लेखक - झिग झिगलर
अनुवाद - सायली गोडसे
प्रकाशक - मंजुल पब्लिशिंग
यशोशिखराकडे जाणारी पाचवी पायरी
#काम
जीवनात कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही आणि फुकट खायची सवय लागलेल्या माणसाला कधी इज्जत मिळत नाही.
आयता मिळालेला पैसा माणसाला बेफिकीर बनवतो, त्याला ऐषोआरामाची सवयं, वाईट व्यसनं आणि चुकीच्या संगती लावतो.माणूस पुरता उद्ध्वस्त होतो
आणि तसेही माणूस कामाने मरत नाही तर खायला मिळाले नाही म्हणून मरतो. त्यामुळे जीवनाला सुदैवी बनवण्यासाठी काम करा आणि जे करताय त्या कामावर मनापासून प्रेम करा.
आपली प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर कामातील आपली निष्ठा, जबाबदारी, उत्साह, वेळ हा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडा.
फक्त कामाचा देखावा करून यशस्वी कसे होता येईल?
कामापेक्षा सुट्टीची जास्त वाट पाहात असाल तर तुम्ही आयुष्याचा जुगार खेळत आहात.
ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात योग्य वापर करूनच माणूस आयुष्य गोड, अर्थपूर्ण, उपयुक्त बनवता येईल.
आपल्याला मिळालेले काम ही एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला यशस्वी बनवायची.
मिळालेल्या कामातून कमी उत्पन्न मिळत असेल तर शिक्षण ,कौशल्य विकास आणि गुंतवणूक यावर भर द्यायला हवा.
माणसाला नेहमी नोकरीकडून जास्त अपेक्षा असतात वेगवेगळ्या सुविधा ,गलेलठ्ठ पगार , फाँरेन टूर...इत्यादी अनेक अपेक्षा असतात
पण माणूस नेमके स्वतःकडून अपेक्षा ठेवत नाही.
महान व्यक्ती चिकाटी,समर्पण, प्रयत्न, घाम याच्या जिवावरच बनतात. ते जे काही करतात ते सर्वोत्तम क्षमतेने करतात,
अपयश आले तरीही निराश न होता जिद्दीने प्रयत्न करत राहतात.
खरेतर प्रत्येक माणसाकडे काहीतरी चांगले असतेच फक्त त्याने स्वतःला ओळखलेले नसते एकदा का ते Passion माणसाला सापडले की माणूस यशस्वी होतोच फक्त गरज असते ती तळमळीने योग्य काम करण्याची....
अपूर्ण
#वाचनवेडा
#seeyouatthetop
#मराठी
#selfhelp
#ज्ञानयज्ञ
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know