WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Saturday, October 9, 2021

तणावमुक्त व्हा..आनंदाने जगा

तणावमुक्त व्हा..आनंदाने जगा

लेखक : डॉ. दीपक केळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

तणावमुक्तीचे सूत्र

6.#आत्मविश्वास वाढीस प्राधान्य
      जेवढा आपला आत्मविश्वास जास्त तितके आपण ताणतणावर लवकर मात करू शकू.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही कृती महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात
▪️पहिल्या रांगेत बसणे
▪️नजरेला नजर भिडवून बोलणे
▪️25 टक्के जास्त वेगाने चालणे
▪️नेहमी हसतमुख राहणे
▪️हाती घेतलेले प्रत्येक काम तडीस नेणै
▪️कामात अग्रेसर राहून वेळेवर करणे

आत्मविश्वास वाढीस लागला की मनाला शक्तीशाली बनवण्याचे काही उपाय करणे आणखी फायदेशीर ठरते
▪️गोष्टी जास्त मनावर न घेण्याची वृत्ती बाळगा
▪️कुणाबद्दल द्वेष नाही आणि कुणाला अतिमहत्त्व द्यायचे नाही
▪️प्रत्येक गोष्टीची 100% जबाबदारी घ्यायची
▪️स्वतःला आणि इतरांना चुकांसाठी माफ करायला शिका.
▪️माणसांच्या ठिकाणी स्वतःला पाहून विचार करा

 मनाने  शक्तीशाली व्यक्ती तितकाच शक्तीशाली संवाद साधतात, सकारात्मक बोलतात, उत्साहाने बोलतात, बोलताना इतरांची शक्य तितकी प्रशंसा करतात, क्षुल्लक गोष्टी आणि क्षुल्लक व्यक्तींच्या नादी लागत नाही. नवनवे मित्र ,काम करण्याचे नवे मार्ग शोधत राहा.
चांगल्या सवयी अंगी बाणवत स्वतःला सुधारत राहा. विनाकारण होणारे वाद टाळा

7. #इच्छाशक्ती
जे काही आपण ठरवलयं ते करायचेच या प्रवृत्तीला इच्छाशक्ती म्हणतात 
इच्छाशक्ती जास्त असणाऱ्या व्यक्तींना ताण कमी असतो 
आणि इच्छाशक्तीसाठी 
▪️माणसाने स्वतः शी प्रामाणिक असले पाहिजे .
▪️आपल्या बाहयमन ,अंतर्मन यात सुसंवाद असला पाहिजे 
▪️आपल आत्मसन्मान आपणच जपला पाहिजे
▪️स्वतःला कधीच कमी लेखायचे नाही
▪️ आकर्षक दिसण्यावर भर देणं
▪️ आत्मस्तुती आणि परनिंदा टाळा
▪️इतरांसाठी त्यागाची तयारी ठेवा
▪️आत्मपरीक्षण करत स्वसुधारणा करण्याची जबाबदारी घ्या

9.#ध्येयनिश्चिती
व्यक्ती ध्येयहीन असला की तो कायम काहीतरी गमावत असल्याच्या तणावाखाली वावरतो त्यामुळे आयुष्यात काहीतरी ध्येय असावेच
▪️ध्येय निश्चित, वास्तववादी, साध्य करता येण्याजोगे, कालमर्यादा असलेले आणि मोजमाप करता येऊ शकेल असे असावे
▪️ध्येयासाठी मासिक,वार्षिक,पंचवार्षिक नियोजन असावे
▪️ध्येयपूर्तीसाठी माणसाने सतत कार्यरत असावे
▪️ध्येयनिश्चिती करण्यासाठी सदैव आत्मपरीक्षण तसेच सातत्याने
सल्लागाराची मदत घेणं इष्ट ठरते
▪️ध्येयाच्या मार्गावर सतत आपल्याला फीडबॅक मिळेल असे पार्टनर सोबत असावे
▪️ध्येयानुरूप सवयी अंगीकारा
▪️ध्येयाच्या मार्गावर स्वतःसाठी Penalty / Reward आपणठरवले पाहिजे

10.#व्हिज्युअलायझेशन
 कुठल्याही गोष्टी दोनदा होतात ...आधी मनात आणि मग प्रत्यक्षात 
त्यामुळे ज्या गोष्टी प्रत्यक्षात यावे असे वाटते त्यांना व्हिज्युअलायझ करण्याची मनाला सवय लावावी.
रोज सकाळी 20 मिनिटे त्यासाठी असावीच

11.#स्वसंमोहन
दररोज शवासनात झोपून 5-10 मिनिटे स्वसंमोहन करता आले पाहिजे
मंद प्रकाशात,शांत वातावरणात स्वतःच्या शरीराला शिथील करण्याची ही सवय तणावमुक्तीसाठी वरदानच ठरते.
संमोहनाच्या गाढ अवस्थेत पोहचल्यावर ज्या प्रसंगाची भिती वाटते तो प्रसंग बारीकसारीक तपशीलासह डोळयासमोर उभा करायचा आणि त्या प्रसंगाची मनातील भिती घालवायची हा एकूणच याचा उद्देश असतो, यातही तज्ञांची मदत तुम्ही घेऊ शकता
आणि स्वतःला Fobia आणि Anxiety पासून वाचवू शकता.

#ज्ञानयज्ञ
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know