WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Saturday, October 9, 2021

मनं उलगडताना भाग 2

मनं उलगडताना
      लेखक: डॉ. विजया फडणीस
    प्रकाशन : रोहन प्रकाशन

लेखमाला: भाग दुसरा

आजच्या या धकाधकीच्या काळात आपण आपले आयुष्य साधे सरळ नाँर्मल जगणं ही सुद्धा मोठी अँचिव्हमेंट म्हणावी लागेल
शारीरिक व्याधी तर लवकर समजून येतात पण मनोविकार आणि मनोवृत्तीचे आजार मात्र लवकर कळून येत नाही कधी कळालेच तर दुर्लिक्षलेही जातात. आणि जेव्हा परिसीमा गाठली जाते तेव्हा शेवटी मानसतज्ञ गाठले जातात त्यातही कुजबूज आणि लोकापवादाची भीती असतेच.
कित्येकजण वास्तवाचा / परिस्थितीचा स्वीकार सुद्धा करू शकत नाही. अशावेळी घर अगदी सेट असते पण तरी मांइड सेट नसल्यामुळे माणसं अपसेट असतात.
भावनिक आधाराअभावी माणसं खचत असतात.
अशावेळेस स्वतःच्या भावनांची जाणीव करून देणाऱ्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करणाऱ्या समुपदेशकाची गरज भासते जो त्याच्या भावनांना नियंत्रित करायला शिकवेल त्याचबरोबर विचारांना विवेकाची जोड देईल. संतुलन पुनः प्राप्त करून देईल.

आपले मानसिक आरोग्य नाँर्मल नसल्याची लक्षणे
▪️वारंवार मूड आँफ आणि अस्वस्थता
▪️वारंवार नकारात्मक विचार आणि भावनांवर नियंत्रण नसणे
▪️विचार न करता कृती आणि नंतर स्वतःला दोष देणं
▪️एकटे वाटणे आणि तीव्र भीती वाटणे
▪️इतरांबद्दल संशय
▪️वैचारिक गोंधळ आणि त्रासदायक विचारात हरवून जाणे
▪️आत्मविश्वास गमावणे
▪️सहनशक्ती संपणे
▪️भ्रम, भास, मनाशी पुटपुटणे आणि हसणे
▪️निष्क्रियता /नैराश्याचे झटके
▪️स्वच्छतेचा अतिरेक

हया उपरोक्त लक्षणांपैकी काही जाणवत असेल तर स्वतःला तीन प्रश्न विचारा
▪️मी स्वतः स्वस्थ आहे का?
▪️माझ्या सहवासात इतरांना स्वस्थ वाटते का?
▪️माझ्यातील दोष उणीवा दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय का?
 हया तिन्ही प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आत्मपरीक्षण करून स्वतः ला जाणून घेण्याची गरज आहे (SWOT Analysis)
एकदा का स्वतःची ओळख पटली की आपण मार्गात येणाऱ्या अडथळयांवर मात करत सकारात्मक दृष्टिकोन व विवेकी विचार करुन स्वतःच्या क्षमतेप्रमाणे स्वतःच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करुन यशप्राप्ती करू शकतो

#भावनिक_आरोग्य
  वाढत्या वयाबरोबर वैचारिक आणि भावनिक प्रगल्भता ,परिपक्वता, भावनांवर नियंत्रण, स्थैर्य संयम यावरून माणसाचे भावनिक आरोग्य ठरते.
    लहानपणापासून वेगवेगळया सुखद भावना (प्रेम,आनंद, विश्वास) आणि दुखद भावना (क्रोध, भिती, चिंता ,नैराश्य) हयावरुन माणसाच्या मनात भावनाकोष तयार होतो. तो भावनाकोष जर संतुलित आणि समृद्ध असेल तर माणसाचे भावनिक आरोग्य उत्तम राहते आणि फ्रस्ट्रेशन टाँलरन्सही उत्तम राहते.
भावनिक दृष्ट्या सक्षम माणूसच स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण करतो ,स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवतो ,तारतम्याने विवेकपूर्ण विचार करतो, सर्जनशील बनतो.
डोळस श्रद्धा ठेवतो.
योग्य तिथे साहस करतो.
इतरांना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारून  त्यांचेही सहकार्य मिळवतो, कौशल्याने नात्यांशी समरस होत मधुर संबध बनवतो.
विचारांमध्ये लवचिकता आणून परिस्थिती नुसार आचरणात योग्य बदल करत संघर्ष टाळतो. सामाजिक बांधिलकी जपतो ,छंद जोपासतो  आणि ख-या अर्थाने उत्तम माणूस बनण्याकडे त्याचा प्रवास होतो.

अपूर्ण

#ज्ञानयज्ञ 
#वाचनवेडा
#मराठी
Nilesh Shinde 
#मन_उलगडताना

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know