प्रेम आणि सुड या दोन भावनेनं काठोकाठ भरलेल्या या कथेमध्ये तितकाच थरार आणि सस्पेंस ठासून भरलेला आहे.रोमांचक! अद्भुत आणि जगप्रसिद्ध! या फ्रेंच भाषेतील कादंबरीला नेपोलियन बोनापार्ट च्या सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी आहे! तसाच फ्रान्स मधील रोमँटिक संस्कृतीचा प्रभाव आहे.
कादंबरी: द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो
मूळ लेखक:अलेक्झान्द्र द्द्युमास
मराठी अनुवाद आणि संक्षिप्तीकरन: प्रणय सखदेव
पृष्ठ:२५२ मूल्य:३००/ सवलत मूल्य:२७०/
टपाल:३५/ एकूण:३०५/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.
मो:9421605019
ज्ञानसाधना पुस्तकालय, परभणी
टिप: याच लेखकाची
द थ्री मस्कटीअर्स:३००/ दोन्ही एकत्र घेतल्यास:५६०/ होम डिलिव्हरी होईल.
एडमंड डान्टे एक खलाशी नवयुवक!आकर्षक, सुंदर आणि रुबाबदार! नुकतेच मिसरूड फुटलेला तरुण! आकाशाला गवसणी घालत जगण्याचा त्याचा काळ!जसा हँडसम तसाच शुर आणि धाडशी! तितकाच चतुर आणि निष्ठावान!
गरिबीत गेलेलं बालपण ! स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तुत्वाने समृध्द जीवन जगण्याचे स्वप्न पाहणारा एडमंड जणू एक राजकुमार!अर्थातच त्याला एक शोभेल अशी प्रेयसी आहे! ती त्याचा जीव की प्राण!सुंदर पण जबाबदार! सहनशील आणि समर्पित! दुर्मिळ व्यक्तिमत्वाची ही सुंदरी त्याच्या जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देते!
अथांग सागराची सफर करताना स्वाभाविकपणे अनेक संकट आणि वादळं येतात.यातून हा तरुण नवनवे अनुभव घेत जातो.निष्ठा आणि कष्टाच्या जोरावर तो जहाजाच्या कॅप्टन च्या मर्जीतील एक लाडका ऑफिसर होतो....हो अर्थातच जहाजावर त्याच्यापेक्षा जेष्ठ आधिकारी कार्यरत असतात!
एका दिवशी अचानक कॅप्टन ला असह्य वेदना सुरू होतात....त्यातच कॅप्टन चा मृत्यू होतो.सगळी खलाशी आणि आधिकारि गांगरून जातात.पण हा नवखा तरुण जहाजाची जबाबदारी अंगावर घेतो.अनेक संकटातून जहाज सुखरूप घेऊन येतो...कॅप्टन ने सांगितलेल्या सर्व धाडशी मोहिमा पूर्ण करून!
ते एक विशाल जहाज असते.अतिशय लोकप्रिय! ज्याला पाहायला नेहमी गर्दी होते!जहाजाच्या मालकाला तर हे जहाज जणू प्राणप्रिय!जेंव्हा जहाजाचा मालक एकूण घटनाक्रम माहिती करून घेतो, तेंव्हा त्याला आपला कॅप्टन नाही याचा शोक होतो पण त्याच वेळी नवीन कॅप्टन मिळाल्याचा आनंद!
एडमंड डान्टे हाच आपला नायक! कर्तुत्ववान! रूपवान आणि नशीबवान!तारुण्याच्या पदार्पणातच जगप्रसिद्ध जहाजाचा कॅप्टन! सुंदर प्रेयसी!मालकाचा विश्वास आणि खास साथ! भरपूर पैसा! सुखी संसाराची स्वप्न पाहणारा एडमंड डान्टे मात्र आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही!
गरिबीत वाढलेला एडमंड डान्टे सुखी होण्याचे स्वप्न पाहतो ,पण त्याचे स्वप्न स्वप्नच राहते.साखरपुड्यातूनच त्याला होते अटक आणि मग कधीही न संपणारी कैद!
स्वप्नांचे वाटोळे!मालकाच्या लाख प्रयत्नांना यश काही येत नाही आणि एडमंड डान्टे काही सुटत नाही. घरचे कर्ज फेडून स्वाभिमानी वडील अक्षरशः उपासमारी ने पाय खोडून मारतात.प्रेयसी तिला आणि त्याला नको असलेल्या माणसासोबत लग्न करते.जहाजाचा मालक आणि त्याची कंपनी दिवाळखोरीत निघेते.....
असे काय घडले होते? काय गुन्हा केला होता आपल्या नायकाने?एडमंड डान्टे कडे असे कोणते पत्र होते, ज्यामुळे त्याला जन्मकैद झाली होती!
कोणताही गुन्हा न करता आयुष्याचे वाटोळं होताना दिसते तेंव्हा कोणाचं चित्त जागेवर राहील?त्याला तर कोण्या अज्ञात बेटावर कैदी म्हणून ठेवलं होतं जेथून केवळ मृत्यूची बातमी बाहेर येत असे.कैदी बाहेर येणं जवळपास अशक्य!
एडमंड डान्टे निराश , हताश आणि उदास जीवन जगतो. जगतो कसला मृत्यू येत नाही म्हणून जिवंत राहतो.त्याला आपली सुटका कधीच होणार नाही याची पूर्ण खात्री पटते आणि तो जीवन संपवण्याच्या मागे लागतो.आत्महत्या करण्याची पूर्ण तयारी करतो.पण....
हा पण या कादंबरीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे.जेलमध्ये त्याला भेटतो एक कैदी! जो त्याला जीवनाचा अर्थ शिकवतो.शिकवतो नवी विद्या! शिकवतो नवे प्रयोग! सांगतो जगातील मोठ्या खजिन्याचे रहस्य! करतो त्याला त्याचा वारस! आणि जातो जग सोडून कायमचा!
तो अभ्यद्य तुरुंग! एडमंड डान्टे या तुरुंगातून पसार होतो....त्या न केलेल्या गुन्ह्याच्या शोधात!त्याच्या आयुष्याची, त्याच्या प्रेमाची, त्याच्या परिवाराची राख रांगोळी केलेल्या शत्रूच्या मागावर!
एक कोवळा उत्साही, उमदा, रुबाबदार ध्येयवेडा तरुण होता तो जेंव्हा या तुरुंगात डांबला तेंव्हा!नवरदेवाच्या वेशातील सजलेला एडमंड डान्टे येताना या जेलमध्ये आला होता.. पण आता तो समुद्र पोहून जाताना मात्र एक मतलबी,धूर्त आणि क्रूर काळजाचा "बदले की आग" घेऊन जगणारा महाभयंकर ज्वालामुखी होऊन जात होता! छातीपर्यंत वाढलेली दाढी!राकट चेहरा! १९ व्या वर्षी आलेला तो उमदा तरुण आज ३३ वर्षांचा जेलमधून पळून आलेला कैदी होता.
पण तो बाहेर कसा आला?
त्याला इतकी प्रचंड संपत्ती कशी मिळते?
तो आपल्या शत्रूंचा पाठलाग कसा करतो?
जेलमधील तो वेडा जो त्याचा जिवलग मित्र, गुरू आणि मानलेला पिता होतो...त्याने याला वारस का केलं?
तो सूड कसा घेतो?
ते बेट ज्यावरून या कादंबरीचे नाव पडले ते काय आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच ही फ्रेंच कादंबरी वाचूनच मिळवावेत! त्याच्यातच खरी मजा आहे.
मला खात्री आहे, ही कादंबरी कधीही पुस्तक न वाचणाऱ्या वाचकाला ही खिळवून ठेवते.मी तर परिचय लिहिण्यासाठी वाचायला सुरू केलेली कादंबरी पहाटे संपवूनच झोपी गेलो....अथांग समुद्रातील जहाजातून प्रवास करत...ज्याचा कॅप्टन एडमंड डान्टे होता!
या कादंबरीचा लेखक अलेक्झान्द्र द्द्युमास अतिशय लोकप्रिय! स्वतःच्या लिखाणातून अमाफ संपत्ती कमावून एखाद्या राजवाड्याला शोभेल अशा महालात राहायचा.कमालीचे शौक आणि उधळपट्टी! शेवटी कर्जबाजारी होऊन कफ्ल्लक जीवन जगावे लागले.... देशोधडीला लागला देश सोडून पळून गेला.सुंभ जळाले होते पण पिळ जात नव्हता.स्वतःच्या लिखाणावर प्रंचंड विश्वास असलेला अलेक्झान्द्र द्द्युमास सांगत असे,"आलेल्या यमाला ही एक सुंदर भन्नाट कथा सांगेन! ती ऐकून तो मला सोडून तसाच निघून जाईल!"
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know