WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Saturday, December 4, 2021

आहे मनोहर तरी

सुनीता देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक 'आहे मनोहर तरी'.खर तर यांची प्रथम ओळख म्हणजे पू. ल.देशपांडे यांची पत्नी अशी आहे.पण या पुस्तकामध्ये त्यांच्या लिखाणातून आपणास एका लेखिकेचा परिचय होतो.त्यांनी जर पूर्ण वेळ लेखन केलं असत तर त्या एक प्रसिद्ध लेखिका म्हणून आपल्या समोर असत्या. कॉलेज मध्ये असताना यांचे पुस्तक वाचनात आले होते.तेंव्हा त्यांच्या लेखनास इतकं समजता आले नाही.त्यांचे लेखन समजून घेण्याची प्रगल्भता त्यावेळी नव्हती.
         पुस्तकामध्ये सुनीता ताईंचा लहानपणीचा काळ ते पुस्तक लिही पर्यंत चा काळ येतो.यात त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना,अनुभव त्या सांगतात.सुरवातीलाच त्या म्हणतात की हे आत्मचरित्र नाही.आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती आहे.पाखरांसारखी.त्या आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगतात.त्या वेळेचा काळ आपल्या समोर येतो.तसेच बेचाळीसच्या स्वत्यंत्रालढ्यातील त्यांचा सहभाग त्यावेळचे अनुभव त्या मोकळेपणाने सांगतात.पू. ल.आणि त्यांचे प्रेम,लग्न यांबद्दल सांगताना त्या म्हणतात नवरा म्हणून एखादा माणूस किती चांगला असू शकेल तितका तो चांगला आहे.खरे तर बायको म्हणून मीच त्या योग्यतेची नाही.मझ्या रक्तातली विझायला तयार नसलेली बंडखोरी हाच मुळी बायको होण्यातला मुख्य अडसर आहे.त्या पू. ल. यांच्या बद्दल ज्या तक्रारी करतात तेवढ्याच प्रखरतेने आपल्यातील दोष सुद्धा सांगतात.त्या म्हणतात की गेली चाळीसहून अधिक वर्ष भाई आणि मी,आम्ही दोघांनी एकत्र काढली त्याबद्दल लिहायचे तर मला भाईचे चारित्रच लिहावे लागेल.काहीसे मी घडवलेले आणि बिघडवलेले देखील.जे घडवले त्याबद्दल मीच काय,कसे आणि किती लिहिणार?पण माझे जेजे काही चुकले त्याचा अर्थातच त्याला त्रास ही झाला.मात्र तक्रार करण्याचा त्याचा स्वभाव नाही.
         अनेक क्षेत्रातल्या अनेक नामवंत आणि थोर व्यक्ती यांच्याशी पू. ल.आणि सुनीता ताई यांच्या गाठीभेटी होत.बैठका जमत.त्या म्हणतात बैठकीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,गोविंद तळवकर,श्री.पू.भागवत यांच्यासारखी मंडळी असली तरी वातावरण कधीच गंभीर नसे.सदैव रंगतदार आणि खेळीमेळीचे असे.अशा बैठकी या मझ्या दृष्टीने पर्वणीच असे.त्याकाळच्या इतक्या थोर व्यक्ती त्याची संगत, चर्चा,बैठका यांची वर्णने त्यांच्या लिखाणातून वाचून आपणास क्षणभर असे वाटते की आपण ही त्या बैठकांमध्ये असायला हवे होते.
         सुनीता ताई म्हणतात की लग्न ही गोष्ट पुढल्या जन्मी मझ्यासाठी लिहिली गेली,तर मला भाईच नवरा मिळावा.कारण दुसऱ्या कुठल्याही घरात मला स्वतः च्या तंत्राने वागायचे,जिवतोडून प्रेम करण्याचे तसाच अंत पाहण्याचे,सर्वस्व पणाला लावून मदत करण्याचे आणि तशीच अडवणूक करण्याचे,अगदी सर्व तऱ्हेचे इतके स्वतंत्र मिळणार नाही.आणि सुनीता ताईंच्या शब्दात सांगायचे तर,
शेवटी बर वाईट तर कशाला म्हणायचे?कशापेक्षा अधिक बर अगर काशापेक्षा वाईट? तुलनेला अपल्याहाती समांतर आयुष्य थोडेच आहे?शिवाय आपली मते देखील सारखी बदलत असतात.विशेषतः परतीचे वारे वाहू लागले की त्यांची चाहूल संवेनशील माणसांना लगेच लागते.आणि मग सिंहावलोकन सुरू झालं की सगळ उल्ट्याच पालट दिसू लागत.वातावरणात पृथ्वीपासून दूर वरवर गेलं की आपल वजन कमी होत जात ना तशी इथे ओंजळ रीती होत जाते.आणि उरतात फक्त आठवणींचे तरंगते ढग. सारखा आकार बदलत जाणारे. काळ्याकुट् अस्वलासारखे, पांढरा शुभ्र साश्यांसारखे आणि पोहताना गुदगुल्या करणाऱ्या रंगबेरंगी इवल्या इवल्या माशांसारख्या.
Madhavi surve 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know