लेखक -सायमन सिनेक
प्रकाशक - मंजुळ पब्लिशिंग हाऊस
लेखमाला :भाग तिसरा
Why साठीच्या उपाययोजना:
माणसांना प्रेरित करण्यासाठी
साम -दाम-दंड-भेद वापरण्याऐवजी त्यांना आपण विश्वासू वाटलो पाहिजे आणि आपला ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्यावर त्यांचाही ठाम विश्वास असला पाहिजे
आणि ते कायम निष्ठेने आपल्या सोबत राहिले पाहिजे
निष्ठावान कर्मचारी, ग्राहक आणि निष्ठावंत कार्यकर्ते ही आपली संपत्ती आहे कारण ते इतर सर्व उपलब्ध असूनही ते आपल्याला निवडतील.
इतरांपेक्षा आपण वेगळे व्हावे असे वाटत असेल तर तसा वेगळा विचार करणेही गरजेचं आहे त्यासाठी #goldencircle उपयोगी ठरेल
का...कसे...काय हया तीन मार्गाने तयार होणारे सर्कल म्हणजेच गोल्डन सर्कल....
जिथे सुरुवात 'का' या प्रश्नाने होते
'का' म्हणजे कंपनी/आंदोलन/राजकारणी यांच्या अस्तित्वामागचा हेतू ,कारण, विश्वास ज्यापासून त्यांची सुरुवात झाली आहे.
'कसे ' हा दुसरा प्रश्न आपल्या हेतूला साध्य करण्याचे मार्ग दर्शवतात
'काय ' हा शेवटचा प्रश्न कंपनी/ आंदोलन यांचे अंतिम उत्पादन ठरवते.
हया गोल्डन सर्कलला जे फाँलो करतात त्यांना नवी अंतर्दृष्टी देते जी माणसाला आणि पर्यायाने व्यापक सुद्धा जगाला बदलतात.कारण त्यांना कुणाचीही कसलीच फसवणूक करायची, भूलथापा सांगायची गरज उरत नाही
ते फक्त आपण ती गोष्ट ' का' करतायत ऐवढेच आपल्या कर्मचारी आणि ग्राहकांना सांगतात ..काय आणि कसे हे सांगत नाही
आपल्या मूळ उद्देशाला कायम चिटकून राहतात
ते त्यांच्या जीवनाचे मिशन बनते
त्यांनी जनसेवेचा वसा घेतलेला असतो जो त्यांना आनंद ,समाधान देतो
त्यात काळानुरूप बदल करून निष्ठेने एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य पार पाडतात.
उदाहरणार्थ : अँपल कंपनीने आयफोन 13 हे नवीन व्हेरियंट बाजारात आणले पण त्याच्या जाहिराती साठी कुठल्याही सेलिब्रिटी / दरयुद्ध त्यांनी वापरले नाही
अँपलचे फोन महागडे आहेत आणि त्यांचे फीचर इतर फोन पेक्षा कमी आहेत
पण तरीही लोकांना तेच आवडतात आणि आता ते स्टेटस सिम्बाँल बनले आहेत.
कुठलेही आंदोलन, कंपनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय तसा सोपा नसतोच पण अतार्किक असूनही लोक तो घेतातच ना...?
कारण महान नेते दूरदृष्टीने भविष्यातील गोष्टी पाहू शकतात आणि त्यानुसार तर्कसुसंगत पाऊले टाकतात आणि यशस्वी होतात.
तो जोश, जूनून त्यांना त्याग करायला प्रेरित करतात, उत्कट ,उर्जावान आशावादी बनवतात.
कंपन्याचा Why व्यक्ती किंवा समूहाच्या जीवनानुभवांवरून जन्माला आलेला असतो
पण जसजशी कंपनी मोठी होऊ लागते तसतसा हा विचार मागे पडतो आणि फक्त आर्थिक उद्दिष्ट गाठण्यावरच भर दिला जातो.
तसाच इफेक्ट कंपनीचा संस्थापक मरण पावल्यानंतर ही होऊ शकतो कारण कंपनीचा उत्तराधिकारी कंपनीच्या उद्दिष्ट म्हणजेच 'का' बद्दल तेवढाच जागरूक नसतो.
Why स्पष्ट नसतो तेव्हा कंपन्यांना जाहिरातीची खूप गरज असते.
कारण मूल्य, सेवा आणि गुणवत्ता यांच्या बाबत स्पष्टता नसते.
आणि त्यावर कंपनीचा प्रचंड खर्च होतो.
जेव्हा जाहिराती गायब होतात तेव्हा उत्पादनही लोकांच्या विस्मरणात जाते.
Nilesh Shinde
समाप्त
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know