लेखक : डॉ. दीपक केळकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
लेखमाला - भाग पहिला
तणाव म्हणजे एखाद्या क्रियेवर शरीराने दिलेली प्रतिक्रिया ज्याचे आदेश मेंदूने दिलेले असतात पण ते व्यक्तीच्या विचारसरणी, वर्तणूक ,विश्वास हयावर अवलंबून असतात.
माणसाला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, नोकरीच्या, आजार, मृत्यू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता असतात ज्या तणावाला कारणीभूत ठरतात.
#ताणाची_कारणे
1.निष्क्रियता
2.भविष्यात काय होईल याची चिंता आणि
अनिश्चितता
3. अघटित होण्याची काल्पनिक भीती
4. कामातील, धंद्यातील स्पर्धा
5.इतरांविषयी मत्सर,अहंकार
6. कामाचा/ निर्णय घेण्याचा दबाव
7. इतरांकडून शारीरिक इजा करण्याची धमकी
8.मित्र,नातेवाईक, कुटुंबीयांकडून होणारे दुर्लक्ष
9. वेळेवर पोहचण्यासाठीची घाई
10. बदल्याची भावना
11.कमीपणाची भावना
12. कामातील विविध प्रकारचे ताण
#ताणामुळे_शरीरावर_होणारे_परिणाम
ताणामुळे पिटयुटरी ग्रंथी शरीरात ACTH हार्मोन्स स्त्रवतात तसेच अड्रेनल ग्रंथी CORTISOL हार्मोन्स स्त्रवतात
ज्यामुळे माणसाचा श्वासोच्छ्वास वाढतो, स्नायू ताठर बनतात, पचनक्रिया मंदावते, तोंडा कोरडं पडते , लघवी/संडासला जाण्याची इच्छा होते, हातापायाची थरथर जाणवते
#ताणामुळे_होणारे_आजार
श्वसनविकार ,पाठदुखी, डोकेदुखी, निद्रानाश, ह्रदयविकार, मनोविकार, वर्तणूकबदल, चिडचिडेपणा, विसरभोळेपणा, स्मृतीभ्रंश
#ताणाची_बाहय_लक्षणे
नख कुरतडणे, मुठी आवळणे,
दातओठ खाणे, कपाळावर आठ्या,
डोळे मिचकावत बोलणे, उसासे टाकत बोलणे ,
भरभर श्वास घेणे, सतत जांभया देणे,
खुर्चीवर बसल्यावर पाय हलवणे.
#ताण_आल्यावर_माणसे_काय_करतात
खूप थोडी माणसं ताणाचे व्यवस्थापन करत काम पूर्ण करतात
बाकीचे सर्वजण हाती घेतलेले काम थांबतात किंवा वेग मंदावतात , दिलेल्या कामापासून , घरापासून पळ काढतात,
व्यसनी बंडखोर बनतात
निराश उदास राहतात
शेवटचा पर्याय आत्महत्या करतात
अपूर्ण...
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know