Thursday, November 18, 2021

*पुस्तकाचे नाव : स्वप्नमेणा

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य*

*पुस्तक क्रमांक : 51.

*पुस्तकाचे नाव : स्वप्नमेणा.

*वाङमय प्रकार : काव्यसंग्रह(गझलसंग्रह).

*कवीचे नाव : प्रदीप निफाडकर.

*प्रकाशन संस्था : राजा प्रकाशन.

*पृष्ठसंख्या :  54.

*स्वागतमूल्य : 70 रुपये.

पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.
 
      मराठी  गझलकार म्हणून ज्यांचा लौकिक मराठी साहित्य जगतात झालेला आहे असे 'प्रदीप निफाडकर' यांच्या 'स्वप्नमेणा' हा काव्यसंग्रह गझलसंग्रह  वाचला . कवी म्हणतात की या कथासंग्रहाला प्रस्तावना नाही कारण कोण काय म्हणते यापेक्षा वाचक रसिक काय म्हणतात हे ऐकणे मला पसंत पडते असा त्यांचा विचार आहे . वाचणार्या सर्वांनाच ,त्याचप्रमाणे मोठ्या साहित्यिकांना त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे . 

     या पुस्तकामध्ये सुरवातीलाच सुरेश भट या थोर गझल सम्राट सम्राटांचे , शिवाजी सावंत या महान साहित्यिकाचे पत्र जे आशीर्वादपर पत्र आहेत  या पत्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे.  

    एकूण 54 गझल यामध्ये अंतर्भूत आहेत. प्रत्येक गझल हे वाचनीय ,श्रवणीय आणि सुंदर असे आहे.

       'स्वप्नमेणा ' ही पहिलीच गझल कवींनी अतिशय अलंकारिक पध्दतीने लिहिलेली आहे . 'मंजूघोषा' या वृत्तामध्ये लिहिलेली ही गझल वाचनीय आहे.  

    हे तुझे आले फुलांचे शहर बाई स्वप्नमेण्यातून खाली उतर बाई

 दृष्ट घे काढून डोळ्यांनीच माझ्या चांगली नाही जगाची नजर बाई  

   कवीची उच्चकोटीची कल्पकता, भावोत्कटता या गझलमधून निदर्शनास येते.  स्वत: च्या डोळ्यांनी दृष्ट काढून घे असा सल्ला कवी येथे देतो . 

    आता माझ्या आश्रयाला कुणी नाही आणि  आश्रय घ्यावा असेही कुणी नाही असा विचार तडा या गझलेमध्ये कवी देतात.  

    कुठे सोडून जाऊ पिंजऱ्याला? नभी जागाच नाही आसऱ्याला!

 दिलासा का दिला या वादळाने? कळेना काय झाले भोवऱ्याला ! 

    काय झाले हे कळेनासे झाले आहे आणि म्हणूनच नवी जागा नाही आश्रय घेण्यासाठी असा उत्तुंग कोटींचं विचार कवी येथे मांडतात . 

    सर्जनशीलतेचा एक उत्तम नमुना म्हणून पुन्हा या गझलेमधे कवी अतिशय छान रीतीने संत महात्म्यांना उद्देशून त्याचप्रमाणे संत   महानपण या गझलेतून कवी व्यक्त करतात.  

    पालखी आणू नका दारात माझ्या
 संत सारे नांदती देहात माझ्या

 नामदेवाने पुन्हा शतकोटींसाठी प्राण आता ओतला शब्दांत माझ्या 

सावता आणून देतो रोज भाजी जेवतो  संसार हा ताटात माझ्या  

    सावतामाळी त्याचप्रमाणे विविध संत यांचा उल्लेख या गझलेमध्ये कवीने करून संतांचे
 महानपण स्पष्ट केलेले आहे.

  मरण्यापेक्षा जगण्याचे मला अधिक भय वाटत आहे असा विचार कवी भय गझलीतून व्यक्त करतात.

     तू माझा स्वर तू माझी लय 
तू माझ्या गीतांचा आशय 

कसली कळ काळजात उठली!
 ही कोणाची तीच जुनी सय

ये मरणा ये रे ये मरणा
 मज वाटे या जगण्याचे भय !

 

    पादाकुलक या वृत्तामध्ये या कवीने गजलबद्ध केले आहे . जगण्याने एवढे छळले की आता जगण्याचे भय वाटत आहे आणि मरणाचे आता भय वाटत नाही, भीती वाटत नाही असा विचार कवी या गझलेत व्यक्त करतात. 

    'किरणे' ही गझल वाचताना खूप आनंद वाटतो  ही जिंदगी नेमकी कशी आहे आणि कशा प्रकारची कल्पना आपण केली होती, नेमके घडले काय हा विचार येथे कवी व्यक्त करतात.  

     सजवून ठेवलेली मी काल जिंदगी ही
 आज पाहतो मी कंगाल जिंदगी ही
 इतकाच सांत्वनाचं तेव्हा निरोप होता 
माझ्या विनाच आता घडवाल जिंदगी ही 

    मी विचार केला होता की जिंदगी मी सजवली आहे मात्र खऱ्या अर्थानं ही जिंदगी मला कंगाल करून सोडते या आशयाचे मत  येथे कवी व्यक्त करतात.  

    'करार' या गझलेमध्ये कवी म्हणतात की मी नको तो प्रकार केला आणि या जगाचा मी माझ्यापेक्षा अधिक विचार केला.  

    जो नको तो प्रकार मी केला 
या जगाचा विचार मी केला

 वेदनादायी अजून थोडीशी 
शब्द माझा तयार मी केला 

मी स्मितानेचं मारले अश्रू
 हुंदका हद्दपार मी केला

पाहिले एकदाच स्वप्न तुझे   
एक सौदा उधार मी केला  

    मी तुझे स्वप्ना एकदाच पाहिले आणि हा जो सौदा होता तो मी उधार केला.  

   माझ्या हातावर माझा विश्वास आहे आणि मी जगाची भलाई पाहतो आहे. जगाची भलाई मी मनामध्ये ठरवतो आहे .

    ही पुन्हा झाली सुरू माझी लढाई 
घाव घालण्यास आले जातभाई

आहे माझ्या हातावर माझा भरोसा 
मी जगाची पाहिली आहे  भलाई  

   माझ्या मनामध्ये जगाबद्दल चांगलाच विचार आहे आणि हा चांगलाच विचार मी शेवटपर्यंत मनामध्ये असू देणार आहे .

    पेच या गझलेमधे अनपेक्षित असा पेच निर्माण झाला असं कवी वर्णन करतात . 

   शेवटी जे नको तेच झाले 
गीतं माझे तुझी ठेच झाले 

हासणेही तुझे व्यर्थ होते 
बोलणे हे रिकामेच झाले 

काय माझे भले बुरेही 
 व्हायचे ते तुझ्यानेच झाले 

मी इथे ,तू तिथे ,दूर स्वप्ने 
जीवनाचे किती पेच झाले?

   आपले जीवन हे पेचमय आहे असा एक अनोखा विचार कवी या गझलेतून मांडतात . 

   माझ्या जीवनामध्ये दु :खाचा अंधार होता आणि मग हा जा अंधार जाळून टाकण्यासाठी मी स्वत: ला जाळून घेतले आणि स्वत: च्या जळण्याची मशाल बनवली हा एक मनाला हेलावून टाकणारा विचार  'मशाल 'या गझलेतून मांडतात . 

    अर्थात सारे जरी मागचे टाळले बोलता बोलता देह गंधाळले 

 अंधार मी घेतला सोबती अन् मशालीपरी मी मला जाळले ! 

   म्हणजेच माझ्या जीवनातला अंधार मिटविण्यासाठी मी स्वत: ला जाळून घेतले व मशाल बनविले .

    अशाच रीतीने विविध सुंदर गझली या गझलसंग्रहामध्ये आहेत  

   *स्वप्न
* ओलावा 
*खुलेआम 
*कवाळे 
*श्रावण
* जर ऐकायचे होते
*  उजाळा 
*तो तिथे इथे मी 
*रंग
* गुंता 
*नेहमी घडते असे
* पूर 
*शुभेच्छा  
*कारखाना
* मुक्ती 
*लिहीत गेलो 
*केव्हा 
*मोताद 
*ललाट 
*आरसा 
*सामसूम
* ठेव 
*शोधात
* देवाला 
*धरसोड 
*संपदा 
*शेवटी 
*आरती
* फुले  
*स्वागत 
* कुठे 
*कवी 
*भूपाळी 
*स्वदेशी 
*ओळी 
*तुझ्याविना  

   कवींनी मराठीमध्ये गझल हा प्रकार रुजवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे .त्यांच्या सर्वच गझला या गाजलेल्या गझला आहेत .म्हणून त्यांचा हा गझलसंग्रह आपल्या  आपल्या पुस्तकांच्या संग्रही असावा असा एक सुंदर गझलसंग्रह म्हणजेच स्वप्नमेणा होय.  

   या महान गझलकारास मानाचा मुजरा!!
   
खूप खूप धन्यवाद....( श्री. मनोज  अग्रवाल औरंगाबाद)

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know