WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Wednesday, June 2, 2021

व्हू मूव्हड माय चीज

व्हू मूव्हड माय चीज
लेखक : स्पेन्सर जाँन्सन एम.डी
प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन

प्रकाशक पाच मित्र ब-याच वर्षानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनात भेटतात आणि त्यानंतर एकमेकांना जाणून घेतात 
त्यापैकी एकजणाने वडीलांचा व्यवसाय पुढे चालवलेला असतो
एकजणाने नुकताच डायव्होर्स घेतलेला असतो
एक मैत्रीण संसाराच्या रहाटगाड्यात अडकून पडलेली असते
एकजण नोकरीत सिनिअर असूनही प्रमोशनसाठी झगडत असतो.
तेवढ्यात माईक त्यांना जी गोष्ट सांगतो
त्याने सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो तीच ही गोष्ट

दोन माणसं, दोन उंदीर आणि त्यांचा चीजसाठी संघर्ष हा जरी कथेचा विषय असला तरी कथेचा मुख्य भर बदलाची मानसिकता हाच आहे.

लेखकाच्या मते माणसाला बुद्धीची देणगी भेटलीय 
पण त्यातील भावना ,तर्क ,धारणा जर चुकीच्या असतील माणूस सदैव मागे खेचला जातो
माणसाला विचार करण्याची क्षमता आहे ,
पण अतिविचार घातक ठरतात
माणसाला अनुभवांचे विश्लेषण करता येते
पण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन मात्र अडसर आहे.
माणसाला कष्ट करण्याची ताकद मिळालीय ,
पण आळस आणि कंटाळा त्यात आडवे येतात.
माणूस यशाने लगेच हुरळून जातो ,अपयशाने लगेच खचूनही जातो.
भीतीदायक विचार त्याला सुरक्षित जगायला भाग पाडतात
त्याच्याकडे एखादी गोष्ट असली की मालकी हक्काची भावना गर्वात रूपांतरित होते. 
जर ती गोष्ट कोणत्याही कारणाने त्याच्याकडून हिरावली गेली की तो साधकबाधक विचार करण्यापेक्षा आकांडतांडव करतो, दुसऱ्यांवर आगपाखड करतो, परिस्थिती समजून न घेता सगळा दोष दुसऱ्यालाच देऊन मोकळा होतो.
आयुष्य साधे सोपे सरळ असते पण आपण आपल्या विचारांची त्याला गुंतागुंतीचे बनवतो.

लेखकाच्या मते चीज म्हणजे ऐश्वर्य, स्वास्थ्य, नातेसंबंध, आध्यात्मिक अनूभूती असे काही असू शकते 
हे चीज तुमच्या साठी तेवढेच महत्त्वाचे आहे जितके तुम्ही त्यावर अवलंबून राहता.आणि त्यासाठी तुम्हाला परिस्थिती नुसार स्वतः मध्ये योग्य बदल करावेच लागतील.

बदल हे वाईट नसतात , 
वरकरणी ते भयप्रद वाटत असले तरी ते भाग्यकारक असतात
पण आपण बदलांना घाबरतो आणि त्यापासून होता होईल तेवढे दूर पळतो आणि शेवटी योग्य वेळी योग्य बदल न केल्याने स्वतः चे नुकसान करून घेतो.

आपल्याला हव्याहव्याशा वाटणार्या गोष्टी जसे की प्रेम,पैसा इत्यादी हया जगात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे 
पण त्यासाठी आपल्याला बदलण्याची गरज आहे
आपण भीतीतून मुक्त होत नाही तोवर आपली परिस्थिती बदलणार नाही आणि त्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही.

बदलाचा आनंद घ्या, साहस अनुभवत  नवनवीन कल्पना राबवा , हव्याशा वाटणार्या गोष्टींचे कल्पनाचित्र रंगवा
सकारात्मक विचार करून अडचणींवर मात करा.

आपल्या भीतीचे योग्य आकलन करून त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द ठेवा .कारण चिंता आणि भीती माणसाला सतत वाईट घडेल याची शंका मनात उत्पन्न करतात
खरे पाहता एखाद्या घटनेला आपण जितके घाबरतो तितकी ती भयप्रद नसतेच ,यापेक्षा जास्त आपले कल्पनाचित्र भयंकर असते.

भूतकाळात आपल्या कडून झालेल्या स्वतःच्या चुकांवर खेद करण्यापेक्षा त्यावर हसण्याची तयारी ठेवा तसेच त्या चुकांमधून शिकण्याची तयारी ठेवा.
अडथळे,आव्हाने हा जीवनाचा भाग आहे त्यांना स्वीकारून त्यावर स्वार व्हा.

पुराना जायेगा तभी तो नया आयेगा
जुने विचार किंवा गोष्टींचा त्याग केल्याशिवाय नव्याकडे आपला प्रवास सुरूच होत नाही.

नव्या गोष्टींची कल्पना केली तरच त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करु 
त्या दिशेने वाटचाल सुरू केली की मार्ग सापडतील, धैर्य, आत्मविश्वास आपला वाढेल आणि त्यापाठोपाठ आनंदही मिळेल.
संदर्भ निलेश शिंदे 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know