Thursday, November 18, 2021

*पुस्तकाचे नाव : मराठी रुबाया स्वानुभव हाच सद्गुरू

**वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य**

*पुस्तक क्रमांक : 47.

*पुस्तकाचे नाव : मराठी रुबाया स्वानुभव हाच सद्गुरू

*लेखक : पंडित यशवन्त देव.

*पृष्ठसंख्या : 112.

*स्वागतमूल्य : 100₹.

*प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे.

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

      पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक रुबाया  रचलेले आहेत  .ज्याप्रमाणे संत कबीर यांनी दोहे रचले त्याप्रमाणे पंडित यशवंत देव यांनी रुबाया रचलेले आहेत.  संत कबीर म्हणतात की गुरुविना ज्ञान नाही  स्वत :चा अनुभव हाच आपला सद्गुरू असतो. हा महत्त्वपूर्ण विचार पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला आहे . 

    या पुस्तकाच्या सुरवातीला 'चिंतन' या सत्रामध्ये ,चिंतन या शीर्षकाखाली पंडित यशवंत देव असा विचार मांडतात की आपण जर पोहायचं ठरवल तर पुस्तक वाचून पोहता येत नाही प्रत्यक्ष पोहावच लागतं त्यामुळे स्वत :चा अनुभव हा खरा सद्गुरू ठरतो  स्वानुभव नावाच्या सद्गुरूला भेटायला झाला असा अशी हाक पंडित यशवंत देव वाचकांना करतात .धर्म कोणताही असो ध्यान जो करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान ज्याला प्राप्त होईल निश्चितच त्यांचं जीवन पूर्णत बदलून जाईल हा पवित्र विचार पंडित यशवंत  या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतात.  

      या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक, संपादक 'कुमार केतकर 'यांनी प्रस्तावना दिलेली आहे. कुमार केतकर म्हणतात कि मन हे नेमके कोठे असते? तर मन प्रश्नातच आहे .जोपर्यंत शरीर जिवंत आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला मन अप्रत्यक्षरीत्या जाणवतं. मात्र शरीर हे प्रत्यक्षरीत्या दिसतं आणि या मनाला स्थिर करण्यासाठी आपण ध्यान करणे गरजेचे आहे.  ओशोंच्या विचारांची महत्ता देखील कुमार केतकरांनी प्रस्तावाच्या माध्यमातून पटवून दिलेली आहे .

   पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकात दिलेले रुबाया हे चार चार ओळींचे आहेत आणि त्याचा अर्थ खाली अतिशय विस्तृतपणे स्पष्ट करून सांगितलेला आहे .
 
    एखादी वस्तू आपल्याला आवडते आपल्या मनात ते मिळावे अशी इच्छा उत्पन्न होते. पण वस्तू फार दूरवर असते. तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला दिसतो आपण पोहोचू शकू असं वाटतं . पण आपण चालायला सुरुवात करत नाही का असं होतं ?आपण भितो जी वस्तू आपल्याला आवडते आहे ती मिळाल्यावर आपल्याला सुख नाही झालं तर या ज्ञानाची भीती आपले पाय जखडून ठेवतात पाय आपले एका स्थानावर ठेवतात  हा विचार खालील रुबायांतून यशवंत देव देतात.

   आकाश मोकळे मला खुणावते आहे 
मज पंख उघडुनी उडून जायचे आहे ।
पिंजराही कधीचा आहे सताड उघडा 
मी कसा घाबरून पंकज मिळतो आहे  ।।

  आपल्याला पलीकडच्या तटाच्या आकर्षण असते ,आपण अलीकडच्या तटावर असतो आणि आपण अलीकडच्या तटावर स्थिरपणे हिंडत असतो हा सुंदर विचार त्यांनी पुढील रुबायांतून मांडलेला आहे . 

  मी पैलतिराचे स्वप्न मनामधी बघतो
 परी ऐलतिरावर घोटाळत मी असतो ।
मी संकल्पविण दुभंगलेला प्राणी 
कधी इथे, कधी तिथे, निरर्थ आदळतो ।। 

    आपल्यापैकी अनेकांची अशी अस्थिर अवस्था असते त्यामुळे आपण ठरवलेले ध्येय आपल्याला निश्चित वेळेत प्राप्त होत नाही. किंवा ते प्राप्त होत नाही, अस अनेकदा घडतं आणि म्हणून ध्येय प्राप्त करायचअसेल तर आपले भाव, विचार, वाणी आपण एकसंध ठेवलं पाहिजे . 

   पंडित यशवंत देव म्हणतात, संसारात खरं मोल कुठल्या गोष्टीला द्यायला हवं हे मला आता चांगल्या रीतीने कळालं आहे त्या महत्त्वपूर्ण गोष्टी हिचा प्रकाश हे मला आता दिसतो आहे, जाणवतो आहे  .मी विचार करत नाही काळ अनंत आहे ना मग झालं त्या महत्त्वपूर्ण मूल्यवान प्रकाशाचा किरण हातातून सुटत नाही ना ?तेव्हा मी पाहीन  हा विचार त्यांनी पुढील रुबायांतून मांडलेला आहे . 

    मज खूण मिळाली खातर झाली पक्की
 मी पिंजऱ्यातून सुटेन हे तर नक्की। 
लागोत कितीही दिवस मोजतो कोण 
दिस आनंतातले अनंत अजून बाकी।।  

   मला आश्चर्य वाटतं की अंधार किती घडत आहे माझ्या एका जन्माची ही कमाई नाही अनेक जन्मा मी त्याच त्याच गोष्टींच्या मोहात पडून निरर्थक पुढे धावलो गोष्टी निरर्थक आहेत हे कळत नाही  , पण निश्चितपणे वळत नाही .हे स्पष्ट करताना ते म्हणतात ,

मज वेढून आहे वेढा सगळीकडचा 
अंधार गडद हा  जमला जन्मांतरीचा।
 आतल्या आत मी वेढ्यातून सुटताना 
मग दिसतो आहे नूर नव्हता  नूर नव्हे  तेजाचा।।

   आपले डोळे उघडणारे हे सर्व रुबाया आहेत.आपल्याला सर्वसमावेशक शिकवण देणारे हे रुबाया आहेत.  

    संगीत क्षेत्र माझ्या पसंतीचे क्षेत्र आहे. त्यात मी रममाण होतो तो माझ्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे.  प्रत्येक स्वर असतात,  प्रत्येक स्वराशी मी सतत आणि पृथकपणे स्वतःला जोडतो आणि हे जुळणेच मला असीम आनंद देऊन जाते. संगीता तरीही ज्ञानाधिष्ठित आज मला शप्पथ सांगतो. ऊर्जेचा न संपणारा ठेवा बहाल करते आहे.  हे पुढील चार ओळींतून पंडित यशवंत देव अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात  .

वाहून घेतले आहे संगीताला 
निरखीत राहतो नित्य स्वरारंभाला।
 माझ्यातच आहे गायक आणि श्रोता 
नवनवी निर्मिती ध्यानाश्रित स्वरमाला ।। 
 
 पंडित यशवंत देव यांचं जीवन सुखकर केलं ते त्यांचे गुरू ओशो रजनीश यांनी  असे ते आवर्जून सांगतात.
   
    ओशो रजनीश यांना शेवटचा रुबाया पंडित यशवंत देव यांनी अर्पण केला आहे . 

    ते म्हणतात की 

          प्रिय ओशो !!

मज स्फुरले ते लिहून झाले आहे
 मनी आनंदाचे फूल उमलले आहे। 
मी तुमच्या चरणी अर्पण करतो त्याला
 ही तुमची किमया, तुमची करून आहे ।। 

     वरील ओळींतून पंडित यशवंत देव यांच्या मनात असलेली गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त होताना दिसते.  

     मनाला नवीन स्फूर्ती देणारे रुबाया पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकामध्ये खूप अप्रतिम रीतीने मांडलेले आहेत आणि त्यांचा अर्थ देखील त्यांनी अतिशय आकलन होईल असा  स्पष्ट केलेला आहे .

  मन :पूर्वक धन्यवाद!.!...!

 ( मनोज अग्रवाल )औरंगाबाद

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know