डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
६ डिसेंबर २०२१
6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच न्याय मिळवून देणारे, जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध लढणारे, दलित समाजातील प्रत्येकाला मानाने जगण्याची शिकवण देणारे व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. म्हणूनच, महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्यावर रोख लावण्यात आली आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे अभेद्य कवच दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले
जय भीम!
विश्वाला आणि विशेष करून भारतातील धर्माच्या दलालांना माणुसकी शिकविणारे मानवतेचे शिल्पकार परमपूज्य,विश्व वंदनीय, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी त्रिवार नमन
VIRTUAL LIBRARY
VIDYA PRATISHTHAN’S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR PUNE-413106
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know