WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Saturday, December 4, 2021

पुस्तक नाव-आनंददायी जीवनासाठी यशाचा आणि सुखाचा मा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचय कर्ता नाव -  दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक - ४८
पुस्तक नाव-आनंददायी जीवनासाठी यशाचा आणि सुखाचा मार्ग
लेखक नाव- ए. पी. पेरेइरा
अनुवाद विश्वनाथ देशपांडे 
एकूण पृष्ठ संख्या - १०४
प्रकाशक - साकेत प्रकाशन 

     आजचे जग हे स्पर्धेचे आणि कर्तृत्वाचे जग आहे. सर्वसामान्य परिस्थिती त देखील अतिउच्च यश मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची सदर पुस्तकात अगदी योग्य मुद्यांवर चर्चा करून आणि मार्गदर्शनात्मक उदाहरणें देखील दिली आहेत. लेखकांनी हे आधीच स्पष्ट केले आहे की हे पुस्तक युक्त्यांचे भांडार नाही तर स्वतः मध्ये सुधारणा करण्यासाठी केलेले मार्गदर्शन आहे. आपोआप काहीच होत नसते प्रयत्न करणे महत्वाचेच आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यात आपल्या कल्पनेतून ही जास्त सामर्थ्य असते. 

   सर्वप्रथम नेतृत्व गुण महत्वाचा ..यशाची पायरी चढत असताना नेतृत्वासोबत विनोदी वृत्ती असेल तर उत्तमच ती तुम्हाला स्वतःचे  दुःख गिळून चूक कबुल करावयास शिकवते. स्वतः च्या चुकांवर हसण्यास शिकवते, विनम्र बनवते - ताण तणाव कमी करते, आणि प्रामाणिकतेमुळे चेहरा उजळून निघतो . 

     " यशाचे मूल्यमापन मिळालेल्या पदावरून नाही तर यश मिळवताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली त्यावरून होते " 

      अपयशासाठी इतरांना दोष न देता , जबाबदारी घेऊन त्या पार पाडा. याच अडथळ्यांनपासून सहाय्य घ्या. 

      प्रत्येक कामाची लवकर वेळेत सुरवात करावी, पण इतकेच पुरेसे नाही यासाठी सकारात्मक कृती करावी . मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घेणे गरजेचे आहे. व्यक्ती प्रत्येक कृतीतून काहीतरी शिकत असते- ते शिकणे , रुजवणे , आणि कृतीत आणणे महत्वाचे . 

    अजून एक छान मूल्य येथे नमूद केले आहे , जिथे यशासाठी आनंदासाठी स्वतः वर केंद्रित न होता  इतरांकडे ही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

  " जेवढे अधिक द्याल तेवढे अधिक संपन्न व्हाल. जेवढे अधिक परिश्रम , तेवढे अधिक आनंदी ." 

    "काम असे करा जसे तुम्हाला पैसे नको आहेत,
      प्रेम असे करा की त्यात इजा होऊ नये,
      आणि नृत्य असे करा की जणू कोणी निरीक्षण       करीत नाही" 

      आपण किती शिकलो किती पुढे गेलोत तरी हे कायम लक्षात ठेवले पाहिले की प्रत्येक तासाला जगात परिवर्तन घडत आहे स्वतः च्या भल्यासाठी अथवा वाईटसाठी आपण आपल्या वेळ आणि बुद्धीमत्तेवरच अवलंबून आहोत. 

     स्वतः ला अनुभवांची बँक बनवूया सुखद अनुभव आनंद देतातच पण दुःखद अनुभव शहाणपण देतात ते कधीच विसरायचे नसतात. परिस्थिती सर्व बाजूंनी कधीच अनुकूल नसते आणि ती तशी मिळण्याची वाट पाहणारा कधीच काही करू शकत नाही.. 

काही आवडलेल्या ओळी.. 

" आपल्या विचारांची काळजी घ्या
      कारण पुढे तेच शब्द बनतात.
आपल्या शब्दांची काळजी घ्या 
      कारण पुढे तेच कृती बनतात.
आपल्या कृतीची काळजी घ्या 
      कारण पुढे त्याच सवयी बनतात.
आवल्या सवयीची काळजी घ्या 
        कारण त्याच पुढे चारित्र्य बनतात.
आपल्या चारित्र्याची काळजी घ्या
करण पुढे तेच आपले भाग्य बनते."
  
   वैगुण्य आणि मूर्खपणा यात गोंधळ होऊ देऊ नये. साध्याच्या मागे धावताना स्वतः वर योग्य काम करा.
जेव्हा आपण कुठे काम करत असतो तिथे दुबळी आणि मजबूत दोन्ही कड्या असतात. अश्याठिकानी निर्दोषपणे
प्रबळ दुवा बना तर आपोआप च आपण सदर संस्थेसाठी आवश्यक घटक बनू शकतो. 

   कोणत्याही प्रसंगी बोलत असताना, स्वतः ला विचारण्यासाठी येथे काही प्रश्न दिले आहेत म्हणजे सदर बोलण्यावरून आपल्यालाच पुढे याचा त्रास होणार नाही..
प्रश्न -
१) हे खरे आहे का?
२) हे आवश्यक आहे का?
३) हे लाभदायक आहे  का?
दुसऱ्या ना उपदेश करण्याआधी दक्ष राहा. 

     स्वतः ला रिकामा वेळ मिळत असेल छंद जोपासा. मनोरंजन आणि विश्रांती शरीरास आणि मनाशी उत्साह देते.
    अतिशय सुंदर असे पुस्तक,  यश म्हणजे फक्त पैसे- प्रसिद्धी नाही तर जीवनात या सोबत आनंदही तितकाच महत्वाचा आहे हे सांगणारे आहे. 

@दिपाली जोशी

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know