WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Friday, October 8, 2021

शिवनेत्र बहिर्जी

आमचे मित्र प्रेम धांडे यांची नवीन कादंबरी...
शिवनेत्र बहिर्जी...

बहिर्जी नाईक म्हटले तरी आज प्रत्येक जण या व्यक्तीकडे प्रचंड कुतूहलाने पाहतो. बहिर्जी म्हटले की असंख्य कथा, दंतकथा आणि त्यांच्या बुद्धीचातुर्याच्या गोष्टी आपल्या समोर येतात. आजवर फार कमी लोकांनी या व्यक्तीमत्वाचा शोध आणि वेध घेतला आहे. आपल्या समोर येणारी कथा खरी आहे की खोटी याचा आपण विचार पण करत नाही. चित्रपट व मालिका यांमध्ये दाखवलेले बहिर्जी कितीपत खरे आहेत याचा आपण विचार केला आहे का किंवा बहिर्जींबद्दल ऐतिहासिक माहिती कोठे मिळते हे पाहिले आहे का. आज हेच तुम्हाला मला सांगायचं आहे आणि निमित्त आहे आमचे मित्र प्रेम धांडे यांच्या शिवनेत्र बहिर्जी या कादंबरीचे...
          बहिर्जी यांचा पहिला ऐतिहासिक संदर्भ येतो तो म्हणजे सभासद बखरीमध्ये. या बखरीत बहिर्जी नाईक यांच्या विषयी दोन संदर्भ येतात ते महाराज आणि सैन्याने सुरत व जालनापूर (जालना) येथे केलेल्या स्वारीबद्दलचे ते कोणते ते पाहूयात. पहिला संदर्भ सांगतो ...तों इतक्यात सुरतेहून पाळती बहिरजी जासूद आला कीं, "सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सांपडेल." असे सांगितले. दुसरा संदर्भ आहे तो जालन्यावर केलेल्या स्वारीतला तो असा. ...हे वर्तमान कळतांच राजे तेथून निघाले (जालन्यावरुन) लष्कर राजे बहिरजी नायकांवर खुश झाले. त्यांजकडे फाजील होते ते माफ करुन आणखीही बक्षीस दिलें. आता ही बखर लिहिली तो काळ आहे छत्रपती राजाराम महाराजांचा. १६९७ साली त्यांच्या पदरी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली. म्हणजे शिवछत्रपतींच्या नंतर १७ वर्षांनी. बखरीत दाखवलेले प्रसंग त्याही अगोदरचे अर्थातच. बाकीचे मिळणारे संदर्भ समकालीन नाहीत. ज्या व्यक्तीविषयी एवढी कमी माहिती त्या व्यक्तीवर लेख देखील लिहिणे म्हणजे अवघड काम. 
          ऐतिहासिक पुरावे नसल्यावर बहिर्जी नाईक यांच्यावर संदर्भ ग्रंथ मानावे असे लिहिणे सध्यातरी अशक्य वाटते. मग पुरावे नाहीत म्हणून गप्प बसायचे का ? बहिर्जी नाईक यांच्याबद्दल लिखाण करायचे झाले तर दोनच गोष्टी आपल्याकडे शिल्लक राहतात त्या म्हणजे ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करून तर्कशास्त्र वापरून आणि कल्पना करुन लिहिणे. अहो पण शेवटी तर्काला आणि कल्पनेला ही कुठेतरी टेकू देण्यासाठी थोडासा पुरावा लागतो. इथेतर तसेही नाही. मग लिखाण करायचे कसे ? यासाठी आपल्याला मदत करतात त्या म्हणजे परंपरा, कला आणि संस्कृती. तर त्या कश्या ? आपण प्रत्येकाने बहुरुपी पाहिलेला आहे. वेगवेगळी सोंग आणणे. अनेक वेशभूषा करणे. हे बहुरुपी ज्या समाजातून येतात तो समाज म्हणजे डवरी गोसावी नावाचा समाज. बहुरुपी होऊन पोट भरणे हेच यांचे काम असे आपण मानतो. मागे एकदा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल झाला होता ज्यात एका व्यक्तीच्या कानात दुसरी व्यक्ती एक नाव सांगते तेच नाव ती व्यक्ती लांब उभे असलेल्या व्यक्तीला हातावरच्या इशाऱ्याने सांगते आणि क्षणार्धात ती व्यक्ती ते नाव अचूक ओळखते. या सांकेतिक भाषेला करपल्लवी असे म्हणतात. मग ही सांकेतिक भाषा मनोरंजनासाठी नव्हती हिचा वापरच मुळी होत असणार तो म्हणजे हेरांसाठी. कोणाला संशय येऊन लांबूनच इशारे करून शत्रूच्या गोटातील माहिती राजांना पुरवणे. आजही ही कला आणि भाषा जीवंत आहे. याला कुठल्या पुराव्यांची गरज नाही. या समाजातील लोक आजही सांगतात आम्ही शिवाजीराजांना मदत केली होती. एखादा म्हणेल ही भाषा शिकणे काय अवघड आहे कोणीही शिकेल. अहो शिकायला तर सध्या कोणीही सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकेल. पण हा काळ ३५० वर्षांपुर्वींचा आहे. असो.
         बहिर्जी नाईकांना आपण शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, शिवनेत्र म्हणतो. ही झाली अभिमानाची गोष्ट. पण हेर हे राजांचे नेत्र आहेत हे मी पुराव्यानिशी तुम्हाला सांगितले तर. आता पाहूयात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज काय म्हणतात ते....
सूक्ष्मसूत्रप्रचारेण पश्येद्विविधचेष्टितम् |
स्वपन्नपि हि जागतिं चारक्षुर्महीपती: || २१० ||
अर्थ - राजांचे डोळे म्हणजे गुप्तहेरच. त्यांच्यामार्फत गुप्तपणे रहस्यमय सूत्रे हलवून, त्या राजाला निरनिराळ्या कृत्यांची माहिती प्राप्त होत असते. तो राजा निजलेला असला तरी त्याला सर्व वार्ताविशेष माहीत होत असल्यामुळे, राजा हा अप्रत्यक्षपणे जागृत असतो.
( बुधभूषणम् अध्याय दुसरा श्लोक २१० मराठी अनुवाद रा.आ. कदम सर )
खुद्द छत्रपती हे सांगत आहेत. अश्याच प्रकारचे आणखी श्लोक बुधभूषण मध्ये आहेत. आता पुढील श्लोक पाहू.
कथिता: सततं राजन् राजानश्चारचक्षुष: |
स्वके देशे परे देशे ज्ञानशीलान्विचक्षणान् || २०४ ||
अर्थ - हे राजा असे नेहमीच सांगितले जाते की, राजाचे डोळे म्हणजे हेर. राजा हा हेररुपी डोळ्यांनी पाहतो. स्वतःच्या व दुसऱ्याच्या देशात ते त्याने नेमावेत. मात्र ते ज्ञानवान, शीलवान व अत्यंत हुशार असावेत.
( बुधभूषणम् अध्याय दुसरा श्लोक २०४ मराठी अनुवाद प्रभाकर ताकवले सर )
अगदी अश्या माणसाची निवड सुरत स्वारीच्यावेळी केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशीच कामगिरी बहिर्जी नाईकांनी शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत निभावली. पुरावे मिळत नसले म्हणून काय झाले अहो आजही त्यांच्याबद्दल माहिती मिळत नाही हाच त्यांच्या कार्याचा गौरव आहे. हा झाला बहिर्जींच्या चरित्राचा ऐतिहासिक मागोवा.
        आता ज्या साहित्यकृती निर्माण करायच्या त्या अश्याच पुराव्यांना धरुन त्या व्यक्तीमत्वाला कुठलाही डाग लागू न देता निर्माण कराव्या लागतील. अगदी असाच प्रयत्न आमचे मित्र प्रेम धांडे यांनी शिवनेत्र बहिर्जी या कादंबरीत केला आहे. कादंबरीमधला प्रत्येक शब्द तुम्हाला खिळवून ठेवेल. आज अमेरिका किंवा ज्या काही फॉरेन कंट्रीज आहेत त्यांनी काढलेले गुप्तचर यंत्रणांवरील सिनेमे, वेब सिरीज पाहण्यात आपण दंग राहतो. त्यावर चर्चा अश्या चलतात की जसे यातून कुठलेतरी तत्वज्ञान निर्माण होतेय आणि शेवटी असते काय नुसता कल्पनांचा खेळ. अहो आज या मातीतल्या वीरांनी यापेक्षाही कितीतरी मोठे काम केले आहे. आमचे मित्र प्रेम धांडे यांची ही कादंबरी अभ्यास आणि व्यासंगातून निर्माण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेली रणनिती आणि व्यूहरचना यामध्ये बहिर्जी नाईक यांचे प्रचंड सहकार्य झाले असणार. बहिर्जीचे कार्य एवढ्या शब्दात सांगणे कधीही कमीच आहे. परंतु प्रेम धांडे यांनी लिहिलेल्या कादंबरीतून तुम्हाला बराच अंदाज येईल. प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी एवढीच विनंती.....

कादंबरी साठी Pre-booking चालू झाली आहे.
बुकींगसाठी संपर्क - 9356844742
पुस्तकाची किंमत - 325

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know