WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Wednesday, June 2, 2021

वाँरेन बफेच्या यशाचे 50 मंत्र

वाँरेन बफेच्या यशाचे 50 मंत्र
लेखक : अतुल कहाते
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस

प्रस्तावना :
वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा 
वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला 
आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर
जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार  आहे.
आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि 
त्यातही कितीतरी कंपन्याची मालकी त्याच्याकडे आहे.
त्याच्या  बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर 
2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे.
त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात
 सांगितली आहेत , हे पुस्तक म्हणजे व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची गुंफलेली सुरेख माळ ....

गुंतवणूकपूर्व सल्ले :
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा
आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार 
कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही 
त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा.....
ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा 
आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय 
त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा.
छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात
आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे.
माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल

गुंतवणूकदार होण्यापूर्वी :
आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा 
सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत 
जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.

गुंतवणूकदार झाल्यानंतर :
 ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी. 

ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी

ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते

ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी. 

 तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही  ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो.

Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण  कुणावर तरी  विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा
"जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला"

शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे  असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे
आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा

गुंतवणूक कशी करावी:
दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी
गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी.
शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी 
जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल.

ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे
हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या 
(Trading , FO, Commodity )मागे धावू नये.

हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि  दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा
तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा

आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये.
लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात.

जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील
अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी.

गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील

किंवा गुंतवणूकीसाठी  SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते.

लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये
गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी.
कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही.

सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही.

आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा  उद्योजकाप्रमाणे हवे 
वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे

शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात 
100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही.
भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही 
भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI

सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण  एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये.
इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार  शेअर्स बाबत आपले वर्तन असावे
त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी.

इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो
त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका 
शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही 

शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते 
ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते

बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही 
त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा.
खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा.
तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात 
कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते.

शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये. 

ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो.
तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका.

नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही
घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका

शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका
शेअर बाजारात काय  किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो.
संदर्भ निलेश शिंदे 

व्हू मूव्हड माय चीज

व्हू मूव्हड माय चीज
लेखक : स्पेन्सर जाँन्सन एम.डी
प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

प्रकाशक पाच मित्र ब-याच वर्षानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनात भेटतात आणि त्यानंतर एकमेकांना जाणून घेतात 
त्यापैकी एकजणाने वडीलांचा व्यवसाय पुढे चालवलेला असतो
एकजणाने नुकताच डायव्होर्स घेतलेला असतो
एक मैत्रीण संसाराच्या रहाटगाड्यात अडकून पडलेली असते
एकजण नोकरीत सिनिअर असूनही प्रमोशनसाठी झगडत असतो.
तेवढ्यात माईक त्यांना जी गोष्ट सांगतो
त्याने सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो तीच ही गोष्ट

दोन माणसं, दोन उंदीर आणि त्यांचा चीजसाठी संघर्ष हा जरी कथेचा विषय असला तरी कथेचा मुख्य भर बदलाची मानसिकता हाच आहे.

लेखकाच्या मते माणसाला बुद्धीची देणगी भेटलीय 
पण त्यातील भावना ,तर्क ,धारणा जर चुकीच्या असतील माणूस सदैव मागे खेचला जातो
माणसाला विचार करण्याची क्षमता आहे ,
पण अतिविचार घातक ठरतात
माणसाला अनुभवांचे विश्लेषण करता येते
पण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन मात्र अडसर आहे.
माणसाला कष्ट करण्याची ताकद मिळालीय ,
पण आळस आणि कंटाळा त्यात आडवे येतात.
माणूस यशाने लगेच हुरळून जातो ,अपयशाने लगेच खचूनही जातो.
भीतीदायक विचार त्याला सुरक्षित जगायला भाग पाडतात
त्याच्याकडे एखादी गोष्ट असली की मालकी हक्काची भावना गर्वात रूपांतरित होते. 
जर ती गोष्ट कोणत्याही कारणाने त्याच्याकडून हिरावली गेली की तो साधकबाधक विचार करण्यापेक्षा आकांडतांडव करतो, दुसऱ्यांवर आगपाखड करतो, परिस्थिती समजून न घेता सगळा दोष दुसऱ्यालाच देऊन मोकळा होतो.
आयुष्य साधे सोपे सरळ असते पण आपण आपल्या विचारांची त्याला गुंतागुंतीचे बनवतो.

लेखकाच्या मते चीज म्हणजे ऐश्वर्य, स्वास्थ्य, नातेसंबंध, आध्यात्मिक अनूभूती असे काही असू शकते 
हे चीज तुमच्या साठी तेवढेच महत्त्वाचे आहे जितके तुम्ही त्यावर अवलंबून राहता.आणि त्यासाठी तुम्हाला परिस्थिती नुसार स्वतः मध्ये योग्य बदल करावेच लागतील.

बदल हे वाईट नसतात , 
वरकरणी ते भयप्रद वाटत असले तरी ते भाग्यकारक असतात
पण आपण बदलांना घाबरतो आणि त्यापासून होता होईल तेवढे दूर पळतो आणि शेवटी योग्य वेळी योग्य बदल न केल्याने स्वतः चे नुकसान करून घेतो.

आपल्याला हव्याहव्याशा वाटणार्या गोष्टी जसे की प्रेम,पैसा इत्यादी हया जगात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे 
पण त्यासाठी आपल्याला बदलण्याची गरज आहे
आपण भीतीतून मुक्त होत नाही तोवर आपली परिस्थिती बदलणार नाही आणि त्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही.

बदलाचा आनंद घ्या, साहस अनुभवत  नवनवीन कल्पना राबवा , हव्याशा वाटणार्या गोष्टींचे कल्पनाचित्र रंगवा
सकारात्मक विचार करून अडचणींवर मात करा.

आपल्या भीतीचे योग्य आकलन करून त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द ठेवा .कारण चिंता आणि भीती माणसाला सतत वाईट घडेल याची शंका मनात उत्पन्न करतात
खरे पाहता एखाद्या घटनेला आपण जितके घाबरतो तितकी ती भयप्रद नसतेच ,यापेक्षा जास्त आपले कल्पनाचित्र भयंकर असते.

भूतकाळात आपल्या कडून झालेल्या स्वतःच्या चुकांवर खेद करण्यापेक्षा त्यावर हसण्याची तयारी ठेवा तसेच त्या चुकांमधून शिकण्याची तयारी ठेवा.
अडथळे,आव्हाने हा जीवनाचा भाग आहे त्यांना स्वीकारून त्यावर स्वार व्हा.

पुराना जायेगा तभी तो नया आयेगा
जुने विचार किंवा गोष्टींचा त्याग केल्याशिवाय नव्याकडे आपला प्रवास सुरूच होत नाही.

नव्या गोष्टींची कल्पना केली तरच त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करु 
त्या दिशेने वाटचाल सुरू केली की मार्ग सापडतील, धैर्य, आत्मविश्वास आपला वाढेल आणि त्यापाठोपाठ आनंदही मिळेल.
संदर्भ निलेश शिंदे 

नायक

नायक
लेखक : रोंडा बर्न
प्रकाशक : मंजुळ पब्लिशिंग हाऊस

ब-याच वर्षापूर्वी अल्फा मराठी वाहिनीवर नायक नावाची मालिका लागायची ज्याचे शीर्षकगीतच असे होते की
"माझ्या जीवनाचा नायक व्हायचयं मला
कुणी सांगेल का मला कसे जगायचे कसे वागायचं ? "

त्याच प्रश्नाचे उत्तर सिक्रेट पुस्तकाच्या लेखिका रोंडा बर्न यांनी लिहिलेल्या हया पुस्तकात मिळते
या पुस्तकात आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची मार्गदर्शन संकलित करण्यात आलेली आहे.

आपल्याला चित्रपटाच्या नायकाविषयी खूप आकर्षण असते 
नायक चांगला तरच पिक्चर सुपरहिट असतो.
 नायक अन्यायाविरुद्ध लढतो,सगळया अडथळयांवर मात करतो आणि शेवटी त्याला जे हवं ते मिळवतो.
चित्रपट पाहून प्रत्येकालाच आपणही असेच नायक व्हावे असे वाटते त्यामुळे काहीजण नायकासारखे कपडे हेअरस्टाईल यांचे अनुकरण केले जाते.
पण वास्तविक पाहता जीवनातील त्याचा संघर्ष मात्र तितकासा चर्चिला जात नाही आणि अनुकरला तर मुळीच जात नाही.
त्यामुळे फक्त हिरोसारखे दिसण्याऐवजी तसं असणे महत्त्वाचे आहे
त्यासाठी आपल्याला "मी जबाबदार" असे म्हणून स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागेल आणि स्वतःच्या जीवनाचा नायक व्हावे लागेल.

सामान्य माणूस आणि नायक यांच्यातील फरक लेखकाने वेगवेगळ्या मुदयावरुन स्पष्ट केला आहे

1.स्वप्न :
नायकाला स्वतःची स्वप्ने असतात,उद्दिष्ट असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तो आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करतो
जबरदस्त इच्छाशक्तीने अशक्य गोष्टी शक्य 
बनवतो. त्याउलट सामान्य माणसाला निरूद्देश जीवन जगतात , जीवनाचे ध्येय न कळाल्याने असमाधानी दुखदायक आयुष्य जगतात.
त्यामुळे लेखक सल्ला देतात की तुम्ही तुमच्या अंतकरणात डोकावून स्वतःची स्वप्ने शोधा आणि ती कशी पूर्ण करता येईल यावर विचार करा.
पैसा आणि सुरक्षिततेइतकेच आपला स्वतःचा आनंद ,समाधान हयालाही महत्त्व द्या.त्यासाठी टाळाटाळ न करता धाडस दाखवा आणि आनंदाच्या मार्गाने वाटचाल सुरु करा

2.विश्वास
नायकाचा स्वतः वर पूर्ण विश्वास असतो तो कुठल्याही गोष्टीला अशक्य समजत नाही
याउलट सामान्य माणसं नेहमी स्वतः बद्दल नकारात्मक दृष्टिकोन बाळगतात आणि कुढत राहतात.
त्यामुळे लेखक इथे सल्ला देतात की  स्वतः वर स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा 
कायम सकारात्मक स्वसंवाद करून अंतर्मनात आत्मविश्वासाचा नवीन प्रोग्राम डेव्हलप करा . एकदा अंतर्मनाने गोष्टी स्वीकारल्या की त्याच गोष्टी पुढे वैश्विक मनाकडे जातात आणि Law of Attraction तशा गोष्टी घडवून आणायला मदत करते. तेव्हा ठाम विश्वास , दृढ निश्चय, जिद्द चिकाटीने स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा.

3.दूरदृष्टी
नायकाला दूरदृष्टी असते ज्याचा वापर करून तो भविष्यात जे काही घडवायचे आहे त्याचे मनचक्षूसमोर चित्र मांडतो
त्या स्वप्नांची स्पष्ट जाणीव अंतर्मनाला जाणीव करून देतो आणि मग ती स्वप्नप्रतिमा नायकाच्या प्रयत्नशीलतेने
सत्यात अवतरते
सामान्य माणसाला तशी कुठलीच दूरदृष्टी नसते त्यामुळे ती जशी जन्माला येतात तशीच नष्टही होतात.

4.मन
नायकाचे मन सकारात्मक वृत्तीने आणि आशावाद यांनी भरलेले असते.
त्यामुळे तो नेहमी यशश्री खेचून आणतो
त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सोहळा असतो
ते कधीच स्वतःच्या स्वप्नांच्या विपरीत विचार करत नाही.
याउलट सामान्य माणूस आपल्या नकारात्मक वृत्तीने अपयश दुख आजारपण यातच गुंतलेला असतो
त्यासाठी इतरांना दोष देण्यात धन्यता मानतो, रडत कुढत संभ्रमात तो आयुष्य काढीत असतो
तो षड्रिपूंना सतत बळी पडत असतो 
आपल्या आनंदासाठी सतत बाहय गोष्टीचा आधार शोधत असतो.

5.अंतःकरण
नायक भीती आणि शंकेला स्वतःच्या स्वप्नांच्या आड येऊ देत नाही 
धाडसाने भीतीवर मात करत Comfort झोन वाढवायचा प्रयत्न करत असतो.
जे काही मिळवले आहे, मिळत आहे आणि मिळणार आहे त्याबद्दल कृतज्ञ असतो
सामान्य माणसे नेहमी कल्पनातीत भीतींचे शिकार झालेले असतात त्यामुळे धोका पत्करायलाच ते घाबरतात आणि मग कृतिशून्य राहतात
वैश्विक शक्तीकृतज्ञ राहण्याऐवजी ते अडचणी आव्हानांनाच मोठे समजतात

6. अंतःप्रेरणा :
नायक अंतःप्रेरणेला स्वप्नपूर्तीसाठी अंतप्रेरणेला यशप्राप्तीसाठीचे प्राथमिक साधन मानतो जी वैश्विक मनाच्या उच्च पातळीवरून अंतर्मनात पोहचलेली असल्याने तिच्यावर विश्वास ठेवून जागरूक मनाने तो मार्गक्रमण करत राहतो.
याउलट सामान्य माणूस अंतप्रेरणेला कमी लेखतो किंवा अज्ञानास्तव तो आतला आवाजाकडे दुर्लक्ष करतो.

7. वर्तन
नायकाला आपल्या कृतीच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामाबाबत फार जागरूक असतो
त्यामुळे तो नेहमी सर्वांचा मान राखतो
सर्वार्थाने सदैव विनम्र राहतो.
माणसाची वर्तणूक हीच गोष्ट माणसाला प्रगती अधोगतीला कारणीभुत ठरते हे तो जाणतो
गुरूजन आणि थोरामोठ्याचे बोल ऐकण्यासाठी सदैव आतूर असतो
तसेच यशापयथाने हुरळून घाबरून जात नाही 
याउलट सामान्य माणसे पैश्याच्या मोहाने आंधळी होतात मोठ्यांचा अनादर करतात 
चांगलं असण्यापेक्षा चांगले दिसण्यावर भर देतात ,इतरांना दुख देऊन स्वतःच्या सुखाची कामना करतात

8.ध्येयनिष्ठा
नायक आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असतो
स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध असतो.
समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मकतेला स्वतः मध्ये परावर्तित होऊ देण नाही
ठाम निश्चय ,ज्वलंत इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी यामुळे वैश्विक शक्ती त्याला
त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आनंदाने मदत करतात
याउलट सामान्य माणसं भीतीच्या भावनेतून कटिबद्धता टाळतो. 
निरनिराळ्या सबबी सांगून यशाच्या वाटेवरून माघारी परततो.त्याला सगळे रस्ते फसवे आणि अडथळ्यांची शर्यत वाटतात आणि जीवन चक्रव्यूह भासतो 
नकारात्मक माणसांच्या जाळयात सहजपणे अडकतो

9.सत्वपरीक्षा
नायक त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाला सुधारण्याची शिकण्याची संधी समजतो तरीही काही अडथळे असे असतात जिथे नायकाचा कस लागतो
ती जणू त्याची सत्वपरीक्षा असतो
सातत्याने स्वतःच्या क्षमता वाढवून या अडथळयांवर आणि नकारात्मकतेवर वैश्विक शक्ती आणि स्वतःवर च्या विश्वासाच्या बळावर तो यशस्वीपणे मात करतो.
सामान्य माणूस सत्वपरीक्षेआधीच माघार घेतात ,
नकारात्मक मनस्थितीमुळे सुद्धा तो खचतो.
परिस्थितीला शरण जातो

10.बक्षीस
नायकाला त्याचे स्वप्न साकार होणे हे विश्वाकडून मिळालेले मोठे बक्षीस आहे
त्यासाठी लागणारी संसाधने तसेच त्याच्या प्रगतीचा विचार करणारी लोकांची सोबत हे त्याचे मोठे भाग्य असते.
स्वप्न तर सगळीच पाहतात पण फक्त नायक सगळ्या.अडथळयांना पुरून उरतो याचा आनंद अनुभवत आपले आयुष्य सुंदर आणि आनंदी बनवतो
सामान्य माणसं हया टप्प्यावर पोहचतच नाही

11. सामाजिक जाणीव
नायकाचे स्वप्न साकार होत असतानाच त्याचा कनवाळूपणा जागृत होत असतो
त्यामुळे तो इतर लोकांना निराशा यातनांपासून मुक्त ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात
दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी तो झटतो आणि त्यात त्याला समाधान मिळते
सामान्य माणसे नेहमी स्वतः साठी जगतात
पण इथेच नायकाचे वेगळेपण असते त्यामुळे मरावे परी किर्तीरूपी उरावे हया उक्तीप्रमाणे नायक कायम लोकांच्या स्मरणात राहतात
संदर्भ  निलेश शिंदे 

द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड भाग 8

#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
                          लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
                    प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग आठवा (शेवटचा भाग)

अंतर्मनाचा योग्य वापर केला तर आपल्याला संपत्ती, आरोग्य, आनंद, मनशांती, मनशक्ती, प्रश्नांची उत्तरे मिळतात पण काही चुका ,काही अडथळे मात्र आपल्याला इच्छित परिणामांपासून वंचित ठेवतात.

➡️ #आत्मविश्वास_अभाव
अंतर्मनाचे कार्य पूर्णपणे न समजल्यामुळे
 आपला स्वतः वर आणि स्वतः च्या इच्छा स्वप्न अशी अंतर्मनाच्या साहाय्याने पूर्ण होऊ शकतात यावर विश्वासच नसतो 
तर तो महत्त्वाचा अडथळा ठरतो

➡️ #अतिप्रयास
अंतर्मनावर जुलूम जबरदस्ती  करून,गोष्टी थोपवण्याचा प्रयत्न केला तर अंतर्मन त्या भावना स्वीकारत नाही.
त्यासाठी बाहयमनाने आधी भावना स्वीकारू देत ,त्या पटू देत मगच त्या अंतर्मन स्वीकारते.

➡️ #नकारात्मक_भावना 
गोष्टी वाईट होत चालल्या आहेत,
मला यश भेटूच शकत नाही
मी यात अडकून पडलोय 
अशा नकारात्मक भावना असतील
तर अंतर्मन सहकार्य करत नाही 
मनात प्रार्थनेनंतर लगेचच येणारे नकारात्मक विचार सुद्धा असेच चांगल्या गोष्टी होण्यापासून रोखतात.

➡️ #सुस्पष्ट_कल्पना_आणि_ठाम_विचारांचा_अभाव
 अंतर्मन आणि बाहयमनातील सुसंवादाचा अभाव,गोंधळ असेल तर नक्की इच्छित परिणाम काय अपेक्षित आहेत हे माहिती नसते.
जसे ड्रायव्हरला कुठे जायचे हेच आपण सांगितले नाही तर तो आपल्याला कसे व कुठे पोहचवणार ?
तसेच आपल्या मनात गोंधळाची स्थिती असेल तर आपल्याला इच्छित परिणाम मिळू शकत नाही.
 
➡️ #भविष्यातील_संकल्पना_वाटणे
हया सर्व प्रार्थना गोष्टी आपल्याला वर्तमानात मिळाल्या आहेत असे समजून करण्याऐवजी त्यांना भविष्यातील घटना समजले तर त्या गोष्टी भविष्यातच राहतील
आणि आपण फक्त भावी नेते,भावी उद्योजक होऊ. पण वास्तवात त्याला काही महत्त्व नाही.

➡️ #इच्छाशक्तीवर_जोर
कल्पनाशक्तीने चिंतामुक्त स्थितीची प्रतिमा साकारण्याऐवजी फक्त इच्छाशक्तीचा वापर केला तर आपली मानसप्रतिमा तयार होत नाही आणि प्रतिमा नसल्याने प्रतिसाद मिळत नाही.इच्छा आणि कल्पना यांचा संघर्ष कधीच नसावा

➡️ #सहजतेचा_अभाव
प्रार्थनेत सहजता असावी लागते.
आपल्याला अंतिम परिणाम काय हवा इतकेच माहिती हवी ते कस पूर्ण होईल त्याला कुठली साधने लागतील हयाच्या दलदलीत पडायचे नसते.

➡️ #बुद्धीचातुर्याचा_वापर
आपल्या बुद्धीचातुर्याची प्रार्थनेत गरज नसते कारण when there is logic there will be no magic.
अंतर्मनावर आपला अढळ आणि ठाम विश्वास आणि आपली समस्या सुटेलच असा ठाम विश्वास हवा.
आपल्याकडे बालसुलभ, चमत्कार मानणारी,विस्मित होणारी आस्था असणः खूप गरजेचे आहे

➡️ #प्रार्थनेची_चुकीची_वेळ
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर लगेचच बाहयमन अर्धजागृत अवस्थेत असते तेव्हा केलेली प्रार्थना अंतर्मनात जाते .ही वेळ सोडून इतर वेळी केलेली प्रार्थना निष्फळ ठरते.

➡️ #मनातील_नकारात्मक_भावना
संपत्ती मिळवण्यासाठी मनात फक्त संपत्तीच्या भावना असल्या पाहिजे. त्याऐवजी विपन्नतेच्या भावना असतील तर संपत्ती कशी मिळेल.

➡️ #इच्छापूर्ती_वारंवार_कल्पना_न_करणे
आपल्या कल्पनाशक्तीने तयार केलेली मानसप्रतिमा जेव्हा जेव्हा वाईट विचार येतील तेव्हा तेव्हा ती डोळयासमोर आणायची आणि नकारात्मक भावनांना मागे सारायचे. 
तसेच सातत्यपूर्वक दिवसातून दोनदा रोज प्रार्थना करत राहिली की बाहयमनातील विचार अंतर्मनात विचार पोहचायला सोपे जाते.

समाप्त
संदर्भ: निलेश शिंदे 

मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा

#मित्र_जोडा_आणि_लोकांवर_प्रभाव_पाडा
(How to win Friends and  influence People )

लेखक - डेल कार्नेजी
अनुवाद - शुभदा विद्वांस
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस

लेखमाला - भाग तिसरा

#लोकांना_जिंकून_घेण्याचे_मार्ग

1️⃣विनाकारण वाद घालू नका
➖टोकाची भूमिका घेऊ नका
➖वादविवादात जिंकून सुद्धा माणसं हरतात कारण त्यांच्या शब्दप्रहाराने समोरच्याचा अहंकार दुखावतो आणि तो बदला घेण्याची संधी शोधतो अशामुळे आपण आपला एक शत्रू निर्माण करतो
➖द्वेषाला द्वेषाने नाही तर प्रेमानेच जिंकावे लागतात
➖ ज्याला भव्यदिव्य काही करायचेय तो मनसंयमाने वाद टाळतो 
➖छोट्या मतभेदांना चुका सुधारण्याची संधी समजा, संवादाचे पूल बांधून विसंवाद दूर करा
➖संवादात सहमतीचे मुद्दे शोधा आणि चर्चेने ते वाढवा
➖ आपल्या वादामुळे कुणाला फायदा नुकसान होणार आहे याचा विचार करा
➖आपल्या चुका लक्षात आल्या तर त्या कबूल करण्याचे धारिष्ट दाखवा

2️⃣  विरोधी मतांचा आदर करा
➖स्वतःला हुशार समजणे बंद करा
➖कुणाच्या आत्मसन्मान आणि आकलनावर शंका घेऊ नका त्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.
➖कुणाची चेष्टा निंदा करणे टाळा
➖टोकाची दुराग्रही आक्रमक मते मांडू नका
➖समोरच्याला आपले मत खोडण्याचा आनंद घेऊ द्या
➖मुत्सद्दीपणे हळूहळू त्याच्या चुका त्याला लक्षात आणून द्या पण तू चुकलाय असे बोलू नका
➖चर्चा करताना पूर्वग्रह ,जुन्या कल्पनांना  दूर ठेवा

3️⃣ चुकांची प्रांजळपणे कबुली
आपल्या चुकांसाठी इतरांकडून झापून घेण्यापेक्षा आधीच स्वतःच्या चुका कबूल करा स्वतः ला त्यासाठी दूषणे द्या म्हणजे आपल्या चुका समोरच्याच्या नजरेत सौम्य होतील.आणि प्रामाणिकपणामुळे आपला आदर वाढेल कारण कधीकधी जे लढून मिळत नाही त्यापेक्षा जास्त शरणागती पत्करून मिळते.

4️⃣ नात्याची मैत्रीपूर्ण सुरुवात
एखाद्याच्या मनात तुमच्या विषयी द्वेष, हेवेदावे असतील तर सामोपचाराने बोला
राग,संताप, तिरस्कार दूर ठेवा.
तुम्ही प्रामाणिक आहात हे जाणवू द्या,
दुसऱ्या वर आपली मते लादू नका
सहमतीचे मुद्दे वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहा. सहानुभूतीने, स्तुतीने त्यांचे मन जिंकायचा प्रयत्न करा
लोकांशी बोलायला सुरुवात करताना सहमतीच्या मुद्यावर फक्त होय असे उत्तरे येणारे प्रश्न विचारा.नंतर आपल्या मताशी त्याला सहमत खरायचा.

5️⃣ सेफ्टी व्हाँल्व्ह 
समोरच्याला पूर्ण व्यक्त होऊ द्या 
त्यांच्या स्वतःबद्दल व्यवसायाबद्दल,संघर्षाबद्दल,यशाबद्दल, समस्याबद्दल आनंदाबदद्ल बोलू द्या त्यात रूची घ्या, त्याला प्रोत्साहन द्या
जोवर ते स्वतः थांबत नाही तोपर्यंत त्याला थांबवू नका.

6️⃣लोकांचे सहकार्य मिळवा
प्रत्येक माणसाला त्याच्या डोक्यातून आलेल्या कल्पनांवर विश्वास ,श्रद्धा असतो
त्यामुळे आपल्या कल्पना कुणावरही लादू नये, त्यापेक्षा त्यांचे विचार, कल्पना, आवडीनिवडी, गरजा हयाबद्दल आपुलकीने बोला. त्याची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपण झटतोय हे त्याला जाणवले तर त्यांचे पूर्ण सहकार्य मिळते.

7️⃣ इतरांच्या नजरेतून प्रामाणिकपणे पाहा
लोक कितीही चुकीचे वागत असले तरीही त्यांना तसे वाटत नाही कारण त्यांच्या वागण्यामागे काहीतरी कारण दडलेले असते ,आपण प्रामाणिकपणे त्याच्या जागी जाऊन विचार केला तर कदाचित आपल्याला ते सापडते त्यामुळे समोरच्या माणसाच्या भावना विचारांना स्वतः च्या  भावना विचारांइतकेच महत्त्व द्या .
त्यांना सहानुभूती दाखवा

8️⃣ जगण्याचा उदात्त हेतू समजून घ्या
माणूस एखादी गोष्ट करतो कारण एकतर त्याला ती आवडत असते आणि एक उदात्त आदर्शवादी विचार असतो. त्यांच्या उदात्त हेतूला आव्हान देऊन त्याला जागृत करा.
म्हणजे तो आपोआप बदलेल.

9️⃣ नाटयमयता
एखादी संकल्पना उपदेश, धमक्या, रागावणे हया मार्गांनी समजावण्यापेक्षा 
नाटयमय पद्धतीने सुस्पष्ट आणि पारिणामकारकरीत्या मैत्रीपूर्ण शब्दात सांगा.
एखादी गोष्ट समोरच्याकडून करून घ्यायची असेल तर स्पर्धा लावा
सर्वोत्तम होण्याची इच्छा माणसाची भीती मारते,ते धैर्यवान बनतात कडवी झुंज देऊन जिवाची पर्वा न करता स्वतःला सिद्ध करतात.

#नेतृत्वाचा_स्वीकार

1️⃣ कानउघाडणी
नेतृत्वाने एखाद्याची चूक सापडली तरी चूक दाखवून झापू नये त्यापेक्षा
➖ आधी कौतुक करा आणि एखाद्या वेदनाशामकाप्रमाणे त्यांच्या चूका सांगा जेणेकरून माणसं टीका सहज पचवतात
आणि सुधारणा घडून येतात.
➖कौतुक हे टीकेचे स्टार्टर वाटता कामा नये यासाठी कौतुक आणि टीका यामध्ये "आणि"  हा शब्द वापरा
Eg.you are good and i know you will not repeat any mistakes
➖दुसर्यावर टीका करण्यापूर्वी आपण केलेल्या भूतकाळातील चुका आठवा
त्या आपल्या चुकांची कबूली आधी दिल्यामुळे त्यांना त्यांचे दोष ऐकणे अवघड जात नाही
➖ आदेश देऊ नका
चुका सापडल्यावर कडक शब्दात आदेश आज्ञा दिल्याने माणसाच्या मनात हीनतेची संतापाची भावना जागृत होते त्यामुळे सौम्य शब्दात सांगा"आपण असे केले तर"
हयामुळे मानपानाचा प्रश्न उरत नाही
आणि ते आनंदाने आपली चूक सुधारतात
➖अपराध पोटात घाला
चुका दाखवताना आपण एखाद्याला स्वतःच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करू नये, त्यांचा अपमान न करता त्यांचे दृष्टिकोन समजून घ्या आणि अपराध पोटात घाला
➖ यशासाठी प्रोत्साहन
माणसाच्या दोषांकडे दुर्लक्ष आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली तर माणसाचे दोष गळून पडतात पण सतत दोष दाखवत राहिलात तर समस्या वाढतात.
➖ स्तुतीचा परिणाम
कौतुकाची पावती म्हणूनच माणसे सुधारतात, योग्य सन्मान दिला तर माणसं हवी ते काम करतात.. क्षमतांची जाणीव वाढते ते झटतात आणि चुका आपोआपच सुधारल्या जातात.
कारण माणसाच्या अंगभूत गुणांवर नेतृत्व विश्वास दाखवते त्यामुळे त्याचा आत्मविश्वास पण वाढतो. कामात स्वारस्य वाढते.
➖ कामे आनंदाने करू द्या 
एखाद्याला कामे सांगताना तो काम करून आपल्यावर उपकार करतोय अशी जाणीव 
ठेवली आणि योग्य कामासाठी प्रोत्साहन म्हणून बक्षीस, पदव्या,बढत्या दिल्या तर माणसे आनंदाने आणि समाधानाने काम करतील