Saturday, December 4, 2021

पुस्तक नाव- परीघ

परीघवाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य.
परिचय कर्ता नाव -  दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक - ५०
पुस्तक नाव- परीघ
लेखक नाव- सुद्धा मूर्ती ( अनुवाद - उमा कुलकर्णी)
एकूण पृष्ठ संख्या - २२०
वाङमय प्रकार - कादंबरी
प्रकाशक - मेहता पब्लिकेशन
प्रथम आवृत्ती २०१३
 किंमत २००₹

" देवासमोर हात जोडून उभे असताना तो जे देईल तोच प्रसाद नाही का ! सुखाप्रमाणे दुःख हाही एक प्रसाद समजून आपण त्याचा स्विकार केला पाहिजे. म्हणजे मनाला वेदना होत नाहीत." आपल्या सगळ्या भावना एकाच व्यक्तीवर केंद्रात झाल्या तर पदरी निराशा येते. 

  कर्नाटक येथील आलद हळदी येथील मृदुला साधी सरळ तिला ना तामझम आवडतो ना कोणती बिनकामाची चर्चा . सर्वांशी मोकळेपणे बोलणे सर्वांना मदत करणे , हवे नाही ते पाहणे . उलट न बोलता सगळी काम करणारी. गावात जवळपास दवाखाना नाही म्हणून नार्सिंग शिकून थोडीफार मदत करणारी.. तिची ओळख होते एक हुशार आणि कस पणाला लावून काम करणाऱ्या डॉ. संजयसोबत. 

    संजय पैशाने गरीब पण महाकष्टाळू त्याला स्वतः ला असे इतर कोणते छंदच नव्हते फक्त अभ्यास आणि काम. सरकारी दवाखान्यात काम करणे त्याला आवडे , गरिबांची सेवा हवं धर्म. 

   मृदुला श्रीमंत नाही पण संजय पेक्षा चांगल्या आर्थिक परिस्थितीत वाढलेली ..संजय मध्ये जीव अडकला आणि त्याचीच झाली. संजय चा एक हात  छोटा असल्याने आणि वरचा पैसा न कमावणारा म्हणून त्याची कायम अहवेलना होत असे. पण मृदुला शारीरिक व्यंग याबद्द्ल कधीच बोलली नाही आणि त्याचा स्वाभिमानी स्वभावच तीला आवडायचा. ती देखील शिक्षिका होती. घरखर्च संसार सांभाळून पैसे साठवायची. 

    संजय ची आई अति कंजूस कायम पैसे पैसे करून साठवणे एक रुपयाही खर्च करताना विचार करणारी आणि याउलट त्याची बहीण आहि बहिनीचा पती अति उधळपट्टी करणारे. 

     कालांतराने सरकारी नोकरीत सारख्या येणाऱ्या अडचणींमुळे आणि बदलामुळे संजयने त्याचा मित्रांसोबत पार्टनरशिप मध्ये नर्सिंगहोम सुरू केले .. सुरवातीचा सगळा पैसा मृदुलाने घातला , वडिलांकडून थोडे कर्जाऊ घेतले. आणि 3 - 4 वर्षात पैशाचा पाऊस पडू लागला. जिथे कोणी संजयला उभे करून घेत नव्हते आज तिथे त्याला पाहुणे म्हणून निमंत्रण येऊ लागले ..महागडा म्हणजे उत्तमच अशी त्याची ख्याती झाली .. त्याचा गुण चांगलाच होता पण आता स्वार्थ आणि अहं वाढू लागला. महागड्या गाड्या, आलिशान घर, नोकर चाकर सगळे सगळे .. दोन दोन दिवस हॉस्पिटलमध्ये waiting लागू लागले. संजय परदेश वाऱ्या करू लागला , त्यांचा मुलगाही त्याच्यासाखरच बनू लागला. 

     आधी जिथे माणुसकी होती तिथे पैसा येऊ लागला. तो अजून कसा कमावता येईल इतकीच चर्चा मग तो काळा असुदे अगर पांढरा. 

     मृदुला घुसमट होती. त्यात तिला संजय ने केली पैशाची गडबड समजली आणि ती कोसळीच , चर्चेला काही अर्थ च नव्हता.. ती विचार करता करत स्वतः च्या गर्तेत गुंतू लागली ,कोणीही तीच ऐकत नव्हतं आणि कोणाचं तिच्याशिवाय अडत ही नव्हतं. संजयला तर हल्ली त्याची खर्च करणारी सगळी मंडळी चांगली आणि मृदुला काहीही न येणारी, साधं ही न नटणारी, कंजूस , कटकटक करणारी वाटे. घरी आता आधीसारखे खेळकर वातावरणच नसून फक्त व्यावहारीक बोलणे असायचे. 

     ती हळू हळू मनोरुग्ण बनू लागली. तिला याचा अंदाज आल्यावर ती मनोचिकिस्तक कडे गेली पण तेथेही संजय आलाच नाही.  हळू हळू सावरू लागली आणि शेवटी तिने योग्य तो निर्णय घेतलाच..काय ते पाहण्यासाठी कथा नक्की वाचून पहा. 

    प्रत्येक व्यक्तिमत्त्व वेगळं असत..आणि त्यात आपले कष्ट ,अपमान ,पैसा, प्रसिद्धी वेगवेगळी वळणं येतात.पैशात अपार शक्ती असते पण त्याचा वापर कसा करायाचा हे माणसाच्या मनावर अवलंबून असते. स्वतः मध्ये न्यूनगंड निर्माण होत असे वाटल्यास ज्यांच्याशी विश्वास वाटतो मोकळेपणा वाटतो ,त्यांच्यासोबत बोला.

@दिपाली जोशी

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know