◆ सगळं उलथवून टाकलं पाहिजे
नावातच संपूर्ण पुस्तकाचा सार दिसून येतो. एकंदरीत जे जे काही वाईट,चुकीचं,अन्यायकारक आहे,ते सर्व कशाचीच आणि कुणाचीच भीडभाड न बाळगता 'उलथवून टाकलं पाहिजे'!
लहानपणीच बापाच्या प्रेमाला पारख झालेलं लेकरू आई आणि बाप' या दोन्ही भूमिकेत राहून जगवल,मोठं केलं,घडवलं आणि या सर्व प्रवासात तावून-सुलाखून निघालेलं हे अस्सल सोनं, म्हणजे देवा,स्वतः अनुभवलेलं न लाजता,न घाबरता कागदावर रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे'
'चुंभळ' कविता वाचली की बाईपणाच्या वेदना काय असतात त्या दिसतात,
'मालक' कविता वाचली की शेतकरी आणि आयुष्यभर मालकासाठी शेतात राबणाऱ्या बैलाच अतूट नातं, डोळ्याच्या कडा ओल्या करत.
"सुडी पेटावी तशी जिथं सासुरवाशीण दिली जाते पेटवून
डोळे असून आंधळ्याचं सोंग घेतलेल्या वाडीवस्तीवर
तरीही साळसूदपणे तिच्या दशक्रियेची बुंदी खाल्ली जाते वर तोंड करून
अशा खोट्या साक्षीनं आदर्शपण अधोरेखित करू पाहणाऱ्या गावाला आदर्श कस म्हणायचं?"
आजही कित्येक सासुरवाशीण स्त्रिया बळी पडतात आणि समाज डोळे असून आंधळा होतो.
भाकड प्रश्न वाचताना
'जनावरे असतात हुशार पण नसतात स्वार्थी
त्यांच्या नावे खोलू नयेत कुणी सहानुभूतीची खाती' या ओळी मनाला भावतात,बेईमान होताना माणसाला जराही कशी लाज वाटत नाही???
एक पुरुष असूनही संवेदनशील मनाचा हळवा कोपरा म्हणजे देवा,
बाईच दुःख बाई सुद्धा समजू शकण्याची शाश्वती नाही.पण ते शब्दबद्ध करण्याचं धाडस एका पुरुषान करावं,हे कौतुकास्पदच!
"ती जगत राहिली वाट्याला आलेला नवरा सोबत घेऊन
नवरा मेल्यावरही शिजत राहिली घुगऱ्यासारखीच
तरी बायकोचच काहीतरी चुकत असलं
असच म्हणत राहिली गावातील माणस"
अशी माणसं उलथवून टाकली पाहिजेत!
पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणारी जमात आजही अन्याय करणारी माणस आपली असतील तर मुर्दाडासारखी पाहात राहतात,खर तर तीच गुलाम असतात.
'स्त्री' काय असते???हे फार मोजक्या शब्दांत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय,
"ज्या मनगटी नांदते,त्या मंनगटाशी इमान राखते बांगडी"
हे ज्याला कळलं,तोच संवेदनशील माणूस!!!
एकंदरीत,संपूर्ण कवितासंग्रह हा शेतकरी वर्गाच्या व्यथा,स्त्री मनाच्या वेदना,पुरोगामीत्वाच्या बुरख्याआड लपलेले खरे चेहरे या सर्व बाबी उघड करणारा आहे.
म्हणून ज्यांने ज्याने हा कवितासंग्रह वाचावा, त्याला त्याला अन्याया विरुद्ध उभं राहून चुकीच्या,खोट्या,बेगडी आणी अन्यायकारक अशा सर्व प्रवृत्तींना 'उलथवून' टाकण्याचं बळ मिळाल्याशिवाय रहाणार नाही!
देवा,तुला भरभरून शुभेच्छा आणि अभिनंदन
एक वाचक
सौ.सुनंदा टिळक भोस
#सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #सगळं_उलथवून_टाकलं_पाहिजे
पुतस्कसाठी संपर्क
9890697098
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know