दादा कोंडके म्हणालं की फक्त द्विअर्थी ( Double meaning ) संवादाचे चित्रपट बनवून पैसा कमावणारा माणूस अशीच काही प्रतिमा त्यांची महाराष्ट्रभर आहे अगदी माझी सुद्धा हीच धारणा होती.
हे पुस्तकं वाचायला घेतल आणि हळू हळू दादांच्या विविध पैलूंची माहिती समोर आली.
सुरुवात दादांच्या बालपणा पासून, दादा आणि त्यांच्या मोठया भावात तब्बल २० वर्षांचे अंतर होते दादा अत्यंत मस्तीखोर असे होते शिक्षणात कधी त्यांच कधीच लक्ष लागलं नाही गणित तर त्यांचा सर्वात मोठा शत्रू.
त्यांच्या वडिलांचे आणि आईचे निधन झाल्यानंतर त्यांचे भाऊ आणि बहीण सुद्धा गावी निघून गेले दादा मात्र मुंबईतच राहिले आणि तेव्हापासूनच यांना एकटेपणाची सवय लागली.
दादा सेवा दलाशी संबंधित होते आणि त्यांच्यासाठी ती लोकनाट्य करत असे आणि अशातच त्यांनी स्वतःसाठी स्वतःचं पहिले लोकनाट्य " विच्छा माझी पुरी करा" ची निर्माती केली त्याला प्रचंड यश मिळाले आणि दादांचं नाव महाराष्ट्र भर झालं. कालांतराने दादांनी सेवादल पण सोडलं आणि विच्छा लक्ष केंद्रित केलं.
भालजी पेंढारकर, हे जर तर नसते दादा कोंडके हे नाव कदाचित इतकं प्रसिद्ध नसतं झालं. दादा त्यांना आपले बाबा आणि ते दादांना चिरंजीव मानायचे आणि संबोधायचे. विच्छा नंतर एखादा चित्रपट निर्माण करण्याचा नुसताच सल्ला नाही तर आत्मविश्वास आणि पाठबळ दिले. दादांना आपण चित्रपट काढू एवढा आत्मविश्वास आणि इच्छा पण नव्हती पण भालजी पेंढारकर यांनी त्यांना आत्मविश्वास आणि पाठबळ दिले आणि सोंगाड्याची निर्मिती झाली.
सोंगाड्या बनवून तयार झाला पण कुठलाही वितरक त्याला हात लावायला तयार नाही कारण हाफ चड्डी घेतलेला गावंढळ नायक लोकांना चालणार नाही अशी ठाम समजूत वितरकांची होती त्यामुळे तब्बल 30-32 वितरकांनी दादांना नकार दिला पण शेवटी एक वितरक ६०,००० रुपयांत तयार झाला पण दादांनी त्याला स्पष्ट नकार दिला कारण सिनेमा बनवण्यासाठी दादांनी तब्बल पावणेदोन लाख रुपये खर्च केले होते. बऱ्याच बऱ्याच जणांनी आणखी दादांच्या मोठ्या भावाने सुद्धा ती ऑफर दादांनी स्वीकारावी आणि चित्रपट निर्मितीचे धंदे बंद करावे म्हणून त्यांच्यावर खूप दबाव टाकला पण यावेळी त्यांच्या मदतीला आले ते भालजी पेंढारकर, त्यांनी दादांना स्वतः चित्रपट वितरण करण्याचा सल्ला दिला मग दादांनी मोठ्या मुश्कीलीने आणि हिमतीने सोंगाड्या प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाला प्रचंड असं यश लाभलं त्यानंतर मात्र दादांनी मागे वळून पाहिलेच नाही.
सोंगाड्या नंतर दादांची गाडी जी सुसाट सुटली ती थांबलीच नाही पण जसजस दादाने यश मिळत गेलं तस तस वादविवाद पण सुरू झाले त्यांनी ज्यांच्याबरोबर सुरुवातीला चित्रपट केले त्यांनी सगळ्यांनी दादांबरोबर काम करण्यास नंतर नकार दिला त्यामुळे दादा खूप निराश झाले होते पण भालजी पेंढारकर यांनी त्यांना धीर दिला आणि जो येईल त्याच्या सोबत नाही तर नवीन टीम बरोबर चित्रपट निर्मितीचा त्यांना त्यांनी सल्ला दिला आणि तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला.
त्यांचे गाजलेले वाद-विवाद म्हणजे पहिला निळू फुले आणि दुसरा अशोक सराफ यांच्या बरोबर. निळू फुले हे दादांचे खूप जुने मित्र आणि दादा त्याला नळ्या म्हणूनच बोलायचे पण पण त्यांनी दादांबरोबर काम करण्यास नकार का दिला शेवटपर्यंत दादांना उमगल नाही. दादांनी निळूभाऊंना खूप विनवणी केली पण त्यांनी काय त्याला दाद नाही धीली नाही मग दादांनी पण त्यांचा विचार सोडून दिला.
अशोक सराफ यांनी दादांबरोबर सर्वप्रथम पांडू हवलदार या सिनेमात काम केले मिया चित्रपट दादांनी अशोक सराफ यांना खुप काही शिकवले सुरुवातीला अशोक सराफ यांना दादांबरोबर सीन करताना खुप कठीण जात होते त्यामुळे त्यांनी दादांना मला एवढी मोठी भूमिका देऊ नका एखादी छोटी भूमिका दया अशी विनंती केली पण साधने त्यांना धीर दिला आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं अर्थात याचे श्रेय अशोक सराफ यांना सुद्धा जात.
पुढे आणखी दोन चित्रपट दादांबरोबर करून नंतरच मात्र अशोक सराफ यांनी दादांबरोबर चित्रपट करण्यास साफ नकार दिला त्याचे कारण दादांना समजेना परंतु त्या वेळी सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की स्वतः अशोक सराफ यांना चित्रपटात घेण्यास बंद केले. ती गोष्ट जो बाळासाहेब ठाकरे यांना समजत होती तेव्हा त्यांनी दादांना या विषयाबद्दल विचारलं तेव्हा दादांनी सांगते मी नाही त्यांनीच माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला पुढे एका कार्यक्रमात अशोक सराफ दादा आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र होते तेव्हा दादांनी बाळासाहेबांना अशोक सराफ याबद्दल विचारले सांगितले मग जेव्हा बाळासाहेबांनी अशोक सराफ यांना विचारले तेव्हा ते म्हणाले दादांनी मला विचारलं होते पण मी दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे चित्रपट करू शकलो नाही त्यानंतर मात्र दादा यांनी अशोक सराफ यांना विचारणे बंद केले.
दादांचे आणि बाळासाहेबांचे आणि पर्यायाने शिवसेनेचे खूप मधुर संबंध होते दादांनी शिवसेनेचा खुप प्रचार केला
दादांच्या चित्रपटात लोक काम करायला नकार द्यायचे त्याचा अजून एक मुख्य कारण दादा सांगतात ते, दादा सेटवर लोकांना दारू पिण्यासाठी आणि पत्ते खेळण्यासाठी सक्त मनाई करत असे कारण दादा स्वतः निर्व्यसनी होते त्यामुळे काही लोकांनी काम करण्यास नकार दिला होता.
दादांची वैयक्तिक आयुष्यात पण अशी शांतता अशी नव्हती दादांचे पहिले लग्न झाले ते नलिनी कोंडके हिच्याशी पण तिने दादांशी दगा केला त्यामुळे दादा तिच्याशी वेगळे झाले.
त्यानंतर दादांचे सुरु जुळले ते आशा भोसले यांच्याशी, आशा भोसले यांनी दादांना लग्नाची मागणी सुद्धा घातली होती परंतु त्यांचे बाबा माझे बालाजी पेंढारकर यांनी स्पष्ट शब्दात दादांना त्यांच्याशी लग्न करू नये असा सल्ला दिला केवळ बाबांनी सांगितल्यामुळे दादांनी आशाताईंनी लग्नाला नकार दिला पुढे असे त्यांनी आर डी बर्मन यांच्याशी विवाह केला. आशा भोसले यांच्याबरोबर प्रेम प्रकरण चालू असताना आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या मधल्या आपल्याला शीतयुद्ध मुळे दादांना दोघांची मर्जी सांभाळणे खूप अवघड जात होते.
पुढे लता मंगेशकर यांच्याशी त्याचे खूप मतभेद झाले लतादीदींनी भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ पैशांसाठी हडप केला असं दादांचा म्हणत होत तो स्टुडिओ मिळवण्यासाठी त्यांनी खूप खटपट केली पण शेवटी भालजी पेंढारकर आणि त्यांच्या मुलाला या स्टुडिओत काही रस राहिला नव्हता उलट भालजी पेंढारकर यांच्या मुलाने दादा या स्टुडिओत इतका रस घेत आहे म्हणून संशय व्यक्त केला त्यामुळे दादा नेते स्टुडिओचा नाद सोडून दिला.
त्यानंतर त्यांच्या जीवनात आली उषा चव्हाण त्यांनी दादांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते पण तिच्या विचित्र स्वभावामुळे दादा पूर्ती वैतागले होते
दादांना सगळ्यात मोठा मानसिक धक्का बसला तो त्याच्या पुतण्या विजय कोंडके यांच्या वागण्यामुळे. विजय कोंडके हा दादांच्या मोठ्या भावाचा मुलगा दादांना स्वतःचं असं मूलबाळ नव्हतं पण आपल्या मोठ्या भाऊ ची मुलं हीच आपली मुलं असे दादा मानत होते परंतु विजयने अन त्याच्या कुटुंबाने दादांना अंधारात ठेवून खूप खूप मोठे आर्थिक गैरव्यवहार केले हे दादांना अजिबात पटले नाही आणि दादाने त्यांच्या बरोबरचे संबंध तोडून टाकले.
दादांच्या शेवटच्या काळात त्यांच्याकडे प्रचंड अशी संपत्ती होती पण दादा हे एकटे एकटी पडले होते आपलं आपलं म्हणावं असं कोणीच जवळ नव्हत याची त्यांना खूप मोठी खंत होती.
प्रत्येकाने वेळ काढून वाचावा असा दादांचा प्रवास आहे, खुप काही सांगण्या सारखं आहे पण सगळंच शब्दात येत नाही🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know