Saturday, December 4, 2021

राऊ

#परिचय ४३

राऊ

ना. सं. इनामदार 

"राऊ" एक ऐतिहासिक कादंबरी.थोरले बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व निर्विवाद , अनेक लढाया झाल्या जिंकल्या, मारताब केले, छत्रपतींचे नाव जपले, घरदार मोठे केले, सुभेदार उभे केले. 

मातोश्री साहेब, काशीबाई साहेब,  आप्पाराव , नानासाहेब प्रत्येक पात्र येथे जिवंत होते , पुढे काय हे वाचण्याची ओढ प्रत्येक पानावर वाढतच जाते. 
"राऊ" बाजीरावांचे लाडाचे नाव फक्त त्यांचे मातोश्री घेत आणि नंतर मस्तानी.. 

भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी पुण्यातील वाड्यात काय चालू , काय करायचे आहे या सगळ्याकडे पेशवेसाहेबांचे लक्ष असायचे.८-९ महिने मोहिमा चालायच्या पाय घरी कधी टिकायचेच नाहीत. यात त्यांनी होळकर, शिंदे असे अनेक मातब्बर सुभेदार तयार केले आणि जपले ही. 

बाजीरावांचे एक वाक्य खरेच खूप विचार करायला लावते एकवेळ निजमासोबतचे युद्ध सोपे पण आपल्यातीलच फितूर झालेल्या लोकांसोबत लढणे मुश्किल. 

दाभाड्यांची मोहीम आवरून तब्बल ७ महिन्यानंतर पेशवेसाहेब पुण्याला आले आणि त्यांचं स्वतः च्या मुलाला पाहून त्यांचे उद्गार होते ," नाना क्षणभर आम्ही तुम्हाला ओळखलेच नाही! एकदम मोठे झालात." किती कष्टाचे दिवस , लांबलांबचे पल्ले, लढाया आणि तरीही कुटुंब संभाळत सत्ता सांभाळणे. खरेच अंगावर शहारे येतात. 

प्रत्येक स्वराज्यासाठी लढणाऱ्याची कहाणी.
हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यापासून खुद्द दिल्लीमध्ये जाऊन बादशहा च्या नाकासमोर त्याचे मनसबदार कापून काढण्याचे पेशव्यांचे कर्तृत्व. छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी अचाट कामाने थक्क करून सोडले. 

चिमजीआप्पा श्रीमंतांचे धाकटे बंधू .कायम लक्ष्मणसारखे त्यांच्या सोबत राहिले. श्रीमंतना नेहमी ते आपलय पितृस्थानी मानत. 

हे इतके सगळे सुरू असतानाच श्रीमंत आणि मस्तानी यांच्या कथेची सुरवात. वाढलेली जवळीक ,नाते सर्वांनाच टोचणारे , सगळीकडून इतके दिवस होत असलेले कौतुक थांबले फक्त सुरू झाली ती अहवेलना.
मग त्यांचे स्वतः चे कुटुंब दूर झाले आणि बाजीराव - मस्तानी यांना एकमेकांनपासून दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

हे नातं जुळलं पण श्रीमंतांनी नात जुळ्यावर कधी वाऱ्यावर नाही सोडलं. आपल्या जवळच्या व्यक्तीची त्यांनी संपूर्ण काळजी घेलती , स्वतः चे मी पण , पेशवेपण पणाला लावून ते संपुर्ण समाजाशी लढले.पण निर्माण झालेली दरी भरून येईनाच ....कधीकाळी लढती तलवार असलेले श्रीमंत आजारी पडू लागले आणि यातच तब्बेत पूर्ण ढासळली....  श्रीमंतांच्या शेवटच्या वेळेस कशीबाईसाहेब त्यांच्या सोबत होत्या..
आणि नर्मदेकाठी रावेरीला श्रीमंतांनी डोळे मिटले.एक तुफान शांत झाले. 

ही कादंबरी आहे तरी प्रत्येकाचे अवांतर वाचन आणि माहिती यात मतमतांतरे नक्की असतील . तरी लेखकांनी त्यांचे संदर्भ , संशोधन येथे दिले आहे. " राऊ " ही खरच मला आवडलेली एक अप्रतिम कथा आहे. 

प्रस्तावनेत लेखकांनी लिहिलेल्या दोन ओळी... 

" खत तो भेजा है पर अब खौफ यही है दिल में |
मैने क्या उसको लिखा और ओ क्या समझेगा ||"

@दिपाली

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know