Thursday, November 18, 2021

*पुस्तकाचे नाव : वेगळ्या वाटेने

**वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य**

*पुस्तक क्रमांक : 48.

*पुस्तकाचे नाव : वेगळ्या वाटेने.

*लेखिका : शकुंतला फडणीस.

*पृष्ठसंख्या : 80.

*स्वागतमूल्य : 100.

*प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन ,पुणे.

*आवृत्ती : प्रथमावृत्ती,26.01.2020.

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

##############################

    महाराष्ट्र राज्यातील गाजलेल्या व्यक्तींचे व्यक्तिचित्र त्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ची महत्त्वपूर्ण माहिती आणि वेगळ्या वाटेने जाऊन त्यांनी गाजवलेले कर्तृत्व  या बाबींचा ऊहापोह विस्तृतपणे शकुंतला फडणीस यांनी या पुस्तकात केलेला आहे.  

   पुण्यभूषण डॉ. सरदेसाई यांना सदरील पुस्तक लेखिकेने आदरपूर्वक समर्पित केले आहे . मनोगतामध्ये लेखिका स्वत: चे विचार मांडताना व्यक्त होतात .या पुस्तकातील व्यक्तींनी वेगळ्या वाटेने जाऊन स्वतःचं कर्तृत्व गाजवले.लौकिक प्राप्त केला. असंख्य अडचणींना तोंड देऊन त्यांनी  स्वत :च व्यक्तिमत्त्व घडविलं आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा व्यक्तिमत्त्वाचा न मिटणारा ठसा मागे ठेवून ते गेले.  

   गाजलेले चित्रकार शि. द. फडणीस यांच्याविषयी लेखिकेने एक पाठ लिहिलेला आहे . त्यांन एकच डोक्यात घेतलय हे या पाठाचे नाव आहे . सदरील पुस्तक हे सात पाठांमध्ये विभागण्यात आले आहे.  

१.त्यान एकच डोक्यात घेतलय  

   मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लहानपणीच शि द फडणीस यांनी स्वत: च्या चित्रकलेची चमक दाखवली आणि पुढे ते प्रसिध्द चित्रकार झाले . फडणीस यांनी विविध चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेतला . त्यांचे चित्र मनोहर मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले. हंस मासिकाच्या व्यंग स्पर्धेमध्ये त्यांनी सलग दोनवेळा बक्षीस प्राप्त केले. त्यामुळे  व्यंगचित्रांकडे वळाव असा त्यांना सल्ला देण्यात आला.  त्यांनी अतिशय छान कौशल्याने व्यंगचित्रे हाताळली . ज्याप्रमाणे कवी, लेखक, गीतकार यांना कॉपीराइट्स अधिकार असतो त्याप्रमाणे चित्रकारांनाही हा अधिकार असतो हे अतिशय ठासून शि द फडणीस यांनी सांगितले.  एकदा एक काम मनावर घेतले की शि द फडणीस ते पूर्णत्वास न्यायचे. हे चित्र काढायचं तर ते पूर्ण होईपर्यंत त्यात गुंतून राहायचे.  त्यामुळेच त्यांनी एक शे पंच्याण्णव पानांचं 'रेषाटन' हे आत्मचरित्र लिहून काढलं होतं आणि या पुस्तकाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला व लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला .

२.सख्खे शेजारी  

       या प्रकरणामध्ये लेखिकेने द. मा. मिरासदार हे त्यांचे शेजारी होते आणि अनेक वर्षे ते शेजारी होते हे अतिशय छान रीतीने रंगवले  आहे  . लेखिकेला जेव्हा कळालं की त्यांच्या बाजूला मिरासदार आडनावाची व्यक्ती राहायला येणार आहे तेव्हा त्यांना वाटलं की द .मा. मिरासदार यांचे कुणीतरी नातेवाईक असतील पण  जेव्हा कळालं की द .मा. मिरासदार  स्वतः तिथे राहायला येणार आहेत ,शेजारी म्हणून तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही . चित्रकार शि द फडणीस आणि द मा मिरासदार हे कथाकार ,लेखक, साहित्यिक दोन्ही दिग्गज एकमेकांच्या शेजारी अनेक वर्षे राहत होते . द मा मिरासदार यांच्या अठरा पुस्तकांना शि द फडणीस यांनी  मुखपृष्ठ दिले आहे .द मा मिरासदार आणि शि द फडणीस हे सुभाषनगर येथे राहत होते. सुभाषनगर हे नगर अनेक दिग्गजांचे वास्तव्याचे ठिकाण होतं . द मा मिरासदार या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत.  द मा मिरासदार यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सुभाषनगर येथे राहूनच त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.

३.पहिली महिला फौजदार  

    महाराष्ट्रातील पहिली महिला फौजदार होण्याचा मान श्रीमती कुसुम देव यांना प्राप्त झाला .  सकाळ वर्तमानपत्रामध्ये फौजदार पदासाठी जाहिरात आली होती आणि कुसुम देव यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तू प्रयत्न कर. 
       त्यावेळी प्रथम कुसुम आश्चर्यचकित झाल्या .मात्र त्यांनी फॉर्म भरला आणि त्या फौजदार च्या परीक्षेला बसल्यानंतर त्यांना फौजदाराच्या मुलाखतीला बोलावण्यात आलं .त्यांची निवड झाली  .पुढे त्यांनी अतिशय चोखपणे काम बजावल. महाराष्ट्रातील पहिल्या महिला फौजदार जेव्हा ड्युटीला जायच्या तेव्हा त्यांच्याकडे लोक कुतूहलाने बघायचे . पुण्याच्या बुधवार  पेठेतील कुंटणखान्यात अडकलेल्या अनेक मुलींना त्यांनी सोडवल आणि चांगले जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केलं . तेथे मिरगे नावाची एक वेश्या राहत होती.त्या वेश्येला त्यांनी चांगल्या रीतीने समुपदेशन केलं  मात्र त्या वेळेचा आणि कुसुम देव यांचं पटलं नाही .नंतर कुसुम देव यांची बदली करण्यात आली. काही वर्षांनंतर त्यांना ती वेश्या भेटली आणि त्यावेळेस तिने  वेश्या व्यवसाय सोडला होता आणि आकाशवाणीवर तिचा भजनाचा कार्यक्रम होणार होता .त्यावेळी कुसुमदेव यांना आश्चर्य वाटलं की एवढपरिवर्तन एका व्यक्तीच्या  आयुष्यात होऊ शकतं . कुसुम देव यांचा ड्युटी फस्ट
 नावाच पुस्तकदेखील उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले होते. त्यामध्ये त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचे वर्णन त्यांनी केलेले आहे.  

४.संशोधन क्षेत्रातील खणखणीत नाणे

       मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधी मुलगी ज्यांनी बीए पास केले. नंतर त्यांचं लग्न झालं आणि त्या म्हणजे डॉ शोभना गोखले .लग्न झाल्यानंतर पतीस विचारले की आता मी पुढे शिकू शकते का त्यांच्या पतींनी त्यांना होकार दिला आणि पुढे त्यांनी शिक्षण सुरू केले. त्यांनी खूप शिक्षण घेतले  यशस्वी लेखिका झाल्या. इतिहासकार झाल्या आणि अनेक संस्थांनी देशाविदेशातील संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले. सन्मान केला . विदेशातील विविध  विद्यापीठामध्ये त्यांनी व्याख्याने दिली.  इतिहासाच्या थोर संशोधक म्हणून त्या सन्मानित करण्यात आल्या . शिलालेखांचा चिकित्सक अभ्यास करणे यामध्ये त्या रममाण व्हायच्या. 'ललाटलेख 'हे आत्मचरित्र त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. प्रकाशित झालेले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या सर्व आठवणी अतिशय छान रीतीने मांडलेल्या आहेत.

५.रेषावतारी  

      या पाठांमध्ये लेखिकेने वसंत सरवटे या प्रयोगशील चित्रकार बद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली आहे.  पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच पुस्तकात नेमके काय लिहिलेले आहे हे वाचकाला समजले पाहिजे हा महत्त्वपूर्ण विचार मनाशी बाळगून त्यांनी आयुष्यभर चित्र काढले .  त्यामुळे त्यांचं वेगळेपण त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये दिसून आले.
आपले चित्र अधिकाधिक प्रभावी असले पाहिजे यासाठी ते अधिकाधिक झटायचे, खूप मेहनत घ्यायचे आणि अधिक प्रयत्नशील असायचे . खूप प्रसिद्धी प्राप्त झाल्यानंतर देखील ते नम्र हाेते .सरवटे हे डिझाइन इंजिनीअर होते.  सरवटे यांच्या जगण्याच्या सगळ्या अतिशय साधारण होत्या .त्यांचे खाण्या पिण्याच्या सवयी देखील अतिशय साधारण होत्या . चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

६.कलंदर कवी  
  
      थोर गझलसम्राट सुरेश भट यांच्याविषयी या पाठांमध्ये माहिती दिलेली आहे . एकदा एका मैफलीमध्ये गेलेले असताना सर्वांची भाषणं झाली . कंटाळवाणे वाटत होते. जेव्हा सुरेश भट यांच्या गजला ऐकायला सुरुवात झाली , तेव्हा सर्वजण थांबले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे सुरेश भट यांच्या गजलेला दाद दिली . मंगेशकर कुटुंबीयांशी सुरेश भट यांच्या खुप जवळचे संबंध होते . हृदयनाथ मंगेशकर हे त्यांचे मित्र होते लता मंगेशकर, आशा मंगेशकर ,आशा भोसले उषा भोसले यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते.  सुरेश भट हे कलंदर कवी होते असा उल्लेख लेखिका या पाठांमध्ये करतात.  त्यांच्या गझली लता मंगेशकर यांनी गायील्या. हे सुरेश भट यांचा महानपण होय . सुरेश भट यांना तंबाखू खाण्याची सवय होती  सुरेश भट यांचा अनोखेपण म्हणजेच त्यांच्या गजला होत.
त्यांच्या बहिणीची मैत्रीण पुष्पा मेहेंदळे यांच्याशी सुरेश भट यांचा विवाह झाला.

7.हसता हसता पन्नास वर्षे

       हरीशचंद्र लचके हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होत. त्यांचं पहिलं व्यंगचित्र जेव्हा वर्तमानपत्रात 
छापून आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. हसा आणि लठ्ठ व्हा, हसा आणि हसवा, गुदगुल्या ही त्यांची हस्यचित्रांची पुस्तके लोकप्रिय आहेत. ते आद्य व्यंगचित्रकार म्हणून लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लोकशक्ती मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्य केले आहे.

    रुळलेली चाकोरी सोडून वेगळ्या वाटेने प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींचा परिचय अतिशय सुरेख शैलीत लेखिकेने करून
दिला आहे.या सर्व व्यक्ती आपल्यासाठी प्रेरक आहेत.

   आपल्या पुस्तक संग्रहात असावे असे एक प्रेरणादायी पुस्तक म्हणजे 'वेगळ्या वाटेने'!!

   धन्यवाद !!.....श्री. मनोज अग्रवाल.(औरंगाबाद)

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know