Thursday, November 18, 2021

पुस्तकाचे नाव : पु. ल.आणि मी.

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य*

  *पुस्तक क्रमांक : 52.

*पुस्तकाचे नाव  : पु. ल.आणि मी.

*लेखक : ना. धो. महानोर.

*पृष्ठसंख्या : 95.

*स्वागतमूल्य : 100 ₹.

*प्रकाशन संस्था : समकालीन प्रकाशन.

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

    या पुस्तकामध्ये रानकवी महानोर यांनी पु.ल
देशपांडे यांच्यासोबत व्यतीत केलेले क्षण वर्णन केलेले आहे .रानकवी ना .धों .महानोर हे पू .ल. देशपांडे यांचे लाडके कवी होते असा विचार या पुस्तकातून व्यक्त झालेला आहे .
ना धों महानोर यांच्या गावी पळसखेड या गावी पु ल देशपांडे यांची झालेली भेट, त्या भेटीची क्षणचित्रे या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आलेली आहेत .पु लं देशपांडे यांनी ना धों महानोर यांना लिहिलेली अविस्मरणीय पत्रेदेखील या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत  .तसेच पु. ल. देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी लेखिका सुनीताबाई देशपांडे यांनी ना धों महानोर यांना पाठविलेली पत्रे त्यांच्यात घडलेला संवाद देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .पु .ल .देशपांडे पंचत्वात विलीन झाल्यानंतर अनेकांनी ना. धों महानोर यांना आग्रह केला की त्यांनी पूलं देशपांडे यांच्याबरोबर व्यतित केलेल्या  क्षणांना  लेखी स्वरूप द्यावं .पुलं आणि मी या पुस्तकाच्या माध्यमातून हे शक्य झालं .
     पु. ल.देशपांडे यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा जून महिना होता आणि ना.धों. महानोर हे पेरणीच्या कामाला लागलेले होते  .पेरणीचे काम सोडून ना. धों .महानोर पुण्याला गेले तेथे त्यांनी सुनीताबाई देशपांडे यांची भेट घेतली तेव्हा पुल यांचा शांत पडलेला देह बघून ना धों महानोर  यांना त्यांची खूप आठवण येत होती.  त्यांच्याबरोबर व्यतित केलेल्या प्रत्येक क्षण त्यांना आठवत होता. याचं वर्णन ना. धों. महानोर यांनी या पुस्तकात केलेलेआहे.  सुनीताबाई देशपांडे म्हणाल्या की पु ल देशपांडे हे भरभरून जगले त्यांना जे जे हवं होतं ,त्यांनी प्राप्त केले. त्यांना जे सूचत गेलं त्यांनी ते लिहिलं.  
    ना. धों. महानोर म्हणतात की कवितेचे धाग्यामुळे पुलं आणि मी जोडले गेलो .त्याचप्रमाणे सुनीताताई आणि मी जोडले गेलो  .जेव्हा ना धों महानोर यांचे पुस्तक प्रकाशित व्हायचे, तेव्हा ते पु ल देशपांडे यांना ते पुस्तक भेट म्हणून पाठवायचे आणि पुल देशपांडे पत्राच्या स्वरुपात त्यांना आशिर्वादपर शुभेच्छा द्यायचे .
    देशपांडे यांनी  पळसखेडा गावी दिलेली भेट, त्या भेटीदरम्यान घडलेली संवाद त्याचप्रमाणे त्या भेटीदरम्यान घडलेल्या सर्व आठवणींना येथे ना धों महानोर यांनी उजाळा दिला आहे .
    या दोन दिग्गज साहित्यिकांना विनम्र अभिवादन .उदयोन्मुख साहित्यिकांना प्रेरणादायी ठरावा असे हे पुस्तक आहे .
     पु ल देशपांडे यांच्या वागण्या बोलण्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गर्वचा लेश नव्हता असा विचार येथे ना धों महानोर मांडतात . पळसखेड  या गावात माझ्या घरी जेव्हा  आले तेव्हा त्यांनी खाली बसून जेवण केल. त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय अनौपचारिकपणे गप्पा मारल्या. शेतात त्यांनी भटकंती केली. शेत बघितले. शेत बघून ते खुप आनंदी झाले.
   मन: पूर्वक धन्यवाद.

( श्री मनोज अग्रवाल औरंगाबाद)

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know