्या ही मुलांना ही शाळेत येऊ दिले. डोंगरावर, नदीकाठी , रानात शाळा भरवू लागले फक्त पुस्तकी आभ्यास न करता गुरुजी मुलांनकडून खूप काही नवनवीन गोष्टी शिकू लागले त्यांच्या सण समारंभात ,यात्रेत , सामील होऊ लागले.
हळूहळू त्याच्या लक्षात आले की मोठ्या मुलांना लहान बाळाला सांभाळण्यासाठी शाळा सोडावी लागते तर त्यांनी स्वतः च्या खर्चाने पाळणाघर सुरू केले. महिलांसाठी रात्रशाळा सुरू केली. आदिवासी ना शिकरिपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले. या सगळ्या सक्रत्मक प्रयत्नाने शाळा नावारूपास आली. आदिवासी लोकांची खरी बाजू प्रत्येक वेळेस गुरुजींनी समाजासमोर मांडली ...शब्दाचे पक्के, पाटील सांगतील ती पूर्व दिशा मानणारे, एकमत ठेवणारे हे लोक..सारे गाव म्हणजे एक कुटुंबच!
गावची शाळा बांधण्यासाठी स्वतः चे शेत विकणारे आणि होत नव्हतं ते सोन देणारे गावचे पाटील - पाटलीन हे ही तितकेच गुरुजींचे पाठबळ.
शेवट खुपच सुंदर आहे गुरुजींचा लाडका विद्यार्थी राष्ट्रपती पदक विजेता होतो हा आनंदच अपरिमित आहे.
खूप सखोल येथे देत नाही ..कारण पुस्तक वाचण्यात जो आनंद आहे , जी शिकवणूक आहे ती कथा वाचूनच समजून घेणे आवश्यक आहे .
खरचं आपल्या सर्वांनच्याच नात्यांना अंतर्मुख करणारी ही कथा आहे. फक्त शिक्षकच नाही तर प्रत्येक पालकाने ही कथा जरूर वाचावी.
@दिपाली जोशी
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know