WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Saturday, October 9, 2021

मनं उलगडताना

मनं उलगडताना
      लेखक: डॉ. विजया फडणीस
    प्रकाशन : रोहन प्रकाशन

लेखिकेविषयी:

लेखनाची मनस्वी आवड असलेल्या मानसतज्ञ ज्ञानतापसी म्हणून
ज्या ओळखल्या जातात अशा डॉ. विजया फडणीस....
ओघवत्या आणि सहज भाषेत अवघड मानसशास्त्रीय संकल्पना समर्पक केसेसच्या माध्यमातून समजावून सांगणार्या लेखिका.
माणसाचे वर्तन, व्यक्तिमत्त्व, स्वभाव, देहबोली यावरून मनोविकार आणि मनोवृत्ती ओळखून योग्य समुपदेशन करून कित्येकजणांच्या आयुष्याला आकार देणार्या  त्यांच्या कौशल्यविकासाला हातभार  लावण्यात त्यांचा हातखंडा आहे.
वयाची सत्तरी गाठून देखील विविध मंचावरून व्याखान ,मुलाखती, लेखमालिका यामार्फत सातत्याने व्यक्त होणाऱ्या समुपदेशक

पुस्तकाविषयी:
 मानसतज्ञ म्हणून सर्व वयोगटातील ,सर्व सामाजिक स्तरावरील खूप माणसांशी लेखिकेचा संपर्क आला.
मनुष्य स्वभावाचे विविध नमुने त्यांनी अनुभवले
साधे सरळ जीवन जगताना आलेल्या अडचणींचे व्यवस्थित समायोजन न झाल्याने निर्माण झालेल्या मनोवस्था आणि त्या योग्यवेळी न कळल्यामुळे मनोविकारात कशा परावर्तित होतात
तसेच विचार आणि भावना यावर नियंत्रण न ठेवल्याने चुकीच्या कृती कशा घडत जातात हे आपल्याला पुस्तकात वाचायला मिळते
अहंकार, दुराग्रह, हट्टीपणा यासारख्या नकारात्मक स्वभावविशेषांमुळे साधे साधे प्रश्न उग्र कसे बनतात आणि ते मानसशास्त्रीय तंत्राने कसे सोडवावे हयावर देखील सविस्तर मार्गदर्शन लेखिकेने केले आहे.
डिप्रेशन, डायव्होर्स, ड्रीम याबाबत विवेकनिष्ठ भावोपचार तसेच वास्तवनिष्ठ उपचारांनी, पुष्पौषधी याद्वारे समस्यांची सोडवणूक कशी करायची हयावर देखील योग्य मार्गदर्शन हया पुस्तकातून मिळेल.
   आपले आणि इतरांचे मन समजून घेत त्यांना उलगडण्यातून जीवनाला नवा अर्थ देण्याचा लेखिकेचा प्रयत्न निव्वळ आशयसंपन्न नाही तर स्तुत्यही आहे.

हया पुस्तकाविषयी अगदी थोडक्यात जाणून घेऊया आजपासून लेखमालिकेच्या रूपाने। 

So Stay Tuned.....

#ज्ञानयज्ञ
#वाचनवेडा
#मराठी 
#मनं_उलगडताना
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know