Saturday, December 4, 2021

बटाट्याची चाळ

#परिचय ४२

बटाट्याची चाळ
पु.ल देशपांडे 

कित्येक दिवस वाचायचे राहतच होते. किती वेळा ठरवलं या महिन्यात हेच पुस्तक घ्यायचे पण परत या ना त्या करणांने राहूनच गेले . शेवटी माझ्या काकांकडे मला पुस्तक दिसले आणि घेऊनच आले. झालं वाचून.इतके दिवस वाट पाहिल्याचे साध्य झाले.आता यावरील कथानक ऐकायचे म्हणजे पर्वणीच. 

बटाट्याची चाळ आणि त्याची संस्कृती व्यापक - चौक, नळ, दार, झाडांच्या कुंड्या, वाळत घातलेले पापड, कपडे, संगीत, नृत्य, साहित्य, कला, राजकारण , समाजकारण, इ. सगळे इथे. सांस्कृतिक चळवळ, भ्रमणमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह झालीच पाहिजे आदी १२ प्रकरणांचा समावेश आहे. आणि असंख्य  व्यक्तिचित्रण.

पुलंचे संवाद म्हणजे एक लय , प्रत्येक पात्र स्वतः च बोलतो अस वाटत. बटाट्याच्या चाळी मधील प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक घर, व्यक्ती आपल्याच आहेत वाटतात.
संगीत, कला, इतिहास संशोधन, राजकारण , बिनकामाचे लोक सगळेच या चाळीत.

संस्कृती शिष्टमंडळातीळ प्रत्येक व्यक्तीचे वर्णन आणि त्यांचे कौशल्य एकाच वेळी हास्य विनोदी आणि मार्मिक टीका वाचताना आनंद देतात आणि विचार ही करायला लावतात. 

काही अप्रतिम वाक्य..
"आचार्य बर्वे यांना २४ भाषा येतात आणि ते २४ भाषेत मौन देखील पाळतात ,याने भाषेचे सामर्थ्य २४ पट वाढते असे त्यांचे मत."
"हे सौजन्य मंत्री आप्पाराव पळशीकर ..यांच्या प्रत्येक हालचालीत सौजन्य होते."
" माझ्या पहिल्याच साहित्यिक सलामीनेच मी महाराष्ट्रातील जनमताचा ठाव घेतला की पहिल्या आठवड्यातच मुंबईच्या एकही बुकडेपोवर पुस्तक मिळेनासे झाले." 

एक जिन्या च्या मालकीसाठी अख्या चाळीमध्ये झालेली वादावादी, उपोषण , शिष्टमंडळ यातून अप्रत्यक्षपणे राजकीय , सामाजिक , कौटुंबिक घटनांवर भाष्य करत प्रत्येक कथा अजून पुढे वाचण्यास भाग पडते.
काही वाक्य तर आपल्या दररोजच्या बोलण्यात तोंडवळणीचं पडून जातात ..हेच तर कौशल्य लेखकाचे.
आणि पु. ल ना तर काही तोडच नाही यात.
सध्या नामशेष होत जाणारी चाळ व्यवस्था आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर नेत आहे.
काही अडले- घडले, अडीअडचणी ला कायम शेजार धावून यायचा. बटाट्याच्या चाळीत लपून काहीच राहत नाही. स्वस्ताई गेली महागाई आली, अनेक रंगरंगोटी झाली पण चाळ अजून उभी आहे कारण तिला माणसांची माया आहे.

चाळीची आठवण पु.ल नी सुंदर अक्षरीत केली आहे. 

@दिपाली जोशी

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know