WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Friday, January 14, 2022

पुस्तक क्रमांक :१ "तंट्या

"तुम्हाला माहिती आहे का?"

"कोणतेही रेल्वे स्टेशन नसताना पातालपाणी जंगलात प्रत्येक रेल्वे क्षणभर का थांबते?"

 "रेल्वे नाही थांबली तर ती पुढे जाऊन अपघातग्रस्त होते असे का म्हणले जाते?"

"मोटरमन (रेल्वे ड्रायव्हर) आपली रेल्वे क्षणभर थांबवून, हॉर्न वाजवून कोणाला मानवंदना  देतो?"

"कोण होता हा भारताचा रॉबिन हुड? गोर गरीब आदिवासी,शेतकरी, जनतेचा मामा?"

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुस्तक माला"

पुस्तक क्रमांक :१  "तंट्या"

तो दरोडेखोर! 
तो डाकू! तो खुनी! तो लुटेरा! मालगुजरपाटील आणि सावकारांचा कर्दनकाळ!त्याचे नुसते नाव ऐकताच  हातापायाला कंप सुटायचा! त्याला समोर पाहून सावकारांची धोतरं ओली व्हायची! घरात आहे नाही ते समोर आणून दिलं जायचे! त्याचा दराराच तसा होता! त्याला पकडायला गेलेल्या कित्येक पोलिसांना स्वतःची कपडे ठेऊन, नाक मुठीत धरून पळ काढावा लागे! असा तो दरोडेखोर होता तरी कोण? 

"तंट्या"

लेखक: बाबा भांड

पृष्ठ:५२५  मूल्य:५००/ सवलत मूल्य:४५०/ टपाल:३५/
एकूण:४८५/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.

मो:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

वरील क्रमांकावर फोन पे, गुगल पे,Paytm ची व्यवस्था आहे.बँक खात्याचे डिटेल्स व्हॉट्सअपवर मिळतील.

कॅश ऑन डिलिव्हरी ची व्यवस्था नाही.क्षमस्व!

पोलिसांचा खबऱ्या बनून जंगलात घेऊन जाऊन त्यांचे शस्त्र आणि कपडे काढून घेणारा तंट्या!

एका फौजदाराचे त्याच्याच घरात जाऊन नाक कापणारा तंट्या!

स्वतःच्या साथीदाराने महिलेला हात लावला म्हणून त्याचा हात तोडणारा तंट्या!

गोर गरीब लोकांच्या मुलींचे लग्न लावून देणारा तंट्या!

दरोडेखोर तंट्या!भारताचा रॉबिन हुड तंट्या!

चार डिसेंबर त्याचा स्मृती दिवस! याच दिवशी तंट्या भील यांना फाशी देऊन त्यांचे पार्थिव पातालपाणी च्या जंगलात फेकून दिलं होतं.तिथेच त्यांचे स्मृती मंदिर आहे.येथेच क्षणभर रेल्वे थांबते आणि हॉर्न वाजवून मानवंदना देऊन पुढं जाते.....

मध्यप्रदेश सरकार ने नुकतेच पातलपणी रेल्वे स्टेशन चे, इंदौर चे नवीन भव्य बस स्थानक याचे नाव तंट्या भिल रेल्वे स्टेशन केलं आहे. शिवराज सिंह चौहान यांना ही मामा म्हणतात...आणि तंट्या भील यांना ही!

नीमाड चे जंगल! होळकर साम्राज्य आणि ब्रिटिश हुकमत याच्या मध्यावर!दुष्काळ आणि दारिद्र्याचे थैमान! सावकार आणि सरकार केवळ लुटण्यासाठी! माणूस म्हणून जगायचं पण काम आणि अन्न मात्र गुरा ढोरा सारखं!

उंबराच्या हिरव्या  दोड्या शिजवून खायच्या! पण मिठासाठी सावकाराकडे कष्ट करायचे!एका आण्याचे मीठ घेऊन कर्ज बाजारी व्हायचं....जंगलातील प्राणी, कंद आणि फळ यावर गुजराण करीत येथील गरीब आदिवासी जीवन जगत होती.प्रसंगी पोटातील आग पाण्याने विझवत होती भुकने व्याकुळ होऊन चक्कर येऊन पडत होती.

सावकार आणि सरकार यांचे अत्याचार सहन करत ही जनता भक्कमपणे उभी होती.प्रसंगी हातचलाखी आणि दरोडे ही टाकत पडत असत....पोलीस आणि जेल त्यांना नवीन नव्हतं. लाचारी तर जीवनाचा भाग होता.अडल नडल तर सावकाराच्या हातापाया पडून मिळवलं जायचं आणि कायमचं कर्जबाजारी होऊन बसायचं.

पण इंग्रज सरकारनं मात्र कहर केला.ज्या जंगलाच्या जीवावर हे सगळं सहन होत होतं, ते जंगल साफ केलं जाऊ लागलं.शेकडो एकर जंगल तोड होऊ लागली.जंगलातील लकाड सरकारी झाली.कोणी तोडायची नाहीत....जंगलाचा राजा आता भिकारी झाला.जंगलाचं लेकरू अनाथ झालं.जंगलाच्या कायद्यानं आदिवासी अनाथ झाले...इंग्रजांचे सहकार्य मालदार आणि सावकारांना मिळत गेलं आणि सावकार जनतेला पिडत गेले....त्यातून एक ज्वालामुखी उठला! इंग्रज आणि सावकारांना हैराण करून सोडणारा एक जन नायक तयार झाला त्याचेच नाव तंट्या!

तंट्या चे मुळ नाव तात्या! तात्या हा अतिशय साधा आणि सरळ! मोकळ्या मनाचा! 

एक सामान्य भील परिवारातील तरुण तात्या नावाचा तरुण! किरकोळ शरीर! पाच फूट काही इंच उंची! आदिवासी दिसतात तसे उंच कपाळ आणि बसके नाक!

आई वडील गमावलेल्या तंट्या वर गावकऱ्यांनी पाटलाच्या पोरीसोबत यशोदा सोबत तंट्या चे सबंध जोडले.तंट्या ला बदनाम केलं.गावाबाहेर त्याला पळून जावे लागले.आज इथं तर उद्या तिथं असे त्याचे जीवन होरपळून निघत होत. बायको भिकी आणि पोरगं किसन तंट्या सह भरडून निघत होते.कोणताही दोष नसताना तंट्या सहन करत होता.

गाव देवीला सोडलेल्या रेड्याने गावभर उभा धिंगाणा घातला असताना त्या रेड्याला चित्त लोळवला तो तंट्या ने! येथूनच त्याच्यातील शक्ती समजली.भिल्लाना त्याचा अभिमान वाटू लागला तर सावकार ला हेवा!

कर्जापायी अपमानित होऊन जीवन जगणारा बाप! सावकाराने मारल्याचा राग घरी बायकोवर अर्थात तांत्याच्या आईवर काढतो...त्यातच तिचा देह निष्प्राण होऊन जातो.काही दिवसांनी अपराधी मनाने खंगुन बाप ही मरतो! तंट्या अनाथ! केवळ कर्जामुळे! आपली पिढीजात जमीन मागायला दुसऱ्या गावी जातो तर तेथील पाटील दोन वेळा गोडी गुलाबी करून फसवतो आणि जेलमध्ये टाकतो.तीन वेळा जेलमध्ये गेलेला तंट्या पोलिसांच्या हुशारीने नाही तर फसवणुकीने पकडला गेला.तिसऱ्या वेळी मात्र तो जेल फोडून आव्हान देऊन निघुन येतो.

जेलमध्ये अनेक साथीदार जमवतो.काही शिकलेले स्वातंत्र्याची आस असणारे ही भेटतात.त्यातील एक त्याचा गुरू!दौल्या सारखे महकाय साथीदार त्याचे बळ वाढवतात! 

होळकर साम्राज्य तंट्या ला अप्रत्यक्ष मदत करते.इंग्रज कायम होळकर दरबारात तक्रार करत असतात.होळकरांची सहानुभूती असल्याने तंट्या आणि साथीदार कायम होळकर सरहद्दी मध्ये राहू लागतात.

मुजोरी करणारे सेठ सावकार लुटायचे! त्यांना ठोकून काढायचे! त्यांच्यावर खंडणी बसवायची आणि ती संपत्ती गोर गरीब लोकांच्या कामाला लावायची!हा तंट्या कामधंदा झाला.अनेक वर्षे इंग्रज पोलीस मागावर असताना, तंट्या त्यांना झुलवत होता.खेळवत होता.

निमाड ची जनता आता उघडपणे तंट्या ला मदत करत होती.तंट्या बाजारात राजरोसपणे फिरत होता.पोलिसांना बातम्या उशिरा कळत होत्या तर तंट्या ला पोलिसांची तत्काळ माहिती मिळत होती.

या कादंबरीतील एकेक प्रसंग अतिशय सुंदर रित्या मांडला आहे.

तंट्या एकाच वेळी अनेक ठिकाणी दरोडा घालत असे.त्यामुळे तंट्या चे अनेक अवतार आहेत असा ही समज लोकांमध्ये पसरलेला होता.

एका साधूच्या दर्शनाला गेला असता त्याला साधूच्या शरीराचे तुकडे तुकडे दिसले होते.त्याला प्रचंड धक्का बसतो.धक्यातुन आणि गुहेतून बाहेर येताच त्याला तो साधू दर्शन देतो.तू काही पहिलाच नाहीस असे सांगतो त्याला. असे अद्भुत वर्णन सोडलं तर लेखकाने या कादंबरीत दंतकथा येऊ दिल्या नाहीत....

लेखकाने दोन वर्षे त्या भागात वास्तव्य करून, फिरून लोकांना भेटून अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे.अतिशय प्रभावी! सुंदर! एकेक वर्णन अंगावर शहारे आणणारे!

लेखकाची निरीक्षण क्षमता प्रचंड! आदिवासी आणि जंगली जीवनाचे हुबेहूब दर्शन या कादंबरीत घडते.कमरेच्या लाल करदोड्याचा काळपट पाडलेला रंग जेंव्हा लेखक लिहितो तेंव्हा कळतं की किती सूक्ष्म निरीक्षण!

बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांच्या वापरामुळे ही कादंबरी अतिशय सुंदर झाली आहे.आपण खंडवा परिसरात आहोत असे वाचकांना वाटायला लागते.आपण जंगलात आहोत असे वाटायला लागते.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या जन नायकाला शेवटी विश्वासघात नडतो.मानलेल्या बहिणीच्या नवऱ्याने दगा दिला. राखी बांधून घ्यायला गेलेल्या तंट्या ला पोलीस पकडतात....पुढे फासी!

भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो नायक पुढे आले होते
त्यांनी स्वतःचे बलिदान दिलं आहे...त्यांची ओळख आपल्याला असायला हवी याच अपेक्षेने हा पुस्तक परिचय!

आपण ही कादंबरी वाचावी! ही पोस्ट किमान पूर्ण वाचावी. पुढे पाठवावी!

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know