लेखक : डॉ. दीपक केळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
तणावमुक्तीचे उपाय
1.#नियमित_व्यायाम
▪️रोज सकाळी वेगाने चालायची सवय लावा
▪️किमान वेग 3 KM/ 30 Minute
▪️वेगवेगळे मैदानी खेळ खेळू शकता
स्विमिंग, सायकलिंग इत्यादी
2.#सुयोग्य_आहार
▪️Good Food = Good Life हे सूत्र लक्षात ठेवा
▪️दोन वेळ पोटभर जेवण ज्यात पालेभाज्या आणि फळभाज्या हयांचा भरपूर समावेश असावा ,
▪️अतिगोड, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा
▪️अति प्रमाणात जेवणे सुद्धा हानिकारक असते
3. #नियमित_झोप
▪️रोज किमान 6-7 तासाची नियमित गाढ झोप असावी ,
▪️बेडरूममध्ये मंद प्रकाश, कमी आवाज, कमी तापमान असावे
▪️झोपण्यापूर्वी तीन तासापूर्वी हलका आहार घेतलेला असावा ,उपाशीपोटी झोपू नये
▪️झोपण्यापूर्वी मनं रिकामे हवे.
दिवसभर सक्रिय असेल तर माणसाला व्यवस्थित झोप लागतेच
▪️झोप येत नसेल तर दिवसभराच्या विचारांचे चिंतन आणि उद्याच्या योजना बनवा ,दीर्घश्वसन देखील फायदेशीर ठरते.
4. #तर्कसंगत_विचारांची_सवय
▪️परिस्थितीवर मार्ग काढण्याची तयारी असावी,
▪️लगेचच हार मानू नये
▪️लक्ष्यपूर्ती नाही झाली तरी निराश होऊ नये.
▪️लोकांचा विचार करून आपली मते ठरवू नये.
▪️सतत पैशांचा विचार करु नये.
गोष्टी मनाविरुद्ध झाली की चिडचिड करु नये.
▪️रोज स्वतः करता वेळ काढणे.
▪️कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार करा.
▪️एकदा निर्णय घेतला की वारंवांर बदलू नये
▪️गरजा आणि लालसा यातील फरक समजून घ्या आणि कुठेतरी समाधान मानायची सवय लावा.
▪️भूतकाळातील कटू आठवणी विसरा पण धडा मात्र लक्षात ठेवा
▪️आजचा दिवस उर्वरित आयुष्यातील पहिला दिवस समजा.
▪️ सुखदुःख हया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे दोन्ही मध्ये स्थिर राहण्याची सवय लावा
5.#योग्य_दृष्टिकोन
▪️आपल्या आत दडलेल्या महामानवाचा शोध घेणे आणि स्वतःच्या ज्ञान, बुद्धिमत्ता, पैसा हयांच्या वापराने आपण जीवनात काय करू शकतो हयावर विचार करून त्यानुसार कृतिकार्यक्रम ठरवा.
▪️रिकामा वेळ ताण कमी करण्यासाठी वापरा
▪️विचारपूर्वक ,जाणीवपूर्वक प्रतिक्रिया दया
▪️इतरांच्या मताचा आदर करा
▪️इतरांना दूषणे देऊन हाती काही लागत नाही त्यामुळे वेळोवेळी क्षमा करायची सवय लावा
▪️इतरांना लेबल (मूर्ख, नालायक, अहंकारी) लावायचा प्रयत्न करू नका.
▪️इतरांना बदलायचा प्रयत्न न करण्याआधी आधी स्वतः ला बदला
▪️इतरांशी आपली तुलना करण्यापेक्षा आपली भूतकाळातील स्वतः शी करणे
किंवा इतरांशी तुलना करायचीच असेल आपल्यापेक्षा कमजोर असलेल्या लोकांशी करा.
▪️कुठलीच समस्या नाही अशी एकच जागा असते ती म्हणजे "स्मशानभूमी"
त्यामुळे अडथळे समस्या यांना सामोरे जायची तयारी ठेवा आणि परमेश्वराला आपल्या समस्या सोडवण्यासाठी बुद्धी, शक्ती,ज्ञान याची मागणी करा
▪️जे घडतयं ते स्वीकारायची तयारी ठेवा
जे होऊ शकते ते करण्याची आणि जे होणारच नाही ते समजून घेण्याची तयारी ठेवा
▪️सत्यवचनी राहा आणि नैतिकतेने वागा जेणेकरुन कुणाचीच भीती राहणार नाही
▪️आनंद मिळवण्यासाठी खूप वेळ जातो पण मिळालेला आनंद फार अल्पकाळ टिकतो
▪️ आनंदी होण्याचा कुठलाही राजमार्ग नाही तसेच कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो त्यामुळे कायम आनंदी राहायला शिका.
▪️ स्वतः वर स्वतः च लादलेल्या मानसिक मर्यादा (चुकीचे विश्वास, भावनिक अडथळे, वर्तणूक) तोडायला प्राधान्य द्यावे
▪️महान विचार करून स्वतः मोठे बनण्याचा प्रयत्न करा
▪️नकारात्मक विचारांना सकारात्मक वाक्यांमध्ये बदला आणि नकारात्मक वाक्य बोललो की स्वतःला दंड करा
▪️जे होतेय ते चांगल्यासाठीच असा विचार ठेवा.
▪️ Yes i can हाच दृष्टिकोन डोळयासमोर ठेवा.
▪️मनात सकारात्मक विचारांचा कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक लेख ,पुस्तके वाचनास प्राधान्य द्या
5.#टाइम_मँनेजमेंट
▪️वेळेचे योग्य व्यवस्थापन होणे हे ताण कमी करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे
▪️आपला 80% वेळ महत्त्वाची पण बिगर तातडीची काम (नातेसंबंध, नव्या संधी,आरोग्य, मनोरंजन,व्यक्तिमत्त्व विकास) करण्यासाठी वापरावा.
तर 20% वेळ कमी महत्त्वाची पण तातडीची काम (वेळेची बंधन असलेली बिल, अपाँइटमेंट, उद्याची तयारी)
करण्यासाठी वापरावा
▪️रोज सकाळी दिवसातील कामांची डायरीत नोंद करावी आणि रात्री दिवसात झालेल्या कामांचे मूल्यमापन करावे आणि ज्या चूका झाल्यात त्या सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत
▪️कामे वेळच्या वेळी होण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा
▪️जी कामे आपण नाही केली तरी चालू शकतात ती इतरांवर सोपवावीत.
अपूर्ण
#ज्ञानयज्ञ
#वाचनवेडा
#मराठी
#तणावमुक्ती
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know