WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Friday, January 14, 2022

पुस्तक:"जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं

पुस्तक:"जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं :ज्ञान , व्यापार आणि युद्धशास्त्र यांच्यामुळे संपन्न झालेल्या मध्ययुगीन आशियाचे दर्शन तत्कालीन फिरस्त्यांच्या नजरेतून "

लेखक : डॉ. स्टुअर्ट गॉर्डन

अनु. र. कृ. कुलकर्णी

किंमत - रु 299

सवलत:१५% सूट!

सवलत मूल्य:२५४/

 टपाल:३६/ एकूण:२९०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून संपर्क नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

फोन पे, गुगल पे, Paytm:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

इ. स. ५०० ते १५०० या कालखंडात आशिया हा विस्मयजनक, एकसंध आणि नवनव्या शोधांनी गजबजलेला प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठी पाच शहरे आशियात होती आणि ती शहरे पाच मोठ्या साम्राज्यांच्या केंद्रस्थानी होती. याच आशियातील गणितींनी शून्य आणि बीजगणित यांचा शोध लावला. येथील खगोलशास्त्रज्ञांनी ग्रह-तार्‍यांचा अधिक अचूक वेध घेताना नौकानयनासाठी उपयुक्त वेधयंत्राचा ( Astrolabe ) शोध लावला. याच काळात आशियातील साहित्यनिर्मितीही नवनिर्मितीच्या अत्युच्च शिखरावर होती. आज घडीलादेखील आपला प्रभाव कायम असलेल्या विचारधारांचा उगम याच काळात झाला आणि तत्त्ववेत्त्यांनी प्रभावी कायद्यांची रचनादेखील याच काळात केली.

या कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या स्मृतिग्रंथांवर या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्या निर्भीड आणि साहसी माणसांनी समुद्र-सफरी केल्या, वाळवंटे तुडवली आणि सर्वोच्च पर्वतांची शिखरे सर केली. दक्षिण रशियातील बुल्गर ते आग्नेय आशियातील बुगी अशा वैविध्यपूर्ण जमातींमधील लोकांबरोबर, आपल्याला अवगत नसलेल्या भाषांमधून व्यवहार करण्याची किमया आशियातील या लोकांनी साध्य केली होती.

यांचे स्मृतिग्रंथ वाचताना आपल्यालाही त्यांच्या तांड्यांबरोबर आणि जहाजांबरोबर प्रवास केल्याचा अनुभव येतो; त्यांनी सहन केलेली रक्त गोठवणारी थंडी आणि त्यांचा थकवा यांचा जणू आपल्यालाही प्रत्यय येतो; त्यांच्या आशाआकांक्षांचे आणि मनातील भीतीचे आपण साक्षीदार होतो आणि या मध्ययुगीन महान आशियाई जगताच्या श्रीमंतीने आणि आश्चर्यकारक प्रगतीने आपण थक्क होऊन जातो.

याच लेखकाचे द मराठाज (१६०० ते १८१८) हे ही पुस्तक उपलब्ध आहे. मूल्य:२९५/

दोन्ही पुस्तकं एकत्रित खरेदी (२९९+२९५+५६ टपाल=६५०)केल्यास:सवलत मूल्य:५३०/ मध्ये होम डिलिव्हरी होईल!




No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know