"मूळ महाभारतावर आधारित!"
"धनंजय"
सर्वांचा तो लाडका!
सुंदर,सुडौल,सुरेख आणि सुशिल!
भिष्माचा तो लाडका पौत्र!पणतू!त्यांचे शस्त्रागार त्यांच्याशिवाय केवळ अर्जूनासाठी उघडले जाई!
तो गुरू द्रोणाचार्य यांचा लाडका शिष्य!सर्वात प्रिय!जे जे म्हणून त्यांना ज्ञात होते ते ते अर्जुनाला त्यांनी शिकवले!
पाच पती मधून द्रौपदीचे मन अर्जूनावर अधिक! त्यानेच तर तिचे स्वयंवर जिंकले होते!
कृष्णाचा तो तर सखाच! परम मित्र!
कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय! अर्जुन! धनंजय! असे कितीतरी नावे असलेला हा महावीर रणांगणावर जेंव्हा गर्भगळीत होऊन बसतो तेंव्हा जगातील सर्वश्रेष्ठ असे जीवनमुक्त करणारे तत्वज्ञान गीता भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात!
महाभारत हे कधीही न संपणारी एक अगाध इतिहासातील मोठी कथा!यात जितके खोल जाऊ तितके नवनवीन रत्न सापडतात! व्यासांनी जे लिहून ठेवले आहे ते केवळ अगम्य आहे!कित्येकांनी यावर भाष्य केलं.कित्येक पुस्तकं लिहिली गेली.एकापेक्षा एक!
असेच एक अतिशय सुंदर अशी कादंबरी अर्जुन हे पात्र समोर ठेवून राजेंद्र खेर यांनी "धनंजय"लिहिली!
कादंबरी: धनंजय
लेखक: राजेंद्र खेर
प्रकाशन: विहिंग प्रकाशन
पृष्ठ:६२५
मूल्य:५२५/
सवलत मूल्य:४८०/टपाल:४५/ एकूण:५२५/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता,पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.
फोन पे,गुगल पे:9421605019
रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी
अर्जुन सर्वांचा प्रिय!सर्वांचाच लाडका! पण अर्जुनाचा जीव कोणावर होता?
भीष्म, द्रोण,द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनावर विशेष प्रेम करत!यांचा अर्जुनवर अधिक लोभ होता! पण अर्जुनाचे कोणावर प्रेम होते?
अर्जुनाचे प्रेम कोणावर अधिक होते?द्रौपदी का सुभद्रा?अभिमन्यू का भगवान श्रीकृष्ण?कोणावर? कोणाला सोडताना त्याला अधिक वेदना झाल्या?अंतिम प्रवासाला निघाल्यावर देखील त्याने सोबत ठेवलेले "गांडिवधनुष्य" त्याला सर्वात प्रिय होते!
या कादंबरीची सुरुवातच मुळात उलटी झालेली आहे.सदेह स्वर्गात जाण्यासाठी निघालेल्या अर्जुनाला त्याचे जीवनचक्र आठवते आणि तो निवेदन करू लागतो! आपल्या जीवनातील एकेक प्रसंग उलगडू लागतो!जीवनाच्या अंतिम ट्प्यावर आलेला माणूस सर्व मोह माया पासून विमुक्त होऊन निर्मळ मनाने सांगतो! तसे अर्जुन अलिप्त होऊन स्वतःचेच जीवन निवेदन करू लागतो!
किंदम ऋषींच्या शापाने व्यथित झालेला सम्राट पंडू राजा निपुत्रिक म्हणून स्वर्गात जाऊ शकत नव्हता!पण त्याच शापाने आता तो आपल्या बायकोला स्पर्श ही करू शकत नव्हता.अन्यथा त्याचा मृत्यू अटळ होता. अशा विचित्र स्थितीत अडकलेल्या या राजाची सुटका पत्नी कुंतीदेवी करते.बालपणी दुर्वास ऋषी कडून मिळालेले वरदान वापरून एकेका देवतांचे स्मरण करून त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती होते!देवांचा राजा इंद्र यापासून हा आपला नायक अर्जुन कुंतिदेवी च्या पोटी येतो!
लेखकाने अतिशय प्रभावीपणे ही कादंबरी लिहिली आहे.कारण हे पात्र तसे फार प्रभावी!महाभारताचा सर्व बाज या पत्रामुळे उभा राहतो! दुर्योधन आणि त्याचे ९९ भाऊ एकट्या भीमाने मारले! पण दुर्योधनाला भीती मात्र कायम वाटतं राहिली ती अर्जुनाची!
कर्ण मृत्युंजय सारख्या महान कादंबरीतून जेंव्हा उभा राहिला तेंव्हा स्वाभाविकपणे अग्नितून निघालेल्या सोन्यासारखा वाचकाला दिसू लागला! त्याची प्रतिमा लेखकाच्या प्रतिभेतून अधिक उंचावली गेली!स्वाभाविकपणे अर्जुन श्रेष्ठ की कर्ण हा प्रश्न निर्माण होऊ लागला! या प्रश्नाचे उत्तर तर महाभारतात आहेच!पण कादंबरीतून हवे असेल तर "धनंजय" वाचली पाहिजे!
महाभारत हे अनेकवेळा चमत्कारांनी भरलेले वाटते!पण लेखकाने वास्तविकता काय असू शकते याचा विचार करून लिखाण केले आहे.बालपणी दुर्योधन आणि त्याच्या बंधूंनी भीमाला विष देऊन गंगेत फेकून दिले.या कामात कर्ण सहायक होता!भीम पाण्यात बुडून नागलोकात गेला असे आपण वाचलेले असेल.पण या कादंबरीत लेखक म्हणतो पाण्यात टाकताच भीमाला जाग आली.त्याने स्वतःला बंधंमुक्त केले.पण नंतर नाग जमातीच्या(नागा) लोकांनी त्यावर हल्ला केला.
कर्ण अर्जूनापेक्षा श्रेष्ठ होता हे दाखवण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा स्वाभाविकपणे अर्जुन लघु दाखवला जातो.लहान दाखवला जातो. मुळ महाभारतात नसलेला संदर्भ घुसाडला जातो.अनेक दुष्कर्मात बरबटलेला कर्ण त्या ठिकाणी नव्हता असे दाखवल्या जाते!...आणि अर्जुनाने निशस्त्र कर्णावर वार केला असे बोलल्या जाते!पण अर्जुन कितीतरी विशाल मनाचा आणि उद्दात्त विचारांचा एक महान योद्धा आहे!
आपल्या बंधूची सिंहासनावर प्रतिष्ठापना व्हावी,केवळ सत्तेसाठी आपल्याच अप्तांचे रक्त सांडू नये हे त्याला वाटणे दुबळेपणा नव्हे तर त्याग होता!त्याच्या बुध्दीला पटेल असा! जेंव्हा भगवान श्रीकृष्ण हा चुकीचा आहे म्हणले तेंव्हा त्यांच्याशी त्याने वाद ही घातला!तो अंकित नव्हता! तो स्वतंत्र होता!पण तो भक्त होता!
द्रौपदी स्वयंवर जिंकले! पण पत्नीची विभागणी करणारा हा महान योद्धा!ज्येष्ठ बंधूंच्या आज्ञेत राहणारा तो एक महान संयमी, धोरणी योद्धा होता!त्याचे पराक्रम वाचण्यासाठी या पेक्षा उत्तम कादंबरी दुसरी नाही!
टिप:लेखक: राजीव पुरुषोत्तम पटेल यांच्या१. पितामह मूल्य:३००/ आणि २. वैदिक(भार्गव परशुराम)मूल्य:३८०/ उपलब्ध आहेत!
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know